Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
गर्दी टाळा सांगणार सरकार अशा गर्दी करून पत्रकार परिषद घेत आहे - सविस्तर वृत्त
भारतामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार वेगाने होत आहे. या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. आरोग्य मंत्रालयाने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आणखी ११ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत ती १४८ वर पोहचली आहे. यामध्ये २५ परदेशी नागरिकांचा समावेश आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ४१ वर; सदर व्यक्ती अमेरिकेतून आल्याचं वृत्त
कोरोनाबाधित रुग्णांची राज्यात आज मोठी वाढ झाली नसली तरीही पुणे आणि मुंबईत प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. तर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आथा ४० एवढी झाली आहे. त्यात २६ पुरूष आणि १४ महिला असे ४० करोना पॉझिटिव्ह रूग्ण असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनामुळे ६४ वर्षीय वरिष्ठ नागरिकाचा कस्तुरबा इस्पितळात मृत्यू
कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या आणि मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल असलेल्या एका रुग्णाचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. संबंधित रुग्ण हा ६५ वर्षांचा होता. या संदर्भातील माहितीला मुंबई महापालिकेने दुजोरा दिला आहे. या रुग्णाला आधीपासून मधुमेह आणि इतरही काही आजार होते. मंगळवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे महाराष्ट्रात मृत्यू झाल्याची ही पहिली घटना आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना: घरी कॉरंटाईन केलेल्या व्यक्तीच्या डाव्या हातावरील शिक्का असा आहे
राज्यातील कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक उपाय योजना करण्यात येत आहेत. परदेशातून परतल्यानंतर ज्यांना १०० टक्के घरी क्वॉरंटाईनच्या सूचना देण्यात आल्या आहेत त्यांच्या डाव्या हातावर शिक्का मारण्यात येत आहे. समाजात या व्यक्ती वावरताना आढळल्यास त्याची ओळख पटावी, यासाठी त्यांच्या डाव्या हातावर खास शिक्का उमटवण्याच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती देखील दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना चाचणी: घरी क्वारंटाइन केलेल्यांच्या हातावर शाई मारणार: आरोग्यमंत्री
मुंबईपाठोपाठ आता नवी मुंबईतही कोरोनाव्हायरसचा नवा रुग्ण आढळून आला आहे, ज्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 39 वर पोहोचली आहे. आज दिवसभरात राज्यात मुंबईत ४, यवतमाळमध्ये एक आणि नवी मुंबईत एक असे एकूण ६ नवे रुग्ण आढळून आलेत. राज्यात कोणत्या ठिकाणी कोरोनाव्हायरसचे किती रुग्ण आहेत, याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिद्धिविनायक मंदिर पुढील काही दिवस बंद
जगभरात हाहाकार माजवलेला कोरोना व्हायरस महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पसरू नये, म्हणून सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यभरातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा तसंच विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारसोबतच विविध संस्थाही पुढे येत याबाबत उपाययोजना करत आहेत. अशातच सिद्धिविनाय मंदिर समितीनेही मोठं पाऊल उचलत पुढील काही दिवस मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात आणखी ४ नवे रुग्ण; कोरोना बाधितांची संख्या ३७ वर
राज्यात कोरोनाचा धोका वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार आणखीन ४ रुग्ण पॉझिटिव्ह झाल्याची माहिती मिळत आहे. आता राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३७ वर गेली आहे. मुंबईमध्ये तीन आणि नवी मुंबईत एक रुग्ण आढल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे. कोरोनाचा वाढत्या संसर्ग लक्षात घेता शाळा, महाविद्यालयं, चित्रपट गृह बंद ठेवण्यात आली आहेत. पुण्यापाठोबात आता मुंबईमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पाहायला मिळत असल्यानं मुंबईकरांना सावधानतेचा इशाराही देण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई महापालिकेकडून सेव्हन हिल्स हॉस्पिटल ताब्यात; ५०० बेड्स उपलब्ध करणार
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नुकताच कस्तुरबा गांधी रुग्णालयाचा आढावा घेतला. यावेळी राज्य शासनाने घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांची त्यांनी माहिती दिली. कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाचे ८० संशयित रुग्ण दाखल आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभुमीवर सरकारी रुग्णालयात नव्या लॅब सुरु करण्यात येणार आहेत. राज्यभरात दोन दिवसात लॅब आणि डॉक्टरांची संख्या वाढवणार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
जेट एअरवेजचे माजी CEO नरेश गोयल यांच्या मुंबईस्थित घरावर ED'ची धाड
जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांची बलार्ड इस्टेट कार्यालयामध्ये चौकशी केल्यानंतर त्यांना अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) ताब्यात घेतलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गोयल यांना ईडीच्या पथकानं ताब्यात घेऊन त्यांच्या घरी नेले आणि घराची झाडाझडती घेतली. गोयल यांच्याविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
आरे आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत सरकारकडून कोणताही निर्णय नाही
कोरेगाव-भीमा प्रकरणातील ३४८ गुन्हे मागे घेण्यात आले असून मराठा आंदोलनातील ४६० गुन्हे मागे घेण्यात आल्याचं सांगतानाच शेतकरी आंदोलनातील गुन्हेही लवकरच मागे घेण्यात येतील, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. तसेच आपल्याविरोधीतील बाजू असणाऱ्यांना तत्कालीन फडणवीस सरकारने शहरी नक्षलवादी संबोधल्याचा टोलाही त्यांनी लगावला. तसेच या प्रकरणातील इतरही अनेक गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
ठाकरे सरकार हाजी अलीत साकारणार मुघल गार्डन; मेकओव्हरसाठी ३५ कोटी
मुंबईतील महत्त्वाचे धार्मिक व पर्यटन स्थळ असलेल्या हाजी अली दर्गाचे नुतनीकरण व सौंदर्यीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज येथे दिले. हाजी अली दर्गा नुतनीकरण व सौंदर्यीकरणासंदर्भात आज मंत्रालयात अस्लम शेख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. यावेळी दर्गाच्या नुतनीकरण व सौंदर्यीकरणाच्या आराखड्याचे सादरीकरणही करण्यात आले.
5 वर्षांपूर्वी -
CAA-NRC विरोध मोर्चा: आझाद मैदानात संविधान बचाओ, भारत बचाओ घोषणाबाजी
नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी)च्या विरोधात मुंबईतील आझाद मैदानात आज महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. एकूण ६५ संघटना या महामोर्चात सहभागी झाल्या आहेत. ‘संविधान बचाव’चा नारा या मोर्चातून घुमत आहे.
5 वर्षांपूर्वी -
ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर यांचे वृद्धपकाळाने निधन
ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर यांचे आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास वृद्धपकाळाने निधन झाले. वयाच्या ९०व्या वर्षी राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचाराआधीच त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. हिंदमाता येथील स्मशानभूमीत आज सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई: अंधेरी पूर्वेकडील मरोळ एमआयडीसीतील इमारतीला भीषण आग
अंधेरी पूर्व एमआयडीसी परिसरातील रोल्टा टेक्नॉलॉजीज या आयटी कंपनीला भीषण आग लागली. कंपनीच्या दुसऱ्य़ा मजल्यावरील सर्व्हर रुमला आग लागल्याची माहिती आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या २४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तब्बल चार तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. ही आग लेव्हल-४ ची असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईत महिला असुरक्षित; नाईट नाईफ निर्णयावेळी सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले होते
माटुंगा रेल्वे स्थानकावर महिलांची छेडछाड काढत विनयभंग करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र महिलांनी कोणतीही तक्रार दाखल न केल्याने फक्त चोरीचा गुन्हा दाखल होत या विकृताची सुटका होण्याची शक्यता आहे. हा व्यक्ती रेल्वे स्थानकावर महिलांना स्पर्श करताना सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहे. इतकंच नाही तर तो हस्तमैथून देखील करत होता. दोन महिलांना पोलिसांना यासंबंधी माहिती दिली. पण त्यांनी तक्रार दाखल करण्यास नकार दिला. रजिऊर खान असं या विकृताचं नाव आहे.
5 वर्षांपूर्वी -
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे निधन
स्त्रीवादाच्या भाष्यकार, ‘मिळून साऱ्या जणी’च्या संपादक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. त्या ८४ वर्षांच्या होत्या. पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव पुण्यातील नचिकेत या त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या जाण्यानं महिला चळवळीचा आधारस्तंभ निखळल्याची भावना व्यक्त होत आहे.
5 वर्षांपूर्वी -
सावधान! मुंबईत पोहोचला कोरोना व्हायरस; २ संशयित रुग्णालयात
चीन कोरोना विषाणूने (व्हायरस) बाधीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी वुहान शहरात केवळ १० दिवसांच्या कालावधीत नवं रुग्णालय उभारत आहे. या रुग्णालयाच्या बांधकामाला गुरुवारी सुरुवात झाली. ३ फेब्रुवारीला हे अद्ययावत रुग्णालय सुरु होईल. आत्तापर्यंत चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे २६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर शेकडो लोकांना याची बाधा झाली आहे. त्यामुळे चीनने युद्ध पातळीवर यावर काम सुरु केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
ही नाइटलाइफ नसून किलिंग लाइफ आहे; आशिष शेलारांनी कमला मिलचं उदाहरण दिलं
मुंबईत नाईट लाईफला राज्य सरकारकडून तत्वत: मंजुरी देण्यात आली आहे. कॅबिनेट बैठकीनंतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. ‘पब आणि बारसाठी नवे नियम करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पब आणि बार हे आधीप्रमाणेच रात्री दीड वाजेपर्यंतच सुरू राहतील,’ अशी माहितीही आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. ‘मुंबईचा महसूल वाढण्यासाठी आम्ही २०१३ मध्ये ही नाईट लाईफची संकल्पना मांडली होती. आता सात वर्षानंतर ही संकल्पना प्रत्यक्षात राबवण्यात येत आहे. यामुळे रोजगारात वाढ होणार आहे. २७ जानेवारीपासून नाईट लाईफबाबतचा नियम लागू होईल,’ अशी माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक आश्विनी भिडेंची उचलबांगडी; पण का? सविस्तर वृत्त
मुंबई मेट्रो रेल्वेच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील झाडांची कत्तलीनंतर वादग्रस्त ठरलेल्या मुंबई मेट्रो रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालक आश्विनी भिडे यांची त्या पदावरून मंगळवारी उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागी रणजीत सिंह देओल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भिडे यांना मात्र अद्याप कोणतीही नवी नियुक्ती देण्यात आलेली नाही.
5 वर्षांपूर्वी -
२६ जानेवारीपासून मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर ‘नाईट लाईफ’ सुरु होणार: आदित्य ठाकरे
मुंबईत आता मर्यादीत आणि अरहिवासी भागात हाँटल, मॉल्स आणि थिएटर २४ तास खुले रहाणार आहेत. येत्या 26 जानेवारीपासून मुंबईतील नरीमन पॉईंट, बीकेसी, काला घोडा आणि मिल कंपाऊड भागात याची अमंलबजावणी सुरू होणार असल्याची माहीती राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. त्यामुळे आता मुंबई रात्रभर जागणार आहे.
5 वर्षांपूर्वी