Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
राणे लवकरच सेनेच्या सहकारी पक्षातील मित्र होणार; युती धर्माने प्रचार करणार का?
एकीकडे शिवसेना-भाजप उमेदवारांच्या याद्या जाहीर होत असतानाच दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीकडून देखील उमेदवारांची घोषणा केली जात आहे. मात्र, या सगळ्यामध्ये राणे कुटुंबीय कुठेच नव्हते. नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा अनेकदा रंगल्या. खुद्द राणेंनी देखील ‘मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, मुख्यमंत्री तारीख जाहीर करतील’, अशी वक्तव्य केली जात होती. भाजपकडून मात्र यासंदर्भात कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केली जात नव्हती. या सगळ्या पार्श्वभूमीवर सेना-भाजपच्या याद्या जाहीर होत असताना राणेंकडून कोणतंही वक्तव्य केलं जात नव्हतं. मात्र, नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांच्या एका ट्वीटमुळे नारायण राणेंचा भाजप प्रवेश नक्की होणार का? आणि झाला तर कधी? याविषयी संभ्रम कायम आहे.
6 वर्षांपूर्वी -
सेनेला दुर्लक्षित करत भाजप नारायण राणेंचा २ ऑक्टोबरला पक्ष प्रवेश करून घेणार
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे २ ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंतीच्या दिवशी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. नारायण राणे यांच्या प्रहार या दैनिकाच्या संकेतस्थळावर याबाबत माहिती देण्यात आली आहे. भाजप-शिवसेना युती होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुंबई येथे घेतलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात युती होणारच यावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे शिवसेनेचा नारायण राणे यांच्या प्रवेशाला होणारा विरोध देखील निवळल्याचे दिसते. १ ऑक्टोबरपर्यंत युती आणि जागावाटपाची घोषणा होणार आहे. त्यानंतर २ ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करतील.
6 वर्षांपूर्वी -
राणे म्हणतात वाघाची शेळी-मेंढी झाली; तर धनंजय मुंडे म्हणतात ही कुत्र्यासारखी अवस्था
विधानसभा निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे राजकीत आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झडताना दिसत आहे. आता तर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. राजकारणात शिवसेनेची अवस्था ही कुत्र्या सारखी झाली आहे, एक गोष्ट सांगून धनंजय मुंडे यांनी टीका केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेना कोकणात मी आणली होती, पुढच्या वेळी दोन्ही खासदार भाजपचे असतील: खा. नारायण राणे
येत्या आठ दिवसात भाजपात प्रवेश करणार असल्याची घोषणा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली. भाजपात प्रवेश करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो आहे आणि त्यामुळे शिवसेनेचा आक्षेप असण्याचं काहीही कारण नाही, असंही ते म्हणाले. शिवसेना कोकणात मी आणली होती, त्यामुळे भाजपात प्रवेश केल्यास कोकणात पुढच्या वेळी दोन्ही खासदार भाजपचे असतील, असा विश्वास राणेंनी व्यक्त केला.
6 वर्षांपूर्वी -
नारायण राणे भाजपात प्रवेश करणार; युती तुटण्याची शक्यता बळावली
शिवसेना-भाजपमध्ये काहीही ठरो, पण माझा भाजपमध्ये प्रवेश नक्की आहे, असं सांगत मुंबईतच भाजपमध्ये प्रवेश व्हावा, अशी इच्छा, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केली. त्यांचे चिरंजीव आमदार नितेश राणे हे भाजपमधूनच निवडणूक लढवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
6 वर्षांपूर्वी -
राणेंचा भाजपप्रवेश हे युती 'न' होण्याचं निमित्त ठरणार?
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्ष चांगलेच सक्रीय झालेले आहेत. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते पक्षांतर करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. दरम्यान, मागील राज्यसभा निवडणुकीच्या वेळी नारायण राणे जर भाजपमध्ये गेले तर युती अवघड असल्याचा सांगणारी शिवसेना नेमका कोणता निर्णय घेणार ते पाहावं लागणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभा:: राणेंना भाजपात तर भुजबळांना शिवसेनेत आणण्याची तयारी?
राज्याच्या सक्रीय राजकारणातून बाहेर फेकले गेलेले माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे नाराज असल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. कॉंग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक असणारे राणे यांना शिवसेनेच्या विरोधामुळे स्वतंत्र पक्ष काढावा लागला आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ते भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी आग्रही असल्याने मुख्यमंत्र्याची भेट घेतल्याचं बोलले जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
कारण उद्धव ठाकरे म्हणाले, ‘राणे परत आले तर मी घर सोडीन’
राज्याचे माजी मुख्यमंत्री, ‘प्रहार’चे संपादकीय सल्लागार, खासदार नारायण राणे यांचे आत्मकथन असलेल्या ‘झंझावात’ या मराठी पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या हस्ते, No Holds Barred या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभगृहात शुक्रवारी सायंकाळी एका शानदान समारंभात झाले. या कार्यक्रमास राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनासकर, सांस्कृतिक व मराठी भाषा मंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, खा. सुनील तटकरे, आ. कालिदास कोळंबकर, दोन्ही पुस्तकांचे संपादक प्रियम मोदी, मधुकर भावे, सौ. निलमताई राणे, निलेश राणे, आ. नितेश राणे आदी उपस्थित होते.
6 वर्षांपूर्वी -
राजू शेट्टी नारायण राणेंच्या भेटीला; तिसऱ्या आघाडीची चर्चा?
आगामी विधानसभा निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी आम्ही केली होती. याला अनेक पक्षांनी, संघटनानी पाठिंबा दिला आहे. नारायण राणेंनी सुद्धा ईव्हीएम बद्दल शंका उपस्थित केली आहे, त्या संदर्भात त्यांच्याशी भेटून चर्चा केली असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली आहे.राजू शेट्टी यांनी आज नारायण राणे यांची मुंबईत भेट घेतली. माझ्या मनात ज्या शंका आहेत त्याच त्यांच्या मनात आहेत का? याबाबत या भेटीत चर्चा झाली. राणेंच्या मनात सुद्धा ईव्हीएम बाबत शंका आहेत. याबाबत जनजागृती आम्ही आता राज्यभर करत आहोत, असे शेट्टी म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
राणेंच्या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवारांच्या हस्ते; मुख्यमंत्र्यांची मात्र टाळाटाळ
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी ‘नो होल्ड्स बार्ड’ नावाचं आत्मचरित्र लिहिलं आहे. या आत्मचरित्राच्या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार होते. मात्र, पुस्तक प्रकाशनाला ते टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे राणेंच्या ‘नो होल्ड्स बार्ड’ (No Holds Barred’) या आत्मचरित्राच्या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. १६ ऑगस्टला या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. तसेच नारायण राणे यांच्या आत्मचरित्राला शरद पवार यांची प्रस्तावना देण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
कोकण: महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष विधानसभेला कोकणातील सर्व जागा लढवण्याच्या तयारीत
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने रविवारी २८ जुलै रोजी राजापूर-लांजा, साखरपा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षाचे सरचिटणीस व माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार आहे. राजापूर नगर वाचनालय सभागृहात सकाळी १०.३० वाजता ही बैठक होणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभा: नारायण राणे कुडाळ-मालवणमधून लढणार: आमदार नितेश राणे
राज्यातील सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जोरदारपणे कामाला लागले आहेत. त्यात महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष देखील निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे देखील आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि त्याबाबत स्वतः आमदार नितेश राणे यांनीच भाष्य केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
आ. नीतेश राणे यांच्या आंदोलनाचा दणका; रस्त्याच्या कामाला जोरात सुरुवात
रस्त्यांवर खड्डे असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप अभियंत्याच्या अंगावर बादली भरून चिखल ओतल्याप्रकरणी आमदार नितेश राणे आणि त्यांच्या १८ समर्थकांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. दरम्यान २-३ दिवसातील नाट्यमय घडामोडीनंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. त्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेला देखील आक्रमक आंदोलनावरून अप्रत्यक्ष टोला लगावला होता.
6 वर्षांपूर्वी -
५ वर्षांत अच्छे दिन आले का? नारायण राणेंचा सवाल
मागील ५ वर्षात महागाई कमी झाली का? अच्छे दिन आले का? असं म्हणत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी सरकारसह शिवसेना, उद्धव ठाकरे आणि विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्यावर प्रचारसभेत तुफान टीका केली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ संध्याकाळी जाकादेवी येथे जाहीर सभा झाली, यावेळी ते बोलत होते.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंची बिल्डरसोबत तब्बल २८ कंपन्यांमध्ये भागीदारी - नारायण राणे
कोकणात देखील लोकसभेची धामधूम सुरु झाली आहे असंच म्हणावं लागेल. मुंबईत मराठी माणसांची टक्केवारी कमी झाली, १९६०-६६ दरम्यान मुंबईत मराठी माणूस साठ टक्के होता, पण आज मराठी माणूस केवळ १८ टक्के शिल्लक आहे. मुंबईतला मराठी माणूस कुठे गेला.वसई, बदलापूर, कल्याण याठिकाणी मराठी माणूस निघून गेले. ही स्थिती शिवसेनेनी आणली, उद्धव ठाकरेंची बिल्डरसोबत पार्टनरशिप आहे. २८ कंपन्यांमध्ये रवींद्र वायकर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ठाकरे घराण्यातील एका व्यक्तीची भागीदारी आहे. हे मी विधानसभेत पुराव्यानिशी मांडले, सत्ता मिळवायची आणि सत्तेतून पैसा कमवायचा ही निती शिवसेनेची आहे असा स्पष्ट आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
निलेश राणेंच्या उमेदवारीवरून नारायण राणेंवर भाजपचा दबाव?
खासदार नारायण राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून जोरदार मोर्चेबांधणी करत पुत्र निलेश राणे हे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे निवडणूक लढवतील, असे जाहीर केले. परंतु आता निलेश राणे यांनी लोकसभा निवडणूक लढवू नये आणि युतीधर्म पाळावा म्हणून भाजपच्या नेतृत्वाने नारायण राणेंवर थेट दिल्लीतून दबाव आणला आहे. यामुळे खासदार नारायण राणे कोणती भूमिका घेतात, याकडे संपूर्ण कोकणाचे लक्ष आहे.
6 वर्षांपूर्वी -
राणे फडणवीस भेट! नारायण राणे शिवसेने विरोधात ५ जागांवर तगडे उमेदवार देणार
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्या अनुषंगाने नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष देखील जोरदार पणे कामाला लागला आहे. भाजप-शिवसेना युती झाली तरी देखील खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष राज्यातील ५ मतदारसंघांमध्ये तगडे उमेदवार उभे करणार आहेत. हे पाचही महत्वाचे मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत. सध्या शिवसेनेत अनेक वरिष्ठ पदाधिकारी युती केल्यामुळे नाराज आहेत. त्यामुळे कदाचित अशांनाच आर्थिक रसद पुरवून शिवसेनेविरुद्ध तगडं आवाहन उभं केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
संजय राऊत व उद्धव ठाकरेंनी फक्त बाता मारून मराठी माणसाला फसवलं
स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार नारायण राणे यांनी मुंबईमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. केंद्रात आणि राज्यात डझनभर मंत्रिपद उपभोगून सतत सहकारी पक्ष भाजपवर विखारी आगपाखड करणारे शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे स्वबळाचा नारा देऊन पलटले आहेत. दरम्यान संपूर्ण सत्ताकाळ राजीनामा नाट्यात व्यर्थ घालवल्यानंतर मागील काही महिन्यापासून अनेक वेळा स्वबळाच्या जाहीर घोषणा देखील स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत.
6 वर्षांपूर्वी -
कोकणात सेनेला गळती, असंख्य शिवसैनिकांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश
लोकसभा निवडणुकीआधी कोकणात शिवसेनेला सोडचिट्ठी देणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. सत्तेत विराजमान असलेल्या शिवसेनेबद्दल कोकणात विनाशकारी नाणार रिफायनरी प्रकल्प आल्यानंतर लोकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाला आहे. त्याचा फटका शिवसेनेला आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बसायची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
राणेंच्या अत्याधुनिक इस्पितळात गरिबांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार
राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या स्वप्नातील अत्याधुनिक एसएसपीएम लाईफटाईम हॉस्पिटल अॅण्ड मेडिकल कॉलेजमध्ये उपचार आणि शस्त्रक्रिया होणा-या रुग्णांना आता शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य सुविधेचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, सदर योजनेतून पिवळे व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबियांना २२ पेक्षा अधिक आजारांवर मोफत औषधोपचार, फेरतपासणी, आंतररुग्ण उपचार, शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत.
6 वर्षांपूर्वी