Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपाला सुपडा साफ होण्याची भीती, 75 वर्षीय लालूंना पुन्हा तुरुंगात धाडण्याच्या हालचाली, CBI सुप्रीम कोर्टात
Lalu Prasad Yadav | लोकसभा निवडणूक जवळ आल्या आहेत आणि बिहारमध्ये भाजपाला सुपडा साफ होण्याची भीती आहेत. नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्यासोबत तरुण नेते तेजस्वी यादव या त्रिकुटासमोर भाजप तसेच मोदी-शहा यांचा निभाव लागणार नसल्याचं राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत. त्यामुळे भाजप बिथरली आहे असं म्हटलं जातंय. त्यामुळे आता भाजप पुन्हा ED-CBI कारवाया जलद करणार असे संकेत मिळत होते. त्यासाठीच आता ७५ वर्षीय आणि गंभीर आजाराने झुंजणाऱ्या लालूप्रसाद यादव यांना पुन्हा तुरुंगात धाडण्याचा हालचाली सुरु झाल्याचं दिसतंय.
2 वर्षांपूर्वी -
भाजपची बिहामध्ये सत्ता गेली, उत्तर भारतात लोकसभा कठीण झाली, CBI ऍक्शन मोडमध्ये, लालू प्रासादांचं 2004 मधील प्रकरण बाहेर काढलं
RJD Lalu Yadav | जमिनीच्या बदल्यात नोकरी प्रकरणी सीबीआयने राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद, त्यांची पत्नी राबडीदेवी आणि दोन मुलींविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. नोकरी शोधणाऱ्यांचाही आरोपपत्रात समावेश करण्यात आला आहे. हे प्रकरण २००४ आणि २००९ मधील आहे जेव्हा लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री होते. अनेक लोकांना त्यांच्या जमीन नोंदणीच्या बदल्यात रेल्वेत नोकरी देण्यात आली. नोकरीच्या बदल्यात घेतलेली सर्व जमीन पाटण्यातच आहे. एका अंदाजानुसार त्यांचे एकूण क्षेत्रफळ १,०५,२९२ चौरस फूट असल्याचे सांगितले जाते.
3 वर्षांपूर्वी -
लालू प्रसाद आणखी प्रकरणातही दोषी, ५ वर्ष कारावास.
लालू प्रसाद आणखी प्रकरणातही दोषी सिध्द झाले असून त्यांना चारा घोटाळ्याच्या तिसऱ्या प्रकरणातही ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
लालू प्रसाद यादव यांना साडेतीन वर्षाचा तुरुंगवास : स्पेशल सीबीआय कोर्ट
रांचीच्या स्पेशल सीबीआय कोर्टात काल आरजेडी चे सर्वेसेवा लालू प्रसाद यांना चारा घोटाळा प्रकरणी शिक्षा ठोठावण्यात आली.
7 वर्षांपूर्वी