Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Former PM Manmohan Singh admitted to AIIMS | डॉ. मनमोहन सिंग प्रकृती कारणामुळे एम्स रुग्णालयात दाखल
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती खालावली आहे. ताप आणि अशक्तपणाच्या तक्रारीनंतर त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 88 वर्षीय डॉ. सिंह यांच्यावर एम्सच्या सीएन टॉवरमध्ये (Former PM Manmohan Singh admitted to AIIMS) उपचार सुरू आहेत.
4 वर्षांपूर्वी -
सध्याची बेरोजगारीची समस्या नोटबंदीच्या चुकीच्या निर्णयामुळे उद्भवली आहे - डॉ. मनमोहन सिंह
माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांनी मंगळवारी केंद्रातील मोदी सरकारला बेरोजगारीच्या मुद्यावर चांगलीच चपराक दिलीय. २०१६ साली मोदी सरकारनं कोणत्याही विचार-विनिमयाशिवाय घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशात बरोजगारी सर्वोच्च स्तरावर आहे, असं डॉ. मनमोहन सिंह यांनी म्हटलंय.
4 वर्षांपूर्वी -
भारताला डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या पंतप्रधानाची कमतरता जाणवतेय
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा आज ८८ वा वाढदिवस आहे. मनमोहन सिंग शांत आणि साधेपणासाठी ओळखले जातात. केवळ साधेपणाच नाही तर ते भारतीय अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी देखील ओळखले जातात. यूपीएच्या कार्यकाळात मनमोहन सिंग दोनदा पंतप्रधान राहिले. २००४-१४ पर्यंत ते भारताचे पंतप्रधान होते. पंतप्रधान होण्यापूर्वी ते १९९१ मध्ये नरसिंहराव सरकारमधील आर्थिक सुधारणांकरिता परिचित होते.
5 वर्षांपूर्वी -
आपल्या सरकारच्या कृती व निर्णयावरून भविष्यातील पिढी आपल्याला ओळखणार - डॉ. मनमोहन सिंग
भारत-चीन हिंसक चकमकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी, “भारतीय सीमेत कोणीही घुसखोरी केलेली नाही,” असं विधान केलं होतं. या विधानावरुन गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर स्पष्टीकरण द्यायची वेळी सुद्धा पंतप्रधान कार्यालयावर आली होती. नेमकं सीमेवर काय झालं या बाबत नेमकी माहिती कोणाला माहिती नाही आहे. या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पत्र लिहिलं आहे. या पत्रात पंतप्रधानांनी सुरक्षा, सामरिक मुद्द्यांवर जपून बोललं पाहिजे, असा सल्ला दिला आहे. कुठलाही भ्रामक प्रचार सक्षम नेतृत्वाला पर्याय ठरत नाही, असं देखीन मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी