Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
मोटार सायकल ते शेतीचा ट्रॅक्टर, पेट्रोल-डिझेल दराने सर्वच हैराण...केंद्राविरोधात संताप
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सलग २१ दिवस झालेल्या इंधन दरवाढीला रविवारी ब्रेक लागला. मात्र आज सोमवार उजाडताच हे दरवाढीचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. आज मुंबई आणि दिल्लीसह देशाच्या अनेक भागांमध्ये पेट्रोल-डिझेल महागले आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात ५ पैशांची, तर डिझेलच्या दरात १२ पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता प्रतिलिटर पेट्रोलमागे ८७.१७ रुपये, तर प्रतिलिटर डिझेलमागे ७८.८१ रुपये मोजावे लागणार आहेत. सलग या इंधन दरवाढीने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशात सलग २०व्या दिवशी इंधन दरवाढ, सरकारचं दुर्लक्ष अन सामान्य राम भरोसे
देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसत आहे. देशात आज सलग विसाव्या दिवशी इंधन दरवाढ झाली आहे. आज डिझले 17 पैशांनी, तर पेट्रोल 21 पैशांनी महागले आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लिटर ८०.१३ रुपये झाले असून डिझेलचे दर प्रति लिटर ८०.१९ रुपये झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले, मोदी सरकारचे मंत्री शांत
लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून आज सलग १९व्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागले आहे. दररोज होणाऱ्या या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचे कंबरडे मोडून निघाले आहे. आज दिल्लीत पेट्रोलच्या दरात १६ पैशांची तर डिझेलच्या दरात १४ पैशांची वाढ करण्यात आली. या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचे दर ७९.९२ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ८०.०२ रुपये प्रति लिटर इतके झाले आहेत. यासह राजधानीत डिझेलच्या दराने पहिल्यांदाच ८० रुपयांचा टप्पा पार केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
२०१४'मध्ये ही होर्डिंग्स पाहिली असतील पेट्रोल पंपा वरती, आव्हाडांकडून आठवण
लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून दररोज होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आज डिझेलच्या किंमती वाढवल्या असून पेट्रोलचे दर मात्र स्थिर आहेत. आज डिझेलचे दर ४० ते ५० पैशांनी महागल्याने मुंबईत डिझेल प्रतिलिटर ७८.२२ रुपये झाले आहे. तर पेट्रोलचा भाव ८६.५४ रुपयांवर स्थिर आहे. तसेच ४८ पैशांच्या दरवाढीने राजधानी दिल्लीत डिझेलचा भाव ७९.८८ रुपये झाला आहे. तर पेट्रोलचा भाव ७९.७६ रुपयांवर कायम आहे. सलग १८व्या दिवशी झालेल्या या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचे कंबरडे मोडून निघाले आहे.
5 वर्षांपूर्वी -
पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सलग सोळाव्या दिवशी वाढ, सामान्य नागरिकांना फटका
लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झालेला असताना दररोज होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आज पेट्रोल-डिझेलच्या दरात आणखी वाढ केली आहे. सलग सोळाव्या दिवशी झालेल्या या इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरिकांच्या खिशावरील ताण वाढला आहे.
5 वर्षांपूर्वी -
पेट्रोल-डिझेल दरवाढ थांबेना, महागाईचा उडणार भडका
गेल्या १३ दिवसांपासून इंधन दरवाढीचे सत्र सुरूच आहे. परिणामी लॉकडाऊनचा मोठा आर्थिक फटका बसलेला असतानाच इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. आज पेट्रोल ५६ पैशांनी महागले असून डिझेलच्या दरात ६३ पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीकरांना आता प्रति लिटर पेट्रोलमागे ७८.३७ रुपये, तर प्रति लिटर डिझेलमागे ७७.०६ रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच मुंबईत पेट्रोलचे दर ८५.२१ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर ७५.५३ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
सलग बाराव्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरवाढ; वाहन धारक हैराण
मागील अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनचा देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. तर दुसरीकडे दररोज होणाऱ्या इंधन दरवाढीने सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आणले आहेत. आज सलग बाराव्या दिवशी इंधन दरवाढ झाली आहे. आज पेट्रोल ५३ पैशांनी, तर डिझेल ६४ पैशांनी महागले आहे. त्यामुळे दिल्लीकरांना आता पेट्रोलसाठी ७७ रुपये ८१ पैसे आणि डिझेलसाठी ७६ रुपये ४३ पैसे मोजावे लागणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
पेट्रोल, डिझेल आजही महागले....सामान्यांची आर्थिक अडचण वाढली
लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे इंधनाचे दर महागले आहेत. आज सलग नवव्या दिवशी देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. आज मुंबईत पेट्रोलच्या दरात ४८ पैशांची, तर डिझेलच्या दरात ५९ पैशांची वाढ करण्यात झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
सलग आठव्या दिवशी पेट्रोल, डिझेल महागलं...सामान्य माणूस हैराण
आज सलग आठव्या दिवशी इंधन दरवाढ झाली आहे. आज पेट्रोल ०.६२ रुपयांनी तर डिझेल ०.६४ रुपयांनी महागले असून दिल्लीतील आजचा पेट्रोलचा दर हा ७५.७८ रुपये आणि डिझेलचा दर ७४.०३ रुपये इतका झाला आहे. तर मुंबईत पेट्रोलचा दर ८२.१० रुपये आणि डिझेलचा दर ७२.०३ रुपये इतका झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
सलग सातव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ
लॉकडाऊनच्या काळात स्थिर असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीने पुन्हा उसळी घेतली असून आज सहाव्या दिवशीही इंधनात दरवाढ झाली आहे. त्यानुसार, मुंबईत आज पेट्रोलची किंमत ८२.१० रुपये झाली आहे. तर, डिझेल ७२.०३ रुपये झाले आहे. दिल्लीत पेट्रोलचा भाव ७५.१६ रुपये झाला असून डिझेलसाठी ७३.३९ रुपये आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईत पेट्रोल ८०च्या घरात; दिवाळीत महागाई वाढण्याची शक्यता
सौदी अरेबियातील अराम्कोच्या सर्वांत मोठ्या इंधन शुद्धीकरण प्रकल्पावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचा फटका जगभरातील देशांसह भारताला बसायला सुरुवात झाली आहे. १४ सप्टेंबरच्या ड्रोन हल्ल्यानंतर असणारे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईतील पेट्रोलचे दर प्रतिलिटर ८० रुपयांच्या जवळपास पोहोचले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
कच्च्या तेलाच्या किंमतीमुळे पेट्रोल-डिझेलचे दर भडकण्याची शक्यता
सौदी अरेबियाच्या सरकारी तेल कंपनीच्या रिफायनरीवर दोन ड्रोन हल्ले करण्यात आले. यामुळे रिफायनरींना मोठी आग लागल्याने जगाचा तेलपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती १० डॉलरनी वाढण्याची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
महागाईमुळे गणपतीबाप्पाच्या आगमनाआधी सामान्य हैराण, २०१९ ला बाप्पा मूळ 'केंद्रीय' विघ्नच दूर करो? सामान्यांचा रोष
मागील काही दिवसांपासून पेट्रोल तसेच डिझेलचे दर वेगाने वाढत वाढत असून हे वाढते दर शंभरी गाठेल अशी शंका सामान्यांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे महागाईसुद्धा प्रचंड वाढणार असल्याने त्याचा सर्वाधिक फटका हा सामान्यांना तर बसणारच आहे, परंतु लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होणार असल्याने त्याची झळ थेट सामन्यांना आणि एकूणच बाजापेठेला सुद्धा बसणार आहे.
7 वर्षांपूर्वी -
पेट्रोल - डिझेल दर वाढीवर काँग्रेसच्या काळातील भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया
२०१४ पूर्वी काँग्रेसच्या काळात भाजप विरोधी पक्षात असताना त्यांच्या काही वरिष्ठ नेत्यांनी पेट्रोल आणि डिझेल दर वाढीवर दिलेल्या प्रतिक्रिया आणि सद्यस्थितीत सत्तेत असताना त्यांचे बदलेले सूर. किती हा विरोधाभास.
7 वर्षांपूर्वी -
भारतात भडका उडणार! पेट्रोल शंभरी गाठण्याची शक्यता
कच्य्या तेलाच्या किमती वाढल्या की त्याचा परिणाम भारतीय चलनावर पडेल आणि रुपया आणखी कुंकुवात होऊन महागाई वाढेल. परिणामी हा त्रास सामान्य जनमानसाला सोसावा लागेल. आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेला आणखी किती सोसावे लागेल याचा अंदाज लावता येईल.
7 वर्षांपूर्वी -
मुंबईत पेट्रोलचे दर गगनाला भिडले : ८० रुपयांचा टप्पा पार
मुंबईत पेट्रोल दर चा रेकॉर्ड, भारतातील सर्वात महाग पेट्रोल दर मुंबईत आणि तो ही 80 रुपयांच्या वर.
7 वर्षांपूर्वी