Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
राहुल गांधी आज वायनाडमधून उमेदवारी अर्ज भरणार
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी २ मतदार संघातून निवडणूक लढणार आहेत. यूपीतील पारंपरिक असलेला अमेठी आणि केरळातील वायनाड या २ मतदार संघातून राहुल गांधी आपले नशीब आजमावणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
राहुल गांधी दोन मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे दोन मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे. युपीतील पारंपारिक अमेठी मतदारसंघातून त्यांचे नाव यापूर्वीच जाहीर झाले आहे. तसेच आता ते केरळच्या वायनाड मतदारसंघातूनही निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसकडून आज पत्रकार परिषद घेऊन ही अधिकृत माहिती प्रसार माध्यमांना देण्यात आली.
6 वर्षांपूर्वी -
…तर नीती आयोग बरखास्त करणार: राहुल गांधी
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोठी घोषणा केली आहे. सत्तेत परतल्यास नीती आयोग बरखास्त करण्यात येईल, अशी घोषणा राहुल यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. नीती आयोगाने मोदी सरकारचे मार्केटिंग आणि आकड्यांमध्ये फेरफार करण्याशिवाय काहीही काम केलेले नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
२५ कोटी लोकांना दारिद्र्य रेषेबाहेर काढणार : राहुल गांधी
कॉंग्रेस सत्तेवर आल्यास देशातील जनतेला न्याय देईल, असे म्हणत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांची न्याय योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत वीस टक्के गरीब कुटुंबांना वर्षाला ७२,००० रुपये देणार, असे ते म्हणाले. पाच कोटी कुटुंबातील २५ कोटी लोकांना या योजनेचा फायदा होईल, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या वर्गाला आर्थिक आधार मिळेल.
6 वर्षांपूर्वी -
मोदींच्या गुजरातमधूनच काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराचा प्रारंभ
कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज गुजरातच्या अहमदाबाद शहरात होणार आहे. या बैठकीसाठी कॉंग्रेसने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या होमपिचची निवड केल्याने याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
6 वर्षांपूर्वी -
नवाझ शरीफांना पाकिस्तानातं जाऊन मिठी मारणारे मोदीच पाकिस्तानचे 'पोस्टर बॉय: राहुल गांधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खरे पाकिस्तानचे पोस्टर बॉय आहेत. पाकिस्तानच्या दौऱ्यावर आम्ही गेलो होतो का, नवाझ शरीफ यांना भेटायला आम्ही गेलो होतो का ?. पठाणकोटमध्ये कोण आले होते ते, ISI वाले, त्यांना आम्ही बोलावलं होतं ? असे अनेक प्रश्न उपस्थित करत काँग्रेस अध्यक्षांनी मोदींना पाकिस्तानचा पोश्टर बॉय म्हटलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
'चौकीदार चौकंन्ना' असून देखील 'सगळं चोरीला जातंय' आपल्या देशातून? राहुल गांधी
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःची स्तुती करताना तुमच्या देशाचा ‘चौकीदार चौकंन्ना’ असे असं म्हटलं होतं. परंतु आता नुकत्याच घडलेल्या घटनेने ते तोंडघशी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण राफेल लढाऊ विमानांच्या डीलमधील अत्यंत महत्त्वाची कागदपत्रं संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. विशेष म्हणजे राफेल प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना स्वतः महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल यांनी ही माहिती दिली. राफेल प्रकरणात सुप्रीम कोर्टाने नरेंद्र मोदी सरकारला क्लिन चिट दिली होती. परंतु, या निकालानंतर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आल्या. त्यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे.
6 वर्षांपूर्वी -
कॅग पुरावे: अमेठीत ऑर्डनन्स फॅक्टरी २००७ पासून, एके २०३ बंदुकांबद्दल वाचून हसा! मोदींनीं गंडवल?
अमेठीत राजकारण तापू लागलं आहे आणि मोदींच्या कालच्या अमेठीतील सभेनंतर लष्करी उत्पादन करणाऱ्या त्या फॅक्टरीवरून भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळत आहे. त्यानंतर सरकार पुरस्कृत नसलेल्या माध्यमांनी सखोल विषयात जाऊन तथ्य समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी धादांत खोटं बोलतात याचे कागदोपत्री पुरावेच समोर आले आहेत. सध्या लष्कराच्या नावाने भावनिक झालेले वातावरण पाहून मी सांगेन ती पूर्व दिशा लोकं समजतील अशा अविर्भावात ते वावरत आहेत. लष्कराच्या आडून राजकारण खेळत मी म्हणजे भारत आणि मी म्हणजे भारतीय लष्कर असा कांगावा करून लोकशाहीतील सर्व विरोधक म्हणजे पाकिस्तान समर्थक आहेत अशी हवा निर्मिती करून, देशातील सर्वच मोठ्या राजकारण्यांना त्यांच्या मतदारसंघात पराभूत करण्याची रणनीती आखात आहेत असंच पुरावे सांगतात. त्यासाठी कितीही खोटं बोलायला तयार आहेत असं पुरावे सांगतात.
6 वर्षांपूर्वी -
पुरावे! पुलवामा हल्ल्याच्या दिवशी नरेंद्र मोदी संध्याकाळपर्यंत फोटोशूट करत होते?
पुलवामा येथे झालेल्या भ्याड आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे तब्बल ४० जवान शहीद झाले आहेत. अवंतीपुरा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून शहीद वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतरही ‘प्राइम टाइम मिनिस्टर’ ३ तास शूटिंगमध्ये व्यस्त होते अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी (२२ फेब्रुवारी) केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
आघाडीसोबतचे तर्क केवळ माध्यमांमध्ये, पण राज ठाकरेंची वेगळीच रणनीती आहे?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकट मुलाखत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली होती आणि त्यानंतर माध्यमांमध्ये या चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळालं. त्यात राज ठाकरे यांनी पाडव्याच्या सभेआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. मात्र, तत्पूर्वी एक घटना दिल्लीत घडली होती आणि ती म्हणजे स्वतः काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीत शरद पवारांची भेट घेतली होती.
6 वर्षांपूर्वी -
सर्जिकल स्ट्राइकचे हिरो डी. एस. हुडा यांचा राहुल गांधींना 'हात'
लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसनं राष्ट्रीय सुरक्षेसाठी एका कृती दलाची स्थापना केली आहे. सर्जिकल स्ट्राइकचं नेतृत्व करणारे निवृत्त लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा यांच्याकडे या कृती दलाची जबाबदारी देण्यात आली आहे. देशासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याचं काम हुडा यांच्याकडे असेल. ते देशाच्या सुरक्षेशी संबंधित तज्ज्ञांची मतं विचारात घेऊन सदर आराखडा तयार करतील. सर्जिकल स्ट्राइक दरम्यान हुडा नॉर्दन आर्मीचे कमांडर होते.
6 वर्षांपूर्वी -
सर्वपक्षीय बैठकीमध्ये सत्ताधाऱ्यांसह व विरोधी पक्षांची दहशतवादाविरोधात एकजूट
पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या भ्याड आत्मघाती हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांनी दहशतवादाविरोधात एकजूट दाखवली. तसेच दहशतवाद्यांविरोधात होणाऱ्या कारवाईत सरकारसोबत उभे राहण्याचे आश्वासन विरोधी पक्षांच्या नेत्यांनी दिले. तसेच दहशतावादाविरोधात त्रिसूत्री प्रस्ताव देखील पारित करण्यात आला.
6 वर्षांपूर्वी -
कॅग अहवाल: राफेल विमानाची प्रत्यक्ष किंमतच नमूद नाही, मग महाग की स्वस्त ठरलं कसं?
देशाच्या संरक्षण आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या राफेल लढाऊ विमानांच्या कराराबाबतचा कॅगचा अहवाल अखेर आज अधिकृतपणे वरिष्ठ सभागृह म्हणजे राज्यसभेत सादर करण्यात आला आहे. सध्याच्या भाजप प्रणित एनडीए सरकारने केलेला राफेल लढाऊ विमानांचा करार हा आधीच्या काँग्रेस प्रणित यूपीए सरकारने केलेल्या करारापेक्षा 2.86 टक्क्यांनी स्वस्त असल्याचे कॅगने आपल्या अहवालात नमूद केले आहे. तसेच मोदी सरकारने १२६ विमानांच्या तुलनेत ३६ विमानांसाठी करार करताना एकूण १७.०८ टक्के पैसे वाचवले आहेत, असं म्हटल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
6 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान मोदींनी लष्करी गुपिते अनिल अंबानींना सांगून देशद्रोह केला: राहुल गांधी
भारतीय हवाईदलासाठी राफेल लढाऊ विमाने खरेदीचा करार फ्रान्ससोबत होण्यापूर्वीच त्या विषयीची महत्वाची माहिती उद्योगपती अनिल अंबानी यांना सांगून मोदींनी देशाच्या संरक्षण विषयक अशा अत्यंत गोपनीय कायद्याचा भंग करीत एक प्रकारे देशद्रोहाचा गुन्हा केला असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल केला. स्वत:ला देशाचा चौकीदार समजणाऱ्या मोदींवर या महाभयंकर गुन्ह्याबद्दल खटला चालवून त्यांना तुरुंगात पाठवायला हवे, अशी मागणी सुद्धा त्यांनी उचलून धरली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदी भ्रष्टच, अनिल अंबानींनी राफेल प्रकरणी दलालाची भूमिका बजावली: राहुल गांधी
नरेंद्र मोदी यांना राफेल लढाऊ विमानांचे प्रकरण भोगण्याची शक्यता प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी व्यक्त करत आहेत. सदरप्रकरणी अनेक कागदपत्र आणि इतर पुरावे देखील समोर येण्यास सुरुवात झाली आहे. राफेल विमान करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा चौफेर हल्ला चढवला. अनिल अंबानी यांनी राफेल करार होण्यापूर्वी फ्रान्सच्या संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या भेटीचा धागा पकडत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. राफेल विमान करारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबानींसाठी मध्यस्थाची भूमिका बजावली होती, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला. तसेच नरेंद्र मोदी हे भ्रष्ट व्यक्ती असून, त्यांच्यावर खटला चालवून त्यांना तुरुंगात डांबले पाहिजे, असे राहुल गांधी म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
'चौकीदार ही चोर है' असं आता संरक्षण मंत्रालय सुद्धा म्हणतंय: राहुल गांधी
राफेल लढाऊ विमानांच्या करारात पंतप्रधानांनी थेट हस्तक्षेप केला. उद्योगपती अनिल अंबानी यांच्या कंपनीला राफेलचं कंत्राट मिळावं म्हणून त्यांनी समांतर वाटाघाटी सुरु केल्या, असा गंभीर आरोप काँग्रेस अध्यक्षांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, पंतप्रधानांनी फ्रान्ससोबत थेट वाटाघाटी केल्यानं भारतीय संरक्षण मंत्रालयाची बाजू कमकुवत झाली, असं वृत्त आज ‘द हिंदू’ या इंग्रजी वृत्तपत्रानं दिले आणि त्यानंतर खळबळ माजली आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: ‘अपनी बात राहुल के साथ’, राहुल गांधींचा जनतेशी थेट संवाद!
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी निरनिराळ्या रणनीतीचा अवलंब करताना दिसत आहेत. आता त्यांनी थेट जनतेशी संवाद साधण्यासाठी आणि मोदींच्या ‘चाय पे चर्चा आणि मन की बात’ला टक्कर देण्यासाठी ‘अपनी बात राहुल के साथ’ हा संवाद उपक्रम राबविणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
बिहारमध्ये राहुल गांधींची जंगी सभा, तुफान गर्दी
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची बिहारमध्ये जंगी सभा होत असून, त्याला स्थानिक लोकं मोठी गर्दी करताना दिसत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राहुल गांधींनी सुद्धा जंगी सभांचा सपाटा लावला असून, सत्ताधाऱ्यांना प्रत्येक राज्यात घेरण्याची काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सपाट लावला आहे.
6 वर्षांपूर्वी -
राहुल गांधीनी गडकरींना नम्रपणे विचारलं, 'नितीनजी तो बेरोजगारीचा उल्लेख राहून गेला'
काल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटलं की, ‘भारतीय जनता पार्टीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे एकटेच धाडसी नेते आहेत’, असे म्हणून त्यांची उपरोधिकपणे कौतुक केले होते. त्यानंतर केंद्रीय मंत्री गडकरी आणि राहुल गांधी यांच्यादरम्यान सोमवारी टिष्ट्वटरवरून कलगीतुरा रंगला.
6 वर्षांपूर्वी -
राहुल हे अत्यंत साधे व्यक्ती असून त्यांची देशाला व गोव्याला गरज: भाजप गोवा विधानसभा उपसभापती
गोव्याच्या कौटुंबिक दौऱ्यावर असताना सुद्धा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी काल आजारीने त्रस्त असणारे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची स्वतः विधानसभेत जाऊन सदिच्छा भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली होती. दरम्यान, कालच्या या भेटीचे गोवा विधानसभेचे विद्यमान उपसभापती तसेच भाजप आमदार मायकल लोबो यांनी स्वागत केले. तसेच त्यांचे तोंडभरून कौतुक सुद्धा केल्याने भाजपाची राजकीय गोची झाली आहे.
6 वर्षांपूर्वी