Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
SP दर्जाच्या अधिकाऱ्याकडून राहुल गांधींची कॉलर पकडण्याचं धाडस...मग सामान्यांचं काय?
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कारानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि राहुल गांधी पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी हाथरसला रवाना झाले आहेत. मात्र त्याआधीच जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात आलं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत हे आदेश लागू आहेत. तर सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
Farm Bills | नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांना गुलाम बनवणार - राहुल गांधी
देशात अनेक ठिकाणी नव्या कृषी विधेयकाविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. तर दुसरीकडे देशातील प्रमुख विरोधी पक्ष कॉंग्रेसनं शेतकर्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी या विधेयकावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. नवे कृषी कायदे हे शेतकऱ्यांना गुलाम बनवतील, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
गरीबांचं शोषण, मित्रांचं पोषण | हेच आहे मोदीजींचं शासन - राहुल गांधी
मोदी सरकारनं महत्त्वाच्या कामगार कायद्यात दुरुस्त्या करण्यासंदर्भात संसदेत विधेयक मांडलं होतं. हे विधेयक मंजूर करण्यात आलं असून, तब्बल १७ वर्षांनी कामगार कायद्यांमध्ये व्यापक बदल करण्यात आले असून ४० हून अधिक कामगार कायद्यांना या चार संहितांमध्ये सामावून घेण्यात आले आहे. केंद्र सरकारनं कामगार कायद्यात दुरुस्ती केल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
काँग्रेसने शेजारी राष्ट्रांसोबत निर्माण केलेले संबंध मोदींनी संपुष्टात आणले | शेजारी सर्वत्र शत्रू
कोरोना व्हायरस, देशातील परिस्थिती, भारत-चीन तणाव, अर्थव्यवस्था, कृषि विधेयके यासह विविध मुद्दयांवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबतचे एक ट्विट केले आहे. गेल्या अनेक दशकांपासून काँग्रेसने निर्माण केलेले व वाढवलेले संबंध मोदींनी संपुष्टात आणले असा आरोप आता राहुल यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
थाळी वाजवणं, दिवे लावण्यापेक्षा कोरोना योद्ध्यांची सुरक्षा व सन्मान महत्वाचा - राहुल गांधी
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे करोनाची लागण झालेल्या, तसंच करोनामुळे मृत्यू झालेल्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची कोणतीही माहिती नसल्याचं वृत्त समोर आलं होतं. “आरोग्य हा राज्याचा विषय आहे आणि अशाप्रकारची माहिती केंद्रीय स्तरावर आरोग्य विभाग आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे पाहिली जात नाही. जे पंतप्रधान गरीब कल्याण विमा योजनेअंतर्गत मागणी करतात त्यांची माहिती राष्ट्रीय स्तरावर ठेवली जात असल्याची माहिती,” केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चोबे यांनी दिली होती. यावरून आता काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना काळात मोदी सरकारचा खयाली पुलाव | राहुल गांधींकडून यादी
देशात कोरोनाचा धोका वाढत आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 50 लाखांचा टप्पा पार केला असून रुग्णांची संख्या 50,20,360 वर पोहोचली आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 90,123 नवे रुग्ण आढळले असून 1,290 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 82,066 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदीजींनी चीनच्या घुसखोरीबद्दल देशाची दिशाभूल केली | राहुल गांधींचं टीकास्त्र
भारत-चीन सीमेवर चीनच्या कुरापती सुरूच आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर वारंवार विविध प्रकारे चीन भारतील सैन्याला त्रास देत आहे. त्यानंतर केंद्र सरकारने चीनला धडा शिकवण्याच्या सर्व योजना आखल्या आहेत. या विवादादरम्यान आज संसदेच्या अधिवेशनात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देशाच्या रक्षणासाठी विविध योजना सुरू असल्याचे सांगितले. चीनला विविध प्रकारे धडा शिकवला जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्तीत स्वतःचा जीव स्वतःच वाचवा | पंतप्रधान मोरासोबत व्यस्त आहेत
देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाची संख्या वाढत असल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जळजळीत टीका केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
चीनने आपली जमीन बळकावली आहे | ही सुद्धा देवाची करणीच का - राहुल गांधी
पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यातील तणाव वाढला आहे. पँगाँग सरोवराच्या उत्तर काठावर गेल्या ४८ तासांत चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) मोठय़ा प्रमाणात सैन्याची जमवाजमव केली असून, भारतानेही तिथे मोठय़ा प्रमाणात जवान तैनात केले आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदींनी स्वतःच आर्थिक अराजक निर्माण केलं | आता भरपाईसाठी देशाची संपत्ती विकत आहेत
देशात निर्माण झालेल्या आर्थिक गर्तेतून अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी केंद्र सरकारनं निर्गुंतवणुकीच्या धोरणावर जोर दिला असून, तब्बल २६ कंपन्यांचं खासगीकरण करण्याच्या दिशेनं पावलं टाकली आहेत. यातील २३ कंपन्यांना केंद्रानं मंजूरी दिली आहे. त्यातच आता भारतीय जीवन विमा महामंडळ अर्थात एलआयसीतील सरकारची २५ टक्के भागीदारी विकणार असल्याचं वृत्त आहे. या वृत्तानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदींच्या खास मित्रांचा विकासासाठी | सरकारी कंपन्यांचं खासगीकरण करुन रोजगार नष्ट - राहुल गांधी
खासगीकरणाच्या मुद्द्यावरुन राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देश मोदी सरकारने निर्माण केलेली अनेक संकटं आज झेलत आहे. त्यापैकीच गरजेचं नसलेलं खासगीकरण आहे, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
७० वर्षात जे काही उभं केलं होतं | ते सगळं हे विकून टाकणार | काँग्रेसचा घणाघात
भारतीय अर्थव्यवस्था कोरोना संकटात डळमळीत झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकार सतत सरकारी उपक्रमांत (PSUs) आपली भागीदारी विकण्याच्या योजनेवर काम करत आहे. त्यानुसार २७ जुलै २०२० रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली होती. केंद्र सरकारने २३ सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारचं सत्य | तरूणांचं भविष्य हिरावून घ्यायचंय | मित्रांना पुढे घेऊन जायचंय - राहुल गांधी
काँग्रेसचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. मोदी सरकारच्या एकूण धोरणांवरच राहुल गांधी यांनी हल्लबोल केला आहे. त्यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे की, “मिनिमम गव्हर्नमेंट आणि मॅक्झिमम खाजगीकरण, कोविड केवळ एक कारण आहे, सरकारी कार्यालय कर्मचारी मुक्त करायची आहेत, तरूणांचं भविष्य हिरावून घ्यायचंय आणि मित्रांना पुढे घेऊन जायचंय, असा शाब्दिक प्रहार राहुल गांधींनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदींचा कैश लेस भारत | खरं तर कामगार-शेतकरी-छोटे व्यापारी मुक्त भारत आहे - राहुल गांधी
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं घेतलेल्या निर्णयांवरून हल्लाबोल सुरू केला आहे. जीडीपीची ऐतिहासिक घसरण, डबघाईस आलेली अर्थव्यवस्था यासाठी मोदी सरकारला दोषी ठरवत राहुल गांधी यांनी ‘अर्थव्यवस्था की बात’ सुरू केली असून, दुसऱ्या भागात पंतप्रधान मोदी यांच्यावर नोटबंदीच्या निर्णयावरून टीकेची तोफ डागली आहे.
5 वर्षांपूर्वी -
ही आहेत भारतातील मोदी-निर्मित संकटे | यादी देत राहुल गांधींचा हल्लाबोल
पहिल्या तिमाहीतील भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासदराची आकडेवारी समोर आल्यानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी अपेक्षेप्रमाणे मोदी सरकारवर हल्ला चढवला होता. भारताचा विकासदर जवळपास उणे २४ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील ही सर्वात निचांकी घसरण आहे. याबाबत मी अगोदरच इशारा दिला होता. परंतु, दुर्दैवाने केंद्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले होते.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO | GDP'ची ऐतिहासिक घसरण | राहुल गांधींचा इशारा सत्य ठरला
पहिल्या तिमाहीतील भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासदराची आकडेवारी समोर आल्यानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी अपेक्षेप्रमाणे मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. भारताचा विकासदर जवळपास उणे २४ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील ही सर्वात निचांकी घसरण आहे. याबाबत मी अगोदरच इशारा दिला होता. परंतु, दुर्दैवाने केंद्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
विद्यार्थ्यांना हवी होती 'परीक्षा पे चर्चा' | पंतप्रधानांनी केली 'खिलौने पे चर्चा' - राहुल गांधी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 68व्या मन की बातमधून जनतेशी संवाद साधला. देशभरात यंदा इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा होतोय. उत्सव आणि पर्यावरणाचं दृढ नातं आहे. निसर्ग संवर्धनासाठी उत्सवाचं आयोजन केलं जात असल्याचं मोदींनी सांगतिलं. कोरोनाच्या कठिण काळातही शेतकऱ्यांनी मोठं योगदान दिलं असून अन्नदाता शेतकऱ्यांना मोदींकडून मन की बातच्या सुरुवातीला नमन करण्यात आलं.
5 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारच्या त्या तीन निर्णयांमुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त - राहुल गांधी
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या ‘अॅक्ट ऑफ गॉड’ या वक्तव्यावरून त्यांच्यावर निशाणा साधला. केंद्र सरकारच्या तीन निर्णयांमुळे देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. नोटबंदी, दोषयुक्त जीएसटी प्रक्रिया आणि फसलेलं लॉकडाउन यामुळे देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याचे ते म्हणाले. गुरुवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची बैठक पार पडली.
5 वर्षांपूर्वी -
केंद्र सरकारचा निष्काळजीपणा चिंताजनक | कोरोना लसीवरून राहुल गांधींचं टीकास्त्र
देशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 33,10,235 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 75,760 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 1,023 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 60,472 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी कोरोना, लॉकडाऊन यासह विविध मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
राहुल गांधी थेट माझ्याशी बोलले | त्यामुळे मी माझं ट्विट मागे घेत आहे - कपिल सिब्बल
काँग्रेसच्या कार्यकारी समिती महत्त्वाची बैठक नवी दिल्लीत पार पडली. नेतृत्वाच्या मुद्यावरुन काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. २३ काँग्रेस नेत्यांनी पत्राद्वारे पक्षनेतृत्वाचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र पाठवण्याच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पक्ष नेतृत्वाबद्दल लिहिण्यात आलेल्या पत्राच्या टायमिंगबद्दल राहुल यांनी बोट ठेवलं. राजस्थानात पक्षाचं सरकार अडचणीत असतानाच पत्र का लिहिण्यात आलं, त्या पत्रावर कार्यकारणीच्या बैठकीत चर्चा अपेक्षित असताना ते माध्यमांमध्ये कसं गेलं, असे सवाल राहुल यांनी उपस्थित केले.
5 वर्षांपूर्वी