Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
केरळ | ANI म्हणत भाजप आमदार प्रस्तावाच्या विरोधात | PTI म्हणतं समर्थनात
केरळमध्ये, केंद्राच्या नवीन वादग्रस्त कृषि कायद्याविरूद्ध राज्यातील पी. विजयन सरकारने आणलेल्या प्रस्तावाला विधानसभेतील भाजपचे एकमेव आमदार राजगोपालन यांनी पाठिंबा दिला आहे. या प्रस्तावात केंद्रीय कायदे मागे घेण्याची मागणी करण्यात आली असून या निषेधार्थ हजारो शेतकरी एका महिन्यापेक्षा जास्त काळापासून दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
केरळ सरकार नवे कृषी कायदे लागू करणार नाही | सुप्रीम कोर्टात दाद मागणार
केंद्र सरकारने लागू केलेल्या ३ कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी आज (८डिसेंबर)भारत बंदची हाक दिली आहे. देशभरातील शेतकऱ्यांसह अनेक संघटना, विरोधी पक्षांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून महाराष्ट्रातही कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद राहणार आहेत. माथाडी कामगारही या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. संवेदनशील मार्गावर एसटी सेवा बंद ठेवण्यात आली आहे. सकाळपासूनच भारत बंदच्या या शेतकऱ्यांच्या हाकेला लोकांनी सहकार्य केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
मंदिरात आली मगर | पण नशीब शाकाहारी होती ती
उत्तर केरळमधील कासरगोड इथल्या श्री अनंतपुरा मंदिराच्या परिसरात दिसून आलेली एक महाकाय मगर हा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला आहे. या मगरीचे नाव ‘बाबिया’ (Babiya crocodile) असल्याचे सांगितले जात आहे आणि ही मगर अनेक वर्षांपासून मंदिराच्या परिसरातील तलावात राहात आहे. याशिवाय सर्वात आश्चर्यकारक गोष्ट अशी की मगर शाकाहारी असल्याचे सांगितले आहे. असेही सांगितले जात आहे की, वर्षानुवर्षे मंदिराच्या तलावात राहात असूनही ती पहिल्यांदाच मंदिरात आली. पण ती कशी मंदिरात आली याबद्दल काहीही माहिती नाही.
5 वर्षांपूर्वी -
BREAKING | केरळमध्ये एअर इंडिया विमानाला अपघातात | विमानाचे दोन तुकडे
एअर इंडियाचं विमान केरळच्या कोझिकोड विमानतळाच्या धावपट्टीवर घसरलं. या घटनेत वैमानिकाचा मृत्यू झाला आहे. हे विमान दुबईतून केरळच्या कोझिकोड विमानतळावर हे उतरलं. या विमानात १९१ प्रवासी होते. अद्याप एअर इंडियाने याबाबत काहीही सांगितलेलं नाही. नेमके किती लोक जखमी झाले आहेत किंवा या प्रवाशांचं काय झालंय ते अद्याप समजू शकलेलं नाही.
5 वर्षांपूर्वी -
गर्भार हत्तीणीला फटाक्यांनी भरलेलं अननस भरवलं, ३ दिवस तडफडून प्राण सोडले
केरळमध्ये एक संतापजनक घटना उघडकीस आली. इथे एका गर्भवती हत्तीणीला काही समाजकंटकांनी फटाके भरलेलं अननस खाऊ घातलं. त्या हत्तीणीच्या तोंडात अननसमधील फटाके फुटले आणि तिच्या गर्भात असलेल्या पिल्लाचा मृत्यू झाला. त्यानंतर तीन दिवसांनी या हत्तीणीनेही प्राण सोडले. ही हत्तीणी १४ ते १५ वर्षांची असल्याचा अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
5 वर्षांपूर्वी