Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Maharashtra Bandh | शेतकऱ्यांचे बळी घेणाऱ्या भाजपाला बंद पाळून नागरिकांची सणसणीत चपराक
आजचा महाराष्ट्र बंद पूर्णपणे यशस्वी झाला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये नागरिकांनी कडकडीत बंद पाळून शेतकऱ्यांचे मारेकरी म्हणजेच भारतीय जनता पक्षाला सणसणीत चपराक लगावली आहे. बंदला विरोध करून (Maharashtra Bandh) भारतीय जनता पक्षाने आपला खरा शेतकरी विरोधी चेहरा दाखवून दिला आहे. उत्तर प्रदेशात रामराज्याच्या नावाखाली तालीबानी राजवट सुरु असून उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांचे बळी दिले जात आहेत, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
4 वर्षांपूर्वी -
Congress Rally | शेतकरी विरोधी काळे कृषी कायदे, वाढती बेरोजगारी, महागाई विरोधात अकोल्यात काँग्रेसचा निषेध मोर्चा
अकोल्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देश रसातळाला गेला आहे. शेतकरी, कामगार, कष्टकरी, सामान्य माणसांचे जगणे कठीण झाले आहे. मोदी सरकारचे शेतकरीविरोधी धोरण, कामगारविरोधी धोरण, बेरोजगारांच्या विरोधातील धोरण, गरिबांच्याविरोधातील धोरणांना विरोध करण्यासाठी ही लढाई आहे. सामान्य जनतेला न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरुच राहिल’,
4 वर्षांपूर्वी -
फडणवीस सरकारच्या काळातील फायली बाहेर काढणार | तशी वेळच आता आली आहे - नाना पटोले
काँग्रेस पक्षातील दोन मंत्र्यांचे घोटाळे लवकरच आपण बाहेर काढणार आहोत असा इशारा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. त्याला “कर नाही, त्याला डर कशाला” असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे. यावेळेस चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असा टोलाही पटोले यांनी लगावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपचा ताणतणाव कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलंय ‘ते’ वक्तव्य - नाना पटोले
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर होते. आज एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी आजी, माजी आणि एकत्र आलो तर भावी सहकारी, असे विधान केले. यावेळी रावसाहेब दानवे देखील मंचावर होते. त्यावरून आता तर्कवितर्क लढविण्यास सुरुवात झाली असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यावरच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
OBC Reservation | ओबीसी नेतृत्व संपुष्टात आणण्याचे पाप भाजपाचे | सत्तेत असताना झोपा काढल्या, आता आंदोलन - नाना पटोले
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज (बुधवार) दुपारी साडेतीन वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे होणार आहे. या बैठकीमध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. ओबीसी राजकीय आरक्षण संपुष्टात आल्यानंतर राज्य सरकारसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच सण उत्सवाच्या दिवसात कोरोना रुग्णांची वाढती संख्या याबाबत देखील चर्चा होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
काँग्रेसनं अनेकांना जमीन राखायला दिली | त्यांनीच चोरली-डाका मारला - पटोलेंचा पवारांना टोला
आजच्या काँग्रेसची अवस्था उत्तर प्रदेशातील एखाद्या जमीनदारासारखी झाली आहे. रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार सगळे हिरवेगार शिवार माझे होते, असे सांगतो, तसे आजच्या काँग्रेस झाले आहे अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे त्याच वेळी काँग्रेसच्या नेतृत्वाने वस्तुस्थिती स्वीकारली तर विरोधकांना एकत्र येण्यासाठी मार्ग मोकळा होईल, अशी सूचनाही त्यांनी करून घेतली आहे. शरद पवार एका ‘वेबपोर्टल’ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
भाजपाची जन आशीर्वाद यात्रा पेट्रोल, डिझेलचे भाव दुप्पट करायला आहे का? - नाना पटोले
भाजपाची जनआशीर्वाद यात्रा पेट्रोल, डिझेलचे भाववाढ दुप्पट करायला आहे का, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. भाजपाने लोकांना फसवले. आता कशाच्या बळावर तुम्ही जन आशीर्वाद यात्रा काढता, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपाला लगावला.
4 वर्षांपूर्वी -
25 वर्षे शिवसेना -भाजप एकत्र होती | तेव्हा गडकरींना शिवसेना कशी काम करते हे माहिती नव्हतं का?
केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून तक्रार केली आहे. राज्यातील महामार्गाच्या कामांमध्ये शिवसेना कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी अडथळे आणत असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले. तसेच शिवसेनेच्या नियमबाह्य कामामुळे आणि दहशतीमुळे राष्ट्रीय महामार्गाची कामे बंद पडतील. असा इशाराच मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. तसेच त्यांनी उद्धव मुख्यमंत्र्यांकडे महामार्गाच्या कामात येणाऱ्या अडचणींची दखल घेण्याची विनंती केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
प. बंगालप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही पेगॅसस प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी - नाना पटोले
बहुचर्चित पेगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून देशातील महत्वाचे राजकीय नेते, पत्रकार, वकील, सामाजिक कार्यकर्ते यांचे फोन हॅक करण्यात आले आहेत. या लोकांवर हॅकिंगच्या माध्यमातून पाळत ठेवण्यात आल्याचे उघड झाले आहे. केंद्र सरकारने या प्रकरणाच्या चौकशी आदेश अद्याप दिले नसले तरी पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारने या हेरगिरी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती गठीत केली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही सेवानिवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
काँग्रसला राज्यात नंबर एकचा पक्ष बनवायचा आहे | आम्ही सगळे मिळून काम करणार आहोत - नाना पटोले
आघाडी सरकारमध्ये एकत्र असले तरीही काँग्रेस महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावर लढवणार आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले याविषयी घोषणा करत होते. आता त्यांच्या या घोषणांना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही पाठबळ दिले आहे अशी माहिती पटोले यांनी बुधवारी दिली. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असूनही काँग्रेस स्थानिक निवडणुका एकट्यानेच लढवणार असल्याचे पटोलेंनी सांगितले आहे. मंगळवारी कर्नाटकचे काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांच्यासमवेत नाना पटोले यांनी राहुल गांधींची भेट घेऊन पक्षाच्या रणनीतीविषयी चर्चा केली होती.
4 वर्षांपूर्वी -
तत्कालीन फडणवीस सरकारचे अनेक चिठ्ठे बाहेर आले तर फडणवीस आणि माजी मंत्री अडचणीत येतील - नाना पटोले
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी झोटिंग समितीच्या अहवालावर प्रतिक्रिया करताना मोठं विधान केलं आहे. विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीसांनी बहुजन नेत्यांचं खच्चीकरण केलं आहे. हे सर्वांना माहीत आहे. एकनाथ खडसेंचंही राजकीय नुकसान करण्याचा प्रयत्न झाला, असं सांगतानाच तत्कालीन फडणवीस सरकारमधील अनेक चिठ्ठे बाहेर आले तर फडणवीस आणि तत्कालीन अनेक मंत्री अडचणीत येतील, असा गौप्यस्फोट नाना पटोले यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपकडूनच सरकार अस्थिर करण्यासाठी मनगढत कहाण्या पेरल्या जात आहेत - नाना पटोले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप करून खळबळ उडवून देणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं आज उत्तर दिलं आहे. ‘पटोले यांनी योग्य माहिती अभावी हे वक्तव्य केलं आहे. त्यांनी आधी व्यवस्थेची माहिती करून घ्यावी,’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी हाणला आहे.
4 वर्षांपूर्वी -
सहकारी पक्ष भडकले | पटोले स्पष्टीकरण देताना म्हणाले, ते वक्तव्य केंद्राबाबत होतं, राज्याबाबत नव्हे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप करून खळबळ उडवून देणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं आज उत्तर दिलं आहे. ‘पटोले यांनी योग्य माहिती अभावी हे वक्तव्य केलं आहे. त्यांनी आधी व्यवस्थेची माहिती करून घ्यावी,’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी हाणला आहे.
4 वर्षांपूर्वी -
आम्ही त्यांना चंपा किंवा टरबुज्या म्हणणार नाही | नाना पटोलेंकडून खिल्ली
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला काहीही म्हटले तरी चालेल. पण आम्ही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना चंपा किंवा टरबुज्या म्हणणार नाही. ती आमची संस्कृती नाही, असा टोला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. राज्यातील सत्ता गेल्यापासून भारतीय जनता पक्षाचे नेते सैरभेर झालेले आहेत. केंद्राच्या मदतीने राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे सगळे प्रयत्न विफल झाल्याने आता त्यांचा तोल ढासळला आहे, अशी टीकाही पटोले यांनी केली.
4 वर्षांपूर्वी -
मोदी तेरे राज मे, सायकल आगयी हाथ मे | इंधन दरवाढ, महागाईविरोधात काँग्रेसचा सायकल-बैलगाडी मोर्चा
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भरपावसात सभा घेतली होती. त्याचाच कित्ता गिरवीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही भरपावसात भिजत इंधन दरवाढ आणि महागाईच्या विरोधात सायकल मोर्चा काढला. यावेळी ‘माेदी तेरे राज मे, सायकल आगीय हाथ मे’, ‘मोदी सरकार मुर्दाबाद’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
4 वर्षांपूर्वी -
अमित शहांच्या मुलाची प्रॉपर्टी १० पटींनी वाढली | पण त्यांची ईडी चौकशी करणार नाही - नाना पटोले संतापले
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर आता ईडीकडून उर्जामंत्री नितीन राऊत यांची चौकशी होण्याची दाट शक्यता आहे. नितीन राऊत यांनी अर्थिक गैरव्यवहार केला असल्याची तक्रार ईडीकडे दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार डॉ. तरुण परमार यांनी ईडीकडे केली.
4 वर्षांपूर्वी -
१२ आमदारांच्या पत्रांचा राज्यपालांना विसर | राजभवन हे भाजपचं कार्यालय झालंय - नाना पटोले
पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षाची निवडणूक व्हावी, असे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सूचना दिल्या आहेत. तर, राज्यपालांना 12 नामनिर्देश आमदारांबाबत दिलेल्या पत्राचे काय झाले? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
पावसाळी अधिवेशन तोंडावर तरी विधानसभा अध्यक्षांचे नाव निश्चित नाही | नाना पटोले तातडीने दिल्लीला
पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना तातडीने दिल्लीला बोलवण्यात आले आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्याचा दौरा अर्धवट सोडून नाना पटोले दिल्लीला रवाना होणार आहे. नवी दिल्लीत काँग्रेसची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिल्लीत येण्याचे पक्षश्रेष्ठींनी आदेश दिले आहे. नाना पटोले ३ दिवसांच्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
प्रकाश आंबेडकर-संभाजीराजे एकत्र आल्यास शिवशाहीला नाही तर पेशवाईला फटका
राज्यात सध्या अनेक घान सुरु आहेत. अशात प्रत्येक राजकीय पक्षाचा महत्वाचा नेता आपला पक्ष वाढवण्यासाठी दौरे करत आहे. एकीकडे शिवसेना खासदार संजय राऊत उत्तर महाराष्ट्राचा दौरा करत आहेत तर दुसरीकडे महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही विदर्भ दौऱ्यावर आहे. आज (१२ जून) नाना पटोले अमरावतीत असताना त्यांनी पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकरांबद्दल वक्तव्य केले आहे.येत्या निवडणुकीत वंचित आघाडी आणि संभाजीराजे छत्रपती एकत्र आल्यास त्याचा फटका पेशवाईला बसेल, शिवशाहीला नाही, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. ते अमरावतीत बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
सध्या कोणतीही चर्चा नाही, पण भविष्यात आघाडीसंदर्भात प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करू – नाना पटोले
महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी आघाडीसंदर्भात महत्वाचं वक्तव्य केलं आहे. निवडणूक आली की, काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांच्या राजकीय आघाडीची मोठी चर्चा सुरू होते. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चर्चेनंतरही ही आघाडी होऊ शकली नाही. प्रकाश आंबेडकरांनी लोकसभेत 42 लाख आणि विधानसभेत 27 लाखांवर मतं घेत काँग्रेस आघाडीचे मोठं नुकसान केलं होतं. या सर्व पार्श्वभूमीवर आज काँग्रेसनं आंबेडकरांशी भविष्यात जुळवून घेण्याची संकेत दिलेत.
4 वर्षांपूर्वी