Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
सोमय्यांनी नौदल सैनिकांच्या नावाने लोकांकडून पावतीशिवाय करोडोची कॅश जमा केली | आता म्हणतात पुरावे द्या
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर आयएनएस विक्रांत प्रकरणी गंभीर आरोप केले होते. त्यांच्या याच आरोपांनंतर काल (6 एप्रिल) रात्री उशिरा किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 420, 406, 34 अंतर्गत पोलिसांनी हा गुन्हा दाखल करुन घेतला आहे. माजी सैनिक बबन भोसले यांनी सोमय्यांविरोधात तक्रार दिली होती. ज्यानंतर याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी बबन भोसले यांच्यासह अप्पर पोलीस आयुक्त संजय दराडे यांची भेट घेतली आणि सोमय्यांविरोधात तक्रार देण्यात आली.
3 वर्षांपूर्वी -
Defamation Suit Against Kirit Somaiya | मानहानीप्रकरणी किरीट सोमय्या यांना कोर्टाकडून समन्स
शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांविरोधात 100 कोटींचा दावा दाखल केलाय. अनिल परबांच्या दाव्याची दखल घेत न्यायालयानंही आता किरीट सोमय्यांना फटकारलंय. अनिल परब यांच्या मानहानीप्रकरणी किरीट सोमय्या यांना समन्स बजावण्यात आलंय. 23 डिसेंबरपर्यंत कोर्टात हजर राहण्याचे सोमय्यांना कोर्टानं आदेश दिलेत. अनिल परबांनी सोमय्यांविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा (Defamation Suit Against Kirit Somaiya) दाखल केलाय.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शौर्य दाखविणाऱ्या विश्वास नांगरे-पाटील यांना सोमैय्या माफिया म्हणाले
मुंबईवर झालेला 26/11 चा दहशतवादी हल्ला हा आपल्या देशासाठी एक वाईट आठवण आहे. पण याच हल्ल्याच्या वेळी मुंबई पोलिसांनी दाखवलेले शौर्य आणि स्वतःचे प्राण धोक्यात घालून लोकांना वाचवण्यासाठी त्यांची धडपड याचे मोल ठरवणेही शक्य नाही. दहशतवाद्यांनी हल्ला करून जेव्हा काही दहशतवादी ताज हॉटेलमध्ये घुसले तेव्हा त्याठिकाणी अनेक लोक होते. त्या सर्वांचे प्राण धोक्यात होते. त्यांना वाचवण्यासाठी आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील हे कशाचीही पर्वा न करता केवळ एका बॉडीगार्डसह ताजमध्ये घुसले.
4 वर्षांपूर्वी -
Bhartiya Jai Hind Party | भ्रष्टाचार बाहेर काढायचे असतील तर दिल्लीला जाऊन गुजरातच्या भाजपा नेत्यांचे काढा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जरंडेश्वर साखर कारखाना आणि पाटबंधारे खात्यात होत असलेल्या तथाकथित भ्रष्टाचाराबद्दल भाजपाचे माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्याचा निषेध करण्यासाठी आज भारतीय जय हिंद पार्टी (Bhartiya Jai Hind Party) तर्फे ठाण्यात चक्काजाम आंदोलन करण्यात आला होता.
4 वर्षांपूर्वी -
कोल्हापूर आरोप पर्यटन दौरा | भेटीतील मूळ काम सोडून मीडियाला बाईट देण्यावर सोमय्यांचा अधिक भर?
मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि सत्ताधारी महाविकासआघाडी सरकारवर सातत्याने टीका आणि गैरव्यवहाराचे आरोप करणारे भाजपा नेते किरीट सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या बाहेरूनच दर्शन घेतलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या यांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर टीका केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोल्हापूर आरोप पर्यटन दौरा | कोणीही रोखत नसताना सोमैयांच्या 'मला रोखून दाखवा, मला रोखून दाखवा चिथावण्या
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या आज पुन्हा एकदा कोल्हापूर दौऱ्यावर निघाले आहेत. त्यापूर्वी त्यांना मुंबईतील सिद्धीविनायक मंदिराच्या बाहेरुनच सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. त्यावेळी किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा आव्हान दिलंय. आता शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनाच मी नोटीस दिली की हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा, अशा शब्दात सोमय्या यांनी पवार आणि ठाकरेंना एकप्रकारे चॅलेंज केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
सोमय्या आता रश्मी ठाकरेंना लक्ष करताना त्यांच्या मालमत्तेवरून अलिबाग 'आरोप पर्यटन दौरा' करणार
महाविकास आघाडी सरकारमधील अनिल परब, अनिल देशमुख, हसन मुश्रीफ अशा सत्ताधारी मंत्र्यांनंतर किरीट सोमय्या यांनी आपला मोर्चा आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वळवला आहे. काल गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचं कारण देत सोमय्या यांना विसर्जनात सहभागी होण्यापासून अडवण्यात आलं तर त्यांचा कोल्हापूर दौराही पोलिसांनी होऊ दिला नाही. त्यांना कराडमध्येच अडवण्यात आलं. यावेळी सोमय्या यांनी कराडमध्ये पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकार आणि मुख्यमंत्र्यांवरच प्रहार केले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
सोमैयांकडून आरोप पर्यटनाला धार्मिक रंग | गणेश विसर्जनापासून रोखलं, हिंदूला रोखलं, आंबेबाईच्या दर्शनापासून रोखल्याची बोंब
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि नेत्यांवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्याचं सत्र किरीट सोमय्या यांनी सुरू केलं आहे. आजही ते कराडमध्ये पत्रकार परिषद घेत आहेत. यावेळी ते कोणता नवा गौप्यस्फोट करणार, ठाकरे सरकारवर निशाणा साधत ते काय बोलणार हे पाहण्यासारखं होतं. किरीट सोमय्या यांचा कोल्हापूर दौरा रोखणं, पोलिसांनी नोटीस बजावणं या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आजच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. यावेळी बोलताना सोमय्या यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
किरीट सोमैयांची 'आरोप पर्यटन यात्रा' कराडमध्येच संपली | पत्रकार परिषदेची शक्यता
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केल्यानंतर किरीट सौमैया कोल्हापूरला यायला निघाले होते. मात्र राष्ट्रवादीने त्यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचा इशारा दिला. त्यानंतर मात्र प्रशासन आणि पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर भाजप नेते किरीट सोमैय्या अखेर कराड येथेच उतरले आहेत. कोल्हापूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी त्यांना विनंती केल्यानंतर ते आज पहाटे महालक्ष्मी एक्सप्रेसमधून कराड स्थानकात उतरले आहेत. माझे भांडण प्रशासनाशी नाही, त्यामुळे प्रशासन अडचणीत येत असेल तर मी येणार नाही, असा पवित्रा सोमैया यांनी घेतला. त्यामुळे आता कोल्हापुरात राष्ट्रवादी आणि भाजप मध्ये होणारा संघर्ष तात्पुरता टळला आहे, शिवाय राष्ट्रवादीचा मोर्चा सुद्धा आता रद्द झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
किरीट सोमय्या मुंबईत स्थानबद्ध | कोल्हापुरात नो एन्ट्री | घराभोवती पोलिसांचा बंदोबस्त
भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांनतर राज्यात खळबळ उडालेली आहे. मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची सविस्तर माहिती घेण्यासाठी सोमय्या 20 सप्टेंबर रोजी कोल्हापुरात जाणार आहेत. तर दुसरीकडे सोमय्या यांनी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस आली असून त्यांना कोल्हापूर जिल्ह्यात येण्यास मनाई करण्यात आली आहे. या नोटिशीनंतर माझ्या दौऱ्यामध्ये ठाकरे सरकारकडून खोडा घातला जातोय, असा आरोप खुद्द सोमय्या यांनी केला आहे. मला गणेश विसर्जनासाठी जाऊ दिले जात नाहीये. माझ्या घरात डझनभर पोलीस पाठवण्यात आले आहेत, असं सोमय्या यांनी म्हटलंय.
4 वर्षांपूर्वी -
आरोपांच्या आकड्यांचा हवेत गोळीबार? | किरीट सोमय्या यांचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप
भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात आरोप करणं सुरूच ठेवलं आहे. यापूर्वी 11 जणांवर थेट आरोप केल्यानंतर सोमय्यांनी यामध्ये आता आणखी एका मंत्र्यांचं नाव घेतलं आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्यांनी मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत. हसन मुश्रीफांच्या कुटुंबाने बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर सोमय्यांनी 2700 पानांचे पुरावे इन्कम टॅक्सला दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
वाशीम | किरीट सोमय्या यांच्या ताफ्यावर दगडफेक | शिवसैनिकांनी दगडफेक केल्याचा आरोप
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली आहे. शिवसैनिकांनी ही दगडफेक केल्याचं सांगण्यात येत आहे. सोमय्यांच्या ताफ्यावर दगडफेक आणि शाईफेक करण्यात आली. शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यावर 100 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप सोमय्यांनी केले होते, याची पाहणी करण्यासाठी ते निघाले होते.
4 वर्षांपूर्वी -
स्वतःविरुद्धच्या न्यायालयातील दाव्याला देखील किरीट सोमैय्या यांनी 'वसुली' संबोधलं
सध्या सचिन वाझे प्रकरणाचा तपास NIA आणि राज्य ATS करत आहेत. त्यासंबंधित विषय न्यायालयात देखील असून त्याबाबतीत पुरावे गोळा करण्याचं देखील काम चौकशी यंत्रणांकडून सुरु आहे. सचिन वाझे प्रकरणात ज्या आर्थिक घडामोडी समोर आल्या आहेत त्याचा देखील तपास अजून सुरु आहे.
4 वर्षांपूर्वी -
अन्वय नाईक आत्महत्या | किरीट सोमय्यांचा जीव वर खाली का होतो? | आज्ञा नाईक संतापल्या
आमच्यावर हात टाकण्यात आला होता. तेव्हाच्या तपास अधिकाऱ्याला कोणाचा आदेश होता हेदेखील बाहेर काढावं. मी आणि आई मनाचं काही सांगत नाही आहोत. आम्ही संशय व्यक्त करत नसून सुसाईड नोटमध्ये नाव देण्यात आलं आहे. तपास अधिकाऱ्याला आमची चौकशी करण्याचा आदेश कोणी दिला होता? ज्यांना समस्या आहे त्यांनी चर्चेला बसावं.. चाय पे चर्चा होऊन जाऊ द्या,” असं आव्हान यावेळी आज्ञा नाईकने दिलं. तसंच किरीट सोमय्यांचा जीव वर खाली का होतो? असा सवाल विचारला. अक्षता नाईक आणि आज्ञा नाईक यांनी यावेळी महाराष्ट्र पोलिसांचा आपल्याला अभिमान असल्याचं सांगितलं. तसंच गरज लागल्यास मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ अशी माहिती दिली.
4 वर्षांपूर्वी -
अॅड. रमेश त्रिपाठींनी रेणू शर्मांची केस सोडली | तर सोमैयांना राजकीय उतावळेपणा अंगलट
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं. तशा प्रकारे पोलिसांना तिने लेखी लिहून दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
निवडणूक आयोग | भाजपचे तक्रारदार सरसावले | पण काहीच निष्पन्न होणार नाही कारण....
किरीट सोमैया यांनी निवडणूक आयोगाकडे याबाबतची थेट लेखी तक्रारच केली आहे. त्यामुळे सोमय्या यांच्या तक्रारीवर निवडणूक आयोग काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात पाच अतिशय महत्वाचे मुद्दे नमूद करत धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचा भगवा हिरवा झाला आहे का | किरीट सोमय्यांचा सवाल
औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर बोचऱ्या शब्दांत वार केला आहे. शिवसेनेचा भगवा हिरवा झाला आहे का, असा जळजळीत सवाल त्यांनी उपस्थित केला.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५’वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
5 वर्षांपूर्वी -
फरहान आझमी म्हणतो..तर आम्ही बाबरी मस्जिद बनवू...हे सेनेला पटणार का? सोमैया
नवी मुंबईच्या नेरुळमध्ये भारतीय जनता पक्षाचं राज्यस्तरीय अधिवेशन होतंय. या अधिवेशनाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा संघटनात्मक बांधणीला सुरुवात करणार आहे. चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्षपदी सूत्रं हाती घेतली. त्यानंतर झालेल्या भाषणात त्यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, हे सरकार पडावं अशी आम्ही वाट बघत नाही. मात्र आपसातील भांडणांमुळेच हे सरकार कोसळेल असंही त्यांनी सांगितलं. यावेळी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नढ्ढा यांनी महाराष्ट्रात ऐकला चलो रे चे संकेत दिले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
आदिवासीच्या झोपडीतील जेवणात कोंबडीचा रस्सा, भाकरी, बिसलेरी पाणी..वाह! : सोमैया
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नुकतंच शहापूरच्या दौऱ्यावर गेले होते. शहापुरमधील दौऱ्याचापाडा येथे एका भुमीपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी त्यांच्यासोबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडदेखील उपस्थित होते. शरद पवार यांनी कार्यक्रम आटोपल्यानंतर तेथील आदिवासी पाड्यातील एका झोपडीत जेवणाचा आस्वाद घेतला. जितेंद्र आव्हाड यांनी झोपडीत जेवतानाचा फोटो शेअर केला असून या नेत्याला काय म्हणावे…अशी भावना व्यक्त केली आहे.
5 वर्षांपूर्वी