Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
शरद पवारांच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकांचा तिसऱ्या आघाडीशी काहीच संबंध नसल्याचं स्पष्ट
राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, निवडणूक स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर आणि इतर विरोधकांमध्ये बैठकांवर बैठका होत आहेत. याच स्वरुपाची बैठक आज दुपारी 4 वाजता देखील दिल्लीत पवारांच्या निवासस्थानी होणार आहे. परंतु, या बैठकांचा आणि तिसऱ्या आघाडीचा काहीही संबंध नसल्याचे आता समोर आले आहे. गेल्या काही दिवसांत प्रशांत किशोरांचे सल्ले घेऊन शरद पवार आगामी लोकसभेसाठी तिसऱ्या आघाडीसाठी मोर्चेबांधणी करत असल्याची चर्चा होती.
4 वर्षांपूर्वी -
विरोधकांची नव्हे, ती बैठक राष्ट्रमंचच्या नेत्यांची | काँग्रेस-शिवसेनेशिवाय तिसरी आघाडी शक्य नाही - संजय राऊत
पवारांचे दिल्लीतील ६ जनपथ निवासस्थान हे सध्या राजकीय घडामोडींचे केंद्र बनले आहे. दुपारी ४ वाजता १५ राजकीय पक्षांची बैठक होणार आहे. तृणमूलचे रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी ११ जून रोजी मुंबईत पवारांची भेट घेतली होती. त्याच वेळी भाजपविरोधात विरोधकांची तिसरी आघाडी उभारण्याच्या चर्चेला सुरुवात झाली होती. त्यापाठोपाठ मंगळवारी प्रशांत किशोर यांनी पुन्हा पवारांची भेट घेतली. ही खासगी भेट होती, राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा किशोर यांनी केला.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यसमितीची उद्या दिल्लीत बैठक | जोरदार राजकीय हालचाली
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यसमितीची बैठक उद्या मंगळवारी (22 जून) दिल्लीत होत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. या बैठकीला सर्व निमंत्रित सदस्य आणि परमनंट सदस्य सहभागी होणार आहेत. या बैठकीत विविध अजेंड्यावर चर्चा होणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.
4 वर्षांपूर्वी