Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
बारामतीची जवाबदारी निर्मला सीतारामन यांच्यावर | महागाई रोखण्यात नापास झालेल्या केंद्रीय अर्थमंत्र्यांमुळे सुप्रिया सुळेंचं मताधिक्य वाढणार
Loksabha Election 2022 | महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यात शिरकाव करण्याच्या तयारीत आहे. भाजप नेत्यांना राज्यातील १६ लोकसभेच्या जागा अत्यंत कठीण वाटत आहेत आणि यात पवारांचा (खासदार सुप्रिया सुळे) मतदारसंघ बारामतीचा समावेश आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वेसर्वा यांच्या कन्या सुप्रिया सुळे या येथून खासदार आहेत. दरम्यान, 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात 48 पैकी 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्यावर भाजपने भर दिला असल्याचंही बोललं जात आहे.
3 वर्षांपूर्वी -
दिल्लीत नितीश कुमार आणि शरद पवार कार्यरत होताच, राज्य भाजप नेत्यांची बारामतीत हेडलाईन मॅनेजमेंटसाठी केविलवाणी राजकीय धडपड
Loksabha Election 2022 | जनता दल युनायटेडच्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीनंतर दुसऱ्याच दिवशी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी देशातील मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांना एकत्र आणण्याच्या मोहिमेवर सोमवारी पाटणाहून दिल्लीला रवाना झाले. जदयूने त्यांना देशभरातील विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे अधिकार दिले आहेत. दिल्ली विमानतळावर त्यांनी माध्यमांना सांगितले की, मला पंतप्रधान होण्याची कोणतीही आकांक्षा नाही. विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा माझा प्रयत्न आहे. ‘आज देशात प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा कट सुरू आहे.
3 वर्षांपूर्वी