Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
IND Vs AUS: चौथा दिवशी भारताच्या विजयात पावसाचा अडथळा
भारत विरुद्ध कांगारूंच्या चौथ्या कसोटी सामन्यात पावसाचा व्यत्यय आला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये मालिका भारतीय टीमने जळपास जिंकली आहे. दरम्यान, या गोष्टीवर उद्या शिक्कामोर्तब होईल. परंतु, ते होण्यापूर्वी विराटसेनेने रविवारीच कांगारुंची लक्तर वेशीवर टांगली आहेत.
6 वर्षांपूर्वी -
IND Vs AUS : पंत १५९ नाबाद, तर जाडेजा ८१ धावा, भारताचा पहिला डाव घोषित
कांगारूंविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामान्यांच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ करताना भारताने दमदार फलंदाजी करत पहिला डाव ७ बाद ६२२ भावांवर घोषित केला आहे. रिषभ पंत, चेतेश्वर पुजारा आणि रवींद्र जाडेजा यांच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने ६०० धावांचा टप्पा ओलांडला आहे आणि कांगारुंपुढे मोठं लक्ष उभं केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
Ind vs Aus 4th Test: चेतेश्वर पुजाराचे धडाकेबाज शतक
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या चौथ्या टेस्ट मॅचचा आज पहिला दिवस आहे. दरम्यान, कांगारूंविरुद्धच्या ऐतिहासिक जेतेपदासाठी सज्ज असलेला विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या आणि शेवटच्या सामन्यात भारतीय संघ सुस्थितीत आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
IND Vs AUS 4th Test : विराट कोहली माघारी, भारताला तिसरा धक्का
कांगारूंविरुद्ध त्यांच्याच भूमीत ऐतिहासिक जेतेपदासाठी सज्ज असलेला विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे.
6 वर्षांपूर्वी -
क्रिकेटच्या देवाचे गुरु रमाकांत आचरेकर यांचं निधन
आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आणि भारताला लाभलेला क्रिकेटचा देव ज्यांच्यामुळे लाभला ते रमाकांत आचरेकर यांचं आज निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. आचरेकर सरांनी भारतरत्न तेंडुलकरसह विनोद कांबळी, प्रविण आमरे, अजित आगरकर आणि चंद्रकांत पंडित असे दिग्गज क्रिकेट खेळाडू भारताला दिले. त्यांच्या सर्व शिष्याचें भारतीय क्रिकेटमध्ये मोठे योगदान आहे हे विसरता येणार नाही. दरम्यान, त्यांच्या निधनाने क्रिकेट वर्तुळात शोककळा पसरली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मेलबर्न: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, भारताने तिसरी कसोटी जिंकली
बॉक्सिंग डे कसोटीत टीम इंडियाने अखेरच्या दिवशी विजय प्राप्त केला. भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियावर तब्बल १३७ धावांनी विजय प्राप्त केला आहे. दरम्यान, या सामन्यामुळे टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर २-१ अशी आघाडी घेतली आहे आणि सरत्या वर्षाचा अंत गोड केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
IND Vs AUS ऑस्ट्रेलिया १५१ धावांत गारद; भारताकडे २९२ धावांची आघाडी
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या तिसऱ्या कसोटीचा तिसरा दिवस ऑस्ट्रेलियासाठी अत्यंत वाईट ठरला आहे. भारतीय टीमने दिलेल्या ४४४ धावांचा पाठलाग करताना कांगारूंची खेळी अवघ्या १५१ मध्ये संपुष्टात आली आहे. बुमराहच्या भेदक गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १५१ धावांमध्ये पूर्णपणे संपुष्टात आला आहे. त्याने तब्बल ६ विकेट्स तंबूत धाडल्या.
6 वर्षांपूर्वी -
IND Vs AUS 3rd Test: भारताने ४४३ धावांवर डाव घोषित केला
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजारा (१०६) आणि कर्णधार विराट कोहली (८२) यांनी उभ्या केलेल्या धावसंख्येवर आणि इतर फलंदाजांनी उभारलेल्या धावांवर भारत चांगल्या स्थितीत पोहोचला आहे.
6 वर्षांपूर्वी -
AUS Vs India तिसरी कसोटी; पहिल्या दिवसअखेर भारत २ बाद २१५
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारतीय क्रिकेट टीमने पहिल्या दिवसाच्या अखेर सामन्यावर चांगले नियंत्रण राखले आहे. दरम्यान, आजच्या दिवसभराच्या नवोदित मयंक अग्रवालने ७६ तर अनुभवी चेतेश्वर पुजाराने ६८ नाबाद अशा धावा घेऊन भारताला पहिल्या दिवसअखेर २ बाद २१५ धावांपर्यंत मजल मारली आहे. लोकेश राहुल आणि मुरली विजय यांना संघाबाहेर करून मयंक-विहारी हा नवा सलामी जोडीचा प्रयोग भारतीय टीमने केला होता. त्यामुळे हा प्रयोग काहीसा पोषक ठरला आहे असंच म्हणावं लागेल.
6 वर्षांपूर्वी -
विराट कोहली व अजिंक्य रहाणेची संयमी खेळी, भारत सुस्थितीत
भारतीय क्रिकेट टीमचा कप्तान विराट कोहलीच्या संयमी खेळीने आणि त्याला चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांची लाभलेली साथ.यामुळे आज दुसऱ्यादिवशी भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत चिकाटीने पुन्हा कमबॅक केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
कांगारुंची झुंज अपयशी, विराटसेनेचा यजमानांवर विजय
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय टीमने कांगारूंवर ३१ धावांनी विजय मिळवला आहे. कांगारुंपुढे ३२३ धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. भारतीय गोलंदाजांनी कांगारूंचा दुसरा डाव २९१ धावांतच गुंडाळला. ऑलराऊंडर पॅट कमिन्स आणि कर्णधार टीम पेन यांनी जोमाने केली करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांची झुंज अपयशी ठरली. भारताच्या तेज गोलंदाजीपुढे कांगारुंचे प्रयत्न अपुरे पडले. अखेर भारताने चार सामन्यांच्या मालिकेत यजमानांवर १-० अशी आघाडी घेतली आहे.
6 वर्षांपूर्वी -
चेतेश्वर पुजाराच्या १२३ धावांच्या खेळीने भारताचा डाव सावरला
येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टेस्ट मॅच दरम्यान भारतीय क्रिकेट संघ पहिल्या डावात मोठ्या अडचणीत सापडला होता. दरम्यान, होमपीचवर ऑस्ट्रेलियन टीम भारतीय खेळाडूंना सहज मात देईल असे वाटत होते. परंतु, मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजाराने वैयक्तिक शतकी खेळी करत पहिल्यांदा भागीदारी करत भारताला सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न केला. अखेर पुजाराच्या महत्त्वपूर्ण फलंदाजीच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसअखेर ९ बाद २५० धावा केल्या आणि टीमचा जीव भांड्यात पडला.
6 वर्षांपूर्वी -
महिला ट्वेण्टी-२० वर्ल्ड कप; भारतीय महिला टीमचे आव्हान संपुष्टात
महिलांच्या ट्वेण्टी-२० वर्ल्ड कपमधून भारतीय संघाचे आव्हान अखेर संपुष्टात आलं आहे. उपांत्य फेरीत भारताचा इंग्लंडच्या महिला टीमकडून पराभव झाला आहे. भारताने पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारून इंग्लंड टीम समोर ११३ धावांचं लक्ष ठेवलं होतं. परंतु, इंग्लंडच्या टीमने भारतावर ८ विकेट्सने दणदणीत विजय प्राप्त केला आहे. आता अंतिम सामान्यतर इंग्लंडची गाठ ऑस्ट्रेलिया टीमसोबत पडणार आहे.
7 वर्षांपूर्वी -
विराट कोहली १०,००० धावांचा पल्ला गाठणाऱ्या विक्रमवीरांच्या यादीत
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताय टीमचा कर्णधार विराट कोहलीने १०,००० धावांचा पल्ला गाठला आहे. १०,००० धावा पूर्ण करणाऱ्या खेळाडूंच्या क्लबमध्ये त्याने आज दिमाखात प्रवेश केला आहे. विराटने १०,००० धावांचा टप्पा केवळ २०५ डावांमध्ये ओलांडून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
#Metoo ची छाया क्रिकेटविश्वावर, BCCI सीईओंवर लैंगिक शोषणाचे आरोप
#Metoo ची छाया क्रिकेटविश्वावर पडली असून बीसीसीआयचे सीईओ जोहरी यांच्यावर आता गंभीर आरोप करण्यात आले आहेत. बीसीसीआयचे सीईओ जोहरी यांच्यावर एका महिला लेखिकेने लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या प्रशासकीय समितीने जोहरी यांच्याकडे संबंधित महिलेले केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण मागितलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
बिहारी खासदार अखिलेश प्रसाद सिंह यांचे पृथ्वी शॉ आणि मनसेच्या नावाने स्टंट?
पृथ्वी शॉ’च्या क्रिकेटमधील जडणघडणीत महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाच्या मदतीचा मोलाचा वाटा आहे. अगदी प्रथम श्रेणी क्रिकेट पासून ते अंडर- १५ आणि अंडर-१९ क्रिकेट पर्यंत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारा पृथ्वी शॉ नेहमीच एका मुंबईकरांसारखा महाराष्ट्रात एकजीव झाला होता तसेच तो आणि त्याच संपूर्ण कुटुंब उत्तम मराठी सुद्धा बोलतात हे सर्वश्रुत आहे. असं सर्व असलं तरी महाराष्ट्राने खेळाकडे आणि खेळाडूंकडे कधीच संकुचित दृष्टिकोनातून पाहिले नाही. अगदी आज त्याची ख्याती जगभरात पोहोचली तरी सर्वांनी पृथी शॉ या नम्र आणि गुणी खेळाडूंकडे केवळ भारतीय क्रिकेटचा उगवता तारा असच पाहिलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
पृथ्वी शॉचा विक्रम, कसोटी सामन्यात पदार्पणातच शतक
राजकोट येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी सामन्यात पदार्पणातच पृथ्वी शॉने स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली आहे. कारकिर्दीत स्थानिक क्रिकेटमध्येच तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. पहिल्याच कसोटी सामन्यात त्याने शतकी खेळी करत भारताला सुस्थितीत उभं केलं आहे. पृथ्वीने ९९ चेंडूत १०१ धावा पूर्ण केल्या आहेत.
7 वर्षांपूर्वी -
भारत इंग्लंड पाचवी टेस्ट: पहिल्या दिवसअखेर इंग्लंड ७ बाद १९८
भारत इंग्लंड मधील पाचव्या टेस्टमध्ये सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत इंग्लंडला ७ बाद १९८ अशा कात्रीत पकडले आहे. पहिल्या दोन सत्रात इंग्लंडने सामन्यावर चांगली पकड मिळवली होती. परंतु, चहापानानंतर मात्र भारताने तब्बल ६ बळी टिपत इंग्लंडला संकटात टाकले असून भारत सुस्थितीत गेला आहे.
7 वर्षांपूर्वी -
जोस बटलरच्या शतकी खेळीने इंग्लंड सुस्थितीत
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने ८ बाद २६० धावांपर्यंत मजल मारली आहे. इंग्लंड संघाच्या तळाच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांना चांगलेच झुंजवले. त्यामुळे अखेर इंग्लंडने २३३ धावांची आघाडी घेण्यात यश मिळविले आहे.
7 वर्षांपूर्वी -
नॉटिंगहॅम कसोटीवर भारत सुस्थितीत, इंग्लंडपुढे ५२१ धावांचं आवाहन
विराट कोहलीच्या शतकी खेळीने आणि चेतेश्वर पुजारा तसेच हार्दिक पांड्याच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर दुसरा डाव भारताने ३५२ धावांवर घोषित केला. भारतीय टीम सध्या सुस्थितीत असून विजयाची अशा आहे.
7 वर्षांपूर्वी