Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
तामिळनाडूच्या निवडणुकीत सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हसन एकत्र येण्याची शक्यता
२०२१ मध्ये तामिळनाडू मध्ये विधानसभा होणार असल्याने सध्या राज्यात निरनिराळ्या आघाड्यांची चर्चा रंगली आहे. त्यातच तब्बल ४० वर्षाची मैत्री असणारे दोन सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हसन (South Super Star Rajinikanth and Kamal Haasan) राजकारणात आले असून तीच मैत्री राजकारणात देखील प्रत्यक्ष पाहायला मिळू शकते अशी शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्ष देखील दक्षिणेत प्रवेशाचे जोरदार प्रयत्न करत असून, त्यानिमित्ताने मध्यंतरी रजनीकांत यांना जवळ करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होताना दिसला.
6 वर्षांपूर्वी -
देशात एकच भाषा लादता येणार नाही, अन्यथा जनआंदोलन उभारू: कमल हसन
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘एक देश, एक भाषा’ याबाबत केलेल्या वक्तव्यावरून सुरू झालेल्या राजकीय वादात आता अभिनेता आणि राजकीय नेता कमल हसनने उडी घेतली आहे. पूर्ण देशात एकच भाषा लादता येणार नाही, असे करण्याच्या प्रयत्न झाल्यास मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करत कमल हसन यांनी शहा यांच्या वक्तव्याला विरोध केला.
6 वर्षांपूर्वी -
तामिळनाडूत पोटनिवडणुकीच्या सर्व २० जागा लढणार: कमल हसन
प्रसिद्ध सुपरस्टार अभिनेते आणि मक्कल नीधि मय्यम पक्षाचे अध्यक्ष कमल हसन यांनी आज त्यांच्या वाढदिवसा निमित्त महत्वाची घोषणा केली आहे. तामिळनाडू विधानसभा पोटनिवडणुकीच्या सर्वच्या सर्व म्हणजे २० जागा त्यांचा पक्ष संपूर्ण ताकदीनिशी लढणार असल्याची घोषणा केली. त्यानिमित्त पक्षाने वीस विधानसभा मतदारसंघात ८०% कार्यकर्ते नियुक्त केल्याचे म्हटले आहे.
7 वर्षांपूर्वी -
कमल हसन यांच्या राजकीय पक्षाची घोषणा.
आज तामिळनाडूमध्ये कमल हसन यांनी त्यांच्या पक्षाचा नावाची अधिकृत घोषणा केली. त्यांच्या पक्षाचे नाव “मक्कल नीति मय्यम” म्हणजे “लोक न्याय पार्टी” असं करण्यात आलं.
7 वर्षांपूर्वी