Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
VIDEO | जान कुमार सानूचा माफीनामा | अशी चूक पुन्हा होणार नाही
टीव्ही रियलिटी शो बिग बॉस १४ (TV Reality show Bigg Boss) मध्ये आता हळूहळू वादविवाद वाढू लागले आहेत. पण अलीकडेच या शोचे स्पर्धक आणि गायक जान कुमार सानू (Singer Jan Kumar Sanu) याने मराठी भाषेवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जान याच्या वक्तव्याबद्दल माफी मागण्यासाठी २४ तास दिले होते. त्यानंतर बिग बॉस या कार्यक्रमात जानला त्याच्या चुकीची जाणीव करून देत त्याला नॅशनल टेलिव्हिजनवर माफी मागावी लागली. जानने मराठी लोकांची माफी मागून यापुढे अशी चूक करणार नाही अशी ग्वाही दिली.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO | जान कुमार सानूचा मराठी भाषेबद्दलचा द्वेष दाखवणारा व्हिडिओ पाहा
सध्या ‘बिग बॉस’चे 14वे पर्व सुरू जोशात सुरू आहे. यात रोज काहीना काही नवे वाद उभे राहत आहेत. स्पर्धकांची आपापसांत रोजची भांडणे सुरू आहेत. आता यात प्रेमाचा त्रिकोण समोर आल्यानंतर नवी खडाजंगी सुरू झाली आहे. गायक राहुल वैद्य, जान कुमार सानू आणि निक्की तंबोली यांच्यात आपापसांत जोरदार वाद सुरू आहेत. या वादादरम्यान जान कुमार सानूने मराठी गायक राहुल वैद्य याच्यावर शाब्दिक हल्लाबोल करताना ‘मराठी’ भाषेबद्दल अपमानकारक शब्द उच्चारले. यानंतर आता मनसेच्या अमेय खोपकरांनी जान कुमार सानूला धमकीवजा इशारा दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मराठी चित्रपटांवरील अन्यायावर मनसे आक्रमक
फर्जंद सिनेमाचे सर्व शो सकाळी ११ ते दुपारी १.३० या वेळेत होत आहेत. या प्रकारामुळे नाराज झालेल्या ‘फर्जंद’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्याकडे धाव घेतली. तरीही सिनेमाला तात्काळ प्राईम टाइम शो नाही दिले तर मनसे स्टाईलने आंदोलन करू असा इशारा वजा धमकी मनसे चित्रपट सेनेकडून देण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
छत्रपती शिवाजी महाराज संबंधित 'फर्जंद' सिनेमाला मुंबईत प्राईम टाईम नाही - मनसे आक्रमक
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सेनेतले सुभेदार आणि तानाजी मालुसरेंचे शागीर्द सुभेदार कोंडाजी फर्जंद यांनी अवघ्या ६० मावळ्यांना सोबत घेऊन मिळवलेला पन्हाळा किल्ला आणि त्यांनी दाखवलेले शौर्य याची उत्तम कहाणी म्हणजे फर्जंद सिनेमा.
7 वर्षांपूर्वी -
न्यूड : 'कपडा जिस्म पे पहनाया जाता है, रुह पे नही'
चौकटीबाहेरच्या विषयांना हाताळत चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांना काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न दिग्दर्शक रवी जाधवने त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘न्यूड’ या चित्रपटातूनही केला आहे.
7 वर्षांपूर्वी