Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
उद्धवा, अजब तुझे सरकार... किरीट सोमय्यांचे मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र
सोमवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यावेळी काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. मात्र या मुद्द्यावरून विरोधी पक्षानं महाविकास आघाडीच्या सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये किरीट सोमय्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ‘देशद्रोही आता देशभक्त झाले… उद्धवा, अजब तुझे सरकार’ असं सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागले आहे.
5 वर्षांपूर्वी -
आरोप करून अज्ञातवासात जाणारे किरीट सोमैया टीआरपी'साठी पुन्हा प्रकटले? सविस्तर वृत्त
राज्यातील सत्तांतर नाट्यात शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने राज्यात महाविकास आघाडीने सरकार स्थापन केलं. मात्र तिळपापड झालेले भारतीय जनता पक्षाचे नेते शिवसेनेविरोधात आग ओकण्यास सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. आरे मेट्रो कारशेड प्रकल्पाला स्थगिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली. तसेच अन्य प्रकल्पांबाबतही फेरविचार करणार असल्याचं सांगितले यावरुन भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली आहे. किरीट सोमैय्या यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत म्हटलंय की, शिवसेनेने आपला रंग दाखवायला सुरुवात केली आहे असं म्हणत जहरी टीका केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
नाशिक: विरोधकांवर आरोप करून ५ वर्ष अदृश्य झालेल्या सोमय्यांना मनसे अदृश्य झाल्याचा भास?
जळगाव येथील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा फोटो न लावण्यावरून भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार व प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. नरेंद्र मोंदीची उंची मोठी आहे, त्यांचा प्रोटोकॉल ठरलेला असतो. त्यांची उद्धव ठाकरे यांच्याशी तुलना होऊ शकत नाही, असा टोला शिवसेनेला लगावला. लोकसभा निवडणुकीत मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच महायुतीला मते मिळाल्याचे सांगत शिवसेनेला सोमय्या यांनी डिवचले आहे.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंची उंची मोदींएवढी नाही: किरीट सोमय्या
जळगाव येथील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा फोटो न लावण्यावरून भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार व प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. नरेंद्र मोंदीची उंची मोठी आहे, त्यांचा प्रोटोकॉल ठरलेला असतो. त्यांची उद्धव ठाकरे यांच्याशी तुलना होऊ शकत नाही, असा टोला शिवसेनेला लगावला. लोकसभा निवडणुकीत मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच महायुतीला मते मिळाल्याचे सांगत शिवसेनेला सोमय्या यांनी डिवचले आहे.
6 वर्षांपूर्वी -
पीएमसी बँकेविरोधात सखोल चौकशीसाठी किरीट सोमय्यांची आरबीआय'कडे तक्रार
महाराष्ट्रासह अन्य ७ राज्यांमध्ये मिळून १३७ शाखा असलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने सहा महिन्यांसाठी निर्बंध आणले असून, त्यामुळे काही लाख खातेदारांवर संकट कोसळले होते. आरबीआयने या बँकेतून खातेधारकांना केवळ एक हजार रुपयेच काढण्याची मुभा दिली होती.
6 वर्षांपूर्वी -
ईशान्य मुंबईत संजय पाटील यांना मिळणारा पाठिंबा भाजपसाठी धोक्याची घंटा?
ईशान्य मुंबईतील शिवसेना आणि किरीट सोमैयांच्या वादानंतर अखेर किरीट सोमैया यांचा पत्ता कट होऊन मुलुंड मधील स्थानिक नगरसेवक मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर करण्याची वेळ भाजपवर आली. प्रचार शिगेला पोहोचला असताना अनेक ठिकाणी भाजपचे उमेदवार मनोज कोटक यांना ठिकाणी स्थानिक मतदारांनी चांगलेच फैलावर घेतल्याचे पाहायला मिळाले.
6 वर्षांपूर्वी -
ईशान्य मुंबई: जोरदार शक्तिप्रदर्शन करत संजय पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
किरीट सोमैया आणि शिवसेनेच्या वादात ईशान्य लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चुरशीची होणार यात शंका नाही. उद्धव ठाकरे यांच्यावर गैरव्यवहाराचे वैयक्तिक आरोप केल्याने किरीट सोमैया यांचा पत्ता कट करत भाजपाने मुलुंडचे नगरसेवक मनोज कोटक यांना ईशान्य मुंबईतून उमेदवारी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने माजी खासदार संजय दीना पाटील यांना आधीच उमेदवारी जाहीर केल्याने त्यांनी प्रचारात देखील आघाडी घेतल्याचे पाहायला मिळाले.
6 वर्षांपूर्वी -
ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांना उमेदवारी, सोमय्यांचा पत्ता कट की दुसरी सेटलमेंट?
शिवसेना-भारतीय जनता पक्षाचं जागावाटप निश्चित झालं असतानाही ईशान्य मुंबईतून भाजपकडून नक्की कोणाला उमेदवारी द्यायची यावर अजूनही निर्णय झाला नव्हता. त्यात किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला होता, त्यानंतर आता भाजपाकडून ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
किरीट सोमय्यांविरोधात शिवसेना आमदार निवडणूक रिंगणात उतरणार
लोकसभा निवडणुकीच्या तिकीटासाठी किरीट सोमय्यांकडून मातोश्रीच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसैनिकांचा रोष असलेले ईशान्य मुंबईचे विद्यमान खासदार सोमय्यांकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मोठे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, अद्याप मातोश्रीवरुन त्यांना कोणताही प्रतिसाद मिळालेली नाही. निवडणूक जवळ येत असताना, प्रचाराचे दिवस कमी होत असताना ईशान्य मुंबईचे खासदार असलेल्या किरीट सोमय्या यांना धक्का बसला आहे.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा, किरीट सोमैयांच्या उमेदवारीला तीव्र विरोध
ईशान्य मुंबईच्या लोकसभा उमेदवारीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर आज पुन्हा चर्चा झाली. परंतु आज देखील याबाबत कोणताही तोडगा निघाला नसल्याचे समोर येत आहे. कारण उद्धव ठाकरे यांनी ईशान्य मुंबईतून भाजपाचे विद्यमान खासदार किरीट सोमैया यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध दर्शविला आहे.
6 वर्षांपूर्वी -
ईशान्य मुंबई: उद्धव ठाकरेंवर वैयक्तिक आरोप करणाऱ्या किरीट सोमैयांची उमेदवारी अडचणीत?
लोकसभा निवडणूक घोषित झाल्या आणि ईशान्य मुंबई मतदारसंघात विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्या अडचणी वाढण्याची चिन्ह आहेत. तसेच त्यांच्या नावासोबत आणखी एका नावाची शिफारस करण्याची सूचना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील नेत्यांना केल्याने सोमय्या यांची उमेदवारी अडचणीत येणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
6 वर्षांपूर्वी