Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
राहुल गांधींच्या नैत्रुत्वात विरोधकांची बैठक | 100 खासदार एकवटले | संसदेवर सायकल मार्च
पेगास हेरगिरी प्रकरणावरून विरोधी पक्षांनी संसदेमध्ये सरकारला घेरण्याची तयारी चालविली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना नाष्ट्यासाठी कॉन्स्टिट्यूशनल क्लबमध्ये आमंत्रित केले होते. सर्व शक्तींची एकजूट करणे, ही माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची बाब असल्याचे राहुल गांधींनी बैठकीत सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
इस्रायलसाठी पेगासस दहशतवाद्यांविरूद्धचं शस्त्र | मोदी-शहांनी ते देशातील राज्य व संस्थांविरोधात वापरले - राहुल गांधी
भारतात पाळत ठेवण्यासाठी निवडण्यात आलेले फोन नंबर फक्त पत्रकार, नेते व सामाजिक कार्यकर्त्यांपुरते मर्यादित नव्हते. केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि उद्योजकही टार्गेटवर होते. इस्रायली कंपनी एनएसओचे हेरगिरी साॅफ्टवेअर पेगाससबाबत नवे गौप्यस्फोट करणाऱ्या १० देशांच्या १७ माध्यम संस्थांनी ‘फॉरबिडन स्टोरीज’च्या हवाल्याने गुरुवारी खुलासा करत सांगितले की, भारताचे माजी सीबीआय प्रमुख आलोक वर्माही हेरगिरीचे टार्गेट होते. २०१८ मध्ये त्यांना पदावरून हटवल्याच्या काही तासांतच त्यांचा फोन नंबर पेगाससच्या यादीत टाकण्यात आला. इतकेच नव्हे तर राफेल कराराशी संबंधित उद्योगपती अनिल अंबानी व त्यांच्या कंपनीशी संबंधित लाेकांचे नंबरही पेगाससच्या यादीत टाकले होते.
4 वर्षांपूर्वी -
Pegasus Hacking Report | राहुल गांधी, प्रशांत किशोर आणि दोन केंद्रीय मंत्र्यांवर होता वॉच
पेगासस स्पायवेअरद्वारे फोन टॅपिंग केली जात असल्याच्या मुद्द्यावरून देशभर खळबळ उडाली आहे. त्यातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा फोन टॅप करून त्यांची हेरगिरी केल्याचं वृत्त आल्याने काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची तात्काळ पदावरून हकालपट्टी करा, अशी मागणीच काँग्रेसने केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Pegasus हॅकिंग प्रकरण | तुमच्या फोनमध्ये ते काय वाचतात हे आम्हाला माहीत आहे - राहुल गांधी
संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर होत असलेल्या या अधिवेशनात २० बैठका होतील. अधिवेशन १३ ऑगस्टपर्यंत चालण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात सरकार १७ नवीन विधेयके आणणार असून ती मंजूर करून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. दुसरीकडे, विरोधकही कोरोना, शेतकरी आणि संरक्षण सेवांमध्ये संपाला गुन्हा जाहीर करण्यासंबंधी अध्यादेशावर सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपचं फेक न्यूज तंत्र आता लोकांनी ओळखलंय | काँग्रेस सोडून गेलेले लोकं RSS संबंधित होते - राहुल गांधी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज काँग्रेसच्या समाज माध्यमांवर सेलमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या स्वयंसेवकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेस सोडून गेलेल्यांवर टीका केली. ज्यांना भीती वाटते त्यांनी काँग्रेसमधून खुशाल जावं. ज्यांना कशाचीच भीती वाटत नाही असे लोक काँग्रेसमध्ये आहेत, त्यांचं स्वागत आहे. काँग्रेस सोडून गेलेले सर्व लोक संघाशी संबंधित होते, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
दुसऱ्यांचं ऐकल्याशिवाय काहीही टिकू शकत नाही | राजकीय पक्षांचं देखील तसंच आहे - सिब्बल यांचा सूचक इशारा
बुधवारी सकाळी काँग्रेसचे उत्तर प्रदेशमधील महत्त्वाचे नेते जितिन प्रसाद यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यावरून राजकीय तर्क-वितर्क सुरू झाले असून ज्योतिरादित्य सिंदिया, जितिन प्रसाद यांच्यानंतर आता सचिन पायलट यांचा नंबर लागणार का? अशी देखील विचारणा होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी आपल्याच पक्षाला सूचक इशारा दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
देशात कोरोना लसींचा तुटवडा आणि केंद्र सरकार ट्विटरवरील ‘ब्लू टिक’साठी भांडतंय - राहुल गांधी
नवे आयटी नियम लागू न केल्याने शनिवारी सरकारने ट्विटरला अंतिम नोटीस पाठवली. यात म्हटले आहे की, २६ मेपासून लागू सोशल मीडियासाठीच्या नव्या नियमांचे ट्विटरने त्वरित पालन करावे, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल. विशेष म्हणजे ट्विटरने शनिवारी अचानक टाकलेल्या पावलांनंतर केंद्राने ही नोटीस बजावली.
4 वर्षांपूर्वी -
राहुल गांधींना ‘पंतप्रधानपदी’ पाहणं म्हणजे मोदींना ‘पंतप्रधान’ म्हणून कायम करणं - जावेद अख्तर
देशात सध्या कोरोना आपत्तीमुळे पंतप्रधान मोदी आणि भाजपाची प्रतिमा मलिन झाली आहे. तसेच नुकत्याच पार पडलेल्या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाची ३ प्रमुख राज्यांत बिकट अवस्था झाली आहे. त्यात देशातील संपूर्ण भाजपाला एकट्या ममता बॅनर्जींनी दिलेली मात ही विरोधकांचा आत्मविश्वास वाढविण्यात कारणीभूत ठरली आहे. तसेच उत्तर प्रदेशात देखील पंचायत निवणुकीत भाजपाची चिंता वाढली आहे. मात्र यामध्ये काँग्रेसने कोणतीही विशेष कामगिरी केलेली नाही.
4 वर्षांपूर्वी -
एक तर महामारी, त्यात पंतप्रधान अहंकारी | राहुल गांधींचं मोदींवर टीकास्त्र
काँग्रेस नेते राहुल गांधी कोरोनाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. रोज काही ना काही ट्विट करून त्यांनी मोदी सरकार विरोधात एक प्रकारचे ट्विटर वॉरच सुरू केलं आहे. आजही त्यांनी नवं ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. राहुल गांधी पंतप्रधान मोदींवर टीकेचे बाण सोडत असल्याने सत्ताधारी भाजपाही त्याला प्रत्युत्तर देत आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान अहंकारी असल्याचा अप्रत्यक्ष टोला हाणला आहे.
4 वर्षांपूर्वी -
ऑक्सिजनची पातळी कमी होण्यास कोरोना कारणीभूत, परंतु ऑक्सिजनच्या तुटवड्याला मोदी सरकारच जवाबदार - राहुल गांधी
देशात करोनाचा कहर वाढत असून गेल्या २४ तासांत तीन लाखांहून अधिक करोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात पहिल्यांदाच तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे भारतात नोंद झालेली रुग्णसंख्या ही जगातील सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या आहे.
4 वर्षांपूर्वी -
केंद्र सरकारची लसीकरण रणनीती नोटबंदीपेक्षा कमी नाही | असं राहुल गांधींनी का म्हटलं?
देशात गेल्या 24 तासांत 2,95,041 नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दीड कोटीवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा एक लाख 82 हजारांवर पोहोचला आहे.कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना लसीकरणही वेगाने सुरू आहे. दरम्यान, केंद्राच्या लसीकरण रणनीतीवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे.
4 वर्षांपूर्वी -
निवडणुकांमुळे कोरोना संसर्ग वाढतोय | राहुल गांधीचा प. बंगालमधील सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय
देशभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे.देशात गेल्या २४ तासांमध्ये सर्वाधिक कोरोना रूग्णांची वाढ झाली आहे.दुसरीकडे ५ राज्यांच्या निवडणूकीचा प्रचार जोरात सुरू आहे.सभांना लाखो लोकांची गर्दी होत आहे. कोरोना संसर्गाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रसे नेते राहुल गांधी यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी यांनी पश्चिम बंगालमधील पुढच्या प्रचारसभा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. इतकचं नाही तर इतर पक्षाच्या सर्व राजकीय नेत्यांना देखील मोठ्या सभा घेण्यापूर्वी विचार करावा असं आवाहन त्यांनी केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
केंद्राची कोविड रणनीती, पहिला टप्पा लॉकडाउन, दुसरा टप्पा घंटी वाजवणे, तिसरा टप्पा देवाचे गुण गा
देशासाठी सर्वात वाईट बातमी आहे. कारण कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती सातत्याने बिघडत असलेली पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांच्या आत देशात विक्रमी 2 लाख 16 हजार 642 लोक संक्रमित आढळले आहेत. गेल्या वर्षी संक्रमणाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एका दिवसात समोर आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. या दरम्यान 1 लाख 17 हजार 825 लोक बरेही झाले आहेत. तर 1182 रुग्णांनी जीव गमावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
केंद्राच्या अपयशी धोरणांमुळेच देशात कोरोनाची दुसरी लाट | चांगल्या सूचनांची सुद्धा अॅलर्जी - राहुल गांधी
देशात कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना दिसत आहे. शनिवारी विक्रमी नवीन संक्रमितांचा आकडा समोर आला. गेल्या 24 तासांमध्ये 1 लाख 44 हजार 829 लोक संक्रमित आढळले. गेल्या वर्षी व्हायरस सुरू होण्यापासून ते आतापर्यंत एका दिवसात आढळणाऱ्या रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी गुरुवारी 1.31 लाख रुग्ण आढळले होते.
4 वर्षांपूर्वी -
लॉकडाऊनच्या परिणामाबद्दल मी आधीच सतर्क केलं होतं | त्यांना ते काही महिन्यांनंतर कळलं - राहुल गांधी
जगभरात कोरोना संकट कोसळलं तसं ते गेल्यावर्षी भारतातही आलं. त्याच्या काही दिवसांनी मोदी सरकारने देशवासियांना कोणतीही कल्पना न देता आणि कोणतीही पूर्वतयारी न करता थेट लॉकडाऊनची घोषणा केली होती. अगदी आरोग्य यंत्रणांबाबतही तोच प्रकार अनुभवायला मिळाला होता. त्याचे गंभीर परिणाम देशाला भिगावे लागले. त्याचा मोठा परिणाम म्हणजे बेरोजगारी प्रचंड वाढली आणि आर्थिक पीछेहाट होण्यात इतिहास रचले गेले. आज पुन्हा तीच परिस्थिती देशावर ओढवली आहे आणि त्यामुळे अनेक विषय पुन्हा चर्चेला येण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
निवडणूक आयोगाची गाडी खराब | भाजपाची नियत खराब | लोकशाहीची अवस्था खराब - राहुल गांधी
पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी भरभरून मतदान झाले. पश्चिाम बंगालमध्ये ३० जागांसाठी तब्बल ८०.४३ टक्के तर आसामच्या ३९ जागांसाठी ७४.६९ टक्के मतदानाची नोंद झाली. या टप्प्यात नंदिग्राममध्ये मतदान झाले असून, ममता आणि त्यांचे प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार सुवेंदू अधिकारी या दोघांनीही विजयाचा दावा केला. बंगालमध्ये हिंसाचाराच्या तुरळक घटना घडल्या. मतदान प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याच्या अनेक तक्रारी तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केल्या.
4 वर्षांपूर्वी -
सर्वाधिक साक्षरता प्रमाण असणाऱ्या राज्यातील जनतेची राहुल गांधींना पंतप्रधान म्हणून पसंती
देशात पाच राज्यांच्या निवडणुकाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे आणि राजकीय पक्ष प्रचाराला देखील लागले आहेत. त्यासाठीच्या मोठ्या प्रमाणावर सभा घेण्यास सुरुवात झाली आहे. संबंधित राज्यातील विद्यमान सत्ताधारी, विरोधकांनी जोरदार तयारी केली आहे. मात्र मतदान होण्यापूर्वी करण्यात आलेल्या सर्व्हेत आकडे समोर आली होती. त्यानुसार पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या पुन्हा ममता बॅनर्जी यांचीच जादू चालणार असं म्हटलं आहे. तर दुसरीकडे आसाममध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचं सरकार येऊ शकतं.
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांना लाल किल्यावर जाऊ दिलं | गृहमंत्र्यांना विचारा यामागे काय कल्पना होती? - राहुल गांधी
तीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर आहेत. प्रजासत्ताक दिवशी आयटीओ, लाल किल्ला आणि नांगलोई या भागात हिंसा झाली. आजही गाजीपूर आणि सिंघु बॉर्डरवर तणावाची स्थिती आहे. या संपूर्ण प्रकरणात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यात ते म्हणाले की, तीनही कायदे समजून घेण्याची गरज आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, तीनही कायदे कशा प्रकारे शेतकऱ्यांना नुकसान पोहोचवतील.
4 वर्षांपूर्वी -
हिंसेनं समस्या सुटू शकत नाही | राहुल गांधींचं शेतकऱ्यांना शांततेचं आवाहन
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं आहे. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने सामने आले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या असून त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
माझं वाक्य लक्षात ठेवा | कृषी कायदे रद्द करण्यास सरकारला भाग पाडू - राहुल गांधी
राहुल गांधी यांनी आज पुन्हा कृषी कायद्यावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला. राहुल गांधी यांनी तामिळनाडूच्या मदुराई येथे जलीकट्टूच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत राहुल यांधी शेतकऱ्यांच्या आंदोलनावरुन मोदी सरकारला लक्ष्य केलं. “देशातील काही मूठभर श्रीमंत मित्रांसाठी मोदी सरकार देशातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे. दुर्लक्ष हा शब्द देखील खूप छोटा भासेल अशापद्धतीची वागणूक आज आंदोलक शेतकऱ्यांना दिली जात आहे”, असं राहुल गांधी म्हणाले.
4 वर्षांपूर्वी