Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
विरोधकांची एकजूट, नितीश कुमार यांची राष्ट्रीय संयोजकपदी वर्णी लागणार? शरद पवारांना सुद्धा मोठी जबाबदारी मिळणार? बेंगळुरूमध्ये निर्णय होणार
Oppositions Unity | येत्या पंधरवड्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. एकाबाजूला भाजपकडून एनडीएतील जुन्या मित्रपक्षांना परत आणण्यासाठी कवायत सुरू आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांची चिराग पासवान यांच्यासोबत पाटण्यात झालेली भेट पार पडली आहे. जीतनराम मांझी आणि व्हीआयपी प्रमुख मुकेश साहनी यांनी यापूर्वीच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आहे. त्याचवेळी १३ जुलै रोजी दिल्लीत आणखी एक बैठक होणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
2024 मध्ये भाजपचा पराभव निश्चित | एनडीए शिल्लक राहिली नाही, पण शंख रॅलीत विरोधक एकवटले - नितीश कुमार
Opposition Unity | इंडियन नॅशनल लोकदलातर्फे (आयएनएलडी) रविवारी हरियाणातील फतेहाबादमध्ये विरोधकांची शंख रॅली काढण्यात आली आहे. या रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी, शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांच्यासह अनेक विरोधी पक्षनेते सहभागी झाले होते. विरोधकांचा हा मेळावाही महत्त्वाचा मानला जात आहे, कारण बिहारमध्ये एनडीएपासून फारकत घेतल्यानंतर नितीश कुमार पहिल्यांदाच विरोधकांच्या मोठ्या व्यासपीठावर दिसले आहेत.
3 वर्षांपूर्वी