Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
JEE Main Result 2021 | जेईईचा निकाल जाहीर, टॉप रँकिंगमधील 18 विद्यार्थ्यांमध्ये मुंबईतील सिंद्धातचाही समावेश
जेईई-मेन, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेचा निकाल मंगळवारी रात्री जाहीर झाला. ज्यामध्ये एकूण 44 उमेदवारांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. तर 18 विद्यार्थ्यांना टॉप रँक मिळाला आहे. प्रथम क्रमांक मिळवणाऱ्यांमध्ये राजस्थानमधील तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या तीन विद्यार्थ्यांमध्ये मुंबईचा रहिवासी सिद्धांत मुखर्जी यांचे नाव आहे. तो कोटा येथील एका खासगी कोचिंग इन्स्टिट्यूटमधून तयारी करत होता. शिक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री ही माहिती दिली.
4 वर्षांपूर्वी -
JEE Main Result 2021 | जेईई मेन चौथ्या सत्राचा निकाल | इथे पाहा निकाल
Jee Main Result 2021. नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात आलेल्या JEE MAIN 2021 च्या चौथ्या सत्राचा निकाल आज जाहीर होणार असल्याची माहिती आहे. जेईई मेन चौथ्या सत्राची परीक्षा 26 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2021 आयोजित करण्यात आली होती. जेईई मेन परीक्षेचा निकाल आज जाहीर होण्याची शक्यता आहे. jeemain.nic.in आणि nta.ac.in या वेबसाईटवर निकाल जाहीर केला जाईल. निकालासोबत एनटीए जेईई मेन चौथ्या सत्राची अंतिम उत्तर तालिका, कट ऑफ आणि ऑल इंडिया रँकिंग देखील जाहीर करेल अशी माहिती आहे.
4 वर्षांपूर्वी -
JEE Main Exam | जेईई मेन परीक्षेचे प्रवेशपत्र जारी | परीक्षेच्या तारखेतही बदल
नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने घेण्यात येणाऱ्या जेईई मेन्सच्या तिसऱ्या सेशनसाठीच्या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्रक जारी करण्यात आले आहेत. तिसऱ्या सेशनच्या तारखांमध्ये थोडा बदल करण्यात आला असून त्या आता 20 जुलै, 22 जुलै, 25 जुलै आणि 27 जुलै या तारखांना परीक्षा होणार आहे. चौथ्या सेशनच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील असं NTA ने सांगितलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
JEE Main Exam 2021 | JEE मेन परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु, असा करा अर्ज
जेईई मेन परीक्षा 2021 च्या चौथ्या सत्रासाठी नोंदणी सुरु झाली आहे. जेईई मेन परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी नॅशनल टेस्टींग एजन्सीची वेबसाईट jeemain.nta.nic.in या वेबसाईटवर अर्ज करु शकतात. जे विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करु इच्छितात ते 12 जुलैपूर्वी अर्ज दाखल करु शकतात. जेईई मेन परीक्षा 2021 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे शुल्क ऑनलाईन पद्धतीनं भरावं लागणार आहे. चौथ्या सत्राची परीक्षा 27 जुलै ते 2 ऑगस्ट या दरम्यान होणार आहे.
4 वर्षांपूर्वी