Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
PHOTO: मोदींना अक्कल दाढ आली नव्हती तेव्हा पंडित नेहरुंनी इस्त्रोची स्थापना केली
काँग्रेसने थेट विकासाचं प्रदर्शन भरवत मोदींना चांगलीच चपराक दिली आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या जन्म दिवसाच्या निमित्ताने काँग्रेस पक्षाचे नेते मोहन जोशी यांनी ‘सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताह’ आयोजित केला असून त्यासाठी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरातील कलादालनात हे छायाचित्रांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
6 वर्षांपूर्वी -
माझं गोत्र 'कौल दत्तात्रय ब्राह्मण' सांगत राहुल गांधींचे भाजपला प्रतिउत्तर
सध्या ५ राज्यांमध्ये विधानसभेची धामधूम सुरु असून त्यानिमित्त एकमेकांवर चिखलफ़ेक सुरु असताना भाजपने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना डिवचण्यासाठी तुमचे गोत्र कोणते असा प्रश्न उपस्थित केला होता. सध्या कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राजस्थान दौऱ्यावर आले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
मोदीजी ‘माझ्याशी केवळ १५ मिनिटे ‘राफेल’वर खुली चर्चा करा’ : राहुल गांधी
छत्तीसगडच्या दौऱ्यावर असलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप तसेच मोदींवर तुफान टीकास्त्र सोडले आहे. दरम्यान, शनिवारी सरगुजा येथे आयोजित एका रॅलीमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी थेट मोदींनी राफेल करारावर केवळ १५ मिनिटे माझ्याशी खुली चर्चा करावी असं खुलं आव्हान दिलं. त्यांनी केवळ १५ मिनिटं माझ्याबरोबर राफेलच्या विषयावर बोलू द्यावं आणि त्यानंतर तेवढ्याच वेळ स्वतः सुद्धा त्याविषयी बोलावं असं राहुल गांधी म्हणाले. राफेल लढाऊ विमानांच्या कराराद्वारे मोदींनी अनिल अंबानी यांच्या कंपनीला तब्बल ३०,००० कोटी रुपये दिल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
7 वर्षांपूर्वी -
नोटाबंदी हा आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा : राहुल गांधी
सध्या छत्तीसगड तसेच मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. आजच्या प्रचारादरम्यान एकाबाजूला छत्तीसगडमधील अंबिकापूर येथे पंतप्रधानांनी प्रचारसभेत काँग्रेस पेशावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मध्य प्रदेशातील देवरी सागर येथील प्रचारसभेत मोदींवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, सभेदरम्यान बोलताना राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींनी २ कोटी लोकांना रोजगार देण्याचं आश्वासन दिल्याची आठवण करुन दिली. पण, चीन सरकार केवळ २४ तासात तब्बल ५० हजार तरुणांना रोजगार देत आहे. तसेच मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडियासारख्या मोहिमेतून मोदी सरकार २४ तासात लेव्हल ४५० युवकांना रोजगार देत आहे असा आरोप केला.
7 वर्षांपूर्वी -
राजस्थान: भाजपला धक्का, खासदार हरीशचंद्र मीणा आणि आमदार हबीबुर रहमान काँग्रेसमध्ये
राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नरेंद्र मोदी सरकारला जोरदार राजकीय झटका देत भारतीय जनता पक्षाचे खासदार हरीशचंद्र मीणा आणि आमदार हबीबुर रहमान यांनी बुधवारी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यादी महाराष्ट्रातून भाजप सोडून काँग्रेसमध्ये विदर्भातील खासदार नाना पटोले यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर हरीशचंद्र मीणा हे काँग्रेस प्रवेश करणारे दुसरे खासदार ठरले आहेत. त्यामुळे सध्या लोकसभेत भाजपचे संख्याबळ अधिकृतपणे २७२च्या जादुई आकड्यावरून खाली घसरले आहे.
7 वर्षांपूर्वी -
राफेल विमान करारप्रकरणी केंद्र सरकारकडून सुप्रीम कोर्टात शपथपत्र सादर
अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राफेल लढाऊ विमान करारप्रकरणी मोदी सरकारने सुप्रीम कोर्टात शपथपत्र सादर केले आहे. तसेच या शपथपत्रामार्फत केंद्राने राफेल लढाऊ विमान खरेदी करारासाठी अमलात आणण्यात आलेल्या खरेदी प्रक्रियेची माहिती सुद्धा बंद लिफाफ्यात न्यायालयात सादर केली आहे. तसेच राफेल लढाऊ विमान खरेदी कराराच्या निर्णयासंबंधीच्या प्रक्रियेबाबतचा तपशील केंद्राने याचिकाकर्त्यांना सोपवली आहे.
7 वर्षांपूर्वी -
दसॉल्ट एव्हिएशनच्या पैशातून अनिल अंबानींनी जमीन खरेदी केली: राहुल गांधी
जर पंतप्रधान नरेंद्र मोदी राफेल डील प्रकरणात निर्दोष असते तर ते याप्रकरणी आरोप होत असताना ते प्रत्येक गोष्टीच्या चौकशीला तयार झाले असते असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. दरम्यान, राफेल डील प्रकरणात अनिल अंबनी यांच्याकडे जमीन उपलब्ध होती म्हणून रिलायन्स सोबत हा करार करण्यात आला हे धादांत खोटं आहे. कारण दसॉल्ट एव्हिएशनच्या पैशातूनच अनिल अंबानींनी ती जमीन खरेदी केली होती आणि त्यासाठीच दसॉल्ट एव्हिएशनने काही लाख किंमतीच्या रिलायन्समध्ये तब्बल २८४ कोटी रुपयांचे समभाग विकत घेऊन भलीमोठी गुंतवणूक केली होती, असा घणाघाती आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
चंद्राबाबू नायडूंच्या टीडीपी'ची काँग्रेससोबत युती, भाजपची आंध्र-तेलंगणा वाट बिकट
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि टीडीपी’ने युती करण्याचा निर्णय घेतला आहे. आज आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना भेटण्यासाठी दिल्लीला आले असता दोन्ही नेत्यांनी चर्चेअंती हा निर्णय प्रसार माध्यमांसमोर घोषित केला. त्यामुळे आता आंध्र प्रदेश आणि तेलंगणाची लढाई भाजपासाठी अधिकच कठीण होण्याची शक्यता आहे.
7 वर्षांपूर्वी -
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधींची आज ३४ वी पुण्यतिथी
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि आयर्न लेडी इंदिरा गांधी यांची आज ३४ वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींसह देशातील अनेक मान्यवरांनी इंदिराजींना श्रद्धांजली वाहिली आहे. याच दिवशी म्हणजे ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधींची निर्घृण हत्या करण्यात आली होती.
7 वर्षांपूर्वी -
एनसीपीचा राजीनामा देऊन तारिक अन्वर पुन्हा काँग्रेसवासी
शरद पवारांचे जुने विश्वासू आणि राष्ट्रवादीच्या स्थापनेमध्ये महत्वाची भूमिका बजावणारे तारिक अन्वर अखेर यांनी आज राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पुन्हा काँग्रेसवापसी केली आहे. त्यामुळे बिहारमधील राष्ट्रवादीची ताकद संपुष्टात आली आहे. तारिक अन्वर हे दिल्लीतील राजकारणातले मोठे नेते आणि शरद पवारांचे विश्वासू म्हणून सर्वश्रुत होते. त्यामुळे काँग्रीसला बिहारच्या राजकारणात बळ मिळणार आहे.
7 वर्षांपूर्वी -
सीबीआय प्रकरण; राहुल गांधी सुद्धा आंदोलनात सामील
सध्या देशभर सीबीआय विरुद्ध सीबीआय वाद रंगला सटाणा काँग्रेसने देशभर सीबीआयच्या कार्यालयांवर मोर्चे काढले आहेत. सीबीआय अधिकाऱ्यांमधील वाद आणि लाचखोर अधिकाऱ्यावरील कारवाईमुळे देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान, मोदींनी राफेल घोटाळ्याची चौकशी थांबविण्यासाठी CBI संचालक आलोक वर्मा यांची पदावरून तडकाफडकी हकालपट्टी केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
संरक्षण मंत्र्यांचा तडकाफडकी फ्रान्स दौरा, राहुल गांधींचं प्रश्नचिन्ह?
राफेल लढाऊ विमान करारासाठी फ्रान्समधील दसॉल्ट एव्हिएशन या फ्रेंच कंपनीसमोर अनिल अंबानींच्या रिलायन्ससोबत व्यवहार करण्याची अट घालण्यात आली होती, असा धक्कादायक गौप्यस्फोट फ्रान्समधील मीडियापार्ट या न्यूज पोर्टलने केला होता आणि त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पुन्हा आक्रमक झाले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
राहुल गांधींनी ते उदाहरण दिलं होत 'त्यांच्या' बटाट्यांच्या स्वप्नांवर, भाजपने केली होती मोड-तोड
राहुल गांधींनी ते उदाहरण दिलं होत ‘त्यांच्या’ बटाट्यांच्या स्वप्नांवर, भाजपने केली होती मोड-तोड
7 वर्षांपूर्वी -
लोकसभा निवडणुकीआधी ३ राज्यांमध्ये राहुल गांधी मोदींना जोरदार धक्का देणार, सर्वे रिपोर्ट
कालच मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, मिझोराम आणि तेलंगण या ५ राज्यांमध्ये १२ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत मतदान तर, ११ डिसेंबरला मतमोजणी करण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्याधर्तीवर प्रसारित करण्यात आलेल्या निवडणूक पूर्व सर्व्हेमध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि राजस्थान या ३ तीन राज्यांमध्ये मोदींनी सभा घेताल्यातरी सत्तापरिवर्तन अटळ आहे असं म्हटलं आहे. या तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेसला बहुमत मिळेल आणि त्यात राजस्थानमध्ये भाजपचा धुव्वा उडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
राफेल डील व अनिल अंबानींशी संबंधित प्रश्नाला मोदी टाळतात - नवी दिल्ली
राफेल डील व अनिल अंबानींशी संबंधित प्रश्नाला मोदी टाळतात – नवी दिल्ली
7 वर्षांपूर्वी -
राफेल डील: सोशल मीडियावर #MeraPMChorHai वरून काँग्रेस-भाजपमध्ये तुंबळ युद्ध, ट्विटर ट्रेंडमध्ये
फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींकडून राफेल डीलवरून आलेल्या वक्तव्यानंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये समाज माध्यमांवर तुंबळ युद्ध सुरु झालं आहे. फ्रान्समधून आलेल्या प्रतिक्रियेवरून काँग्रेसमध्ये जोश निर्माण झाला असून, भाजप तोंडघशी पडल्याचे निदर्शनास येत आहे. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधानांना थेट लक्ष करत, फ्रान्सचे राष्ट्रपती पंतप्रधानांना चोर बोलत आहेत, असा टोला लगावला होता.
7 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारने राफेल खरेदीच्या माध्यमातून भारतीय सैन्यावरच सर्जिकल स्ट्राइक केला: राहुल गांधी
लवकरच भारतात सर्जिकल स्ट्राइक दिन साजरा करण्याच्या तयारीत असलेल्या मोदी सरकारच्या अडचणी खुद्द फ्रान्समधून आलेल्या प्रतिक्रियेतून वाढल्याचे चित्र आहे. या खरेदी व्यवहारातील करारावर काँग्रेसने आधीच अनिल अंबानींच्या सहभागावर संशय व्यक्त केला होता. त्यावर मोदी सरकारने हात झटकले होते. परंतु भाजपने दिलेल्या प्रतिक्रियेच्या बरोबर विरुद्ध प्रतिक्रिया फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी दिली आहे.
7 वर्षांपूर्वी -
प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वड्रा यांच्याविरोधात एफआयआर दाखल
हरयाणातील गुरुग्राम येथे गृहसंकूल व व्यापारी संकुले उभारण्यासाठी केलेल्या जमीन खरेदी प्रकरणात प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वड्रा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात ४२० हे कलम एफआयआर’मध्ये लावण्यात आलं आहे. त्याबरोबरच हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंह हुडा यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
7 वर्षांपूर्वी -
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला राहुल जाणार नाहीत: काँग्रेस
आरएसएस’कडून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना कोणत्याही कार्यक्रमाचे निमंत्रण मिळालेले नाही आणि मिळाले असते तरी ते गेले नसते असं प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जून खरगे यांनी बुधवारी प्रसार माध्यमांपुढे स्पष्ट केले. त्यामुळे काँग्रेसने या विषयावर आता पडदा टाकला आहे.
7 वर्षांपूर्वी -
अनिल अंबानींना कर्जाच्या सापळय़ातून वाचवण्यासाठी राफेलचे कंत्राट: राहुल गांधी
जगातील सर्वात मोठ्या संरक्षण खरेदीच्या करारात म्हणजे राफेल लढाऊ जेट विमान खरेदी प्रकरणात भारतीय जनता पक्षाच्या सरकारने कर्जाच्या सापळय़ात अडकलेल्या एका भारतीय उद्योगपतीच्या भल्यासाठी राफेल करारात वाट्टेल ते फेरबदल केले, असा सनसनाटी आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे केला.
7 वर्षांपूर्वी