Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
ग्रामपंचायत निवडणुका 2022 | भाजपने शिवसेना फोडून नेमकं काय साध्य केलं?, ठाकरेंच्या कामगिरीने सेना किती खोलवर रुजलीय सिद्ध झालं
Maharashtra Gram Panchayat Election 2022 | महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यातील एकूण १ हजार ७९ ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज जाहीर होत आहे. या निवडणुकीत जवळपास सर्वच्या सर्व ग्रामपंचायतीचे कल हाती आले असून निवडणुकीत भाजप हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष (समर्थित पॅनल) ठरला आहे. तर महाविकास आघाडीने सुद्धा मोठा आकडा गाठल्याचे पाहायला मिळतंय. मात्र अधोरेखित होतेय ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कामगिरी. कारण, तब्बल ४० आमदार आणि १२ खासदार फुटणही शिवसेनेची राजकीय मूळ किती खोलवर रुजली आहेत याचा प्रत्यय आला आहे. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपची चिंता वाढणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
ग्रामपंचायत निवडणुकीत ती मतं एकनाथ शिंदे या चेहऱ्याला नव्हे | तर मतदारांच्या पारंपारीक धनुष्यबाण चिन्हाला व स्थानिक उमेदवाराला
२१ जून २०२२ ला शिवसेनेत सर्वात मोठं बंड झालं. एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेच्या नेतृत्वाविरोधात अर्थात उद्धव ठाकरेंच्या विरोधात हे बंड पुकारलं आहे. शिवसेनेला बंडाळी होणं हे काही नवं नाही. मात्र एकनाथ शिंदे यांचं बंड सर्वार्थाने वेगळं ठरलं कारण शिवसेना सत्तेत असताना हे बंड झालं. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं. ३० जूनला एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले. त्यानंतर राज्यातील मोजक्या ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या आहेत.
3 वर्षांपूर्वी