Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
सुजय यांनी व्हीडिओ चित्रित करण्याचा नाटकीपणा केला, मी कसं स्वत:चं वजन वापरलं हा दिखाऊपणा केला - न्यायालय
एखादी चांगली गोष्ट करण्यासाठी गैरमार्गाचा वापर झाला असेल तर त्या कृतीमागचा हेतू हा कधीच शुद्ध राहत नाही, अशा शब्दांत हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने भारतीय जनता पक्षाचे खासदार सुजय विखे-पाटील यांच्यावर कडक शब्दात ताशेरे ओढले. सुजय विखे-पाटील यांनी परस्पर रेमडेसिविर इंजेक्शन्सचा साठा खरेदी केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सोमवारी हायकोर्टाच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
4 वर्षांपूर्वी -
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा!... सर्व वाचकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 व्या वर्धापन दिन निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हुतात्मा स्मारक येथे पुष्प चक्र अर्पण करणार आहेत. या कार्यक्रमात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मुख्य सचिव सीताराम कुंटे, महापालिका आयुक्त इकबाल चहाल उपस्थित आहेत. करोनाची पार्श्वभूमीवर या कार्यक्रमात मोजक्याच लोकांना प्रवेश देण्यात आला.
4 वर्षांपूर्वी -
आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक | १८ वर्षांवरील सगळ्यांना मोफत लस दिली जाणार?
केंद्र सरकारनं १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणासाठी परवानगी दिली आहे. देशातील अनेक राज्यांनी मोफत लसीकरणाची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात मात्र अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. अशातच आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत राज्यातील कोरोना परिस्थिती, मोफत लसीकरण, लॉकडाऊन याचसोबत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. आज दुपारी साडेबारा वाजता मंत्रिमंडळाची ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र कडक निर्बंध | दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यात जाण्यासाठी कसा मिळवाल ई-पास? - स्टेप बाय स्टेप
राज्यात करोनाच्या गंभीर होत असलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर निर्बंधांची घोषणा केली आहे. यामध्ये जिल्हांतर्गत, आंतरजिल्हा आणि आंतरराज्य असा प्रवास करण्यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय उपचार किंवा अशा प्रकारच्या टाळता न येण्यासारख्या कारणांसाठीच फक्त प्रवासाची मुभा देण्यात आली असून अशा प्रवासासाठी पास काढण्याची सक्ती करण्यात आली आहे. यासाठी पोलीस विभागाकडून संकेतस्थळाची लिंक देण्यात आली असून त्या लिंकवरून संबंधितांनी पाससाठी अर्ज करण्याचं आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Maharashtra Lockdown | लग्न समारंभासाठी नवी नियमावली
राज्यात कोरोना रूग्ण संख्या सातत्याने वाढत असल्याने लॉकडाऊन जारी करणार असल्याचे संकेत काल झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीनंतर मंत्र्यांनी दिले होते. त्यानंतर काल (२१ एप्रिल) सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात कडक निर्बंधांची नियमावली जारी | आज रात्री ८ पासून लागू होणार नियम
राज्यात कोरोना रूग्ण संख्या सातत्याने वाढत असल्याने लॉकडाऊन जारी करणार असल्याचे संकेत काल झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीनंतर मंत्र्यांनी दिले होते. त्यानंतर काल (२१ एप्रिल) सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्याला आजपासून प्रतिदिन ६५ हजार रेमडेसिविर कुप्या मिळणार | अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांची माहिती
मागील आठवडाभर राज्याला केवळ ३५ हजार रेमडेसिविरच्या कुप्या मिळत होत्या. मात्र सात कंपन्यांच्या बॅच येण्यास प्रारंभ झाला असून राज्याला दैनंदिन ६५ हजार रेमडेसिविर कुप्या बुधवार, दि. २१ एप्रिलनंतर प्राप्त होतील. त्यामुळे रेमडेसिविरचा राज्यातील तुटवडा संपुष्टात येईल, अशी ग्वाही राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.
4 वर्षांपूर्वी -
खासगी वाहनाने राज्यांतर्गत प्रवास करता येईल का? जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरं
महाराष्ट्रातील दररोज वाढणारा कोरोनाबाधितांचा आकडा मोठा असल्याने राज्य सरकारची चिंता चांगलीच वाढली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (१४ एप्रिल) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज ५८ हजार ९५२ नव्या कोरोना बाधीत रुग्णांची नोंद झाली आहे. तर याच गेल्या २४ तासांत नवीन ३९ हजार ६२४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
‘युजलेस’ जावडेकर! गुजरातची हुजरेगिरी करून मातृभूमीची बदनामी करणारे हे महाराष्ट्रद्रोहीच - काँग्रेस
राज्यात केवळ दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा उपलब्ध आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारला लस पुरवण्याची कळकळीची विनंती केली. तसेच गुजरात छोटं राज्य असूनही महाराष्ट्रापेक्षा गुजरातला अधिक लसींचा पुरवठा करण्यात आल्याचा आरोप टोपे यांनी केला. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने लसीकरणाचं योग्य नियोजन केलं नसल्याचा आरोप केला आहे. राज्यातील अनेक केंद्रांवर लसच उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद ठेवण्यात आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
लॉकडाऊनची भीती | जनरल डब्ब्यांमध्ये एकमेकांवर बसून परप्रांतीय राज्याबाहेर
राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्याने राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन होऊ शकतो, असे संकेत काँग्रेसचे नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. परंतु, कोणत्याच उपायाला यश येताना दिसत नाही. अशातच केंद्र सरकारल महाराष्ट्राला सापत्न वागणूक देत आहे.
4 वर्षांपूर्वी -
आंध्र प्रदेशसह ६ राज्यांनी लस पुरवठ्याबाबत भीती व्यक्त केली होती | पण द्वेष केवळ महाराष्ट्रावर?
राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. देशभरातील सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात सापडत आहेत. दरम्यान आता राज्यावर अजुन एक संकट आले आहे. राज्यामधील विविध लसीकरण केंद्रांवर लसींचा तुटवडा भासत आहे. जर महाराष्ट्रात योग्य वेळी लसींचा पुरवठा झाला नाही तर येत्या तीन दिवसात राज्यातील लसींचा साठा हा संपण्याची भीती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कठोर निर्बंध | तर शुक्रवार रात्रीपासून ते सोमवार सकाळपर्यंत संपूर्ण लॉकडाउन | अत्यावश्यक सेवा सुरु राहणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्रातील लॉकडाऊनबाबत घोषणा करण्यात आली. यामध्ये आठवड्याचे पाच दिवस कडक निर्बंध आणि शनिवार-रविवार कडक लॉकडाऊन करण्यात येण्याबाबत निर्णय घेण्यात आला. उद्या सायंकाळी 8 वाजल्यापासून नियमावली लागू होईल. उद्योग व्यवसायांना कंपनीच्या वेळा ठरविण्यात येणार आहेत. सिनेमागृहे, नाट्यगृह बंद राहणार आहेत. कंपन्यांमध्ये कोरोना रुग्ण सापडला तर त्याची जबाबदारी कंपनी मालकाची असेल, असे मुंबईच्या पालकमंत्र्यांनी सांगितले. रात्रीच्या वेळी अत्यावश्यक सेवांनाच संचार करण्यास मुभा देण्यात येणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर ‘वर्षा’वर बोलावली महत्वाची बैठक
राज्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. पुन्हा लॉकडाऊन लावण्यासारखी परिस्थिती सध्या उद्भवली आहे. राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी 4.30 वाजता महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, देशातीलही एकूणच कोरोची स्थिती गंभीर होत असल्याने आज दिल्लीतही महत्वाची बैठक होणार आहे. तसेच, पुण्यातही आज पुण्याचे पालकमंत्री अजित पवार बैठक घेणार आहेत. पुण्यात लॉकाडऊन लागणार की निर्बंध क़डक होणार यासाठी आजची बैठक आहे. त्यामुळे एकूणच कोोरनाची स्थिती पाहता आजच्या सगळ्या बैठका महत्वाच्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
लॉकडाउन नव्हे | तर परिस्थितीनुरूप कठोर निर्बंधांवर भर देण्याचे सरकारचे संकेत
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णसंख्येत प्रचंड वाढ होत असताना काल धुळवडी दिवशी मात्र रूग्णसंख्येत घट झाली आहे.त्यामुळे महाराष्ट्राला दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. मागील २४ तासांत राज्यात कोरोनाचे ३१ हजार ६४३ नवे रुग्ण वाढले आहेत. महत्वाची बाब म्हणजे रविवारी राज्यात ४० हजाराहून अधिक रुग्ण आढळले होते. तर शनिवारी राज्यात तब्बल ३५ हजार ७२६ नवे रुग्ण वाढले होते.त्यामुळे गेल्या दोन दिवसांच्या आकडेवारीच्या तुलनेत आज मात्र रूग्णसंख्येत घट झाल्याने महाराष्ट्रासाठी समाधानकारक बाब आहे.
4 वर्षांपूर्वी -
लस पुरवठ्यावरून महाराष्ट्र सरकारवर आगपाखड करणाऱ्या केंद्राकडून परदेशात सर्वाधिक पुरवठा
देशात कोरोना संक्रमणानं पुन्हा एकदा वेग घेतलेला दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातून समोर येत आहेत. याच दरम्यान केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारवर लसीकरण आणि लस पुरवठ्यावरून बेजबाबदारपणाचा आरोप केला होता. राज्याला पुरवण्यात आलेल्या लसीच्या डोसपैंकी ५६ टक्के लसीचा वापरच करण्यात आलेला नाही, असं जावडेकर यांनी म्हटलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
रिपोर्टनुसार फडणवीस सरकारच्या काळातच सर्वाधिक महिला अत्याचार
सध्या महिला अत्याचारावरून भारतीय जनता पक्षाचे नेते महाविकास आघाडी सरकारवर आरोप करत असले तरी सर्वाधिक महिला अत्याचार हे फडणवीस सरकारच्या काळात आसल्याच उघड झालं आहे. त्यामुळे भाजप नेत्यांचे दावे अधिकृत आकडेवारीतून खोटे ठरत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
आमदार फुटत नव्हते | अनपेक्षितपणे निवडक IPS अधिकाऱ्यांचं बंड समोर आलं | आधीच भविष्यवाण्या?
राज्य सरकारशी छुपा वाद झाल्याने तीन अतिवरिष्ठ पोलिस अधिकारी गेल्या अडीच महिन्यात प्रतिनियुक्ती तथा डेप्यूटेशनवर केंद्रात गेले आहेत. त्यात राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल, महासंचालक (नागरी संरक्षण दल) रश्मी शुक्ला आणि डीआयजी मनोजकुमार शर्मा यांचा समावेश आहे. तर, त्यांच्यापेक्षा उघड आणि मोठा जाहीर वाद नाही तर संघर्ष परमबीरसिंह यांचा झाला, असल्याने ते ही केंद्रात डेप्यूटेशनवर जाणार का याकडे लक्ष लागले आहे.
4 वर्षांपूर्वी -
त्या केवळ फोनच टॅप करत नव्हत्या | तर फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी अपक्ष आमदारांना फोडण्यातही सक्रिय..
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकल्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा एक मोठा प्रहार केला आहे. मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलीस दलातील बदल्यांमध्ये झालेल्या हेरफाराबद्दल महाविकास आघाडी सरकारवर आरोप केले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Maha Budget 2021-22 | दारुच्या किमती वाढणार | व्हॅटमध्ये 5% वाढ
आज अर्थमंत्री अजित पवार यांनी अनेक घोषणा केल्या. पण राज्यात नेमकं काय स्वस्त होणार आणि काय महागणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. राज्याचं करसंकलनाचं उद्दिष्ट आणि आर्थिक गणित बसवण्यासाठी अजित पवारांनी मद्यावर करवाढ प्रस्तावित केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
देव माणसं | लग्नाच्या ६ महिन्यात नवऱ्याचा मृत्यू | सासू-सासऱ्यांचा सूनेच्या पुनर्विवाह्यासाठी पुढाकार
आपल्या आजूबाजूला सूनेचा वेगवेगळ्या कारणांसाठी छळ होतानाच्या घटना घडत असतात. पण शालिग्राम आणि वस्तलाबाई वानखेडे यांनी विधवा सूनेचा सांभाळ करत तिचा विवाह लावून दिल्याने त्यांच्या कार्याचे संपुर्ण जिल्ह्यात कौतूक होत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालूक्यातील सूनगाव या गावात सूनेच्या लग्नाचा अनोखा सोहळा पार पडला.
4 वर्षांपूर्वी