Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
चीनकडून पँगाँगमध्ये हेलिपॅडची उभारणी, दक्षिण किनाऱ्यावर सैन्याची जमवाजमव
चीनच्या मुद्द्यावरुन सरकारवर एकापाठोपाठ एक प्रश्न उपस्थित करणाऱ्या राहुल गांधींनी अनेक गंभीर आरोप केंद्र सरकारवर केले होते. आपलं सैन्य चीन सीमेवर विनाशस्त्र का पाठवलं गेलं. हा प्रश्न निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांच्या मुलाखतीचा हवाला देत राहुल गांधींनी उपस्थित केला होता. त्यावरुन भाजपनंही जोरदार पलटवार केला होता.
5 वर्षांपूर्वी -
आता पूर्व दौलत बेग ओल्डीमध्ये चीनकडून सैन्याची जुळवाजुळव करण्यास सुरूवात
पूर्व लडाखमधील गलवान व्हॅलीत निर्माण झालेला तणाव निवळण्याची चिन्ह असतानाच चीनच्या कुरापती पुन्हा सुरू झाल्याची समोर येत आहे. पूर्व लडाखमधील काही नव्या भागात चीनच्या बाजूने जमवाजमव सुरू झाली असून, त्यामुळे पीपल्स लिबरेशन आर्मीकडून भारतासाठी सामरिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या दौलत बेग ओल्डी आणि डेपसांग या भागात मोर्चा उघडण्यात येण्याची शक्यता बळावली आहे.
5 वर्षांपूर्वी -
चीन विश्वासघात करतोय? पँगोंग त्सो तलाव परिसरात चिनी सैन्य तैनात
नियंत्रण रेषेजवळ भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेली संघर्षाची स्थिती निवळण्याचे संकेत मिळाले होते. काल चीनच्या हद्दीतील चुशुल-मोल्डो येथे दोन्ही देशांच्या वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांमध्ये उच्चस्तरीय बैठक झाली होती.
5 वर्षांपूर्वी -
भारत-चीन नियंत्रण रेषेवरून दोन्ही देशांचे सैन्य मागे घेण्यावर सकारात्मक चर्चा
नियंत्रण रेषेजवळ भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेली संघर्षाची स्थिती निवळण्याचे संकेत मिळत आहेत. काल चीनच्या हद्दीतील चुशुल-मोल्डो येथे दोन्ही देशांच्या वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांमध्ये उच्चस्तरीय बैठक झाली.
5 वर्षांपूर्वी -
भारतीय सैन्याकडून चीनचा कमांडिंग ऑफिसर ठार झाल्याचं चीनकडून मान्य
६ जूनला झालेल्या बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी होतेय का, हे पाहण्यासाठी भारतीय जवानांची तुकडी १५ जूनला गलवान भागात गेली होती. बैठकीत ठरल्याप्रमाणे चिनी सैन्यानं या भागातील पोस्ट हटवावी, असं आवाहन जवानांकडून करण्यात आलं. मात्र चिनी सैन्यानं कर्नल संतोष बाबू यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर भारतीय जवान संतापले आणि त्यांनी चिनी सैन्याला झोडपून काढण्यास सुरुवात केली होती.
5 वर्षांपूर्वी -
चीन अभ्यास करून मैदानात, आता भारताविरुद्ध औषधांच्या बाजापेठेसंबंधित अस्त्राचा वापर
गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैन्यामध्ये सुरु असलेल्या संघर्षाचे पडसाद संपूर्ण देशभरात पहायला मिळत आहेत. २० भारतीय जवानांना या संघर्षात हौतात्म्य पत्करावं लागलं. यानंतर संपूर्ण देशभरात चिनी मालावर बहिष्कार घालण्याची मागणी सुरु झाली. अनेक शहरातील बाजारपेठांमध्ये दुकानदारांनी चिनी माल न विकण्याचा निर्णय घेतला.
5 वर्षांपूर्वी -
चीन दगाबाजीच्या तयारीत? लडाख ते अरुणाचल प्रदेशपर्यंतच्या सीमेवर चीनची लढाऊ विमानं सज्ज
गेल्या आठवड्यात गलवान भागात भारत आणि चीनच्या जवानांमध्ये झटापट झाल्यानंतर सीमावर्ती भागातील हालचाली वाढल्या आहेत. मोदी सरकारनं लष्कराला फ्री हँड दिला आहे. त्यामुळे लष्कराला अधिकचे अधिकार मिळाले आहेत. लेहमध्ये मिग-२९ विमानं आणि अपाचे हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आली आहेत. यानंतर चिनी सैन्याकडूनही जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. लडाखपासून ते अरुणाचल प्रदेशपर्यंतच्या सीमेवर चीननं लढाऊ विमानं सज्ज ठेवली आहेत.
5 वर्षांपूर्वी -
Fact Check: ती चिमुकली शहीद कर्नल संतोष बाबू यांची मुलगी नव्हे, अभाविप’च्या कार्यकर्त्याची बहीण
भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले. यामध्ये कर्नल संतोष बाबू यांचादेखील समावेश होता. सोशल मीडियावर सध्या एका लहान मुलगी संतोष बाबू यांच्या फोटोसमोर श्रद्धांजली वाहतानाचा फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, ही शहीद कर्नल बाबू यांचीच मुलगी आहे. फॅक्ट चेकमध्ये याची पडताळणी केली असता, हा दावा खोटा असल्याच समोर आले.
5 वर्षांपूर्वी -
भारतात राष्ट्रवादाला खतपाणी घालणाऱ्यांमुळे भारतीय फसणार नाहीत हीच अपेक्षा - ग्लोबल टाइम्स
पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्याचे चित्र अद्याप स्पष्ट नाही. मात्र, एक गोष्ट निश्चित, की चिनी सैनिकांनी पेंगाँग त्सो जवळ 8 किलोमीटर भागावर कब्जा केला आहे. मेच्या सुरुवातीला येथे पाऊल ठेवलेल्या चीनने डिफेन्स स्ट्रक्चर्स आणि बंकर्सदेखील तयार केले आहेत. सरोवराच्या उत्तरेकडील काठावर फिंगर 4 ते 8 दरम्यानच्या ऊंच भागांवर पिपल्स लिब्रेशन आर्मीच्या (PLA) सैनिकांनी कब्बजा केला आहे. गलवान घाटी आणि हॉट स्प्रिंग्ससंदर्भात भारत चीन दरम्यान बोलने होत असतानाच, चीनने येथे आपल्या हालचाली वाढवल्याचे समजते.
5 वर्षांपूर्वी -
भारताच्या तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांसोबत संरक्षण मंत्र्यांची तातडीची उच्चस्तरीय बैठक
लडाखमध्ये भारत चीन सीमेलग चिनी हवाईदलाची हालचाल वाढल्याचे दिसून आले आहे. यानंतर, भारतीय हवाई दलानेही आपल्या फॉरवर्ड बेसेसवर लढाऊ विमानं तैनात केली आहेत. आयएएफ प्रमुख एअर चिफ मार्शल राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी शनिवारी ही माहिती दिली. ते येथील एअरफोर्स अकॅडमीच्या कम्बाइन्ड ग्रॅज्युएशन डे परेड निमित्त आले होते.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO - चीनकडून भारताला थेट हायड्रोजन बॉम्बची भीती दाखवायला सुरुवात
लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये असणाऱ्या भागात १५-१६ जूनला रात्री भारत आणि china चीन या दोन्ही राष्ट्रांच्या सैन्यामध्ये हिंसक झडप झाली. हे स्वरुप इतकं हिंसक होतं की यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले. शेजारी राष्ट्राच्या अर्थात चीनच्या सैन्यातील जवळपास ४३ जवानांनाही यात प्राण गमवावे लागले. सीमावादाच्या या मुद्द्याला मिळालेलं चिंता वाढवणारं हे वळण पाहता चीननं कांगावा करण्यासही सुरुवात केली.
5 वर्षांपूर्वी