Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
आ. निलेश लंकेचं पुढील भविष्य अतिशय उज्ज्वल | राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून त्यांना मोठी संधी मिळणार - अमोल मिटकरी
कोरोनाच्या काळात सर्व रुग्णालये फुल असताना आ. निलेश लंके यांनी कोवीड सेंटर सुरु करून हजारो लोकांचे प्राण वाचवत अनेक कुटुंब उद्धवस्त होण्यापासून वाचवले. आमदार लंके यांचे पुढील भविष्य अतिशय उज्जवल आहे. राष्ट्रवादीला एक साजेसा आमदार लोकांनी दिला आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून आमदार निलेश लंके यांना मोठी संधी मिळणार असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे विधान परीषद अध्यक्ष अमोल मिटकरी यांनी केले.
4 वर्षांपूर्वी -
दडपशाही व भ्रष्टाचाराचे आरोप करत कर्मचारी ज्योती देवरेंविरोधात संपावर | चित्र वाघ यांचा देवरेंना 'राजकीय' पाठिंबा?
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची एक ऑडिओ क्लिप राज्यभर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कालच भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ज्योती देवरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. चित्र वाघ त्यांचा केवळ राजकीय फायद्यासाठी याविषयात त्यांना अनेक आरोप असतानाही समर्थन देत असल्याचं कर्मचारी देखील ऑफ कॅमेरा सांगत आहेत. मागील काही दिवसांपासून त्या स्वतःची चौकशी होणार असल्याने भावनिक वातावरण करून सहानुभूती मिळवून स्वतःचा बचाव करत असल्याचं म्हटलं जातंय.
4 वर्षांपूर्वी -
ऑडिओ क्लिप व्हायरल पूर्वी 6 ऑगस्टला विभागीय आयुक्तांना कसुरी अहवाल | सरकारी कामात अनियमितता ठपका, कारवाईची शिफारस झाल्याने...
पारनेरच्या लोकप्रतिनिधीवर धक्कादायक आरोप करत आत्महत्येचा इशारा देणाऱ्या ऑडिओ क्लिपमुळे राज्यभर चर्चेत असलेल्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. तहसीलदार ज्योती देवरे यांच्याविरुद्ध नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 6 ऑगस्टलाच विभागीय आयुक्तांना एक कसुरी अहवाल पाठवल्याचे उघड झाले आहे. देवरे यांच्याविरुद्ध आलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती.
4 वर्षांपूर्वी -
तहसीलदार ज्योती देवरेंवर भ्रष्टाचाराचे आरोप | विभागीय आयुक्तांचा अहवाल | २०२० पासून होत्या वादात... म्हणून बनाव?
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिपद्वारे आत्महत्येचा इशारा दिल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. देवरे यांनी या ऑडिओ क्लिपद्वारे कोरोना काळात चांगलेच चर्चेत आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्याकडे अंगुलीनिर्देश असल्याचं बोललं जात आहे. याबाबत आता खुद्द आमदार निलेश लंके यांनीच उत्तर दिलं आहे. तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिप व्हायरल करून आपल्या बचावासाठी केविलवाणा प्रयत्न केलाचा पलटवार निलेश लंके यांनी केलाय.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना संकटात ६ महिने बिळात लपून बसणाऱ्यावर काय बोलायचं? | लंकेंचा विजय औटींना टोला
शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी आणि राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्यावाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे. विजय औटींच्या टीकेला निलेश लंके यांनी सडेतोड प्रतिउत्तर दिल्याने विजय औटींचा पुन्हा त्रागा होण्याची शक्यता आहे. मी बाप नव्हे तर जनतेचा सेवक आहे.समाजकारणात, राजकारणात आल्यापासून मी माझे जीवन जनतेसाठी अर्पण केले आहे.ज्या दिवशी मी स्वतःला आमदार समजेल त्यावेळी माझी जनतेसोबत असलेली नाळ तुटेल असे खणखणीत प्रतीउत्तर आमदार नीलेश लंके यांनी माजी आमदार विजय औटी यांना दिले.
4 वर्षांपूर्वी -
विजय औटींना महिला सरपंचानी झापले | आमदार निलेश लंकेविरोधातील टिकेवरून जोरदार निशाणा
संकटाचा सामना करायचा का संकटाला भिऊन घरात बसायचं ? म्हणजे चुकीचं वागा असा याचा अर्थ नाही. मुख्यमंत्री पदोपदी सांगतात मास्क वापरा, हात धुवा, सामाजिक अंतर पाळा. मुख्यमंत्र्यांच्या सुचना पाळायला का अडचण आहे आपल्याला ? नाही ? ‘त्यांच्यातच जाउन झोपन !’ कोणत्याही गोष्टीला एक सिमा असावी. माणसाने वागावं कसं ? तुम्ही अधिक कडक केले असते, प्रशासनाच्या मागे अधिक मजबुतपणे उभे राहिले असता तर काही जिव नक्कीच वाचले असते. मी तपशिलात जाणार नाही. त्यासाठी योग्य वेळ येऊ द्या. मी आमदार असतो तर ५० टक्के जिव नक्कीच वाचविले असते असा दावा करीत विधानसभेचे माजी उपाध्यक्ष मा. आ. विजय औटी यांनी आमदार नीलेश लंके यांच्यावर पुन्हा निशाणा साधला.
4 वर्षांपूर्वी -
मी आमदार असतो तर ५० टक्के जिव नक्कीच वाचविले असते | विजय औटींचा निलेश लंकेवर निशाणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पदोपदी सांगतात मास्क वापरा, हात धुवा, सामाजिक अंतर पाळा. मुख्यमंत्र्यांच्या सुचना पाळायला का अडचण आहे आपल्याला ? नाही ? प्रशासनाच्या मागे अधिक मजबुतपणे उभे राहिले असता तर काही जिव नक्कीच वाचले असते.
4 वर्षांपूर्वी