Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
वसईत अंबाडी शिरसाड मार्गच पाण्याखाली, संपूर्ण गाव पाण्याने वेढलं गेलं
वसई तालुक्यात दोन दिवसापासून पडणारा पाऊस, समुद्राची भरती, व तानसा धरणाचे पाणी या मुळे वसई पूर्व भागात पूरस्थिती निर्माण झाली असून तानसा नदीच्या काठावरील पारोळ, शिरवली, सायवन, उसगाव, चांदीप,घाटेघर, कोपर, नवसई, भाताणे, खानीवडे, खारट तारा, मांडवी, या गावात पुराचे पाणी आले असून, घरात पाणी जाऊन या भागातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर शिरसाड अंबाडी मार्ग पाण्याखाली गेल्याने ग्रामीण भागाचा वसई, विरार, नालासोपारा शहराशी संपर्क तुटला आहे
6 वर्षांपूर्वी -
पावसामुळे मुंबई आणि आसपासच्या शहरातील वाहतूक जवळपास ठप्प होण्याच्या दिशेने
मुंबई आणि परिसरात कालपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने थैमान घातले आहे. आजही दिवसभर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असून आज हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे गरज नसल्यास घराबाहेर पडू नका, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचल्याने रस्ते वाहतूक कोलमडली असून रेल्वे रूळही पाण्याखाली गेल्याने रेल्वे वाहतूकही कोलमडली आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मुसळधार पावसाने मुंबईला झोडपले; पाणी साचल्याने अनेक मार्ग देखील बंद
मुंबईसह उपनगरांत शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. श्रावण महिना गुरुवारी सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी पावसानं दडी मारली होती. परंतु त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यानं दमदार हजेरी लावली आहे. मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरात शुक्रवार सकाळपासूनच पावसाने जोर धरला. पूर्व आणि पश्चिम उपनगरात सायन, कुर्ला, वांद्रे-कुर्ला संकुल, साकिनाका, अंधेरी, पवई, विद्याविहार, घाटकोपर, कांजूरमार्ग, भांडुप, मुलुंड, पवई, विलेपार्ले, जोगेश्वरी, मालाड परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. मुसळधार पाऊस पडत असतानाच, वेगाने वाहणा-या वा-यांमुळे पावसाचे टपोरे थेंब मुंबईकरांना चिंब भिजवत आहेत. या मुसळधार पावसानं सखल भागात पाणी साचलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
राजापुरात पुन्हा पूर, चिपळुणात वाशिष्ठी तर खेड'मध्ये जगबुडी नदीची पातळी वाढली
जिल्ह्यात मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा जलप्रलय झाला आहे. राजापूर शहरात पाणी भरले असून चिपळुणातील वाशिष्ठी नदीचेपाणी वाढू लागले आहे. रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई येथेही पूर आला आहे. वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे रत्नागिरीत शाळा सोडून देण्यात आल्या आहेत.
6 वर्षांपूर्वी -
महालक्ष्मी एक्सप्रेसमधल्या ५०० प्रवाशांना वाचवण्यात यश
महालक्ष्मी एक्सप्रेसमधील प्रवाशांच्या मदतीला नौदल, हवाईदल देखील कार्यरत करण्यात आलं होतं. मुंबईहून कोल्हापूरला जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस शुक्रवारी रात्रीपासून वांगणी येथे अडकली आहे. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी रुळावर साठलं आहे. एक्सप्रेसमध्ये ७०० प्रवासी अडकले होते. यापैकी ५०० प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO : महालक्ष्मी एक्स्प्रेस वांगणीजवळ अडकली, एनडीआरएफचे पथक घटनास्थळी
मुसळधार पावसामुळे बदलापूर, वांगणी परिसरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, रेल्वेरूळ पाण्याखाली गेल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेस बदलापूर-आणि वांगणी स्थानकांच्यामध्ये अडकली आहे. या ट्रेनमध्ये सुमारे दोन हजार प्रवासी असून, प्रवाशांची सुटका करण्यासाठी एन डी आर एफचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
6 वर्षांपूर्वी -
मुंबई आणि उपनगरामध्ये पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात
शहर आणि उपनगरात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू आहे. तुफान पावसाने मुंबई शहराला रात्रभर अक्षरशः झोडपून काढलं आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान शहर आणि उपनगरातील सखल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाल्यानं काही ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. भांडूप, अंधेरी, दादर, हिंदमाता, वांद्रे, माटुंगा, वडाळा, चर्चगेट या भागांमध्ये मुसळधार पाऊस बरसतो आहे.
6 वर्षांपूर्वी -
मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस, सायनमध्ये पाणी तुंबलं नसून केवळ साचलं आहे
मागील काही दिवसांपासून उसंत घेणारा वरुणराजा काल रात्री पासून मुंबईमध्ये पुन्हा जोरदारपणे दाखल झाला आहे. काल रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे सकाळी कार्यालयांकडे निघालेल्या मुंबईकरांना अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुंबईत सकाळपासून ट्रॅफिकमुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहे. तसेच अनेक ठिकाणी आणि विशेष करून सखल भागात पाणी साचल्याने स्थानिक लोकांना देखील अनेक अडचणी येत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
केरळात पावसाचे आगमन, मुंबईसह महाराष्ट्रात लवकरच रिमझिम
महाराष्ट्रासह देशभरात उष्णतेची लाट पहायला मिळत आहे. त्यामुळे प्रत्येकजण आतुरतेने पावसाची वाट बघत होते. अखेर आज केरळमध्ये पावसाचे आगमन झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून मिळाली आहे. तसेच मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. केरळमध्ये पाऊस पडल्यानंतर आठवडाभरात महाराष्ट्रात पावसाचे आगमन होते. तसेच दहा जूनला दक्षिण कोकण आणि गोव्यात अतिवृष्टीचा इशारा कुलाबा वेधशाळेकडून देण्यात आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
भर पावसात कर्तव्यदक्ष ट्रॅफिक पोलीस
भर पावसात कर्तव्यदक्ष ट्रॅफिक पोलीस
7 वर्षांपूर्वी