Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
निलेश राणे सुद्धा विधानसभेच्या आखाड्यात उतरणार? | कुडाळ-मालवण मतदारसंघातून लढत देणार
कुडाळ मालवण विधासभेत सध्या शिवसेनेचे वैभव नाईक हे नेतृत्त्व करतात. वैभव नाईक यांनी 2014 मध्ये दिग्गज नेते नारायण राणे यांचा पराभव केला होता. तेव्हापासून या मतदारसंघावर शिवसेनेचं वर्चस्व आहे. कोकणातल्याच नव्हे तर राज्याच्या राजकीय पटलावर सिंधुदुर्गचं एक वेगळ स्थान राहीलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन विधानसभा मतदासंघ आहेत. यामध्ये कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या मतदारसंघांचा समावेश आहे. 2014 मध्ये यापैकी 2 जागा शिवसेनेकडे तर एक काँग्रेसने जिंकली होती.
4 वर्षांपूर्वी -
७ पिढ्या लांब राहिल्या, 2024 नंतर विनायक राऊतांची कुठलीच पिढी कोकणात दिसणार नाही - निलेश राणे
शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर घणाघाती टीका केली होती. नाराय़ण राणेंच्या सात पिढ्या आल्या तरी कोकणातील शिवसेनेची ताकद कमी होणार नाही,” असं शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी म्हटलंय. त्यानंतर आता निलेश राणे चांगलेच आक्रमक झाले आहेत. “सात पिढ्या लांब जाण्याची गरज नाही. 2024 नंतर विनायक राऊत आणि त्यांची कुठलीच पिढी कोकणात दिसणार नाही,” असा पलटवार निलेश राणे यांनी केलाय. ते सिंधुदुर्गमध्ये बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
सांगली-कोल्हापूर ते कोकण महापूर | भाजपच्या वर्गणीकडे दुर्लक्ष करत निलेश राणेंची सेनेवर 'या' मुद्यावरून टीका
माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. चिपळूणमध्ये आलेल्या महापुराच्या मुद्द्यावरुन मुंबईत शिवसेनेनं नवी वसुली मोहीम सुरु केल्याचा गंभीर आरोप निलेश राणे यांनी केलाय. मुंबईतील काही व्यापाऱ्यांनी त्याबाबत माहिती दिली आहे. शिवसेना सध्या महापुराच्या नावाखाली मुंबईकरांकडे वेगळी वर्गणी मागत आहे. ही एकप्रकराची शिवसेनेची नवीन वसुली मोहीम आहे, असा घणाघाती आरोप निलेश राणे यांनी केलाय. त्याचबरोबर शिवसेनेला कधीपर्यंत पोसणार असा सवालही निलेश राणे यांनी मुंबईकरांना विचारलाय.
4 वर्षांपूर्वी -
संभाजीराजेंच्या मनात काय भलतच दिसतयं | मराठा आरक्षणाचा विषय स्वतःसाठी वापरू नका - निलेश राणेंचा संताप
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. यानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा समाजाच्या भावना जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राचा दौरा केला. आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर तीन वाजता ते राज ठाकरेंना भेटण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
त्यांना कोकणाने दोन-दोन वेळा नाकारलं | आरोप करणाऱ्याला गर्दीत खूप मागे उभे केले होते - उदय सामंत
शिवसेनेचे नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात रत्नागिरीत गुप्त बैठक झाल्याच्या वृत्तामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. उदय सामंत हे स्वत:हून फडणवीसांच्या भेटीसाठी आले होते, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते निलेश राणे यांनी केला होता. उदय सामंत यांनी निलेश राणेंच्या या आरोपाला उत्तर दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
गौप्यस्फोट की राजकीय पुड्या? | रत्नागिरी गेस्टहाऊसवर उदय सामंत फडणवीसांना भेटायला तडफडत होते - निलेश राणे
शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट घेतल्याचा दावा केला जात आहे. रत्नागिरीत सामंत आणि फडणवीसांची गुप्त भेट झाल्याचा दावा भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान निलेश राणे लोकसभेत दोनवेळा रत्नागिरी मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. मात्र याच मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादीतील मंत्री, खासदार आणि आमदारांची मजबूत पकड असल्याने केवळ राजकीय संभ्रम निर्माण करण्यासाठी असं ट्विट केल्याचं म्हटलं जातंय.
4 वर्षांपूर्वी -
मराठवाडा-विदर्भात अजित पवारांचं स्वागत त्यांच्या ताफ्यावर दगडी मारून केलं पाहिजे
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी विरोधकांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवला. वैधानिक विकास महामंडळाच्या नियुक्तीवरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. त्यावेळी अजित पवार म्हणाले, राज्यपाल विधानपरिषदेच्या १२ आमदारांची नावं जाहीर करतील त्यावेळेस विकास मंडळांची घोषणा करु. अजित पवारांच्या या विधानावरुन मोठा गदारोळ उडाला. त्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी दादांचं पोटातले ओठात आले, १२ आमदारांसाठी मराठवाडा, विदर्भातले लोकं ओलीस ठेवले का? तिथली जनता माफ करणार नाही, असा हल्ला चढवला होता.
4 वर्षांपूर्वी -
आता 2024 पर्यंत शिवसेना कुठेच ठेवायचं नाही हे आमचं ठरलंय - निलेश राणे
शिवसेना राणेंच काही करू शकत नाही. माझा एक पुतळा जाळला असेल विनायक राउतला आम्ही 10 वेळा जाळला. एवढी औकात शिवसेनेची पण नाही आणि विनायक राऊतची पण नाही. विनायक राऊत आणि शिवसेनेचा मी रोज वचपा काढणार. 2024 खूप लांब आहे. ग्रामपंचायतीमध्ये आडवच केलं ना आम्ही शिवसेनेला. त्यामुळे आता 2024 पर्यंत शिवसेना कुठेच ठेवायचं नाही हे आमचं ठरलं आहे असं सांगतानाच शिवसेनेचे फक्त 56 आमदार आहेत ते घालवायला किती वेळ लागतो असं ते म्हणाले. त्यावेळी भाजप सोबत होती म्हणून 56 आले असेही ते म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | मातोश्रीवरचा चप्पलचोर | भाषा बदल नाहीतर जिथे दिसाल तिथे फटकावीन - निलेश राणे
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कोकण दौऱ्यानंतर भारतीय जनता पक्षाला प्रत्युत्तर देण्यात आघाडीवर असलेले शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यावर निलेश राणे यांनी अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली आहे. विनायक राऊत म्हणजे मातोश्रीवरचा चप्पलचोर आणि ‘थापे’बाज आहे, अशी बोचरी टीका निलेश राणे यांनी केली.
4 वर्षांपूर्वी -
बाळासाहेब! जे तुम्हाला शक्य झालं नाही ते तुमच्या मुलाला कधीच जमणार नाही - निलेश राणे
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Hindu Hruday Samrat Balasaheb Thackeray) यांचा आज आठवा स्मृतीदिन. या संपूर्ण महाराष्ट्र आणि देशातील शिवसैनिकांच्या, हिंदूंच्या आणि अनेक राजकीय व्यक्तींच्या मनात आदराचं स्थान असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस सर्व स्तरांतून अभिवादन करण्यात येत आहे. बाळासाहेब आज आपल्यात नसले तरीही त्यांची वादळी राजकीय कारकिर्द आणि राजकारणातील त्यांचं योगदान हे कायमच अग्रस्थानी राहील. अशा या नेत्याच्या काही स्मृतींना शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या ‘सामना’तून उजाळा देण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
नाणारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मावस भावाला भूखंडाचे श्रीखंड | निलेश राणेंचा खळबळजनक दावा
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नातेवाईक निशाण देशमुख यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या बाधित भागात 1400 एकर जमीन विकत घेतली”, असा आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. निशाण देशमुख हे उद्धव ठाकरे यांचे मावस भाऊ आहेत, असा दावा निलेश राणे यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
अजित पवारांनीच्या पहाटेच्या शपथविधि आडून निलेश राणें यांचं शिवसेनेवर टीकास्त्र
राज्यात सत्तेवर असलेले महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी काही आयपीएस अधिकाऱ्यांनी प्रयत्न केल्याचे विधान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘लोकमत ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत केले होते. मात्र या विधानानंतर अनिल देशमुख यांनी त्याबाबत सारवासारव केली होती. त्यानंतर आता भल्या पहाटे शपथ घेतलेल्या फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करता यावे, यासाठी काही अधिकारी राबत होते, असा दावा शिवसेनेने केला आहे. आमदारांचे कच्चे दुवे शोधून पहाटेच्या मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करत होते, असा दावा सामनात आज प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखामधून करण्यात आला आहे. मात्र शिवसेनेच्या या दाव्यावर भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्य जनतेने मोठं केलं आहे | कुठल्या विकाऊ ब्रँडने नाही | निलेश राणेंचा राऊतांना टोला
अभिनेत्री कंगना रणौतने काही दिवसांपूर्वी मुंबई ही आपल्याला पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते आहे असं वक्तव्य केलं होतं. त्यावरुन बराच वादंग माजला. सिनेसृष्टीतल्या अनेक कलाकारांनी कंगनाच्या या वक्तव्याचा निषेध केला. एवढंच नाही तर राजकीय वर्तुळातही कंगनावर टीका झाली. विधानसभेच्या विशेष अधिवेशनात कंगनाविरोधात हक्कभंगही आणला गेला.
5 वर्षांपूर्वी -
संदीप सिंह...मग या फोटोमधील लोकांना देखील केसमध्ये घ्या - निलेश राणे
बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात असलेला संदीप सिंह याच्या भाजपसोबत असलेल्या संबंधांची आणखी काही माहिती समोर आली आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी रविवारी ट्विट करून यासंदर्भात भाजपवर नवे आरोप केले. संदीप सिंह याच्या तोट्यात असलेल्या कंपनीसोबत २०१९ साली विजय रुपाणी यांच्या गुजरात सरकारने १७७ कोटींचा सामंजस्य करार केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चित्रपट करण्यासाठी टोकन रक्कम म्हणून गुजरात सरकारने हे पैसे संदीप सिंहला दिले होते का, असा सवाल सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
आयुषभर एका कुटुंबाने वाटेल त्याची वाट लावली, बदनामी केली | नियती कोणाला सोडत नाही
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सुप्रीम कोर्टाने आज महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम कोर्टाने सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश मुंबई पोलिसांना दिला आहे. पाटणामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग करा, अशी मागणी एका याचिकेच्या माध्यमातून अभिनेत्री रिया चक्रवर्तीने केली होती. त्यावर आज सुप्रीम कोर्टाने निकाल दिला.
5 वर्षांपूर्वी -
ते दिल्ली बिल्ली तुमची लायकी नाही | कधी एक तरी निवडणूक लढऊन दाखवा - निलेश राणे
भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे हे सुरुवातीपासूनच शिवसेनेविरोधात आक्रमक भूमिका घेत आलेले आहेत. त्यातच राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर राणे यांच्या शिवसेना विरोधाला आणखीनच धार आली आहे. नुकताच निलेश राणे यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र तरीही ट्विटरच्या माध्यमातून सेना नेत्यांना लक्ष्य करायला ते विसरले नाहीत.
5 वर्षांपूर्वी -
सर्व घरांच्या आत काय होतं त्याची माहिती सार्वजनिक घरगडी सेनेचा अध्यक्षांकडे दिसते
अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी राजकीय वाद उफाळला आहे. भाजप नेत्यांनी केलेल्या बेछुट आरोपानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणात उडी घेत सुशांतच्या वडिलांबद्दल गंभीर आरोप केला होता. पण, सुशांतच्या मामाने राऊतांचा दावा खोडून काढला आहे.
5 वर्षांपूर्वी -
सुशांत प्रकरण | आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी राऊत गुजरात दंगलीबद्दल बोलत आहेत - निलेश राणे
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप नेत्यांनी केलेल्या आरोपानंतर आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या तपासाबद्दल काही प्रश्न उपस्थितीत केले आहे. एवढंच ‘नाहीतर मुंबई पोलिसांमध्ये . बिहारप्रमाणे काही गुप्तेश्वर पांडे महाराष्ट्र पोलिसांत आहेत व त्यांच्यामुळे अडचणीत भर पडली’ असा संशयही राऊतांनी व्यक्त केला.
5 वर्षांपूर्वी -
अविनाश जाधवला आंदोलनानंतर अटक व तडीपारी आणि विनायक राऊतचा मुलगा दारू पिऊन पोलिसांना
मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलिसांकडून २ वर्ष हद्दपार होण्याची नोटीस बजावली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अविनाश जाधव विविध प्रश्नांवर आंदोलन करुन सरकारवर टीकास्त्र सोडत आहे. ठाणे महापालिकेच्या कोविड रुग्णालयात नर्स म्हणून काम करणाऱ्या मुलींना काढल्याप्रकरणी मनसेकडून शुक्रवारी ठाणे महापालिकेसमोर आंदोलन सुरु होतं. हे आंदोलन करत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. यानंतर न्यायालयाने अविनाश जाधव यांना ३ ऑगस्टपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
5 वर्षांपूर्वी -
२ दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे मुंबई पोलिस आयुक्तांना भेटतात आणि आज पत्रकार परिषद
ज्या राज्यात घटना घडली असेल त्याच राज्याचे पोलीस संबंधित घटनेचा तपास करतात. त्यामुळे सुशांत आत्महत्या तपासाचा अधिकार कायद्याने मुंबई पोलिसांकडे असल्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी म्हटलंय. यामुळे बिहार पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह झालायं. सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबईत आलेल्या बिहार पोलिसांना होम क्वारंटाईन केल्यानंतर मुंबई पोलिसांच्या भुमिकेवर संशय निर्माण झाला. यावर मुंबई पोलिसांतर्फे आता स्पष्टीकरण देण्यात आलंय. रियाच्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्स्फर झाल्याच्या चर्चेलाही पुर्णविराम मिळालाय.
5 वर्षांपूर्वी