Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
नैसर्गिक आपत्तीतही पंतप्रधांना केवळ गुजरातच दिसतोय, ते फक्त गुजरातचे पंतप्रधान आहेत असंच दिसतंय
अरबी समुद्रातून आलेल्या तौक्ते चक्रीवादळाने महाराष्ट्रात हाहाकार माजवला. रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना मोठा तडाखा बसला. मुंबईतून पुढे जात हे तौक्ते वादळ गुजरातला गेले. गुजरातमध्येही या वादळाने कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, आज (१९ मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचा दौरा केला. या दौऱ्यानंतर लगेचच १००० कोटींच्या मदतनिधीची घोषणा केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
आनंदराज आंबेडकरांनंतर अण्णाराव पाटील यांनी देखील वंचित आघाडी सोडली?
आनंदराज यांच्यानंतर लातूरचे अण्णाराव पाटील हेही प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर नसल्याचे समोर आले आहे. अण्णाराव पाटील हे महाराष्ट्र विकास आघाडी पक्षाचे अध्यक्ष आहेत. मात्र लोकसभा- विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी वंचित आघाडीचा प्रवाह बळकट करण्याचा निर्णय घेतला. अण्णाराव पाटील यांनी भटके विमुक्त, ओबीसी समाज प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आणण्यासाठी आपली ताकद वापरली. अण्णाराव यांच्याकडे ‘वंचित’च्या पार्लमेंटरी बोर्डाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली नागपूर ते कोल्हापूर अशी सत्तासंपादन यात्रा काढण्यात आली होती. प्रकाश आंबेडकर हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत ही भुमिका घेवून पाटील राज्यभर फिरले होते. मात्र निवडणूक झाल्यापासून ते आंबेडकरांपासून अंतर ठेवून आहेत.
5 वर्षांपूर्वी -
वंचित बहुजन आघाडीच्या चिन्हासमोरील बटन दाबलं तरी मत भाजपला - प्रकाश आंबेडकरांचा आरोप
सोलापूर: सध्या महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील १० लोकसभा मतदारसंघांसाठी मतदार प्रक्रिया सुरु आहे. याच निवडणूक प्रक्रिये दरम्यान महाराष्ट्रात कित्तेक ठिकाणी ई.व्ही.एम. मध्ये बिघाड झाल्याने सकाळी 9 वाजेपर्यंत केवळ 0.85 टक्केच मतदान नोंदवण्यात आले. दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा मतदार संघांमध्ये सोलापूरचा देखील समावेश आहे.
6 वर्षांपूर्वी