Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
चिपळूणला 48 तासांत 300 मिमी पाऊस | हजारो लोक पुरात अडकले | तर विदर्भात ३ जण पुरात वाहून गेले
मुसळधार पावसामुळे कोकण जलमय झाले आहे. कोकण विभागात रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे या जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थती निर्माण झाली आहे. विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरात ४८ तासांत तब्बल ३०० मिमी तुफानी वृष्टी झाल्याने चिपळूणसह परिसरातील ७ गावे पुराच्या पाण्यात बुडाली आहेत. मदतकार्यासाठी एनडीआरएफचे २३ जणांचे पथक ५ बोटींसह पथक पाठवण्यात आले आहे. राज्यात कोकणासह नाशिक जिल्ह्यात आणि विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यातही धो-धो पाऊस झाला.
4 वर्षांपूर्वी -
कोकणात तुफान पावसाने नद्यांचं पाणी बाजारपेठेत | खेड्यापाड्यांमध्ये ५ फुटांपर्यंत पाणी
कोकणात मुसळधार पावसाने नद्या ओसंडून वाहू लागल्या असून आजूबाजूच्या गावांमध्ये पाणी शिरलं आहे. परिणामी जनजीवन पूर्णपणे ठप्प झाल्याचं चित्रं आहे. अगदी बाजारपेठांना देखील नद्यांचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळतंय. स्थानिक प्रशासनाला मदत कार्यात देखील प्रचंड अडचणींना तोंड द्यावं लागतंय.
4 वर्षांपूर्वी -
आपत्ती निवारण्यासाठी कोकणाला ३ हजार कोटींचा निधी मंजूर
राज्यातील आपत्ती निवारणासाठी राज्य सरकारने कंबर कसली असून कोकणाला ३ हजार ६३५ कोटींचा भरीव निधी दिला आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून २ हजार कोटी तर राज्य शासनाच्या इतर निधीतून १६०० कोटी देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची दुरदृश्य प्रणालीद्वारे आज बैठक झाली. बैठकीत निधीला तत्वतः मान्यता देण्यात आली. तसेच दुष्काळ निवारण कार्यक्रम- पेंच प्रकल्प नागपूर हा प्रकल्पाच्या मंजुरीसाठी मंत्रीमंडळ बैठकीत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
4 वर्षांपूर्वी -
कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण चार महिन्यांपूर्वीच फुल्ल
कोरोनाने मागील वर्षी देशात असे काही थैमान घातले होते, की सण उत्सवांवरही याचे सावट पाहायला मिळाले. हे चित्र यंदाच्या वर्षीही फारसे काही वेगळे नाही. कोकणच्या दिशेने जाणाऱ्या अनेक चाकरमान्यांना मागच्या वर्षी गावी जाणे शक्य झाले नव्हते. प्रशासनाचे नियम आणि कोरोनाचे संकट यांमुळे चाकरमान्यांचा हिरमोड झाला होता.
4 वर्षांपूर्वी -
अजब | झोपलेल्या केंद्रीय समितीकडून तब्बल २१ दिवसानंतर कोकणात नुकसानग्रस्त भागाची पाहणी
जिल्ह्याला तौक्ते वादळाने तडाखा दिल्यानंतर तब्बल २१ दिवसानंतर येथील नुकसानीच्या पाहणीसाठी जिल्ह्यात दाखल झालेल्या केंद्रीय समितीने आज देवगड, मालवणला भेट दिली. कडेकोट पोलीस बंदोबस्तात किनारपट्टी भागातून गाड्यांच्या ताफ्यातून धावत्या भेटी देऊन या समितीने पाहणी केली. पंचनाम्याचे अहवाल केंद्राकडे सादर करणार, अशी माहिती यावेळी समिती अध्यक्ष अशोक परमार यांनी दिली.
4 वर्षांपूर्वी -
तौक्ते वादळ | कोकणच्या संबंधित पालकमंत्र्यांकडून कालपासून नुकसानीचे आढावा दौरे | प्रशासन कामाला
मागील तीन दिवसांपासून तौक्ते वादळाने गुजरात आणि दीवला झोडपून काढलं आहे. त्यामुळे या परिसराचं मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात आणि दीवमधील नुकसानीचा आढावा घेण्यासाठी थोड्याच वेळात गुजरातला पोहोचत आहेत. गुजरातच्या भावनगर येथून ते हवाई पाहणी करतील.
4 वर्षांपूर्वी -
नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या जमिन व्यवहाराची चौकशी सुरु | ते २२४ गुजराती-मारवाडी रडारवर
कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्प सुरू करण्याची विरोधकांनी मागणी लावून धरलेली असतानाच या प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या जमिन व्यवहाराची चौकशी सुरू झाली आहे. तसेच रिफायनरीसाठी घेतलेल्या जमिनी परत देण्याच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत. नाणार रिफायनरी प्रकल्पाची चौकशी करण्यासाठी राजापूर प्रांत कार्यालयासह तलाठी कार्यालयात कक्ष स्थापन करण्यात आले आहे. तारळ, कुळवंडे, नाणार, साखर, सागवे, वाडापाल्ये, उपळे, विल्ये, डोंगर, कात्रादेवी या गावांमध्ये तक्रार स्विकृती कक्ष स्थापन केले जाणार आहे. या कक्षांमध्ये तक्रार स्वीकारली जाणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोकणातील चाकरमान्यांसाठी | गावी जाणाऱ्या नागरिकांना कोरोना टेस्ट करावी लागणार
राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने जिल्हा [प्रशासनांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. मागील वर्षी कोकणच्या दौऱ्याला मुकलेला कोकणी माणूस पुन्हा नाराज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणी लोकांना प्रिय असलेला शिमग्याच्या उत्सव यावर्षी देखील येणार नाही अशी शक्यता आहे. कारण, होळीसाठी कोकणात येणाऱ्या चाकरमन्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. ही चाचणी नेगेटिव्ह आली तरच चाकरमन्यांना आपल्या गावात प्रवेश मिळेल.
4 वर्षांपूर्वी -
नाणार पंचक्रोशीतील जवळपास 100 प्रकल्पग्रस्त राज ठाकरेंची भेट घेणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी रत्नागिरीच्या नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा उचलला आहे आणि मात्र तो पूर्वीच्या भूमिकेशी सांगड घालणारा नसला तरी राज्याचा हिताचा असल्याचं म्हटलं जातंय. कालच राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नाणार प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाऊन देऊ नका, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे राज्य सरकारने बासनात गुंडाळलेला नाणार प्रकल्प पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे.
4 वर्षांपूर्वी -
निसर्ग संपन्न कोकण | अमीर खान नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी सहकुटुंब सिंधुदुर्गात
कोकणाला निसर्गाची मोठी देणगी लाभली आहे. सुंदर समुद्र किनारे, नद्या आणि नारळ-फोपळीच्या रांगा हे कोकणाचं वैशिष्ठ म्हणावं लागेल. चित्रपट दिग्दर्शकांचे लक्ष देखील सध्या कोकणाकडे आहे आणि त्याची भुरळ आता बॉलीवूडच्या मोठ्या कलाकारांनाही पडली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोकण गणेशोत्सव: चाकरमान्यांसाठी होम क्वारंटाइन कालावधी १० दिवसांवर
गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यां चाकरमान्यांसाठी होम क्वारंटाइन होण्याचा कालावधी १४ वरुन १० दिवसांवर आणण्यात आला आहे. सोबतच एसटीने प्रवास करताना ई-पासची गरज लागणार नाही. मात्र खासगी वाहनाने प्रवास करताना ई-पास अनिवार्य असणार आहे. कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना १२ तारखेपूर्वी कोकणात पोहोचावं लागणार आहे. ज्यांना १२ तारखेनंतर कोकणात जायचं आहे त्यांना स्वॅब टेस्ट करुन तो निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट प्रशासनाकडे सादर करावा लागणार आहे. त्यानंतर त्यांना परवानगी दिली जाईल. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत बोलताना ही माहिती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
सावधान! देवगड हापूस आंब्याच्या खोक्यातुन 'कर्नाटकचा हापूस आंबा' बाजारात येतोय
रत्नागिरी, देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटक आंब्याची विक्री करून ग्राहकांची फसवणूक करण्याचे प्रकार मार्केट यार्डात सुरु असल्याचे उघडकीस आले आहेत. खरेदी केलेला आंबा रत्नागिरी आहे की कर्नाटक हे कळू नये यासाठी कर्नाटक आंब्याची रत्नागिरी, देवगड असा उल्लेख असलेल्या बॉक्समधून विक्री होत आहे. फसवणुकीच्या या प्रकाराकडे बाजार समितीचे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे असले तरी त्यात त्यांचे देखील आर्थिक हितसंबंध असल्याचं अनेकदा समोर आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोकण: उत्तर भारतीयांच्या कोकणात सत्यनारायणाच्या पूजा आणि उद्या छटपूजा?
उत्तर भारतीय समाज सर्वत्र पसरतो आहे. विशेष म्हणजे मुंबई आणि आसपासच्या शहरांपुरता मर्यादित असणारा समाज सध्या कोकणात देखील मोठया प्रमाणावर स्थिरावतो आहे. विशेष म्हणजे हा समाज एकत्र येऊन आज स्वतःच्या बॅनरखाली विविध कार्यक्रम आयोजित करत आहेत. आज तरी या फलकांवर कोणत्याही पक्षाचं नाव असलं तरी त्यांच्यातीलच काही लोकं प्रतिनिधी म्हणून उभे केले जातील आणि नंतर ते थेट स्वतःला एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षासोबत जोडून राजकीय फायदा उचलण्यास सज्ज होतील अशी चर्चा स्थानिक लोकांमध्ये रंगली आहे.
5 वर्षांपूर्वी -
उरणच्या ओएनजीसी गॅस प्लँटमध्ये अग्नितांडव; ३ कामगार गंभीर जखमी
रायगड जिल्ह्यातील उरण येथील ओएनजीसीच्या (ऑईल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशन) गॅस प्लँटमध्ये भीषण आग लागली. सकाळी सात वाजेच्या सुमारास लागलेल्या या आगीत तीन कामगार जखमी झाले आहेत. आगीचा भडका उडताच जेएनपीटी आणि ओएनजीसी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
कोकणात जाणाऱ्या एसटीला भीषण आग; बाप्पाच्या कृपेने सर्व प्रवासी सुखरूप
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या एका एसटीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वडपाले गावाजवळ ही घटना घडली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. एसटीमध्ये ६० प्रवासी असून ते थोडक्यात बचावल्याची माहिती मिळत आहे. परंतु या भीषण आगीत एसटी जळून खाक झाली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचे हाल
लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने कोकणाकडे निघालेल्या गणेशभक्तांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे आणि त्यातच सकाळी सात वाजण्याच्या सुमारास वडपाले गावाजवळ एक एसटी बस जळून खाक झाली. परिणामी, वाहतुकीचा वेग मंदावला असून मुंबई-गोवा महामार्गावर वाहनाच्या २ ते ३ किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत.
6 वर्षांपूर्वी -
राजापुरात पुन्हा पूर, चिपळुणात वाशिष्ठी तर खेड'मध्ये जगबुडी नदीची पातळी वाढली
जिल्ह्यात मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा जलप्रलय झाला आहे. राजापूर शहरात पाणी भरले असून चिपळुणातील वाशिष्ठी नदीचेपाणी वाढू लागले आहे. रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई येथेही पूर आला आहे. वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे रत्नागिरीत शाळा सोडून देण्यात आल्या आहेत.
6 वर्षांपूर्वी -
कोकण : पालशेत किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात डॉल्फिन अवतरले
निसर्गरम्य कोकणात सध्या पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. परंतु, त्याचवेळी पर्यटकांसाठी मोठी आनंदाची बातमी म्हणजे ३१ डिसेंबरच्या निमित्ताने अनेक राज्यातून आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटकांच्या भेटीला स्वतः डॉल्फिन्स सुद्धा आले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
शाळेच्या उदघाटनाचा मान राज ठाकरेंनी लहानग्या विद्यार्थ्यांना दिला
चिमुकल्या विद्यार्थ्यांचा तो उत्साह पाहून राज ठाकरेंनी त्या जिल्हा परिषदेच्या पूर्वप्राथमिक शाळेच्या इमारतीचं उदघाट्न त्या विद्यार्थ्यांच्या हातून करून घेतलं. त्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रचंड आनंद झाला.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे दौऱ्या दरम्यान कोंकण वासियांना संबोधित करताना
राज ठाकरे सध्या कोंकण दौऱ्यावर असून, दौऱ्यादरम्यान त्यांनी कोंकण वासियांना संबोधित करताना सावध राहण्याचा इशारा दिला. तसेच आपल्याकडे लोक आणि कार्यकर्ते जास्त आहेत तरी आपण सत्तेत नाही अशी खंत देखिल व्यक्त केली.
7 वर्षांपूर्वी