Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
मेहतांना नुसते घरी पाठवू नका तर गुन्हाही दाखल करा : जयंत पाटील
एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एसआरए घोटाळ्याच्या आरोपांवरून पायउतार करण्यात आलेले मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे. मंत्री प्रकाश मेहता गृहनिर्माण खात्याचा गैरफायदा घेत एस.डी. कॉर्पोरेशनसंबंधित एसआरए प्रकल्पात प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून बांधकाम व्यवसायिकाकासाठीच काम केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी नेमण्यात आलेल्या लोकायुक्त अहवालात प्रकाश मेहता यांच्यावर जाणीवपूर्वक केलेल्या त्रुटींवर बोट ठेवण्यात आले होते.
6 वर्षांपूर्वी -
एसआरए घोटाळ्यामुळे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहतांना मंत्रिमंडळातून डच्चू?
अखेर राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काल सकाळी अकरा वाजता पार पडला. यात एकूण तेरा आमदारांना पद आणि गोपनियतेची शपथ देण्यात आली. १३ मंत्र्यांना सामावून घेताना फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळातील आधीच्या एकूण ६ मंत्र्यांना डच्चू दिला आहे. विशेष म्हणजे हे सहाही मंत्री भारतीय जनता पक्षाच्या कोट्यातील आहे. आज भारतीय जनता पक्षाच्या १०, शिवसेनेच्या २ नेत्यांना तर आरपीआय आठवले गटाच्या अविनाश महातेकर यांना मंत्रिपपदाची शपथ देण्यात आली.
6 वर्षांपूर्वी -
गुजराती नेते महाराष्ट्र घोटाळ्याने पोखरत आहेत; SRA व एस.डी.कॉपोरेशन प्रकरण काय आहे?
सध्या राज्यात अनेक घोटाळे बाहेर येत असून, त्यात राज्यातील अमराठी नेते महाराष्ट्र घोटाळ्यांनी पोखरत असल्याचं उघड होत आहे. भाजपच्या या गुजराती नेत्यांचे देशातील मोठ्या बांधकाम व्यावसायिकांशी घनिष्ट संबंध असून, त्यांच्यासाठी कायदे धाब्यावर बसवून बांधकामं केली जात आहेत. त्यामध्ये एस. डी. कॉर्पोरेशन या बांधकाम कंपनीचं नाव सर्वात पुढे आहे. कांदिवली पूर्वेतील ठाकूर व्हिलेज येथे म्हाडाच्या अखत्यारीत येणाऱ्या ५२ एकर जागेवर सुरु असलेला तब्बल १२ हजार कोटींचा प्रकल्प ते ताडदेवमधल्या एम. पी. मिल कम्पाऊंड येथील एसआरए प्रकल्पात, त्याच विकासकासाठी याच गुजराती नेत्यांनी अक्षरशः नियम धाब्यावर बसवून स्वतःच्या तुंबड्या भरल्या आहेत.
6 वर्षांपूर्वी -
प्रकाश मेहता यांची रायगडच्या पालकमंत्री पदावरून उचलबांगडी.
प्रकाश मेहता यांच्या विरोधात पालकमंत्री पदावरून अनेक तक्रारी येत होत्या आणि आज अखेर प्रकाश मेहता यांची रायगडच्या पालकमंत्री पदावरून उचलबांगडी करण्यात आली.
7 वर्षांपूर्वी