Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
भाजपच्या मदतीने संसदेत प्रस्ताव आणून मराठा आरक्षणाचा कायदा करावा | भाजप ते करत नसेल तर... - हर्षवर्धन जाधव यांची भूमिका
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही भेटायला तयार नसतील तर संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा, असे वक्तव्य कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केले. राज्यात दौरे करुन किंवा आंदोलन करुन मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही, असेही हर्षवर्धन जाधव यांनी म्हटले.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | पवार भेटीनंतर संभाजीराजे राज ठाकरेंची भेट घेणार
मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी राज्यभरातील अभ्यासक, जाणकार आणि नेत्यांच्या भेटीगाठी घेत असलेले संभाजीराजे छत्रपती गुरुवारी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेणार आहेत. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संभाजीराजे राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी दाखल होतील, असे सांगितले जात आहे. मराठा आरक्षणावर राज ठाकरे यांची नेमकी काय भूमिका आहे, हे जाणून घ्यायचा संभाजीराजे यांचा प्रयत्न आहे.
4 वर्षांपूर्वी -
पक्षाने किती सन्मान दिला हे संभाजीराजे सांगत नाहीयेत | आमच्याकडून त्यांच्याबद्दल अपशब्द निघणार नाही - चंद्रकांत पाटील
खासदार छत्रपती संभाजीराजे भाेसले १८ व १९ मे राेजी नाशिक दाैऱ्यावर येऊन गेल्यानंतर पाठाेपाठ अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील हेदेखील मंगळवारी (दि. २५) नाशिक दाैऱ्यावर येऊन गेले. त्यानंतर पुन्हा संभाजीराजेंनी नाशिकमध्ये तळ ठाेकून विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या गुप्त बैठका घेत चर्चा केली. आज गुरुवारी (दि. २७) ते आरक्षणासंदर्भात मराठा क्रांती माेर्चाच्या आंदोलनाची भूमिका स्पष्ट करणार आहेत. मराठा आरक्षणाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी शांतता व संयम राखण्याचे आवाहन मराठा समाजाला केले होते.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | संभाजीराजेंच्या सत्ताधाऱ्यांसोबतच्या बैठकांवर मेटेंना अविश्वास | आरक्षणापेक्षा टीकेवर भर?
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर खासदार संभाजीराजे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मराठा समाज अस्वस्थ आहे, त्यांना न्याय द्यावा, आरक्षण देण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा; अशी मागणी संभाजीराजेंनी पवारांकडे केली.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणासाठी पवारांनी पुढाकार घ्यावा | संभाजीराजेंची शरद पवारांकडे मागणी
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर खासदार संभाजीराजे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मराठा समाज अस्वस्थ आहे, त्यांना न्याय द्यावा, आरक्षण देण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा; अशी मागणी संभाजीराजेंनी पवारांकडे केली.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | खा. संभाजीराजे उद्या घेणार शरद पवारांची भेट ! मोदींनी कधीच भेट दिली नाही
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द ठरवल्यानंतर ते पुन्हा कसं मिळवायचं, यावर राज्य सरकारमध्ये चर्चा सुरू आहे. यासंदर्भात मराठा आरक्षण उपसमितीच्याही बैठका सुरू आहे. मात्र, त्याचवेळी मराठी आरक्षणाचा मुद्दा सुरुवातीपासून लावून धरणारे खासदार संभाजीराजे हे देखील महाराष्ट्रभर दौरे करत आहेत.यासंदर्भात कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, २७ मे रोजी संभाजीराजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण व छत्रपतींचा सन्मान कसा करतात हे भाजपाला शिकवू नका - प्रविण दरेकर
संभाजीराजे यांना मोदींनी का भेट दिली नाही यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर टीका केली होती. त्यांच्या टीकेला आता विधान परिषद विरोधी पक्षनते प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
श्रीमंत मराठ्यांना एक टक्काही आरक्षण नको, पण बहुजनांना जो न्याय, तोच गरीब मराठ्यांनाही द्या - संभाजीराजे छत्रपती
मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस तापत चालला आहे. अशात खासदार संभाजीराजे सध्या महाराष्ट्राभर दौरा करत मराठा समाजाच्या व्यथा जाणून घेत आहेत. आज (२६मे) औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलताना संभाजीराजे यांनी भाष्य केले आहे. गरीब मराठा समाजाला न्याय देण्याची वेळ आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार मराठा आरक्षणाबाबत सुधारणा व बदल करण्याचा अधिकार आता संसदेला - घटनातज्ज्ञ उल्हास बापट
कालच छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, “मराठा आरक्षणाबाबत मी अनेक कायदेतज्ज्ञांशी चर्चा केली आहे. त्यांनी काही सल्ले दिले आहेत. त्याची माहिती सरकारला देणार आहे. आंदोलन हा एक भाग असू शकतो. पण मराठा आरक्षणाबाबत सरकारला काय सूचना करता येईल? मराठा आरक्षणावर काय कायदेशीर मार्ग आहे? याची माहिती घेण्यासाठी हा दौरा करण्यात येत आहे. त्यातून समाजाच्या व्यथाही समजून घेता येणार आहे, असं संभाजी छत्रपती म्हणाले होते.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | …तर भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देईन, संभाजीराजे छत्रपती आक्रमक
राजीनामा देऊन मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटणार असेल तर मी आताच खासदारकीचा राजीनामा देईन, असा इशाराच भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिलाय. संभाजीराजे छत्रपती यांनी आज सोलापुरात पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. सुप्रीम कोर्टाने गायकवाड समितीचा अहवाल रद्द केल्यानंतर मराठा समाजातील प्रमुखांची आरक्षणाविषयीची भूमिका जाणून घेण्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे हे राज्य दौऱ्यावर आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मोदींना काय वाटतं ते संभाजीराजेंना नव्हे तर चंद्रकांतदादांना कळवलं होतं? का भेट दिली नाही त्यावर अजब प्रतिक्रिया
मराठा आरक्षण हा राज्याचा विषय आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटते. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांची आजपर्यंत संभाजीराजे छत्रपतींशी भेट होऊ शकली नाही, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. मराठा आरक्षणाविषयी संभाजीराजे यांनी त्यांचं मत मांडलं आहे. विनायक मेटे यांनीही आपली बाजू मांडली.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजेंचा कायदेशीर आणि विषयाला अनुसरून सुज्ञ मार्ग | महाराष्ट्र दौरा सुरू
कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आता रणशिंग फुंकले आहे. राज्यातील मराठा समाजाच्या अपेक्षा समजून घेण्यासाठी मुंबई आणि मराठवाड्याचा दौरा करणार असल्याची घोषणा संभाजीराजे यांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मी भाजपचा ठेका घेतलेला नाही | भाजपने मराठा समाजाच्या भावनेशी खेळू नये, तोडगा सांगावा - संभीजीराजे संतापले
मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन करण्यासाठी आग्रही असलेल्या भाजपला संभीजीराजे छत्रपती यांनी चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट हवी होती. त्यासाठी मी चारवेळेला पंतप्रधान मोदींना पत्रही दिले. परंतु, अद्याप त्यांनी मला भेटीसाठी वेळ दिलेली नाही, असे सांगत संभाजीराजे छत्रपती यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. ते गुरुवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणावरून संभाजीराजे गरजले | पंतप्रधान मोदींना चारवेळा पत्र दिले | अद्याप भेट दिली नाही
मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन करण्यासाठी आग्रही असलेल्या भाजपला संभीजीराजे छत्रपती यांनी चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट हवी होती. त्यासाठी मी चारवेळेला पंतप्रधान मोदींना पत्रही दिले. परंतु, अद्याप त्यांनी मला भेटीसाठी वेळ दिलेली नाही, असे सांगत संभाजीराजे छत्रपती यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली.
4 वर्षांपूर्वी -
पदोन्नतीतील आरक्षण रद्दचा निर्णय तूर्तास मागे, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
ठाकरे सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. पद्दोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. ठाकरे सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयामुळे बराच वाद झाला होता. आज (१९ मे) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय स्थगित करण्यात आला आहे. या निर्णयावरुन राज्य सरकारवर टीका होत होती. त्यामुळे महाविकासआघाडी सरकारने कुठे तरी एक पाऊल मागे घेतले आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपाची बैठक मराठा आरक्षणासाठी नव्हे तर आंदोलनासाठी आहे - अशोक चव्हाण
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केलं आहे. या पार्श्वभूमीवर पुढील रणनीती ठरविण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक सुरू झाली आहे. तर, मराठा आरक्षणावर पुढील दिशा ठरवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने देखील महत्त्वाची बैठक बोलावली आहे. त्यामुळे या दोन्ही बैठकांमध्ये काय निर्णय होतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत माझी भूमिका लवकरच जाहीर करेन - छत्रपती संभाजीराजे
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापायला लागले असतानाच आता छत्रपती संभाजीराजे यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये संभाजीराजे यांनी आपण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर लवकरच भूमिका मांडणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता संभाजीराजे आरक्षणासाठी सामोपचाराची का सरकारविरुद्ध एल्गार करण्याची भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा समाजाच्या आंदोलनात भाजपचा सक्रिय पाठिंबा | पक्षीय स्वरूपाने समाजात उभी फूट पडण्याची भीती - सविस्तर वृत्त
मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळावे यासाठी समाजातर्फे होणाऱ्या आंदोलनाला भारतीय जनता पार्टीचा संपूर्ण पाठिंबा असेल व पक्षाचे नेते, कार्यकर्ते त्यामध्ये संपूर्ण ताकदीने सहभागी होतील, अशी घोषणा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी मुंबई येथे केली. मराठा आरक्षणासाठी आपल्या अध्यक्षतेखाली पक्षाची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
4 वर्षांपूर्वी -
निकालापासून फडणवीसांकडून ना राज्यपालांची भेट, ना पंतप्रधानांची, ना राष्ट्रपतींची... पण दिली ही रोजची प्रतिक्रिया
राज्यातील मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाकडून नुकतंच रद्द करण्यात आलं होतं. याप्रकरणी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. 102 घटनादुरुस्तीच्या संदर्भात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. 50 टक्क्याहून अधिक आरक्षण देणे हे अंसवैधानिक आहे की नाही याबाबत ही पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. 102 व्या घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची स्थापना झाली होती. त्यानुसार राज्यांना आरक्षणाचा अधिकार उरले नसल्याचं कोर्टाने म्हटलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
राज्य सरकारचं शिष्टमंडळाने राज्यपालांना भेटलं, पंतप्रधानांची वेळ मागणार असल्याचे जाहीर होताच....
राज्यातील मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाकडून नुकतंच रद्द करण्यात आलं होतं. याप्रकरणी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. 102 घटनादुरुस्तीच्या संदर्भात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. 50 टक्क्याहून अधिक आरक्षण देणे हे अंसवैधानिक आहे की नाही याबाबत ही पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. 102 व्या घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची स्थापना झाली होती. त्यानुसार राज्यांना आरक्षणाचा अधिकार उरले नसल्याचं कोर्टाने म्हटलं होतं.
4 वर्षांपूर्वी