Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
मुंबई लोकल ट्रेन | राज्य सरकारकडून महत्वाची माहिती
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा काँग्रेस पक्षाचे प्रमुख या तिघांनी लॉकडाउनसंदर्भात विचार केलेला नाही. या सगळ्या परिस्थितीत अधिक कडक निर्बंध कसे लावता येतील यावर चर्चा होणार आहे. कालच यावर नव्याने धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आमच्या विभागाकडून फाईल गेली आहे. अंतिम निर्णय आज संध्याकाळपर्यंत होईल,” अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
अजब मोदी सरकार | प्लॅटफॉर्मवर गर्दी होऊ नये म्हणून प्लॅटफॉर्म तिकीट १० वरून ५० रु
सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशात रेल्वे विभागाने रेल्वे स्टेशनवरील गर्दी कमी करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील निवडक रेल्वे स्टेशवर प्लॅटफॉर्म तिकीटासाठी आता 10 रुपयांऐवजी 50 रुपये द्यावे लागणार आहेत. सेंट्रल रेल्वेने प्लॅटफॉर्ट तिकीटांमध्ये पाचपट वाढ केली आहे. प्लॅटफॉर्म तिकीटांच्या किमती वाढवण्यात आलेल्या स्टेशनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CST),दादर आणि लोकमान्य तिलळ टर्मिनस सामील आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Mumbai Local Train | सर्वसामान्यांसाठी 1 फेब्रुवारीपासून मुंबई लोकल सुरु
कोविड परिस्थितीमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा परवानगी दिलेल्या काही मर्यादित प्रवाशांसाठीच सुरु होती मात्र 1 फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. यामुळे सर्वाना यातून प्रवास करता येईल तसेच त्यांची होणारी गैरसोयही टळेल. याशिवाय मुंबई व उपनगरातील विविध कार्यालये व आस्थापना यांनी कामाच्या वेळांमध्ये सुधारणा करावी जेणे करून सर्वाना सुविधा होईल असेही यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन , मदत व पुनर्वसन विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
आधी गर्दीच्या विभाजनासाठी तंत्रज्ञानातून उपाय शोधा | राज्य सरकारला सल्ला
सरसकट लोकल सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकारने पश्चिम रेल्वे,मध्य रेल्वेला पत्र पाठविले होते. या पत्राला रेल्वेकडून उत्तर आले आहे. २२ आणि २७ ऑक्टोंबरला राज्य सरकारसोबत झालेल्या बैठकीचा संदर्भ देऊन, रेल्वेने कार्यालयीन वेळा बदलण्या संदर्भात या पत्रात उल्लेख केला आहे. ज्यामुळे गर्दीच्या वेळी अडचण होणार नसल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे. लोकल सुरू झाल्यावर गर्दीचे नियोजन कसे करणार ? अशी विचारणा या पत्राद्वारे रेल्वेने राज्य सरकारला केले आहे. शिवाय लोकल सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकार आणि रेल्वे यांची लवकर बैठक व्हावी. यामध्ये गर्दी नियोजन संदर्भात तांत्रिक दृष्ट्या मार्ग काढावा असे यात म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई लोकल ट्रेन | मुंबईकरांसाठी राज्य सरकारकडून सकारात्मक संकेत
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी बंद असलेली लोकल सेवा सुरु करण्याबाबत ठाकरे सरकारने संकेत दिले आहेत. लोकांची गर्दी पाहता लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र आता हळूहळू अनलॉक सुरु झालं असून चाकरमान्यांना कामावर जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते, अत्यावश्यक सेवा वगळता इतर कर्मचाऱ्यांना लोकल बंद असल्याने रस्ते वाहतुकीवरही त्याचा परिणाम पाहायला मिळतो.
5 वर्षांपूर्वी -
BREAKING | उद्यापासून सर्व महिला प्रवाशांना लोकल प्रवासासाठी परवानगी
सरसकट सर्व महिलांना उद्यापासून लोकल प्रवासासाठी संमती देण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी ही घोषणा ट्विटरवरुन माहिती देत केली आहे. उद्यापासून सर्व महिलांना सकाळी ११ ते दुपारी ३ आणि संध्याकाळी ७ नंतर मुंबई लोकल सुरु असेपर्यंत ट्रेनमधून प्रवास कऱण्याची संमती देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार आम्ही त्वरित परवानगी देत आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
महिलांना शुभदिनी केंद्राकडून आनंदवार्ता नाही | रेल्वे प्रवासाच्या मान्यतेला वेळ लागणार
मुंबई लोकलचे दरवाजे महिलांसाठी खुले झाले आहेत. १७ ऑक्टोबर म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या माळेपासून सरसकट सर्व महिलांना लोकल प्रवास करता यासाठी राज्य सरकारने रेल्वे बोर्डाकडे विनंती केली होती. त्यानुसार सकाळी ११ ते दुपारी ३ आणि संध्याकाळी ७ ते लोकल सेवा सुरु असेपर्यंत सर्व महिला प्रवास करु शकतील असं पत्रात म्हटलं होतं. मुंबई आणि MMR मधील महिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात यावी असं विनंतीत म्हटलं होतं. त्यासाठी Q R कोडची गरज असणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
Unlock 5.0 | सणासुदीच्या काळात ३९२ विशेष गाड्या धावणार
ऑक्टोबर महिन्यातील आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने 392 विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन (festival special trains) या नावाने सर्व गाड्या धावणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात ९ ऑक्टोबरपासून ‘या’ शहरांदरम्यान स्पेशल एक्स्प्रेस रेल्वेगाड्या धावणार
रेल्वे सेवेअभावी कोंडीत सापडलेल्या राज्यातील जनतेला काही प्रमाणात दिलासा देणारी घोषणा मध्य रेल्वेनं केली आहे. येत्या ९ ऑक्टोबरपासून (शुक्रवार) पाच एक्स्प्रेस गाड्या सुरू करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे.
5 वर्षांपूर्वी -
लोक बेरोजगार होत आहेत | कर्मचाऱ्यांच्या लोकल प्रवासाबाबत विचार करावा - मुंबई उच्च न्यायालय
‘लोक बेरोजगार होत आहेत, त्यांची उपासमार होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता नियोजित पद्धतीने मुंबई लोकल व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांमधून अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त अन्य सेवांतील कर्मचाऱ्यांनाही प्रवास करण्याची परवानगी देण्याचा विचार करावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
पश्चिम रेल्वे मार्गावर २ महिला विशेषसह ६ फेऱ्या वाढणार
रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. सोमवारपासून (२८ सप्टेंबर २०२०) पश्चिम रेल्वे मार्गावर ५०० ऐवजी ५०६ फेऱ्या (local trip) धावणार आहेत. वाढवण्यात आलेल्या सहा लोकल फेऱ्यांपैकी २ महिला विशेष (Ladies special) आहेत. वाढील लोकल फेऱ्यांमुळे गर्दीचा ताण कमी होण्यास मदत होईल.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईतील महिलांसाठी आनंदाची बातमी | प. रेल्वेवर लेडीज स्पेशल ट्रेन सुरु होणार
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईची लाईफ लाईन असलेली रेल्वे सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद आहे. त्यामुळे सामान्य जनतेचे प्रचंड हाल होतायत. रोडवरील ट्रॅफीक आणि बसच्या धक्काबुक्कीतून प्रवाशांना प्रवास करावा लागतोय. त्यामुळे ट्रेन लवकरात लवकर सुरु करावी अशी मागणी सर्व स्तरातून होतेय. दरम्यान मुंबईतील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
5 वर्षांपूर्वी -
लोकल प्रवाशांना आणखी दिलासा | मध्य रेल्वेने घेतला महत्त्वाचा निर्णय
मध्य रेल्वेने अत्यावश्यक कर्मचाऱ्यासाठी धावणाऱ्या लोकलच्या फेऱ्या वाढवल्यात. आजपासून मध्य रेल्वेवर ६८ अतिरिक्त लोकल धावणार आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेवरी लोकल फेऱ्यांची एकूण संख्या ४२३ इतकी झाली आहे. कोरोनाकाळात लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. या आधी पश्चिम रेल्वेनेही लोकल फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबईची लाईफलाईन रुळावर येणार
एवढ्या दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबई लोकल सोमवारपासून धावणार आहे. पण लोकल ट्रेन फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू होणार आहे. रेल्वेकडून रविवारी रात्री उशिरा अधिकृत माहिती देण्यात आली. पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर लोकल धावणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुंबईत धावणारी एसी लोकल उद्यापासून बंद - पश्चिम रेल्वे
राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने वाढत चालला आहे. कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ होत ४९ वर येऊन पोहचला आहे. अशामध्ये सरकारकडून वारंवार आवाहन करुन देखील गर्दी कमी होत नाही. त्यामुळे गर्दी कमी करण्यासाठी नाईलास्तव लोकल बंद करावी लागेल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
टोलवाटोलवीनंतर मुंबई महापालिकेची कबुली, त्या पुलाची जबाबदारी आमची होती
महापालिकेच्या मुख्यालयापासून जवळच असलेला छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानका जवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळला. या दुर्घटनेत ६ मुंबईकरांचा मृत्यू झाला असून ३१ जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटने नंतर शिवसेना प्रणित मुंबई महानगर पालिका आणि रेल्वे मध्ये चांगलीच टोलवाटोलवी रंगली. सुरुवातीला तर दोघांनीही एकमेकांकडे बोट दाखवत आपली जबाबदारी सपशेल झटकली.
6 वर्षांपूर्वी -
परप्रांतीय लोंढ्यांमुळे मुंबई लोकल सेवेचा ताण वाढत आहे - मुंबई उच्च न्यायालय
परप्रांतीय लोंढ्यांमुळे मुंबई लोकल सेवेचा ताण वाढत आहे, मुंबई उच्च न्यायालयाने चिंता बोलून दाखवली. राज ठाकरेंच्या दूरदृष्टीतून महाराष्ट्राला स्वतंत्र रेल्वे बोर्ड असावा ही मागणी रास्त नाही का? आपले मत नोंदवा.
7 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रासाठी स्वतंत्र रेल्वे बोर्ड - मनसे ब्लू-प्रिंट २०१४
सप्टेंबर २०१४ मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जनतेपुढे सादर केलेल्या ब्लू-प्रिंट’मध्ये ‘महाराष्ट्रासाठी स्वतंत्र रेल्वे बोर्ड’ चा मुद्दा अधोरेखित केला होता. त्याचा अधिकृत विडिओ सुद्धा सर्वत्र वायरल होत आहे. त्यामुळे राज ठाकरे यांची राज्याच्या विकासाप्रती असलेली दूरदृष्टी अधोरेखित होत आहे.
7 वर्षांपूर्वी