Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Monster Employment Index | रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यात पुण्याचा देशात दुसरा क्रमांक
रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत, पुणे बंगलोरनंतर देशात दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. 2020 च्या ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत या वेळी रोजगार निर्देशांक 40 टक्क्यांनी वाढला आहे. मॉन्स्टर एम्प्लॉयमेंट इंडेक्सने (Monster Employment Index) प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या काळात, लॉकडाऊनमुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या, तर मोठ्या संख्येने लोक त्यांच्या गावी परतले.
4 वर्षांपूर्वी -
पुण्यात उद्यापासून संचारबंदी लागू | 19 सप्टेंबर 2021 पर्यंत कलम 144 लागू असेल
गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊन कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी पुण्यात जमावबंदी लागू करण्यात येणार आहे. पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या काळात 10 सप्टेंबर 2021 ते 19 सप्टेंबर 2021 पर्यंत कलम 144 लागू असेल. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात अनुचित प्रकार टाळण्यासाठी 7 हजार पोलीस तैनात केले जाणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
पुण्यातील व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा | कोरोना निर्बंधात मोठे बदल
पुण्यातील व्यापारी, हॉटेल व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कोरोना आढावा बैठकीत निर्बंधांमध्ये मोठी शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
तिसऱ्या लाटेचं सावट असताना पुणेकरांकडून कोरोना नियम धाब्यावर | लहान मुलांसहित भुशी डॅमवर गर्दी
कोरोनाची दुसरी लाट ही ओसरत असली तरही रुग्ण संख्या पूर्णपणे कमी झालेली नाही. डेल्टा प्लस या व्हेरिएंटचा धोका अद्यापही कायम आहे. यासाठी राज्य सरकारने निर्बंधांमध्ये पूर्णपणे सूट दिलेली नाही. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुण्यामध्ये पर्यटनस्थळावर कडक अंमलबजावणीचे आदेश पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवा यांनी दिले आहेत. तरीही सुद्धा पर्यटन स्थळावर मोठ्याप्रमाणात गर्दी होतानाच पाहायला मिळत आहे. आज भुशी डॅम येथे पोलिसांनी कारवाई केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठी कलादिग्दर्शक राजेश साप्ते आत्महत्या प्रकरण | एकाला अटक, ५ जणांवर गुन्हा दाखल
कलादिग्दर्शक राजेश साप्ते यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी ५ जणांवर गुन्हा दाखल केला असून, एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. शनिवारी राजेश साप्ते यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर, कलाविश्वासात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी सोनाली राजेश साप्ते यांनी वाकड पोलिसात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत ही कारवाई केली.
4 वर्षांपूर्वी -
पुणे | कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी, महापौरांची माहिती
राज्यात कोरोनाचा कहर वाढत होताच. पुण्यातही कोरोनाची स्थिती चिंताजनक होती. मात्र, आता हळूहळू कोरोना रुग्ण संख्या पुण्यातील कमी होत चालली आहे. पुण्यात पॉझिटीव्हीटी रेट वाढत आहे. यामुळे सोमवारपासून पुण्यात नवीन नियम लागू करण्यात आले होते. नवीन नियमावली नुसार अत्यावश्यक सेवा वगळता इतर सगळं बंद राहील. पुण्याचा दर मागच्या तुलनेत वाढत असल्याचं म्हणत 4.6 पॉझिटिव्हिटी रेट होता आता 5.3 झाला आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील नियमावली सुरू ठेवायचा निर्णय घेण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
वाद पेटला | पुण्याच्या आंबिल ओढ्यात राडा, घरं पाडण्यास स्थानिकांचा विरोध
बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट घातल्याचा आरोप करत पुण्यात स्थानिक नागरिकांनी मोठा विरोध केला. घरे पाडण्याच्या कारवाईला सुरुवात झाल्यानंतर आंबिल ओढ्यातील नागरिकांनी विरोध केल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. काही जणांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. आंबिल ओढ्यात 700 ते 800 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी | भाडेकरू होणार घरमालक
महानगरपालिकेची मालकी असलेल्या इमारतीत भाडेतत्वावर काही सदनिका देण्यात आल्या आहेत. या सदनिका संबंधित भाडेकरू नागरिकांच्या नावावर करण्यात येणार आहेत. शहर सुधारणा समितीच्या बैठकीत सोमवारी हा निर्णय घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात 1 हजार 512 सदनिकांची विक्री करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी प्रत्येकी 12 ते 15 लाख रुपयांदरम्यान ही सदनिका उपलब्ध होणार आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष आनंद रिठे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
4 वर्षांपूर्वी -
Pune Fire | पुण्यातील पिरंगुटमधील कंपनीस भीषण आग, 15 महिलांसह 17 जणांचा मृत्यू
पुण्याच्या मुळशी येथील उरवडे येथील औद्योगिक वसाहतीत आगीची मोठी दुर्घटना घडली आहे. उरवडे येथील क्लोरिफाईड कंपनीत ही घटना घडली. या दुर्घटनेत 15 महिला कर्मचारी आणि 2 पुरुष कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. संबंधित कंपनीचं नाव एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस असं आहे. आग कशामुळं लागली हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही.
4 वर्षांपूर्वी -
पुणे | लॉकडाऊनचा निर्णय लवकर जाहीर करा | संपूर्ण लॉकडाऊन झाला तरच पाठिंबा - व्यापारी
राज्यात सोमवारी एकूण ५१,७५१ नवे रुग्ण, तर २५८ रुग्णांचा मृत्यू झाला. यातील १३३ रुग्ण एकट्या विदर्भातील आहेत. मराठवाड्यात ८७ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ३४ लाख ५८,९९६ रुग्णांची नोंद झाली असून २८,३४,४७३ रुग्ण बरे झाले.
4 वर्षांपूर्वी -
पुणे | भाजपची सत्ता असल्याने महापौरांनी लस बाबत मोठी घोषणा केली, पण केंद्राने दिल्या एवढ्याच..
कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी लस मिळवण्याच्या धडपडीत लसीचा तुटवडा जाणवत आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि ओडीशानंतर आता बिहार, उत्तर प्रदेशातही लसीचा तुटवडा हाेऊ लागला आहे. या राज्यांत अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद करावी लागली. अनेक राज्यांत एक ते दाेन दिवसांचाच साठा शिल्लक आहे.
4 वर्षांपूर्वी -
पुणे | दिवसभर जमावबंदी तसेच संध्याकाळी ६ ते सकाळी ६ संचारबंदी
राज्यातील कोरोनास्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. राज्यातील मुख्य शहर आणि जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा धोका वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर, मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांची चिंताही वाढली आहे. पुण्यातील स्थितीच्या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज (२ एप्रिल) पुणे जिल्ह्याची कोरोना आढावा बैठक झाली.
4 वर्षांपूर्वी -
पुणे महापालिका | कोरोनाने घरी मृत्यू झाल्यास नातेवाईकच अंत्यसंस्कार करतील
कोरोना रुग्णांच्या संदर्भात पुणे महानगरपालिकेनं एक नवा नियम आणला आहे. त्यानुसार घरात उपचार घेताना एखाद्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला, तर कुटुंबीयांनाच सर्व नियम पाळून त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागणार आहेत. त्यासाठीची सर्व प्रक्रिया नातेवाईकच पूर्ण करतील. फक्त गाडीची सुविधा पुरवली जाईल. महापालिकेच्या या नव्या नियमाची माहिती एका वृत्तामुळे समोर आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा तरुणांसाठी ‘सारथी’अंतर्गत मोफत कोर्सेस | अधिक माहितीसाठी वाचा
मराठा समाजातील युवक ‘जॉब स्किल रेडी’ व्हावेत या उद्देशाने ‘सारथी’मार्फत (छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे) विशेष कौशल्य विकास कार्यक्रम राबवण्यात येत आहे. मराठा, कुणबी समाजाच्या तरुणांना याअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या विविध कोर्सेसचा लाभ घेता येणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
पुण्यात रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंतची संचारबंदी | मोठ्या कार्यक्रमांवर निर्बंध
राज्यात कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे.या पार्श्वभूमिवर सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या पातळीवर निर्बंध लादण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.पुण्यामध्ये आज कोरोनाबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे.पुण्यात रात्रीची संचारबंदी अर्थात नाईट कर्फ्यु लावण्यात आलेला आहे.
4 वर्षांपूर्वी -
ईडीची मोठी कारवाई | अविनाश भोसलेंचे चिरंजीव अमित भोसलेंना ताब्यात घेतलं
रिअल इस्टेट किंग अविनाश भोसले यांच्यावर अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने (ED) धाड टाकून चौकशी सुरु केली आहे. काल दिवसभराच्या चौकशीनंतर ईडीने अविनाश भोसले यांचा मुलगा अमित याला ताब्यात घेतलं आहे. इतकंच नाही तर अमित भोसले यांना अधिक चौकशीसाठी पुण्यावरुन मुंबईला आणल्याचंही सांगण्यात येत आहे.
4 वर्षांपूर्वी -
विदेशी चलन प्रकरण | बिल्डर अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर ED ची धाड
बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर अंमलबजावणी संचलनालय अर्थात ED ने छापेमारी केली आहे. ED चे अधिकारी सकाळी 8:30 पासून ABIL हाऊसमध्ये झाडाझडती करत आहेत. अविनाश भोसले हे मोठे बांधकाम आणि हॉटेल व्यावसायिक आहेत. फेमासंबंधीच्या प्रकरणात त्यांची ईडीकडून चौकशी होत आहे. हे 6 वर्षांपूर्वीचे विदेशी चलन प्रकरण आहे.
4 वर्षांपूर्वी -
Mhada Lottery | पुणे विभागातील म्हाडाच्या घरांचा ऑनलाईन निकाल पाहा Live
म्हाडाच्या पुणे विभागाच्या 5647 घरांसाठी आज सोडत जाहीर केली जाणार आहे. यामध्ये अनेकांची पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमधील घरांचा समावेश आहे. दरम्यान यंदा देखील ही लॉटरी सोडत अर्जदारांना ऑनलाईन पाहता येणार आहे. नेहरू मेमोरियल हॉलमध्ये या म्हाडा घरांच्या लॉटरीचा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाईल. या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी अधिकाधिक अर्जदारांनी त्याच वेबकास्टिंग पहावं असं आवाहन करण्यात आले आहे. भाग्यवान विजेत्यांना घरबसल्या निकाल पाहण्याची सोय यंदा देखील उपलब्ध असेल. सोबतच ज्यांना या सोडतीमध्ये घर लागणार आहे त्यांना ई मेल, एसएमएस या द्वारा माहिती मिळणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
सीरमच्या इमारतीला भीषण आग | ५ जणांचा होरपळून मृत्यू | आरोग्यमंत्र्यांची माहिती
सीरमच्या इमारतीला भीषण आग लागलेली असून, इमारतीत पाच जणांचा मृतदेह सापडल्यानं एकच खळबळ उडालीय. आग लागलेल्या इमारतीमध्ये पाच मृतदेह सापडलेत, अशी माहिती जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय. तसेच तीच माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी देखील दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पुणे | सिरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला आग | परिसरात धुराचे लोट
सिरम इन्स्टिट्यूटच्या नवीन बिल्डिंगला आग लागल्याची अग्निशमन दलाची माहिती, अग्निशमन दलाच्या चार गाड्या रवाना, दुपारी दोन वाजताची घटना, परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. सिरम इन्स्टिट्यूटमधील एका इमारतीच्या तिसर्या मजल्यावर ही आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
4 वर्षांपूर्वी