Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवेल - नाना पटोले
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवेल, अशी घोषणाची नाना पटोले यांनी केली केली आहे. राज्यात काँग्रेस सध्या चौथ्या क्रमांकाचा पक्ष आहे; परंतु २०२४ मध्ये पहिल्या क्रमांकाचा पक्ष होईल, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला. प्रसार माध्यमांशी बोलताना नानांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनामुळे लाखो लोकांचा मृत्यू | भाजपमध्ये मोदींना हटवून गडकरींना पंतप्रधान करण्याची चर्चा, काँग्रेसचा गौप्यस्फोट
देशभरामध्ये कोरोनाची परिस्थती गंभीर बनत चालली आहे.कोरोना रूग्णांसोबतच मृत्यूचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये जगभरातून मोदींवर टिका केली जात आहे.मात्र दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून नितीन गडकरींच्या कामाचं मात्र कौतुक होतय.त्यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गडकरींना पंतप्रधान करायची चर्चा भारतीय जनता पक्षामध्ये चालु आहे असा गौप्यस्फोट केला आहे. ‘देशभरात कोरोनामुळे कोट्यवधी लोकांचा मृत्यू झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
त्या काळात पोर्टल, ऍप असलं काही नसताना २० कोटी बालकांचे पोलीओ लसीकरण केले होते - नाना पटोले
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केंद्रातील मोदी सरकारवर थेट हल्लाबोल केलाय. केंद्रातील मोदी सरकार कोविड परिस्थिती हाताळण्यात पूर्णत: अपयशी ठरले आहे. केंद्र सरकारच्या गलथानपणामुळे लसीकरण मोहीमही फसलीय, असंही नाना पटोले म्हणालेत. देशभरात लसीकरण केंद्राबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. 17 कोटी जनतेला लस दिल्याचे मोदी सरकार सांगते, पण लाखो लोकांची दुसऱ्या डोसची कालमर्यादा उलटून गेली तरी अजून त्यांना दुसरा डोस मिळत नाही.
4 वर्षांपूर्वी -
देशभरात रुग्णांना रेमडेसीवीर नाही, ऑक्सीजन नाही, अंत्यसंस्कारासाठी रांगा तरी मोदी निवडणुकीच्या प्रचारात
कोरोना महामारीच्या संकटाची चाहूल लागताच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारला धोक्याची जाणीव करून दिली होती. महामारीच्या या वर्षभरात सातत्याने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सकारात्मक सूचना केल्या परंतु सत्तेच्या अहंकाराने आपल्याच मस्तीत दंग असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे नेते, राहुल गांधी यांना गांभीर्याने घेत नाही असे म्हणत त्यांची खिल्ली उडवण्याचा पोरकटपणा करत राहिले.
4 वर्षांपूर्वी -
2019 मध्ये प्रचारजीवी पंतप्रधानांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना भारतात आणले तेव्हाच कोरोनाचा प्रसार झाला
लहानपणी आई आम्हाला सांगायची की घरात भांडी वाजवली तर दारिदय्र येतं. पण पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण देशालाच ताट वाजवायला लावली, अशी खोचक टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज (१४ एप्रिल) केली. चीनमधील कोरोना भारतात कसा आला याची चर्चा झाली पाहिजे. 2019 मध्ये आपल्या प्रचारजीवी पंतप्रधानांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना भारतात आणले तेव्हाच कोरोनाचा प्रसार झाला, असा दावा यावेळी नाना पटोले यांनी केला.
4 वर्षांपूर्वी -
ही केंद्राच्या नियोजनशून्य कारभाराचे खापर बिगर भाजपशासित राज्यांच्या माथी फोडायची सुरवात
राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. देशभरातील सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात सापडत आहेत. दरम्यान आता राज्यावर अजुन एक संकट आले आहे. राज्यामधील विविध लसीकरण केंद्रांवर लसींचा तुटवडा भासत आहे. जर महाराष्ट्रात योग्य वेळी लसींचा पुरवठा झाला नाही तर येत्या तीन दिवसात राज्यातील लसींचा साठा हा संपण्याची भीती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता राज्यात १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस द्या - नाना पटोले
कोरोना व्हायरसचा सर्वात मोठा स्फोट महाराष्ट्रात झाला आहे. गेल्या 24 तासांत 43,183 नवीन रुग्ण समोर आले आहेत. कोणत्याही राज्यात कोरोनाची सापडलेली ही सर्वात जास्त प्रकरणे आहेत. गेल्या 24 तासांत अमेरिका, फ्रान्स आणि ब्राझील देशांमध्येच फक्त महाराष्ट्रापेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. सर्वात जास्त रुग्ण आढळण्याच्या बाबतीत महाराष्ट्रात जगात चौथ्या क्रमांकावर आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी वर्षा बंगल्यावर आपत्कालीन बैठक बोलावली आहे.
4 वर्षांपूर्वी -
परेलमध्ये इमारतीला आग | नाना पटोलेंनी ताफा थांबवत संवेदनशीलता दाखवली
महाराष्ट्रात मागील दोन दिवसात जवळपास ६ ते ७ ठिकाणी अग्नितांडव पाहायला मिळाला आहे. काल, मुंबईतील भांडूप मॉलला भीषण आग लागली. तब्बल 11 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आली. त्यातच काल रात्रीच्या सुमारास परेलमध्येही आगीची घटना पुढे आली. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट् प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची संवेदनशीलता पुढे आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
अजून किती फेकणार मोदीजी, हद्द केली राव - नाना पटोले
बांगलादेश स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव आणि बंगबंधू शेख मुजबीर यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी बांगलादेश दौऱ्यावर आहेत. राजधानी ढाकामध्ये बोलताना पंतप्रधान मोदी यांनी आपणही बांगलादेश स्वातंत्र्यासाठीच्या लढ्यात असल्याची आठवण सांगितली. बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी सत्याग्रह करणे हे माझ्या आयुष्यातील सुरुवातीच्या आंदोलनातील महत्त्वाचे आंदोलन होते, असे देखील पंतप्रधान मोदी म्हणाले होते.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीस म्हणजे तपास यंत्रणा आहेत का? | त्यांनी आरोप केल्यावर कोणालाही दोषी ठरवायचे का?
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शरद पवारांनी युपीएचं नेतृत्व करावं असं विधान केलं आहे. त्यानंतर संजय राऊत यांच्या विधानावर काँग्रेस नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली असून टीका केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीसांच्या काळात ते स्वत: न्यायाधीश होते | मंत्र्यांवर आरोप होताच ते क्लीन चीट द्यायचे
फोन टॅपिंग प्रकरणावरुन भाजपकडून राज्य सरकारवर सातत्याने निशाणा साधला जात आहे. दरम्यान आज विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल कोश्यारींची भेट घेत फोन टॅपिंगसह राज्यात सुरू असलेल्या इनतर प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. यानंतर पत्रकार परिषदेत फडणवीसांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला होता. तसेच काँग्रेसला या प्रकरणांमध्ये किती हिस्सा मिळतोय असा सवाल त्यांनी केला होता. आता त्यांच्या या सवालाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
सांगली महापालिकेप्रमाणे राज्यात इतर ठिकाणीही भाजपाला धोबीपछाड देऊ - नाना पटोले
सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडीने भारतीय जनता पक्षाकडून सत्ता खेचून आणली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय सुर्यवंशी महापौरपदी तर काँग्रेसचे उमेश पाटील हे उपमहापौरपदी निवडून आले असून राज्यातील इतर महापालिका, नगरपालिका तसेच जिल्हा परिषदांमध्येही भारतीय जनता पक्षाला असाच धोबीपछाड देऊ, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
सुशांतसिंग प्रकरणात भाजपच्या मोठ्या नेत्याचं नाव आल्याने केंद्राने CBI अहवाल दाबून ठेवला
आतापर्यंत मॅच फिक्सिंगचा काळ खूप चालला. मात्र, आता सर्वसामान्यांना न्याय मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चार्ज काढण्यासाठी मी प्रदेशाध्यक्षपदाचा चार्ज घेतला आहे,” असा टोला काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भारतीय जनता पक्षाला लगावला. ते नागपुरात एका सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर चौफेर टीका केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चार्ज काढण्यासाठी मी प्रदेशाध्यक्षपदाचा चार्ज घेतला – नाना पटोले
आतापर्यंत मॅच फिक्सिंगचा काळ खूप चालला. मात्र, आता सर्वसामान्यांना न्याय मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चार्ज काढण्यासाठी मी प्रदेशाध्यक्षपदाचा चार्ज घेतला आहे,” असा टोला काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भारतीय जनता पक्षाला लगावला. ते नागपुरात एका सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर चौफेर टीका केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
आमची सत्ता असताना इंधन दरवाढीवर टीव-टीव करणारे अमिताभ, अक्षय गप्प का? - नाना पटोले
देशात आता पेट्रोलने शंभरी गाठली आहे. पण तरीही इंधन दरवाढीवरून कोणी बोलायला तयार नाहीत. काँग्रेस सरकारच्या काळात इंधन दरवाढीवरून टीव टीव करणारे सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि अभिनेता अक्षय कुमार आता गप्प का आहेत? आता त्यांना इंधन दरवाढ दिसत नाही का? असा संतप्त सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
इंधन आणि गॅस दरवाढीविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरणार | नाना पटोले यांची घोषणा
केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले असून अत्याचाराचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात दररोज वाढ केली जात आहे. सध्या पेट्रोल प्रति लिटर ९६ रुपये तर डिझेल ८६ रुपये लिटर झाले आहे. त्यातच घरगुती वापराचा गॅस सिलेंडर ८०० रुपये झाला आहे. कोराना संकटामुळे लाखो लोकांचे रोजगार हिरावले गेले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
कोकणातील नाणार जमीन खरेदी प्रकरणी चौकशी होणार | विधानसभा अध्यक्षांचे आदेश
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी योजनांमधील एक असलेल्या जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. जलयुक्त शिवार योजनेवर कॅगने ताशेरे ओढले होते. ही योजना अपयशी असल्याचं कॅगने आपल्या अहवालात म्हटलं होतं. त्यानंतर आता राज्य सरकारने या जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.
5 वर्षांपूर्वी -
नागपूर लोकसभा: नितीन गडकरी विजयी; काँग्रेसच्या नाना पटोलेंचा दारुण पराभव
लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. भाजपच्या नितीन गडकरी यांनी काँग्रेसच्या नाना पटोले यांना अगदी सहज झुंज दिल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे भाजपकडून दुसऱ्यांदा उमेदवारी घेणारे नितीन गडकरी आता पुढील ५ वर्ष या मतदारसंघाचे खासदार असतील हे निश्चित झालं आहे.
6 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान नरेंद्र मोदी घरी बोलावतात आणि अपमान करतात - नितीन गडकरी
माजी खासदार आणि किसान खेत मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत असतानाचा एक असाच काहीसा अनुभव सांगितला. मोदी सरकारकडून देशभरात जीएसटी लागू करण्यात आला आणि त्यानंतर या निर्णयावर मत मांडण्यासाठी मोदींनी सर्वाना सांगितले. नाना पटोलेंनी मोदींच्या या निर्णयाला विरोध केला, हा विरोधाचा सूर ऐकताच मोदी पटोलेंवर संतापले आणि त्यांना प्रश्न केला ‘तुम्ही मला शिकवणार का?’.
6 वर्षांपूर्वी