Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
आ. निलेश लंकेचा लंडनमध्ये डंका | वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
राज्यातील कोरोना परिस्थिती ही दिवसेंदिवस गंभीर होत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके त्यांनी उभारलेल्या कोरोना कोविड सेंटरमध्ये जाऊन रुग्णांची काळजी घेत असल्याचं पाहायला मिळालं होतं. “माझं काय व्हायचं ते होऊ द्या मात्र जर मी घाबरून घरात बसलो तर या लोकांनी कोणाच्या दारात बसायचं. त्यामुळे मी असुरक्षित असलो तरी चालेल पण माझी लोक सुरक्षित असली पाहिजेत, हे शब्द राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांचे होते. मतदारसंघातील कोरोनाबाधित रुग्णांच्या आरोग्य सेवेचा निर्धार त्यांनी केला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही त्यांनी कोविड केअर सेंटरची उभारणी केली.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीच्या आमदाराने उभारलेल्या कोविड सेंटरची योगी सरकारला भुरळ | मुख्य सचिवांची आ. निलेश लंकेशी चर्चा
महाराष्ट्र सरकार मागील अनेक दिवसांपासून कोरोना नियंत्रण करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. यामध्ये अनेक लोकप्रतिनिधी देखील महत्वाची भूमिका बजावत आहेत. महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी लोकसहभागातून उभारलेल्या कोविड सेंटरची चांगलीच चर्चा आहे. परदेशातूनही या सेंटरला मदत मिळत आहे. तसेच, आता या कोविड सेंटरची उत्तर प्रदेश सरकारला देखील भूरळ पडली आहे. उत्तर प्रदेशात सामान्य लोकांसहित योगी सरकारमधील मंत्री आणि आमदारांनी देखील कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.
4 वर्षांपूर्वी