Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंबाबतही कोत्या मनाचे राजकारण केले - नारायण राणे
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बुधवारी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहित उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्य सरकारमधील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते.
4 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्रीच सचिन वाझेचे गॉडफादर, आधी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - नारायण राणे
सध्या राज्यात सचिव वाझे प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकरणावरुन विरोध सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत आहेत. या प्रकरणामुळेच मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली.
4 वर्षांपूर्वी -
कालचा गुंड आज मंत्री कसा झाला? याचं उत्तर त्यांनाच द्यावं लागणार आहे | अरविंद सावंत यांची टीका
भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी उभारलेल्या लाईफटाईम हॉस्पिटलचं लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते काल पार पडले. या कार्यक्रमाला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते हजर होते. त्यावेळी नारायण राणे म्हणाले होते.”आमच्या काही डॉक्टरांना विचारलं उद्घाटन कोणाच्या हस्ते करायचं? तुम्ही ज्याप्रकारे मेडिकल कॉलेज सुरू करण्याचं धाडस केलं. तेव्हा उद्घाटनाला डेअरिंगबाज माणूस हवा म्हणून शहांना बोलावलं”, असं देखील भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे म्हणाले होते.
4 वर्षांपूर्वी -
राणेंनी उद्घाटनाला पहिल्यांदा पावरफुल 'डेअरिंगबाज' माणसाला बोलावलं होतं | सोशल व्हायरल
भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी उभारलेल्या लाईफटाईम हॉस्पिटलचं लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते काल पार पडले. या कार्यक्रमाला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते हजर होते. त्यावेळी नारायण राणे म्हणाले होते.”आमच्या काही डॉक्टरांना विचारलं उद्घाटन कोणाच्या हस्ते करायचं? तुम्ही ज्याप्रकारे मेडिकल कॉलेज सुरू करण्याचं धाडस केलं. तेव्हा उद्घाटनाला डेअरिंगबाज माणूस हवा म्हणून शहांना बोलावलं”, असंही भाजप नेते नारायण राणे म्हणाले होते.
4 वर्षांपूर्वी -
नारायण राणेंचं वक्तव्य म्हणजे निव्वळ विनोद | पवारांकडून राणेंची खिल्ली
अमित शाह यांच्या पायगुणामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार जाईल, असे वक्तव्य करणारे भाजप खासदार नारायण राणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मिश्किल शैलीत समाचार घेतला.
4 वर्षांपूर्वी -
जिल्हा नियोजन बैठक | नारायण राणे आणि विनायक राऊतांमध्ये शाब्दिक बाचाबाची
शिवसेना आणि राणे कुटुंबीयांमध्ये राजकीय सख्य सर्वश्रुत आहे. कोकणातील राजकारणाचा हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. सिंधुदुर्गावर आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी दोन्ही बाजूने दंड थोपटले जातात. आज या लढाईचा ताजा अंक रंगला तो जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत. भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा सदस्य नारायण राणे आणि शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यात या बैठकीत जोरदार शाब्दिक चकमक झडली. त्यामुळे सभागृहात तणावाची स्थिती निर्माण झाली.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी आंदोलनात तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते सहभागी होणार | भाजपचा तिळपापड
नव्या कृषी कायद्यांविरोधात ठाकरे सरकार आक्रमक झालं असून मुंबईत होणाऱ्या शेतकरी आंदोलनात तिन्ही पक्षांचे मुख्य नेते सहभागी होणार आहेत. दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी २३, २४, २५ जानेवारीला आझाद मैदान येथे शेतकरी आंदोलन होणार आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी होणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. दरम्यान यावरुन भाजपा खासदार नारायण राणे यांनी संताप व्यक्त केला आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
मी होतो म्हणून शिवसेनेची कोकणात ताकद होती - नारायण राणे
कोकण म्हणजे शिवसेना हे समीकरण केवळ माझ्यामुळे होतं. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही, असे वक्तव्य भाजप खासदार नारायण राणे यांनी केले. महाविकासआघाडीने भाजपला दणका वैगेरे दिलेला नाही. आकडेवारी समोर आल्यानंतर खरे चित्र स्पष्ट होईल. यावेळी भाजपने शिवसेनेची ताकद असलेल्या ग्रामपंचायतींमध्येही मुसंडी मारली आहे. पुढच्यावेळेस कोकणात शिवसेना औषधालाही सापडणार नाही, असे नारायण राणे यांनी म्हटले.
4 वर्षांपूर्वी -
नारायण राणेंची ED चौकशी होणार या भीतीनेच सरळ भाजपमध्ये पळ काढला
नारायण राणेंची ईडी चौकशी होणार या भीतीने त्यांनी सरळ भारतीय जनता पक्षात पळ काढला, त्यामुळे राणेंना संजय राऊत यांच्यावर बोलण्याचा अधिकार नाही”, अशी खरमरीत टीकाही शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेंवर केली. ते सिंधुदुर्गात माध्यमांच्या प्रतिनिधींनी बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
नारायण राणे गंजलेली ताेफ | अशा तोफेतून आलेल्या गोळ्यांना उत्तर द्यायचं नसतं - जयंत पाटील
राज्यात शंभर टक्के ऑपरेशन लोटस होणार असल्याचं असं भाकीत वर्तवणारे भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे यांच्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी (NCP State President Jayant Patil criticized BJP MP Narayan Rane) अत्यंत खोचक शब्दात टीका केली आहे. गंजलेल्या तोफेतून आलेल्या गोळ्यांना उत्तर द्यायचं नसते, अशी खोचक टीका जयंत पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
यांना काहीच जमत नाही | फक्त हात धुवा, अंतर ठेवा, घरात बसा एवढंच - नारायण राणे
महाराष्ट्रात दिवाळीनंतर ठाकरे सरकारचे फटाके वाजतील असं सूचक विधान भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी केलं आहे. “लवकरच महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारचे फटाके वाजतील. यांना काहीच जमत नाही त्यामुळे ती वेळ लवकरच येईल. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात सुरु आहे. भ्रष्टाचार थांबत नाही तोपर्यंत फटाके वाजणार. तो काढायला गेलं तर फार वेळ लागेल, त्यामुळे वेळ आल्यावर तोदेखील समोर आणू,” असं नारायण राणे यांनी एबीपी माझा वृत्त वाहिनीशी बोलताना म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे कोकणातील ११ आमदार घरी बसवणार | राणेंची गर्जना
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या कोकणातील सर्व आमदारांना पराभूत करणार. सर्वांना घरी बसवण्यात येणार असून कोकणातून शिवसेना पूर्णपणे हद्दपार करणार अशी राजकीय गर्जना भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
नारायण राणेंविरोधात बार्शी पोलिसांत तक्रार दाखल | मुख्यमंत्र्यांवर टीका भोवली
भारतीय जनता पार्टीचे खासदार नारायण राणे यांच्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली आहे. दरम्यान राणे यांनी मुख्यमंत्र्यावर टीका करताना ‘गांडूळ, पुळचट’ यासारखे शब्द वापरले होते, त्यामुळे त्यांच्यावर बार्शी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
बाळासाहेबांकडे पाहूनच शांत | नाहीतर गेल्या 39 वर्षांतलं सेनेचं सगळं बाहेर काढेन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या कालच्या (२५ ऑक्टोबर) दसरा मेळाव्यात तुफान फटकेबाजी केली. यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांचा खरपूस समाचार घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे हे सातत्याने शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ‘बेडूक’ असा उल्लेख करत निशाणा साधला होता.
5 वर्षांपूर्वी -
दिशा सालियनवर बलात्कार आणि मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री पुत्र आत जाणार - नारायण राणे
खासदार नारायण राणे यांनी यावर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दसरा मेळाव्यातील भाषण म्हणजे कसलेही ताळतंत्र नसलेले निर्बुद्ध आणि शिवराळ बडबड होती. दिशा सालियनवर बलात्कार कोणी केले आणि कोणी मारले, हे लवकरच बाहेर येईल. त्यामध्ये एक मंत्री आत जाईल तो मुख्यमंत्री पूत्र आहे, असा थेट आरोप नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर केला.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईत जे काही बेकायदेशीर आलं आहे | ते शिवसेनेमुळे आलं
कंगना प्रकरणावरुन भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला केला आहे. कंगना काय बोलली वगैरे हा वेगळा मुद्दा असून नियमाने कारवाई करावी, असं ते म्हणाले. कंगना मुंबईत आली, तिच्या घरी गेली सुद्धा, शिवसेनेचं नाक कापलं, अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोकणी लोकांसाठी राणेंचा पुढाकार | फडणवीसांच्या हस्ते अत्याधुनिक कोविड-१९ लॅबचे लोकार्पण
माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पडवे कसाल येथील लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक कोविड 19 लॅबचे काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि खा. नारायण राणे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना देखील संबोधित केलं.
5 वर्षांपूर्वी -
नाणार प्रकल्प | गुलाबराव पाटील यांची खासदार नारायण राणे यांच्यावर बोचरी टीका
नारायण राणे म्हणजे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी झाले आहेत. त्यांच्याकडे सध्या कोणताही कामधंदा उरलेला नाही, अशी बोचरी टीका शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी केली. काही दिवसांपूर्वीच नारायण राणे यांनी कोकणातील नाणार प्रकल्पावरून शिवसेनेला लक्ष्य केले होते. नाणार प्रकल्पाला ८० टक्के स्थानिकांचा पाठिंबा असल्याचा दावा शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांकडून केला जातो. मात्र, यामागे शिवसेनेचा केवळ पैसे कमावण्याचा हेतू आहे, असे राणे यांनी म्हटले होते.
5 वर्षांपूर्वी -
विजयदुर्ग किल्ल्याची पडझड | खा. नारायण राणे यांनी पाहणी केली | केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार
कोकणात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे विजयदुर्ग किल्ल्याची महत्त्वाची भिंत मंगळवारी ढासळली. गावाकडे तोंड करून असलेल्या या बुरुजाची तळाची बाजू ढासळल्याने आता वरचा बुरूज धोकादायक झाला असून तो केव्हाही कोसळू शकतो. बुरुजाला संरक्षण देण्यासाठी ही भिंत उभारण्यात आली होती, मात्र ही भिंत कोसळली असल्याने या शिवकालीन किल्ल्याच्या तटबंदीला धोका पोहोचण्याची शक्यता वाढली आहे.
5 वर्षांपूर्वी -
लहान आहेस, तोंड सांभाळून बोल, नाहीतर तोंड बंद करण्याचा उपाय आमच्याकडे आहे - नारायण राणे
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण देशभरात चर्चेचा विषय ठरलं आहे. मागील काही दिवसांपासून या घटनेच्या तपासावरून आरोप होताना दिसत आहे. सुशांत सिंह प्रकरणात राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. सुशांत सिंहच्या पूर्वीची असिस्टंट मॅनेजर दिशा सालियन हिने आत्महत्या केलेली नाही, तर तिची बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे,” असा दावा नारायण राणे यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी