Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Prashant Kishor | प्रशांत किशोर काँग्रेस नैतृत्वाची अट मान्य करणार की 'मै झुकेगा नही साला'? | वाचा सविस्तर
प्रशांत किशोर यांच्या कंपनी IPAC ने तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या पक्षाशी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चेदरम्यान करार केला आहे. पीकेची कंपनी पुढील वर्षी राज्यातील विधानसभा निवडणुकीत केसीआर यांच्यासाठी काम करणार आहे. शनिवारपासून प्रशांत किशोर यांनी हैदराबादमधील केसीआर यांच्या अधिकृत निवासस्थानी तळ ठोकला आहे.
3 वर्षांपूर्वी -
भारताची लढाई 2024 मध्येच लढली जाईल | राज्याच्या निवडणुकांत नाही | प्रशांत किशोर यांचा मोदींना थेट इशारा
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडलेल्या “खोट्या कथन” विरुद्ध विरोधकांना सावध केले आहे. प्रशांत किशोर म्हणाले की “देशात राजकीय लढाई 2024 मध्येच लढली जाईल आणि निर्णय देखील तेव्हाच होईल”, राज्याच्या निवडणुकांमध्ये नाही. त्यामुळे मोदींच्या या प्रचारतंत्रापासून सावध राहा. ते केवळ विरोधकांवर निर्णायक मानसिक परिणाम करण्यासाठी हे तंत्र अवलंबत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
प्रशांत किशोर यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार पद सोडलं | काँग्रेसमध्ये मोठ्या जवाबदारीचे संकेत
प्रशांत किशोर यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर प्रशांत किशोर काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली होती. ही चर्चा खरी ठरणार असल्याची वृत्त आहे. दरम्यान, प्रशांत किशोर यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार पद सोडलं असून या पदाचा अधिकृत राजीनामा दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
लोकसभा २०२४ मध्ये प्रशांत किशोर मोठा राजकीय भूकंप करणार? | मोदींच्या सर्व व्युहरचनांचा त्यांना अनुभव.. आता थेट
आगामी ५ राज्यांतील विधानसभा निवडणुकीसह काँग्रेस २०२४ मधील लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागली असून, पक्षाने आता नवीन व्यूहरचनेकडे लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. यातच आता प्रसिद्ध रणनीतीकार प्रशांत किशोर यांना पक्षात घेण्याबद्दल काँग्रेस सकारात्मक असून, याबद्दलचा निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्रशांत किशोर यांना काँग्रेसच्या राष्ट्रीय निर्णय प्रक्रियेत महत्त्वाचं स्थान हवं आहे. त्यासंदर्भात त्यांनी काही पर्याय काँग्रेसला सूचवले असून, आगामी काळात प्रशांत किशोर सोनिया गांधी यांचे सल्लागारपदीही दिसू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
Pegasus Hacking Report | राहुल गांधी, प्रशांत किशोर आणि दोन केंद्रीय मंत्र्यांवर होता वॉच
पेगासस स्पायवेअरद्वारे फोन टॅपिंग केली जात असल्याच्या मुद्द्यावरून देशभर खळबळ उडाली आहे. त्यातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा फोन टॅप करून त्यांची हेरगिरी केल्याचं वृत्त आल्याने काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची तात्काळ पदावरून हकालपट्टी करा, अशी मागणीच काँग्रेसने केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
प्रशांत किशोर काँग्रेससाठी महत्त्वाची जबाबदारी पार पडू शकतात | हरीश चौधरींचे मोठे विधान
राजकारणातील रणनीतीकार म्हणून ओळख असलेले प्रशांत किशोर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यांनी नुकतेच राहुल गांधी व प्रियंका गांधी यांची भेट घेतली होती. रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी दिल्लीमध्ये राहुल गांधी यांची भेट घेतलेल्या दिवशी राजस्थानचे महसूल मंत्री हरीश चौधरी दिल्लीमध्ये होते. त्यांनीही काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेतली होती. येत्या काळात प्रशांत किशोर महत्त्वाची जबाबदारी पार पडू शकतात, असे संकेत हरीश चौधरी यांनी दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
पवारांना राष्ट्रपती करण्यासाठी प्रशांत किशोर यांची मोर्चेबांधणी? | त्या भेटीनंतर चर्चांना उधाण
निवडणूक सल्लागार प्रशांत किशोर आणि शरद पवार यांनी तीनदा एकमेकांच्या भेटी घेतल्या. यानंतर प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधींची भेट घेतल्यानंतर माध्यमांत चर्चांना ऊत आले आहे. काहींनी तर शरद पवारांना राष्ट्रपती करण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले. पण, शरद पवार यांच्या राष्ट्रपती पदासाठी तयारी असल्याच्या वृत्तावर अधिकृत काहीही समोर आलेले नाही. यामध्ये दोन शक्यतांवर सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
4 वर्षांपूर्वी -
लोकसभा २०२४ | प्रशांत किशोर यांची राहुल गांधी आणि प्रियांका गांधींसोबत महत्वाची बैठक
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दोनदा भेट घेतल्यानंतर प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, केसी वेणुगोपाल आणि पंजाबचे काँग्रेसचे प्रभारी हरीश रावतही उपस्थित होते. त्यामुळे पंजाबच्या निवडणुकीबाबत रणनीती ठरविण्यावर या बैठकीत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.प्रियंका गांधी यांना आज (१३जुलै) ला लखनऊला जायचं होतं. मात्र, प्रशांत किशोर यांच्यासोबत अचानक मिटिंग ठरल्याने लखनऊचा दौरा दोन दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे. पंजाबमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी प्रशांत किशोर यांना आपले प्रधान सल्लागार म्हणून नियुक्त केलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
पूर्णविराम? | तिसरी किंवा चौथी आघाडी भाजपला टक्कर देऊ शकत नाही - प्रशांत किशोर यांचं वक्तव्य
पवारांचे दिल्लीतील ६ जनपथ निवासस्थान हे सध्या राजकीय घडामोडींचे केंद्र बनले आहे. दुपारी ४ वाजता १५ राजकीय पक्षांची बैठक होणार आहे. तृणमूलचे रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी ११ जून रोजी मुंबईत पवारांची भेट घेतली होती. त्याच वेळी भाजपविरोधात विरोधकांची तिसरी आघाडी उभारण्याच्या चर्चेला सुरुवात झाली होती. त्यापाठोपाठ मंगळवारी प्रशांत किशोर यांनी पुन्हा पवारांची भेट घेतली. ही खासगी भेट होती, राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा किशोर यांनी केला.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | रणनितीकार प्रशांत किशोर आणि शरद पवारांची दिल्लीत भेट | राजकीय घडामोडींना वेग
राष्ट्रवादी काँग्रेसचेसर्वेसेवा शरद पवार अखेर मोठ्या ब्रेकनंतर राजधानी दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे शस्त्रक्रियेनंतर गेल्या काही दिवसांपासून आपल्या मुंबईतील निवासस्थानी विश्रांती घेणारे शरद पवार रविवारी दिल्लीसाठी रवाना झाले असून २३ जूनपर्यंत राजधानीमध्येच असणार असं वृत्त आहे. त्यामुळे दिल्लीत भारतीय जनता पक्षविरोधी रणनीतीला जोर येणार असल्याचं म्हटलं जातंय.
4 वर्षांपूर्वी -
प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी | 2024 मध्ये प्रधानमंत्री बनणार आहेत नरेंद्र मोदी - रामदास आठवले
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी आपल्या खास आठवले शैलीत विरोधकांना निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नादी न लागण्याचा सल्ला दिलाय. ते इथंच थांबले नाही तर 2024 मध्येही नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील हे सांगताना मोदी आंबेडकरवादी असल्याही दावा केला. ते प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील संविधान निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते .
4 वर्षांपूर्वी -
भाजपविरोधी आघाडी निर्माण करणार | पण प्रशांत किशोर यांच्याकडे राष्ट्रवादीच्या कॅम्पेनची जबाबदारी नाही - राष्ट्रवादी
राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही जबाबदारी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नाही अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या शुक्रवारी झालेल्या भेटीबाबत दिली आहे. प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. त्यांचा वेगळा अनुभव आहे. तो अनुभव आणि देशात राजकीय परिस्थिती काय आहे याची माहिती प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांना दिली.
4 वर्षांपूर्वी -
प्रशांत किशोर आणि पवारांच्या भेटीत जयंत पाटलांची सुद्धा उपस्थिती | लोकसभेत महाविकास आघाडी फॉर्म्युला?
पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर आणि उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्ष आणि मोदी विरोधी वातावरण झाल्याचे संकेत मिळताच मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रशांत किशोर यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर आज शरद पवारांच्या भेटीसाठी मुंबईत आले आहेत. त्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
लोकसभा निवडणूक २०२४ | मोठी रणनीती आखली जातेय | आज प्रशांत किशोर पवारांची भेट घेणार
प्रत्यक्ष मोदींना सत्तेत आणण्यासाठी महत्वाची रणनीती आखणारे प्रशांत किशोर सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले आहेत. आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल ते दिल्लीमध्ये भाजपच्या रणनीतीला धोबीपछाड देणारे प्रशांत किशोर सध्या २०२४ मधील लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागल्याचे वृत्त आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांच्यासोबत दीर्घकाळ चर्चा केली होती. त्यानंतर आता दुसरं आणि अत्यंत महत्वाचं वृत्त आहे.
4 वर्षांपूर्वी -
१८ ते ४४ वयोगटाचं लसीकरण | प्रशांत किशोर यांचं भाकीत खरं ठरलं | केंद्राच्या भोंगळ कारभाराची किंमत देशातील राज्यं भोगणार
देशात सध्या ४५ वर्षांवरील नागरिकांचे राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत लसीकरण केले जात असून एकट्या महाराष्ट्रात सुमारे ५ लाख नागरिक लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. केंद्र शासनाकडून त्यासाठी पुरवण्यात आलेले डोस पुरेसे नसल्याने १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी राज्य शासनाने खरेदी केलेल्या डोसेसमधून दुसरा डोस देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी दिली.
4 वर्षांपूर्वी -
अमित शहा ओव्हर रेटेड राजकीय निवडणूक मॅनेजर वाटतात | ते मग्रुरी आणि पोकळ बाता मारणारे नेते - प्रशांत किशोर
रविवारी ५ राज्यांचे निकाल जाहीर झाले, परंतु संपूर्ण देशाचे लक्ष फक्त पश्चिम बंगालमधील चुरशीच्या लढाईवर होते. अपेक्षेप्रमाणे बंगालमध्ये निकालामध्येही ‘खेला’ झाला. राज्याच्या एकूण २९२ जागांपैकी तृणमूल काँग्रेसने प्रचंड बहुमत मिळवून २१४ जागा जिंकल्या, तर राज्यात पहिले भगवे सरकार स्थापन करण्याचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला ७६ जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे भाजप दोनशेहून अधिक जागा जिंकेल या अमित शहांच्या स्वप्न दाखवणाऱ्या कथा देखील खोट्या ठरल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
प. बंगाल | भाजपा २ अंकी आकडा पार करण्यासाठी देखील धडपडले, प्रशांत किशोर यांचं भाकीत खरं ठरलं?
पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलणार की पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेस सत्तेत येणार? आज हे चित्र स्पष्ट होईल. पश्चिम बंगालमधील २९४ पैकी २९२ विधानसभा जागांचे निकाल आज हाती येणार आहेत. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून करोनाच्या संकटातही पार पडलेल्या या निवडणुकीचा निकाल काय असेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे. एकीकडे करोनाने कहर केलेला असतानाही मतदानावर याचा फारसा परिणाम झालेला पहायला मिळाला नाही. राज्यात ८४ लाख ७७ हजार मतदार असून ८० टक्के मतदान झालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | ३ मार्च २०२१'ची निवडणूक मुलाखत | प्रशांत किशोर यांचं जवानांवरील हल्ल्याबाबत भाकीत आणि काल..
संरक्षण दलांची पथके आणि नक्षलवाद्यांमध्ये छत्तीसगडच्या जंगलात झालेल्या चकमकीत आतापर्यंत २२ जवान शहीद झाले आहेत. नक्षलवाद्यांनी घडवलेले हे अलीकडच्या काळातील मोठे हत्याकांड ठरलं आहे. याच हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय गृहमंत्री अमीत शाह हे घटनास्थळाला भेट देणार आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. सुकमा आणि बीजापूर जिल्ह्यांच्या सीमाभागात ज्या ठिकाणी जवानांवर हा हल्ला झाला त्या ठिकाणीची पहाणी शाह करणार आहेत. आज दुपारी शाह या ठिकाणाला भेट देणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
हा समर्थक माध्यमांचा प्रचार | पण भाजप दोन अंकी आकड्यासाठी धडपडेल | लिहून ठेवा
पश्चिम बंगालच्या नागरिकांना परिवर्तनाची आस आहे. राजकीय हिंसाचार, खंडणी, भ्रष्टाचार, बांगलादेशी घुसखोरांपासून त्यांना मुक्तता हवी आहे, असे प्रतिपादन गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी केले. भारतीय जनता पक्षाचे २०० पेक्षा अधिक उमेदवार निवडून येतील असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
'बात बिहार की'..निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर कल्पना चोरतात?
प्रसिद्ध निवडणूक प्रचार रणनितीकार प्रशांत किशोर यांच्याविरोधात बिहारमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिहारमधील मोतीहारी येथील रहिवासी शाश्वत गौतम यांची कल्पना चोरल्याचा आरोप प्रशांत किशोर यांच्यावर ठेवण्यात आला आहे. लाईव्ह हिंदुस्तानने या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.
5 वर्षांपूर्वी