Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Mumbai Electricity OFF | आता केंद्रीय अधिकाऱ्यांचे पथक मुंबईला भेट देणार
मुंबईमधील काल (१२ ऑक्टोबर) खंडित झालेला वीजपुरवठा मोठ्या प्रमाणात पूर्ववत करण्यात आला आहे. २००० मेगावॉट पेक्षा जास्त पुरवठा खंडित झाला होता, आता जवळपास सर्वच वीज पुरवठा सुरु झाला आहे. उर्वरित पुरवठा लवकरात लवकर पूर्ववत केला जाईल अशी माहिती केंद्रीय उर्जा आणि नवीन तसेच नवीकरणीय उर्जा मंत्री आर.के.सिंग यांनी काल दुपारी दिली होती. राष्ट्रीय ग्रीड सुरक्षित असून राज्याच्या ग्रीडच्या काही भागांमध्ये बिघाड झाला होता असे त्यांनी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
डोंबिवली: एमआयडीसी फेस २ मधील मेट्रो पोलिटीन केमिकल कंपनीला भीषण आग
डोंबिवली एमआयडीसी फेस २ मधील मेट्रो पोलिटीन या केमिकल कंपनीमध्ये भीषण आग लागली. या कंपनीत मोठ्या प्रमाणात केमिकलचा साठा आहे. आगीमुळे केमिकलच्या ड्रममध्येही सतत स्फोट सुरु आहेत. अग्निशमन दलाच्या १२ गाड्या आग विझवण्याचे प्रयत्न करत आहे. या आगीनंतर या कंपनीतील आणि आजूबाजूच्या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
5 वर्षांपूर्वी -
विश्व हिंदू महासभा अध्यक्ष रणजीत बच्चन हत्या प्रकरणी मुंबईतून एकाला अटक
विश्व हिंदू महासभेचे अध्यक्ष रणजीत बच्चन यांची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना गेल्या रविवारी सकाळी उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये घडली होती. रणजीत बच्चन हे हजरतगंज भागातून मॉर्निंग वॉकला जात असताना मोटारसायकलवर आलेल्या अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. या घटनेमुळे उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलेलं असताना या हत्येप्रकरणातील एका आरोपीला मुंबईतून अटक करण्यात आलं असून पुढील धागेदोरे लवकरच पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी