Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
पेट्रोल-डिझेल दरवाढ | 6 राज्यांमध्ये 100 रुपयांच्या पुढे गेले पेट्रोल | भाजपाला सुख-दुःखच नाही?
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्यांची अवस्था बिकट झाली आहे. आज या महिन्यात चौथ्यांदा पेट्रोल-डिझेलमध्ये दरवाढ झाली आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 101.52 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले आहे. या वाढीमुळे आता देशातील 6 राज्यात पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पुढे गेली आहे. त्याचबरोबर डिझेलची किंमतही 100 रुपयांच्या जवळपास पोहोचली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे सोमवारी राज्यात एकाचवेळी एक हजार ठिकाणी आंदोलन - नाना पटोले
केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किमती भरमसाठ वाढवल्या आहेत. पेट्रोलने १०० रुपये लिटरचा टप्पा पार केला असून डिझेल ९२ रुपये लिटर झाले आहे. ही भाववाढ अशीच चालू राहिली तर डिझेल १०० रुपये लिटर होण्यास फार दिवस लागणार नाहीत. स्वयंपाकाचा गॅसही ९०० रुपये झाला आहे. या महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त आहे त्यात महागाईचा मार सहन करावा लागत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
पेट्रोल-डीझेलच्या किमतीचा भडका | मुंबईत 101.30 तर परभणीत 103.61 रुपये प्रति लिटर
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीने सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. आज या महिन्यात तिसऱ्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या. देशातील अनेक भागात पेट्रोलचा दर 100 रुपयांच्या पुढे गेला आहे. मुंबईत 101.30 तर परभणीत राज्यातील सर्वात जास्त 103.61 रुपये प्रति लिटरने पेट्रोल मिळत आहे. तसेच, देशात सर्वात महाग पेट्रोल श्रीगंगानगरमध्ये मिळ असून, तिथे एका लिटरसाठी 106.09 रुपये मोजावे लागत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
पेट्रोल-डिझेल आणि नैसर्गिक गॅस जीएसटीच्या कार्यकक्षेत आणण्याचा प्रस्ताव नाही - अर्थमंत्री
इंधनविक्रीमधून केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात महसूल कमवत असल्याचा खुलासा खुद्द केंद्रानेच केला आहे. अबकारी कर, उपकर आणि अधिभार या माध्यमातून इंधनविक्रीमधून केंद्राची घसघशीत कामाई होत असल्याची कबुली सरकारने दिली आहे. त्यात मागील काही दिवसांपासून इंधनाच्या किमती कमी करण्यासाठी केंद्र सरकार पेट्रोल डिझेल जिएसटीच्या कक्षेत आणणार असल्याची चर्चा सुरु आहे.
4 वर्षांपूर्वी -
वाहनाच्या इंजिनमध्ये बदल करणे कायद्याने गुन्हा | तरी महाग पेट्रोलमुळे देशी जुगाड
शंभर रुपयांकडे झेपावलेल्या पेट्रोल , डिझेलच्या किंमतींचा परिणाम आता बाजारावर जाणवू लागला आहे. ज्यांची वाहने नाहीत त्यांनाही आता भूर्दंड सोसावा लागणार आहे. आता मुंबईतील रिक्षा, टॅक्सीने प्रवासी भाड्यात मोठी वाढ केली आहे. यामुळे वाढत्या इंधनाचा फटका आता सामान्य लोकांनाही बसणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | पेट्रोल पंपवर पेट्रोल भरायला गेला आणि ‘लूट लिया रे’....भन्नाट व्हायरल
देशात पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा चांगलाच भडका उडाला आहे. पेट्रोलच्या दराने प्रति लीटर शंभरीचा टप्पा गाठला आहे. सर्वसामान्य लोकांच्या खिशाला याची मोठी झळ पोहोचली आहे. सामान्य माणसासाठी पेट्रोल भाव प्रचंड झाल्याने महागाईचा देखील सामना करावा लागत आहे. आता याबाबत समाज माध्यमांवर देखील सद्यस्थिती सांगणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
4 वर्षांपूर्वी -
गॅस सिंलिंडरच्या दरात पुन्हा वाढ | आजपासून गॅसच्या किमतींत 25 रुपयांची वाढ
एकाबाजूला पेट्रोल आणि डीझेलच्या किमती वाढत असतानाच सामान्य नागरिकांच्या खिशाला आता गॅसने सुद्धा कात्री लावली. सरकारी तेल कंपन्यांनी आजपासून गॅसच्या किमतींमध्ये 25 रुपयांची वाढ केली आहे. दिल्लीत आता सबसिडी नसलेला LPG सिलेंडर 819 रुपयांत मिळत आहे. आधी याची किंमत 794 रुपये एवढी होती. 2021 मध्ये सुरुवातीच्या दोन महिन्यांतच घरगुती सिलेंडरच्या किमतींमध्ये तब्बल 125 रुपयांची वाढ झाली आहे. 1 जानेवारी रोजी जे सिलेंडर 694 रुपयांना मिळत होते ते आता 819 रुपयांवर पोहोचले आहे.
4 वर्षांपूर्वी -
पेट्रोल दर वाढ | तुमचं वाहन नाही | पण रिक्षा, टॅक्सीचं भाडं वाढलं
मुंबईत एमएमआर रिजनमध्ये ऑटो आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार आहे. ऑटो रिक्षाचे भाडे 18 वरुन 21 रुपयांवर तर टॅक्सीचे भाडे 22 रुपयांवरुन 25 रुपये करण्याचा निर्णय झाला आहे. परिवहन आयुक्तांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. मागील काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर वाढत आहेत. त्यामुळे ऑटो रिक्षा आणि टॅक्सीचालक आंदोलनाच्या पवित्र्यात होते. मात्र, भाडेवाढीचा निर्णय होत असल्यानं आता त्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, इंधन दरवाढीचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
हेच का ते अच्छे दिन | इंधन दरवाढीवरून मुंबईतील पेट्रोल पंपांवर शिवसेनेची पोस्टरबाजी
पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. मागील काही आठवड्यांपासून इंधन दर वेगानं वाढले असून, काही ठिकाणी पेट्रोलचे दर शंभरीपार गेले आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण असल्याचं चित्र आहे. याच मुद्द्यावरून विरोधकांकडून मोदी सरकार घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
पेट्रोलचे भाव तब्बल 101.22 | नव्या ऐतिहासिक दराच्या दिशेने वाटचाल सुरु
पेट्रोल आणि डीझेलच्या भावांमध्ये पुन्हा वाढ करण्यात आली आहे. सलग 12 व्या दिवशी ही वाढ झाली आहे. नवीन दरांप्रमाणे आता मुंबईत प्रति लिटर पेट्रोलचे भाव चक्क 97 रुपयांवर पोहोचले. तर दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर 90.58 रुपयांनी विकले जात आहे. दिल्लीत आज डीझेलच्या किमती 37 तर पेट्रोलच्या किमती लिटरप्रमाणे 39 पैशांनी वाढवण्यात आल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
आम्ही तेल प्रकल्प उभारले | सात वर्षात तुम्ही काय केलं जाहीरपणे सांगा - काँग्रेस
मागील काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. यामुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. देशातील काही राज्यांमध्ये पेट्रोलच्या दरांनी शंभरी गाठली आहे. तर काही राज्यांमध्ये पेट्रोल शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल लवकरच शंभरी पार करेल. पेट्रोल, डिझेलच्या किमती सातत्यानं वाढत असल्यानं सामान्य नागरिक अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
पेण'फ्युल' वाढ | अमूलच्या डुडलने मोदी सरकारची अप्रत्यक्ष खिल्ली उडवली
कोरोना महामारीच्या काळात सर्वसामान्यांच्या अडचणीं कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाहीत. वाढत्या महागाईमुळे त्यांच्या समस्या वाढल्या आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किंमती आज पुन्हा वाढल्या आहेत. दरम्यान, तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सलग 11 व्या दिवशी वाढ केली आहे. ज्यामुळे राजधानी दिल्लीत पेट्रोल प्रतिलिटर 90 रुपयांच्या पुढे गेले आहे. सध्या अनेक शहरांत पेट्रोलचे दर शंभरच्या पुढे गेले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
इंधन दरवाढीने लवकरच महागाईचा आगडोंब उसळण्याची शक्यता | सामान्य लोकं हैराण होणार
कोरोना महामारीच्या काळात सर्वसामान्यांच्या अडचणीं कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाहीत. वाढत्या महागाईमुळे त्यांच्या समस्या वाढल्या आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किंमती आज पुन्हा वाढल्या आहेत. दरम्यान, तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सलग 11 व्या दिवशी वाढ केली आहे. ज्यामुळे राजधानी दिल्लीत पेट्रोल प्रतिलिटर 90 रुपयांच्या पुढे गेले आहे. सध्या अनेक शहरांत पेट्रोलचे दर शंभरच्या पुढे गेले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
पेट्रोलची सेंचुरी | 'अब की बार' लोकांचं जगणं अवघड झालं यार
देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनला भिडत असल्याने लोकांचा खिसा खाली होत आहे. त्यामुळे आता मुंबईसारख्या आर्थिक राजधानी असलेल्या शहरातही लोक वाहनांनी प्रवास करताना दहावेळा विचार करत आहेत. पेट्रोलचा दर परवडत नसल्याने गाड्या बाहेर काढायच्या की नाही, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. पेट्रोलचे दर सातत्याने वाढत असल्याने आता बरेच ग्राहक पेट्रोलची खरेदी टाळत असल्याचे पेट्रोल पंपांवरील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
4 वर्षांपूर्वी -
पेट्रोलची सेंचुरी | पंपचालकांच्या जुन्या मशीनमध्ये ३ डिजिट दिसेना | विक्री बंद
कोरोना काळात आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असताना इंधनाच्या चढत्या दरांचा देखील फटका बसणार आहे.कारण, सरकारी तेल कंपन्यांकडून आज (१४ फेब्रुवारी) सलग ६ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे, पेट्रोलच्या किंमतीने आता ‘शंभरी’ गाठली आहे. प्रीमियम पेट्रोलचा दर हा प्रति लीटर तब्बल १०० रुपयांच्या पार गेला आहे.
4 वर्षांपूर्वी -
केवळ एक मिस्ड कॉल देऊन कसा बुक करायचा LPG सिलेंडर
Indian Oil’कडून आता ग्राहकांना एलपीजी गॅस नवी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना केवळ एक मिस्ड कॉल देऊन LPG सिलेंडर बुक करता येईल. इंडियन ऑईलकडून नुकतीच यासंदर्भात माहिती देण्यात आली. त्यानुसार आता त्यांच्या ग्राहकांना गॅस बुक करण्यासाठी 8454955555 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल.
4 वर्षांपूर्वी -
बुरे दिन आने वाले है | पेट्रोलची किंमत 100 रुपये पर्यंत पोहोचण्याची शक्यता
पेट्रोलियम कंपन्यांनी आज गुरुवारी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केला नाही. सलग दहाव्या दिवशी इंधन दर स्थिर आहेत. थंडीची लाट आल्याने तापमान सामान्य ठेवण्यासाठी काही देशांमध्ये सेंट्रलाइज हिटिंग सिस्टम सुरु करण्यात आली आहे. या प्रणालीसाठी इंधनाची गरज लागते.त्यामुळे मागील दोन दिवसांपासून कच्च्या तेलाची मागणी वाढली आहे.
4 वर्षांपूर्वी -
डिझेलचे दर पुन्हा वाढले, लॉकडाउनमधील प्रवास महागणार..नवीन दर पाहा
तेल कंपन्यानी पेट्रोलचे दर स्थिर ठेवून डिझेलचे दर वाढविले आहेत. तेल कंपन्यांनी या महिन्यात डिझेलचे दर नऊ वेळा वाढविले आहेत. दिल्लीत डिझेलची किंमत ऐतिहासिक पातळीवर पोहोचली आहे. सातत्याने होणाऱ्या किंमत वाढीमुळे महागाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण फळं आणि भाज्यांमधील इतर खाद्यपदार्थ महाग होत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
संताप जनक वक्तव्य, पेट्रोल-डिझेलचे दर वाढले तरी सामान्यांवर काही प्रभाव पडत नाही - पेट्रोलियममंत्री
सध्या दोन्ही इंधनाचे दर प्रचंड वाढले आहेत. डिझेल 13 पैशांनी महागले असून, पेट्रोलची किंमतही 5 पैशांनी वाढली आहे. या महिन्यात सलग 21 दिवस इंधनाच्या दरात वाढ झाल्यानंतर सरकारी तेल कंपन्यांनी रविवारी दरवाढ केली नव्हती. पण आज सोमवारी पुन्हा दरवाढ करण्यात आली आहे. कालच्या 80.38 रुपयांच्या तुलनेत दिल्लीत पेट्रोलचे दर 5 पैशांनी वाढून 80.43 रुपये झाले आहेत. डिझेलही 13 पैशांनी वाढून त्याचा भाव 80.53 रुपयांवर पोहोचला आहे. काल दिल्लीत डिझेलची किंमत 80.40 रुपये होती. गेल्या काही दिवसांपासून दिल्ली हे देशातील पहिले राज्य बनले आहे, जेथे पेट्रोलपेक्षा डिझेल महाग आहे.
5 वर्षांपूर्वी -
अब की बार..सतत इंधन दरवाढ...काँग्रेसचे मोदी सरकारविरोधात राज्यव्यापी आंदोलन
७ जूनपासून सलग होणाऱ्या इंधन दरवाढीला रविवारी ब्रेक लागला. मात्र आज सोमवारचा दिवस उजाडताच या दरवाढीचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. देशभरात मार्च महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक संकट ओढावलेले असतानाच दररोज होणाऱ्या इंधन दरवाढीनेही सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. याविरोधात काँग्रेस पक्ष आज राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. आज सकाळी १० ते १२ या वेळत सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी धरणे आंदोलन करून इंधन दरवाढ मागे घेण्याची मागणी केली जाणार आहे. यावेळी राष्ट्रपतींच्या नावे एक निवेदन देण्यात येणार आहे.
5 वर्षांपूर्वी