Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
एलआयसी’त २४ वर्षानंतर मेगाभरती; ८००० पदे भरणार
अर्थव्यवस्थेत मरगळ आल्यामुळे रोजगाराच्या संधी घटत असतानाच आता भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) प्रचंड मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. ‘एलआयसी’कडून लवकरच ‘असिस्टंट क्लार्क’ या पदासाठी मेगा भरती करण्यात येणार आहे. या भरतीच्या माध्यमातून एलआयसीच्या देशभरातील विविध कार्यालयांमधील तब्बल ८ हजार जागा भरण्यात येतील.
6 वर्षांपूर्वी -
हार्ड लँडिंग'नंतर देखील चंद्रावर 'विक्रम' सुरक्षित
मोहिमेत अखेरच्या टप्प्यात विक्रम लँडरचा नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला होता. त्यामुळे लँडरचे नेमके काय झाले? हा प्रश्न अनेकांना पडला होता. पण आता इस्रोकडून लँडरबद्दल एक चांगली बातमी समोर आली आहे. विक्रमने चंद्रावर हार्ड लँडिंग केले असले तरी विक्रम लँडरचे काहीही नुकसान झालले नाही. ऑर्बिटरच्या कॅमेऱ्याने जे छायाचित्र पाठवलं आहे, त्यानुसार कळतं की विक्रम नियोजित स्थळाजवळ उभं आहे. ते तुटलेलं नाही.’
6 वर्षांपूर्वी -
ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांचं निधन
ज्येष्ठ वकील आणि माजी कायदामंत्री राम जेठमलानी यांचं रविवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. देशातील नामवंत वकील म्हणून जेठमलानी यांची ओळख होती. मागील दोन आठवड्यांपासून ते आजारी होते. नवी दिल्लीतील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जेठमलानी यांच्या पश्चात मुलगा वकील महेश जेठमलानी आणि मुलगी असा परिवार असून, मुलगी अमेरिकेत राहते. त्यांची दुसरी मुलगी राणी जेठमलानी यांचे यापूर्वीच निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने ज्येष्ठ विधिज्ज्ञ आणि कायद्याचा अभ्यासक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
6 वर्षांपूर्वी -
चांद्रयान २: इतिहास घडणार! आज मध्यरात्री चंद्रावर फडकणार तिरंगा
चंद्रस्पर्शासाठी चांद्रयानाप्रमाणेच सारे देशवासियही आतुर झाले आहेत. चांद्रयान-२ चे लँडर असलेले ‘विक्रम’ चांद्रभूमीवर उतरण्यासाठी उद्या, शनिवारपासून पूर्वप्रयत्न सुरू करणार आहे. चंद्रावर सुरक्षितरीत्या उतरण्यासाठी या मोहिमेतील हा सर्वात अखेरचा टप्पा असणार आहे. याची सुरुवात शनिवारी पहाटे होणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
राष्ट्रतपस्वी अटल बिहारी वाजपेयी यांची प्रथम पुण्यतिथी
माजी पंतप्रधान आणि भाजपाचे दिग्गज नेते अटल बिहारी वाजपेयी यांची आज पहिली पुण्यतिथी आहे. त्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीतील अटल स्मृती स्थळावर अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. वाजपेयींच्या ‘सदैव अटल’ स्मृती स्थळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांनी वाजपेयींना श्रद्धांजली वाहिली. वाजपेयींनी १६ ऑगस्ट २०१८ ला अखेरचा श्वास घेतला. त्याआधी बराच कालावधीपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळे ते सार्वजनिक जीवनात सक्रीय नव्हते.
6 वर्षांपूर्वी -
७३ वा स्वातंत्र्य दिन देशभरात उत्साहात साजरा
७३ वा स्वातंत्र्य दिन देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. राजधानी दिल्लीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादावर भाष्य केले. दहशतवाद पोसणाऱ्यांचा भारताकडून पर्दाफाश होत आहे. आज केवळ भारतच नाही तर श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान या देशांनाही दहशतवादाचा सामना करावा लागत आहे. आम्ही दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांविरोधात लढत आहोत.
6 वर्षांपूर्वी -
या गोष्टींचा उल्लेख इन्कम टॅक्स रिटर्न'मध्ये केला नाही तर दंड भरावा लागणार.
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी ३१ ऑगस्ट हि शेवटची तारीख आहे. या महिन्यात तो काहीही करून तो भरावाच लागेल. पण त्या घाईत जर काही गोष्टींचा उल्लेख करणे राहून गेले तर तुम्ही गोत्यात येऊ शकता. हल्ली अनेक जण म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असतात. एका म्युच्युअल फंडातून दुसरीकडे जाताना म्युच्युअल फंडातून जे पैसे मिळतात ते दाखवणं राहून जात याचा उल्लेख कर्ण आवश्यक आहे. अन्यथा आयकर विभागाकडून तुम्हाला दंड आकारला जाऊ शकतो.
6 वर्षांपूर्वी -
BLOG : मुलींचं लग्नाचं वय आणि भारतीय मानसिकता...
लग्नसंस्था ही प्रत्येकाच्या आयुष्यात घडणारी फार महत्वाची घटना असते, केवळ वधुवरांसाठीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांसाठीदेखील ही घटना तितकीच महत्वाची असते. म्हणूनच पाल्याने वयाची विशी-पंचविशी ओलांडली कि त्याच्या लग्नाविषयीचे विचार आपसूकच पालकांच्या मनात घोळायला सुरुवात होते. पण जर मुलगी असेल तर मात्र मुलगी वयात आली कि तिच्या लग्नाविषयी घरात चर्चा व्हायला सुरुवात होते. मग मुलीला स्वयंपाक करता येणं किती आवश्यक आहे इथपासून ते सासरी गेल्यानंतर सासूशी कस वागायचं, सासरी कसं सांभाळून घ्यायचं इथपर्यंत त्या चर्चेला उधाण येतं.
6 वर्षांपूर्वी -
पत्रकार रवीश कुमार यांना आंतरराष्ट्रीय ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कार जाहीर
देशातील जनसामान्यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडणारे पत्रकार रवीश कुमार यांना सर्वोच्च रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. रवीश कुमार यांच्यासह म्यानमारचे को स्वे विन, थायलँडच्या अंगखाना नीलापजीत आणि फिलिपिन्सचे रेमुंडो पुजांते कैयाब हे यंदा पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
झोमॅटो'चा झणझणीत रिप्लाय; पण देशातील स्टार्टअप्स देखील धर्माच्या कचाट्यात
मंगळवारी ३० जुलै रोजी जबलपूर येथे राहणाऱ्या अमित शुक्ला यांनी झोमॅटो वरून डिलिव्हरी मागवली पण त्या डिलिव्हरी ला जेव्हा डिलिव्हरी बॉय ऍलोट झाला तेव्हा मात्र त्यांनी ती डिलिव्हरी कॅन्सल केली. डिलिव्हरी कॅन्सल करण्या मागचं कारण म्हणजे त्यांचं असं मत होतं कि त्याला एक हिंदू नसून मुस्लिम डिलिव्हरी बॉय ऍलोट करण्यात आला जे त्याला मान्य न्हवते.
6 वर्षांपूर्वी -
पत्रात ते म्हणाले! मी एक व्यावसायिक म्हणून अपयशी ठरलो आहे, मला माफ करा!
गेले दोन दिवस बेपत्ता असलेले ‘सीसीडी’चे मालक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा धक्कादायक मृत्यू झाला आहे. सिद्धार्थ यांनी मंगळुरु येथील नेत्रावती नदीत आत्महत्या केली असल्याचं सांगितलं आहे. आज नदीत त्यांचा मृतदेह सापडला आहे. यावरून आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच सिद्धार्थ यांनी एक पत्र देखील लिहिले होते.
6 वर्षांपूर्वी -
अॅमेझॉन करणार आता फूड डिलीव्हरी!
मध्यंतरीच्या काळात भारतात विविध फूड डीलेव्हरी अँप्सने जोरदार प्रगती केली. स्विगी, झोमॅटो, सारख्या अँप्सने कित्येकांची मने जिंकली. ह्या फूड डीलेव्हरी अँप्सच्या स्पर्धेत आता अजून एक स्पर्धक येतो आहे तो म्हणजे अॅमेझॉन. अॅमेझॉनने त्यांच्या ह्या नवीन उद्योगाची सुरुवात ही सप्टेंबर पासून करायची असे ठरविले असून, उबरने २०१७ साली सुरु केलेल्या उबर इट्स ह्या फूड डीलेव्हरी सर्व्हिसला विकत घेण्याच्या विचारात आहे.
6 वर्षांपूर्वी -
‘कॅफे कॉफी डे’ चे मालक व्ही. जी. सिद्धार्थ अचानक बेपत्ता
देशातील सर्वात मोठे कॉफी रेस्टॉरंट ‘कॅफे कॉफी डे’ अर्थात, ‘सीसीडी’चे संस्थापक व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांचे जावई व्ही. जी. सिद्धार्थ हे अचानक बेपत्ता झाले आहेत. सिद्धार्थ यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मंगळुरू पोलिसांनी तातडीनं त्यांचा शोध सुरू केला असून सर्व शक्यता तपासून पाहिल्या जात आहेत.
6 वर्षांपूर्वी -
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा आज स्मृतिदिन
अब्दुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम (१५ ऑक्टोबर १९३१- २७ जुलै २०१५) यांचा आज चौथा स्मृतिदिन. वैज्ञानिक, संशोधक, शिक्षक आणि भारताचे राष्ट्रपती ह्या सर्व पदांवर कार्य केलेले एक थोर भारतीय म्हणजे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम. त्यांच्या इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने कार्य करण्याच्या सवयीमुळे ते लोकांचे राष्ट्रपती म्हणून प्रसिद्ध झाले.
6 वर्षांपूर्वी -
मिशन चांद्रयान २: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; वैज्ञानिकांची 'उत्तुंग' भरारी
भारताची चांद्रयान-१ ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर ‘चांद्रयान-२’ या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमेसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने अर्थात (इस्रो) सज्ज झाली आहे. ‘चांद्रयान-२’ मोहिमेवर जाणाऱ्या ‘जीएसएलव्ही-मार्क-३’ या शक्तिशाली रॉकेटचे सोमवारी दुपारी २.४३ वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून प्रक्षेपण होणार होते.
6 वर्षांपूर्वी -
अभिमानास्पद! गोल्डन गर्ल हिमा दासने जिंकले ५ सुवर्णपदक
झेक रिपब्लिकमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत गोल्डन गर्ल आणि धावपटू हिमा दासने सुवर्ण धमाकाच केला आणि देशाची शान जगभरात उंचावली आहे. कारण आता अजून एका सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. हिमाने आता ४०० मीटर धावण्याच्या प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं आहे. यापूर्वी हिमाने ४ सुवर्ण पटकावली आहेत. त्यामुळे आता तिच्या खात्यात एकूण ५ सुवर्ण पदकं झाली आहेत. भारतासाठी अशी भव्य कामगिरी करणारी ती पहिलीच धावपटू ठरली आहे.
6 वर्षांपूर्वी -
कुलभूषण जाधव यांचा खटला लढण्यासाठी हरीश साळवेंनी केवळ १ रुपया आकारला
देशातील सर्वाधिक चर्चेचा ठरलेला विषय म्हणजे कुलभूषण जाधव यांचा सुरु असलेला आंतरराष्ट्रीय न्यायालयातील खटला, ज्यावर संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलं होतं. कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयात बुधवारी भारताला मोठे यश प्राप्त झालं. हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली जाधव यांना पाकिस्तानच्या न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचा फेरविचार करावा आणि त्यांना राजनैतिक संपर्काची अनुमती द्यावी, असे निर्देश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला दिले.
6 वर्षांपूर्वी -
युपी'मध्ये पावसामुळे १५ जणांचा मृत्यू तर १३३ इमारती कोसळल्या
युपी’मध्ये पावसाचा हाहाकार मजल्याचे दिसत आहे. कारण सलग तीन दिवस धोधो कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे वृत्त आहे. राज्यातील तब्बल १४ जिल्ह्यांना या जोरदार पावसाचा तडाखा बसला आहे. जोरदार वादळी वारा आणि वीज कोसळल्यामुळे आतापर्यंत एकूण १५ जणांचा दर्दैवि मृत्यू झाला आहेत तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने नजीकच्या इस्पितळात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर योग्यते उपचार सुरू आहेत.
6 वर्षांपूर्वी -
भारताने १० वर्षात २७ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर आणलं: संयुक्त राष्ट्राकडून कौतुक
भारतात नेहमीच श्रीमंत आणि गरीब यांच्यामध्ये दरी वाढत असून, देशाच्या संपत्तीचा सर्वात मोठा हिस्सा हा मूठभर श्रीमंतांकडे आहे अशी बोंब अनेकांनी केली तरी काही संस्थांना ते मान्य नाही असंच म्हणावं लागेल. सदर रिपोर्ट जाहीर करण्यापूर्वी नक्की कोणते मापदंड लावण्यात आले ते समजायला मार्ग नाही. देशातील ग्रामीण पट्यातील दारिद्राची परिस्थिती अत्यंत विदारक असताना त्याला छेद देणारा अहवाल सध्या प्रसिद्ध झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
लखनऊ-दिल्ली मार्गावर भीषण अपघातात बस नाल्यात कोसळून २९ जणांचा मृत्यू
लऊनऊ-दिल्ली मार्गावर बसचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत २९ जणांचा जागीत मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. ही बस सोमवारी सकाळी यमुना एक्सप्रेसवर नाल्यात कोसळली. उत्तर प्रदेश पोलिसांनी ट्विट करून अधिकृत माहिती दिली आहे.
6 वर्षांपूर्वी