Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
मोदी लाटेतील शिवसेना खासदार विनायक राऊतांना २०१९ ची लोकसभा अवघड?
एनसीपीचे सर्वेसेवा शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या दरम्यान कणकवली येथे दीर्घकाळ चर्चा झाली. दरम्यान, सध्या भाजप आणि शिवसेनेमध्ये ‘तुझ्यागळा माझ्यागळा’ सुरु झाल्याने नारायण राणे यांना युती होणार असल्याची खात्री आहे. तसे झाल्यास रत्नागिरी मतदारसंघ पुन्हा शिवसेनेच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार नीलेश यांनी हे या मतदारसंघातून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने लोकसभा लढवणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, त्यांना राष्ट्रवादीने सुद्धा पाठिंबा द्यावा आणि त्या मोबदल्यात निलेश राणे केंद्रात राष्ट्रवादीला सर्मथन करून त्यांच्या समर्थक खासदारांच्या संख्येमध्ये भर टाकतील असा समझोता झाल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण: अखेर राणे समितीच्या 'त्या' अभ्यासापूर्ण निष्कर्षामुळेच आरक्षण : सविस्तर
मराठा समाजातील आंदोलकांचे लाखोंचे मोर्चे, १४,६०० मराठा तरुणांवर अनेक खटले आणि दुःखाची बाब म्हणजे त्यासाठी ४२ तरुणांच्या प्राणाचे बलिदान असा दीर्घ मन हेलावणारा प्रवास केल्यानंतर अखेर शुक्रवारी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देणारे विधेयक महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाले. आज भाजप आणि शिवसेना स्वतःची पाठ थोपटून किती ही मार्केटिंग करत असले तरी साडेचार वर्षापूर्वी आघाडी सरकारच्या राजवटीत नारायण राणे समितीने सखोल अभ्यासाद्वारे हे निष्कर्ष मांडले होते, ज्याद्वारे मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले होते, वास्तविक त्याच धर्तीवर मागासवर्ग आयोगाने १६ टक्केच आरक्षण देण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेने केवळ कॉपीपेस्ट एकदाच काय तो ४ वर्ष रखडवलेला अहवाल निवडणुकीच्या तोंडावर शब्दांचा खेळ करत स्वीकारला.
7 वर्षांपूर्वी -
दिग्गज नेते नारायण राणे व शरद पवार कोकणात राजकीय भूकंप करणार?
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कोकणात राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी पट्यात राष्ट्रवादीची विशेष ताकद नसताना सुद्धा या मतदारसंघासाठी राष्ट्रवादीने आग्रह धरल्याने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
7 वर्षांपूर्वी -
भव्य सभेत आरोप; सध्याच्या शिवसेनेने धंदेवाईक राजकारण सुरु केले आहे: नारायण राणे
कोकणात सध्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरु झाल्याचे चित्र असून, त्यात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने आघाडी घेतल्याचे दिसत आहे. स्वतः खासदार नारायण राणे यांनी पक्ष विस्तारावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. त्याच अनुषंगाने काल वैभववाडी येथे पक्षाची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.
7 वर्षांपूर्वी -
कोकण; अतिउत्साही शिवसेना नेत्यांकडून 'बाप्पाला' बॉक्समधून लगेज'ने चिपी विमानतळावर आणून प्राणप्रतिष्ठा
आज कोकणातील बहुचर्चित चिपी विमानतळावर विमान उतरविण्यासाठी लागणा-या ६२ परवान्यांपैकी केवळ २५ टक्केच परवाने मिळाले असताना घाईघाईने एचडीएल कंपनीचे खासगी विमान उतरविण्याचा अतिउत्साहीपणा अंगलट येण्याची शक्यता आहे. धक्कादायक म्हणजे गणेश चतुर्थीच्या तोंडावर गणरायाचं प्राणप्रतिष्ठा करण्याचं ठरवलं, परंतु त्याच गणरायाला लगेज’मध्ये बॉक्समधून भरून आणण्यात आलं. सार्वजानिक असो वा घरगुती ‘बाप्पाची’ प्रतिष्ठापना करतांना त्याला ‘सीलबंद’ करून आणण्यात येत नाही.
7 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंना फक्त पैशाची टक्केवारी कळते - नारायण राणे
उद्धव ठाकरेंना फक्त पैशाची टक्केवारी कळते – नारायण राणे
7 वर्षांपूर्वी -
त्यांना आरक्षणाबद्दल काय समजतं? उद्धव ठाकरेंना फक्त पैशाच्या टक्केवारीची गणितं समजतात
खासदार नारायण राणे काल पासून रत्नागिरी जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. त्यावेळी नारायण राणेंनी चिपळूणमध्ये एक सभा आयोजित केली असता त्यांनी मराठा आरक्षणावरून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा भूमिकेवर बोट ठेवत शिवसेना पक्ष प्रमुखांवर सडकून टीका केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशनाची गरज नाही: नारायण राणे
मराठा समाजाच्या आरक्षनांच्या विविध मागण्यांवर आज मुख्यमत्री आणि मराठा समाजाच्या काही पदाधिकाऱ्याची बैठक होणार असल्याची माहिती खासदार नारायण राणे यांनी दिली आहे. नारायण राणे यांच्या मध्यस्थीमुळे ही चर्चा होणार आहे. तर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशनाची गरज नाही. असे ते म्हणाले. घटना दुरुस्ती प्रक्रियेला वेळ लागेल. यामुळे मागास अनुकल नसेल तर या प्रस्तावाला मंत्रीमंडळात मंजुरी घ्यावी, असेही राणे म्हणाले.
7 वर्षांपूर्वी -
‘नाणार’ संदर्भात कितीही करार करा, प्रकल्प सुरु होणार नाही म्हणजे नाही: नारायण राणे
नाणार रिफायनरी संदर्भात केंद्र सरकारने नुकताच करार केला असून त्याला प्रतिउत्तर देताना महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांनी ‘केंद्राने नाणार संदर्भात कितीही करार करावेत प्रकल्प सुरु होणार नाही’ असा सज्जड दम भरला आहे.
7 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा नाणार प्रकल्पाविरोधात विराट मोर्चा
नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्त्वात विराट मोर्चा काढला. यात नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध असलेले सर्व स्थानिक लोक सहभागी झाले होते.
7 वर्षांपूर्वी -
केवळ मराठीच भावनिक राजकारण, ही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही
सध्याची शिवसेना ही पूर्वीची बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही. केवळ मराठीच्या नावाने भावनिक राजकारण करायचा पण त्यांच्यासाठी शिवसेनेकडून काही सुद्धा केले जात नाही हे वास्तव आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी थेट शिवसेनेचं नाव घेऊन केली आहे. यांनी मराठी माणसासाठी कधीच काही केलं नाही, त्यामुळे यांच्या कार्यकाळातच मुंबईतून मराठी माणूस हद्दपार झाला असं ते टीका करताना म्हणाले.
7 वर्षांपूर्वी -
आज नारायण राणे 'मातोश्री'वरील भेटीगाठींवर भाष्य करतील
कालच भाजप आणि सेनेमधील दुरावा दूर करण्यासाठी आणि आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि तब्बल दोन तासाहून अधिक वेळ चर्चा केली.
7 वर्षांपूर्वी -
सावधान! नाहीतर कोकणी माणूस कुणाचंही ऐकत नाही: शरद पवार
सिंधुदुर्गात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या आधुनिक आणि भव्य हॉस्पिटलचे उद्धाटन राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना नाणार प्रकल्पाला होणाऱ्या विरोधावरून मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्ष पणे सूचक इशारा दिला आहे.
7 वर्षांपूर्वी -
राणेंचं 'लाईफ-टाईम' जिल्ह्यासाठी वरदान ठरणार: सविस्तर
माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांचं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाईफ टाईम हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज हे कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारे ठरणार असून सिंधुदुर्ग जिल्हाचा विकास आणि इथल्या आरोग्य समस्येसाठी हे वरदान ठरणार आहे, यात काहीच शंका नाही. नारायण राणे यांनी असं ते महत्वाकांक्षी स्वप्नं बघितलं आणि ते सत्यात सुद्धा उतरवलं असच म्हणावं लागेल.
7 वर्षांपूर्वी -
नारायण राणे पालघरमध्ये शिवसेना विरुद्ध प्रचारात
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार नारायण राणे हे पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपसाठी प्रचारात उतणार असल्याचे वृत्त आहे. पालघर मध्ये मोठया प्रमाणावर कोकणी मतदार तसेच भंडारी समाजाचे लोक आहेत. त्याचाच फायदा भाजपच्या उमेदवाराला व्हावा या उद्देशानेच खुद्द मुख्यमंत्र्यांनी नारायण राणेंना प्रचारासाठी विनंती केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणावरून निलेश राणेंचा प्रकाश आंबेडकरांना दम ? सविस्तर
नारायण राणेंनी मराठा आरक्षणाचा बट्ट्याबोळ केल्याची टीका केल्याने माजी खासदार निलेश राणे हे प्रकाश आंबेडकरांवर चांगलेच संतापले आहेत. निलेश राणेंनी प्रकाश आंबेडकरांना थेट आवाहन देत, ‘राणेसाहेबांबरोबर समोरासमोर चर्चा करण्याचा दम आहे कां? असा प्रश्न विचारला आहे.
7 वर्षांपूर्वी -
कोकणात विधानपरिषदेसाठी तिरंगी लढत, सेना, राणे आणि तटकरे सामना
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षासाठी विधानपरिषदेची जागा सोडल्याची घोषणा भाजपने केली आणि कोकणातील एका जागेसाठी नारायण राणे, शिवसेना आणि राष्ट्रवादी असा सामना बघायला मिळणार हे स्पष्टं झालं.
7 वर्षांपूर्वी -
स्वाभिमान पक्षाने नाणार प्रकल्प 'समर्थकांची' पत्रकार परिषद उधळली
कोकणच्या आणि नाणारच्या भूमीशी काही संबंध नसलेले सामाजिक कार्यकर्ते अजयसिंग सेंगर यांची मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केलेली पत्रकार परिषद महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावली.
7 वर्षांपूर्वी -
नाणार प्रकल्प, जमीन क्रमांकासहीत सेनेच्या नेत्यांची नावं उघड करणार : नारायण राणे
नाणार प्रकल्पावरून शिवसेना केवळ राजकारण करत असून ते वैयक्तिक स्वार्थासाठी विरोध दाखवत असल्याचा आरोप नारायण राणे यांनी एका वहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला. योग्य वेळी मी स्वतः जमीन क्रमांकासहीत शिवसनेच्या नेत्यांची नावं उघड करणार असा गौप्यस्फोट राणे यांनी केला.
7 वर्षांपूर्वी -
कणकवलीत राणेंच निर्विवाद वर्चस्व, भाजप-सेना आघाडीला धोबीपछाड
राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजप-सेना आघाडीला धोबीपछाड देत नगराध्यक्षपदासह एकूण १७ पैकी ११ जागांवर विजय मिळत कणकवली नगरपंचायतीवर निर्विवाद बहुमत मिळवले आहे.
7 वर्षांपूर्वी