Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
काँग्रेसच्या अंतर्गत एक्झिट पोलमध्ये एनडीए'ला २३० तर भाजपाला २०० पेक्षा कमी जागा
लोकसभा निवडणुकीसाठीचे ७व्या टप्प्यातील मतदान आटोपल्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांच्या संस्थांनी आपापली एक्झिट पोल जाहीर केली होती. या एक्झिट पोलमध्ये भाजपप्रणीत एनडीए बहुमतापर्यंत जाईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसने देखील एक्झिट पोल घेण्यात आले असून, या एक्झिट पोलमध्येही भाजपाप्रणित एनडीएला यूपीएपेक्षा जास्त जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. परंतु भारतीय जनता पक्षाला २०० हून कमी जागा मिळतील आणि एनडीएला केवळ २३० जागांवर मजल मराटग येईल. तर काँग्रेस स्वबळावर १४० जागा जिंकेल आणि यूपीएला १९५ जागा मिळतील, असा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
२०१४ वगळता यापूर्वी एक्झिट पोल खोटी ठरली व भलतेच निकाल आल्याचा इतिहास
काल लोकसभा निवडणुकीच्या ७व्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया संपताच अनेक टीव्ही वृत्तवाहिन्यांची विविध एजन्सींनी केलेल्या एक्झिट पोलची निरीक्षणं प्रसिद्ध केली आहेत. वास्तविक २३ तारखेला खरं चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान प्रसार माध्यमांमध्ये एक्झिट पोलची दिली जाणारी आकडेवारी आणि प्रत्यक्ष निकालाचे चित्र पूर्णपणे वेगळंही असू शकतं असा पूर्व इतिहास देखील आहे. एक्झिट पोलचे अंदाज सपशेल आपटल्याची अनेक उदाहरणे आहेत. २००९ मधील एक्झिट पोलची आकडेवारी त्याच उत्तम उदाहरण ठरले आहेत. त्याव्येतिरिक्त ही अनेकदा निरनिराळ्या एजन्सीने केलेली एक्झिट पोल खोटी ठरली असल्याचे इतिहास आहे.
6 वर्षांपूर्वी -
७व्या टप्प्यातील मतदान पूर्ण; थोड्याच वेळात जाहीर होणार एक्झिट पोल
लोकसभा निवडणुकीतील अखेरच्या आणि ७व्या टप्प्यातील मतदान संध्याकाळी ६ वाजता अधिकृतपणे पूर्ण झाले असून संध्याकाळी ६:३० वाजता एक्झिट पोलचा अंदाज जाहीर होणार आहे. २३ मे रोजीच्या मतमोजणीपूर्वी एक्झिट पोलकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
6 वर्षांपूर्वी -
सामान्यांचे प्रश्न घेऊन निवडणूक लढलो, आता जनता जो निर्णय देईल तो मान्य असेल: राहुल गांधी
सामान्य जनतेशी निगडीत असलेले महत्वाचे प्रश्न मांडून आम्ही यावेळची लोकसभेची निवडणूक मोठ्या ताकदीने लढवली आहे. लोकशाहीमध्ये जनता हीच मालक आणि सर्वश्रेष्ठ असते. त्यामुळे जनता जो कौल देईल तो मान्य असेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी प्रसार माध्यमांना दिली. नवी दिल्लीतील औरंगजेब लेन येथील शाळेत मताधिकार बजावल्यानंतर प्रसारमाध्यमांशी थेट संवाद साधताना राहुल गांधी यांनी ही प्रतिक्रिया दिली.
6 वर्षांपूर्वी -
७ राज्यातील ५९ मतदारसंघात दुपारी २ वाजेपर्यंत सुमारे ३९.८५ टक्के मतदान
लोकसभा निवडणुकीसाठी आज ७ राज्यांमधील ५१ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. मतदानाची ही ६वी फेरी असून बिहार, झारखंड, दिल्ली, हरियाणा, मध्य प्रदेश, युपी, पश्चिम बंगाल अशा एकूण ७ राज्यांचा त्यात समावेश आहे. त्यामध्ये ९७९ उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर राहुल गांधींचे स्पष्टीकरण, त्यांनी माफी मागायला हवी
साल १९८४ साली दिल्लीत झालेली शीख दंगलीप्रकरणी कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते सॅम पित्रोदा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे शीख समुदायात संताप निर्माण झाला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर कॉंग्रेसला प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले. शीख समुदायाने दिल्लीत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या घराबाहेर आंदोलन करत त्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. त्यानंतर सॅम पित्रोदा यांनी आपल्या वक्तव्याबाबत माफी मागितली.
6 वर्षांपूर्वी -
भाजप तोंडघशी! राहुल गांधींच्या नागरिकत्त्व वादावरील याचिका सुप्रीम कोर्टाकडून रद्द
कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या नागरिकत्त्व वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. युनायटेड हिंदू फ्रंट आणि हिंदू महासभेकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सिजेआय रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ही याचिका रद्द केली आहे. कोणत्याही परदेशी कंपनीत नागरिकत्त्व ब्रिटीश असल्याचे नमूद असल्यास व्यक्तीचे नागरिकत्त्व ब्रिटीश असेलच असे नाही, असे सांगत न्यायालयाने हिंदू महासभेला इतर पुरावे सादर करण्यास सांगितले. मात्र इतर पुरावे सादर करण्यात न आल्याने न्यायालयाने ही याचिका रद्द केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजपविरोधी पक्षांची जुळवाजुळव चर्चा सुरू, चंद्राबाबू नायडू व राहुल गांधी भेट
लोकसभेच्या एकूण २७२ जागा भारतीय जनता पक्षाला मिळणार नाहीत आणि त्यामुळे भाजपाला इतर लहान पक्षांची मदत घ्यावी लागेल, अशी शक्यता वर्तविली जात असल्याने, सावधगिरीचे पाऊल म्हणून काँग्रेस आणि मित्रपक्ष निकालाआधी पूर्णपणे सक्रिय झाले आहेत. टीडीपीचे प्रमुख व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची यासंदर्भात भेट घेतली. त्यानंतर, त्यानंतर ते लगेचच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भेटीसाठी कोलकात्याच्या दिशेने रवाना झाले.
6 वर्षांपूर्वी -
लोकसभा मतदान पाचवा टप्पा;आज दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. सात राज्यातील एकूण ५१ जागांसाठी आज मतदान होत आहे. पाचव्या टप्प्यात ६७४ उमेदवारांचे भवितव्य मतदार निश्चित करणार आहेत. अमेठीमधून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, रायबरेलीमधून सोनिया गांधी, लखनऊमधून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी अशी बडे नेतेमंडळी रिंगणात आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मोदींच्या काळातच नव्हे तर यूपीएच्या काळातही सर्जिकल स्ट्राईक झाले: निवृत्त लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाकडून सर्जिकल स्ट्राइकवरुन दावे प्रतिदावे सुरू आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर २०१६ मध्ये म्हणजे मोदींच्या काळात झालेल्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे निवृत्त लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा यांनी महत्वपूर्ण विधान केलं आहे. त्याप्रमाणे लष्करानं यापूर्वीदेखील सीमा ओलांडून सर्जिकल स्ट्राइक केल्याचं हुडा यांनी म्हटलं. काँग्रेसप्रणित यूपीए सरकारच्या काळात ६ सर्जिकल स्ट्राइक झाल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. त्याबद्दल प्रसार माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला हुडा यांनी उत्तर दिलं.
6 वर्षांपूर्वी -
आज सात राज्यांमधील प्रचाराच्या तोफा थंडावणार
लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज शनिवारी संध्याकाळी थंडावणार आहेत. ६ मे रोजी युपी, राजस्थान, जम्मू-काश्मीर, बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड या ६ प्रमुख राज्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ७ राज्यांमधील ५१ मतदार संघांमध्ये मतदान होणार आहे. दरम्यान यामध्ये उत्तर प्रदेशातील महत्त्वाच्या अमेठी आणि रायबरेली मतदारसंघांचा समावेश आहे.
6 वर्षांपूर्वी -
सर्जिकल स्ट्राईक भारतीय लष्करानं केला, मोदींनी नव्हे: राहुल गांधी
वायुदलाने केलेला सर्जिकल स्टाईक, नोटाबंदी, राफेल घोटाळ्यावरुन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. नरेंद्र मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केला नसून तो भारतीय लष्करानं केलं आहे. नरेंद्र मोदी सर्जिकल स्ट्राईक आपल्या सरकारनं केल्याचं सांगत लष्कराचा अपमान करत आहेत, असं राहुल गांधी यांनी सांगितलं.
6 वर्षांपूर्वी -
राज्यात आज प्रचाराचा धडाका, मोदी मुंबईत तर राहुल गांधींची संगमनेरमध्ये सभा
लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील प्रचाराची सांगता शनिवारी होणार आहे. त्याआधी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ मुंबईत धडाडेल. तर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची शिर्डी मतदारसंघातील संगमनेरमध्ये सभा होणार आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिलेले काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील मोदींच्या मुंबईतील सभेत उपस्थित राहतात का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
6 वर्षांपूर्वी -
‘चौकीदार चोर हैं’ वक्तव्य, राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाची नोटीस
राफेल करारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वक्तव्य केल्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. भारतीय जनता पक्षाचे खासदार मीनाक्षी लेखी यांनी दाखल केलेल्या अवमानना याचिकेवरुन सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना ही नोटीस बजावली आहे.
6 वर्षांपूर्वी -
जालियनवाला बाग हत्याकांडातील शहिदांना राहुल गांधींकडून श्रद्धांजली
अमृतसरमध्ये ब्रिटिश काळात झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाला आज, १३ एप्रिलला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने याठिकाणी या हत्याकांडातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती वंकय्या नायडू आणि पंजाबचे राज्यपाल शहिदांना श्रद्धांजली वाहणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
तामिळनाडूमध्ये आरएसएस'ची सत्ता येऊ देणार नाही
तामिळनाडूवर नागपूरची म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सत्ता कधीही येऊ देणार नाही, असे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी जाहीर केले. द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन तामिळनाडूचे लवकरच मुख्यमंत्री होतील, असा ठाम विश्वास देखील त्यांनी जाहीर सभेत व्यक्त केला.
6 वर्षांपूर्वी -
राहुल गांधींच्या चेहऱ्यावर दिसला लेझर लाइट; काँग्रेसला स्नायपर हल्ल्याची भीती
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. काँग्रेसनं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना एक लेखी पत्र लिहिलं आहे. अहमद पटेल, रणदीप सुरजेवाला, जयराम रमेश यांनी मिळून हे पत्र लिहिलं आहे. राहुल गांधी अमेठीत पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांच्या चेहऱ्यावर कोणी तरी तब्बल ७ वेळा हिरव्या कलरची लेझर लाइट मारली. स्नायपर हल्ल्यात अशी लेझर लाइट वापरली जात असल्याची शक्यताही काँग्रेसनं व्यक्त केली आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या जीविताला धोका असून, त्यांची सुरक्षा वाढवण्याची गरज असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
लोकसभा निवडणूक २०१९; देशभरात ९१ मतदारसंघांत आज मतदान
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात देशातील अठरा राज्ये आणि २ केंद्र शासित प्रदेशांतील तब्बल ९१ लोकसभा मतदारसंघांत आज मतदान पार पडणार आहे. त्यात विदर्भातील दहा पैकी सात मतदारसंघात मतदान होणार असून त्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती सर्व पूर्व तयारी केली आहे. नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशीम आणि, वर्धा मतदारसंघात गुरुवारी सकाळी ७ पासून मदानाला सुरुवात झाली आहे. एकूण ११६ उमेदवार रिंगणात आहेत. १ कोटी ३० लाख मतदार आहेत. त्याच्यासाठी एकूण १५,००० पेक्षा अधिक मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण ११,००० सुरक्षा दल सज्ज ठेवण्यात आली आहेत.
6 वर्षांपूर्वी -
राहुल गांधी आज अमेठीतून उमेदवारी अर्ज भरणार
कॉंग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अमेठी आणि वायनाड अशा २ मतदारसंघांतून निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान, ४ एप्रिल रोजी त्यांनी वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल असून आज ते अमेठी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. हा अर्ज भरण्याआधी ते अमेठीत रोड शो करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी उपस्थित राहणार आहेत. रोड शो सकाळी दहा वाजता मुंशागंजपासून सुरु होणार आहे. तर दुपारी १२.३० वाजता राहुल गांधी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक अर्ज भरणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
राहुल गांधी यांच्या रोड शोला तुफान जनसागर
केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासमवेत येथे गुरुवारी केलेल्या रोडशोला जनतेचा तुफान प्रतिसाद मिळाला. दरम्यान या रोड शोमध्ये केरळचे माजी मुख्यमंत्री ओमेन चंडी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते रमेश चेन्नितेला यांची देखील विशेष उपस्थिती होती. तसेच या रोडशोदरम्यान काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांच्या वाढत्या गर्दीमुळे सुरक्षा रक्षकांची मोठी तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. राहुल आणि प्रियांका गांधी जनतेला अभिवादन करत होते. राहुल गांधी यांनी रोड शोमध्ये सामील झालेल्या अनेकांशी पुढे येऊन हस्तांदोलन केले.
6 वर्षांपूर्वी