Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
शिंदेंची सभा फ्लॉप तर शिवाजीपार्कची सभा गाजल्याचे माध्यमांवर दिसल्याने भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांचा जळफळाट?, भावनिक टिपण्या सुरु
Union Minister Narayan Rane | शिंदेंची सभा फ्लॉप तर शिवाजीपार्कची सभा गाजल्याचे माध्यमांवर दिसल्याने भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांचा जळफळाट सुरु झाल्याची चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे. आज केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या पत्रकार परिषदेत सुद्धा तेच पाहायला मिळालं. दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदी, अमित शाहांपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत सर्वांवरच टीका केली. ठाकरेंनी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात केलेल्या टीकेला आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला.
3 वर्षांपूर्वी -
सर्वोच्च न्यायालयातही राणेंना धक्का, नारायण राणेंच्या अधीश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम 3 महिन्यात पाडण्याचे आदेश
Union Minister Narayan Rane | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना त्यांच्या अधीश बंगल्यातील अनधिकृत बांधकामाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयातही मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने राणेंची आव्हान याचिका फेटाळून लावत मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. तसेच संबंधित अवैध बांधकाम पुढच्या तीन महिन्यांमध्ये पाडण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. देशाचे माजी अटॉर्नी जनरल मुकूल रोहतगी यांनी राणे यांची बाजू मांडली होती.
3 वर्षांपूर्वी -
Viral Video | उद्धव ठाकरे खोटं बोलतात?, होय!, फक्त नारायण राणे '100 टक्के खरं' बोलतात, व्हिडिओ पहा.. तुमचाही विश्वास बसेल
Union Minister Narayan Rane | उद्धव ठाकरेंनी गटप्रमुखांसमोर केलेल्या भाषणात थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर हल्ला केला. नरेंद्र मोदींवरही टीका केली. या टीकेला उत्तर देताना केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना धमकीवजा इशारा दिला. भाजप नेते, शिंदे गटातील सहकाऱ्यांकडे वाकड्या नजरेनं बघितलं, तर डोळे जागेवर ठेवणार नाही, असं नारायण राणे म्हणाले.
3 वर्षांपूर्वी -
केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मुंबई हायकोर्टाचा दणका, अधीश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश, दंडही ठोठवण्यात आला
Union Minister Narayan Rane | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. राणे यांच्या मुंबईतील जुहू येथील अधीश बंगल्यात काही फेरफार करण्यात आले असून हे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच राणे यांना 10 लाखांचा दंडही ठोठवण्यात आला आहे. राणे यांनी CRZ आणि FSI नियमांचे उल्लंघन केले असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदविले आहे.
3 वर्षांपूर्वी -
आपल्याकडील केंद्रीय मंत्रालयाचा राज्याला काय फायदा होतोय हे न सांगता, राणेंनी शिवसैनिक अन गद्दारातील फरक सांगितला
Union Minister Narayan Rane | लघुउद्योग भारती संघटनेचं राज्यस्तरीय अधिवेशन मुंबईतल्या विलेपार्लेमध्ये होणार आहे. या अधिवेशनात राज्यभरातून लघुउद्योजक सहभागी झाले आहेत. शहरांसह ग्रामीण भागातील लघुउद्योगांना चालना देण्याच्या अनुषंगाने हे अधिवेशन महत्त्वाचं मानलं जातं आहे. या अधिवेशनात उद्योजक आपल्याला येणाऱ्या समस्या आणि आव्हानं यांचीही चर्चा करतात. कोरोनामुळे दोन वर्षे हे अधिवेशन होऊ शकलंल नव्हतं.
3 वर्षांपूर्वी -
MSME Atmanirbhar Fund | राष्ट्रीय लघूउद्योग महामंडळ उभारणार १० हजार कोटीचा आत्मनिर्भर निधी
राष्ट्रीय लघूउद्योग महामंडळ 10 हजार कोटी रुपयांचा आत्मनिर्भर निधी उभारणार आहे. यासाठी केंद्रीय एमएसएमई अर्थात सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे (MSME Aatmnirbhar Fund) यांनी पुढाकार घेतला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sindhudurg Chipi Airport | राणे प्रोटोकॉलवरून स्वतःला 'सीनियर' म्हणाले | उदघाटनाला ज्योतिरादित्य ऑनलाईन झाले
चिपी विमानतळाच्या उद्घाटनापूर्वीच काल नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेऊन चिपीचं सर्व श्रेय आमचं असल्याचं म्हटलं होतं. शिवसेनेचा चिपी विमानतळाशी काहीच संबंध नसल्याचं सांगितलं होतं. तसेच निमंत्रण पत्रिकेत बारीक अक्षरात नाव टाकल्याने नाराजी (Sindhudurg Chipi Airport) व्यक्त केली होती. तसेच शिवसेनेच्या नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचंही म्हटलं होतं. तसेच राणे पुढे म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यापेक्षा राजकारणात आणि प्रोटोकॉलमध्ये आपण सीनियर असल्याचं राणे म्हणाले होते. राणेंच्या या विधानामुळेच ज्योतिरादित्य शिंदे नाराज असल्याचं म्हटलं जातंय.
4 वर्षांपूर्वी -
चिपी विमानतळ उद्घाटन | मुख्यमंत्री आले तर स्वागत करू - नारायण राणे
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री आले तर स्वागत करू असा पवित्र घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला आलेच पाहिजे असं काही नाही, असं विधान केल्यानंतर केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणेंनी नरमाईचा सूर आळवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला आले तर स्वागत करू, असं नारायण राणे म्हणाले. राणेंनी अवघ्या तीनच दिवसात पलटी खाल्ल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
सोमैयांच्या मागणीप्रमाणे राणेंच्या ED चौकशीचं पुढं काय झालं? | आ. वैभव नाईक यांचा सवाल
मुंबई महानगर पालिकेची निवडणूक जवळ आल्याने परिवहन मंत्री अनिल परब यांना गुंतवण्यासाठी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे ब्लॅकमेलिंग करत आहेत. यापूर्वी खासदार नारायण राणे यांच्यावरील ईडी चौकशीचे काय झाले? असा सवाल शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी विचारला आहे.
4 वर्षांपूर्वी -
माझं देखील वृत्तपत्र आहे | लवकरच चॅनल देखील येईल | नारायण राणेंचा सेनेला थेट इशारा
नारायण राणेंना भाजपाकडून केंद्रीयमंत्री पद दिल्या गेल्याने, यावरूनही आरोप-प्रत्यारोपांना सुरूवात झालेली आहे. दरम्यान, नारायण राणेंनी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर या वादात अधिकच भर पडली. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज नारायण राणे यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना एक मोठा खुलासा केल्याचं दिसून आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
स्वत:वरील केसेस कशा काढायच्या हे अजित पवारांकडून शिकावे - नारायण राणे
जनआशीर्वाद यात्रेत मांजर आडवी गेली, असा घणाघात करत केंद्रीय लघू आणि सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीका केली. ते कणकवलीत बोलत होते. तसेच एका दिवसात स्वत:वरील केसेस कशा काढायच्या हे अजित पवारांकडून शिकावे, अशी टीका राष्ट्रवादीवर केली.
4 वर्षांपूर्वी -
दिल्लीतून फोन करून कोणाच्या कानाखाली मारायची नाही असं सांगितलंय, पण बाकी अवयव आहेत ना - नारायण राणे
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यात पुन्हा एकदा शिवसेनेच्या नेत्यांना लक्ष्य केले आहे. माझ्या नेत्यांनी दिल्लीहून परवा फोन करून कोणाच्या कानाखाली नाही मारायचे, असे सांगितले. मात्र, मी कानाच्या खाली मारणार नाही. बाकी अवयव आहेत ना ? कोर्टानेही माझ्याकडून लिहून घेतल्याचे नारायण राणेंनी कार्यक्रमात सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
कणकवली | नारायण राणेंच्या हाताला रेलिंगचा करंट लागताच त्यांनी इतरांना सावध केले | राणे सुखरूप
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कालपासून पुन्हा एकदा आपल्या जन-आशीर्वाद यात्रेला सुरुवात केलीय. काल रत्नागिरी जिल्ह्यातून राणेंची ही यात्रा सिंधुदुर्गात दाखल झाली आहे. यावेळी ठिकठिकाणी राणे यांचं ढोलताशांच्या गजरात जंगी स्वागत केलं जात आहे. कणकवलीमध्येही राणे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. मात्र, त्यावेळी एक ठिकाणी नारायण राणेंना लाईटचा शॉक लागल्याचं पाहायला मिळालं. हा संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
इंधन, गॅसचे दर कधी कमी होणार, GST चा परतावा कधी मिळणार हे त्यांनी सांगावे - उदय सामंत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतचं आक्षेपार्ह वक्तव्य, त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंना झालेली अटक आणि जामीनावर सुटका, या घडामोडीनंतर राणेंची जनआशीर्वाद यात्रा आज पुन्हा सुरु झालीय. यावेळी राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. त्यानंतर आता शिवसेना नेते उदय सामंत आणि आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेंना इशारा दिलाय. संघर्ष टाळण्यासाठी तशाच पद्धतीने वागलं पाहिजे, भूमिका घेतली पाहिजे.
4 वर्षांपूर्वी -
कोकणात जास्तीत जास्त फूड प्रोसेसिंग युनिट उभारणार | नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रेत ग्वाही
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा रत्नागिरीतून पुन्हा नव्या उत्साहात सुरू झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून ही या यात्रेतले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी त्यांनी रत्नागिरीत जास्तीत जास्त फूड प्रोसेसिंग युनिट उभारण्यासाठी केंद्र सरकार मदत करेल, अशी ग्वाही दिली.
4 वर्षांपूर्वी -
कोकणातील राजकीय संघर्षात 'राणे – नाईक' कुटुंबांमधील वैर नेमकं काय होतं? | काय आहे इतिहास
महाराष्ट्रातील राजकारणात सध्या नारायण राणे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यातील वाद पार विकोपाला पोहोचल्याचे आपण सगळेच बघत आहोत. रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री नारायण राणे ह्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचा जन आशीर्वाद यात्रेला विरोध नाही | पण उद्धव ठाकरेंवर विनाकारण टीका केल्यास विरोध करणार - आ. वैभव नाईक
सकाळी नियोजित वेळेत मंत्री नारायण राणे यांचे विमानतळावर आगमन झाले. अकरा वाजता मारुती मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर त्यांनी पुष्पवृष्टी केली आणि तेथून जनआशीर्वाद यात्रा सुरू झाली. त्यानंतर माजी खासदार लोकनेते स्व. शामराव पेजे तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करुन ते गोळप (ता. रत्नागिरी) येथे आंबा व काजू उत्पादकांच्या बैठकीसाठी रवाना झाले.
4 वर्षांपूर्वी -
श्रीधर नाईक, रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणेंना भर संसारातून कायमचे कोणी उठवले? - शिवसेना
महाराष्ट्राला ठाकरे आणि राणे संघर्ष तसा नवा नाही. आरोप प्रत्यारोप आणि जहरी टीकेपर्यंत असलेल्या या युद्धानं आता नवं रूप धारण केलं आहे. या दोघांमधला सामना आणि एकमेकांवरील प्रहार आता थेट कोर्ट कचेऱ्यांमध्ये रंगणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटकनाट्यामुळे शिवसेना विरुद्ध राणेंच्या संघर्षानं नवं वळण घेतलं आहे. आतापर्यंत भाषणांमधून टीका आणि रस्त्यावरचा राडा एवढ्यापुरती मर्यादित असलेली लढाई आता कोर्ट कचेऱ्यांमध्ये पोहोचली आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात काही लोकांचे राजकीय पर्यटन सुरू | जुने व्हायरसही परत आले, त्यांचा बंदोबस्त करायचाय - मुख्यमंत्री
केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले. यानंतरपासून शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष काही कमी होताना दिसत नाहीये. शिवसेनेकडून नारायण राणेंवर सातत्याने टीका होत असताना दिसत आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील अप्रत्यक्ष रित्या नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला आहे.
4 वर्षांपूर्वी -
चपला घालून महाराजांना कुणी हार घातला म्हणून मुख्यमंत्र्यांचं उत्तर | तो अवमान भाजपाला आवडला का ते सांगावं? - संजय राऊत
शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. एक मंत्री म्हणजे केंद्र सरकार नाही, असा जोरदार हल्ला संजय राऊत यांनी चढवला आहे.
4 वर्षांपूर्वी