Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
ऑलिम्पिक | हरियाणाच्या 11 खेळाडूंची शाळेपासूनच तयारी होती | गुजरातमध्ये कोचला इन्सेंटिव्ह प्रकारच नाही
टोकियो ऑलिम्पिक रविवारी संपले. भारताला एका सुवर्णासह ७ पदके मिळाली, जी १२१ वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी आहे. परंतु अनेक प्रश्नही आहेत. १३१ कोटींची लोकसंख्या असलेल्या देशाला केवळ ७ पदके का? गेल्या २१ वर्षांत देशाने २० पदके जिंकली. यात ११ एकट्या हरियाणाने पटकावलीत. या वेळी ६ वैयक्तिक पदकांपैकी ३ हरियाणाच्या खेळाडूंनी जिंकली. हॉकीच्या पदकातही हरियाणाच्या खेळांडूचा वाटा आहे. १२७ खेळाडूंच्या पथकात हरियाणाचे ३० खेळाडू होते.
4 वर्षांपूर्वी -
इतिहास रचला | नीरज चोपडाने भारताला अॅथलेटिक्समध्ये आतापर्यंतचे पहिले मेडल मिळवून दिले
अॅथलेटिक्समध्ये पदक जिंकण्यासाठी भारताची 121 वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. भाला फेकणारा नीरज चोप्रा याने या खेळात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. त्याने अंतिम फेरीत 87.58 मीटर थ्रो करत सुवर्ण पटकावले. नीरजने पहिल्या प्रयत्नात 87.03 मीटर आणि दुसऱ्या प्रयत्नात 87.58 मीटर भाला फेकला. त्याने तिसऱ्या प्रयत्नात 76.79 मीटर भाला फेकला, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर फाऊल आणि 6 व्या प्रयत्नात फाउल थ्रो केला.
4 वर्षांपूर्वी -
Tokyo Olympics 2020 | भारताला कुस्तीमध्ये सिल्व्हर मेडल, रवी दहियाचा रशियन कुस्तीपटूकडून पराभव
कुस्तीच्या आखाड्यात रवी दहियाकडून सुवर्णपदकाची आशा संपली आहे. 57 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत रवीचा दोन वेळचा विश्वविजेता रशियाच्या जॉर उगुऐवकडून पराभव झाला. रवी आता रौप्य पदकासह भारतात परतणार आहे. उगुऐवने त्याला 3 गुणांनी पराभूत केले.
4 वर्षांपूर्वी -
चक दे इंडिया | भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास | ऑलिम्पिक उपांत्य फेरीत धडक
भारतीय महिला हॉकी संघाने इतिहास रचला आहे. हा संघ प्रथमच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. भारताने उपांत्यपूर्व फेरीत तीन वेळा ऑलिम्पिक चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा 1-0 असा पराभव केला. भारतीय संघाने 1980 मध्ये पहिल्यांदा भाग घेतला होता. मात्र, तेव्हा उपांत्य फेरीचे स्वरूप नव्हते. ग्रुप स्टेजनंतर, सर्वाधिक गुण असलेले 2 संघ थेट अंतिम फेरीत खेळले होते. भारतीय संघ पूलमध्ये चौथ्या स्थानावर राहिला होता.
4 वर्षांपूर्वी