Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
'हॅप्पी प्रजेची सत्ता' ‘हॅप्पी रिपब्लिक डे’ मेसेज आड शोधणाऱ्यांना व्यंगचित्रच समजलं नाही?
वास्तविक इतिहासाचा आढावा घेतल्यास समाज माध्यमं नसून देखील तत्कालीन प्रसिद्ध व्यंगचित्रकारांनी प्रसिद्ध केलेली व्यंगचित्र आणि त्यामागील विचार सामान्यांना अचूक समजत असे आणि ते समाजावर होकारात्मक परिणाम करणारं ठरत असे. अगदी उदाहरच द्यायचे झाले तर, स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरे अर्थात बाळ केशव ठाकरे नावाच्या व्यंगचित्रकाराने १९६० मध्ये ‘मार्मिक’ हे व्यंगचित्र साप्ताहिक सुरु केलं. मात्र मनोरंजनाखातर बनलेलं साप्ताहिक कधी राजकीय मुखपत्र बनलं, हे त्याच्या मूळ संपादकांना आणि वाचकांना देखील कळलं नाही. ‘मार्मिक’ नावाच्या या साप्ताहिकातूनच १९६६ साली शिवसेना नावाच्या संघटनेची म्हणजे एका राजकीय पक्षाची स्थापना झाली. ज्याचे पक्षप्रमुख होते बाळ केशव ठाकरे अर्थात सर्वांना ज्ञात असलेले बाळासाहेब ठाकरे.
6 वर्षांपूर्वी -
देशातील प्रजेचे 'स्वतंत्रते न बघवते', राज ठाकरेंचा मोदी-शहा जोडीवर निशाणा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी स्वतःला बळकटी देण्यासाठी ‘प्रजासत्ताक’ फासावर लटकवल्याची बोचरी टीका राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: कोण आला रे कोण आला! महाराष्ट्राचा वाघ आला: आमचे ठाकरे! ठाकरे! ठाकरे!
ठाकरे सिनेमा प्रदर्शित करून प्रत्येक ठिकाणी सिनेमाला जाताना मिरवणुका काढतंच जा असे जणू काही पक्षाचे आदेशच असावे, असं चित्र सध्या अनेक शहरांमध्ये पाहायला मिळत आहे. सिनेमा प्रदर्शित करण्यापूर्वी अनेकांनी हीच शंका उपस्थित केली होती. पक्षाचे पदाधिकारी सुद्धा कार्यकर्त्यांना आदेश देऊन सिनेमाला जाण्यास सांगत आहेत, असे ठिकाणी प्रसार माध्यमांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे एकदा का सिनेमा प्रदर्शित झाला की पक्ष लगेचच युतीच्या बोलणीसाठी पुढे जाऊन ‘हिंदुत्वासाठी’ आम्ही एकत्र येत आहोत, असे पारंपरिक कारण पुढे करणार असल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
‘ठाकरे’ सिनेमा नक्की बघा! तो बनवतांना आम्ही अभिजीतची मेहनत पाहिली आहे: राजू पाटील
एकीकडे ठाकरे सिनेमाच्या प्रोमोवरून वाद निर्माण झाला असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते मात्र ‘ठाकरे’ सिनेमाचे दिग्दर्शक अभिजित पानसे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यासाठी सर्वांनी अभिजित पानसेंच्या मेहनतीचे कौतुक करत सिनेमा आवर्जून पाहण्याचे आवाहन केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
फडणवीस साहेब! अशाच कामगिरीचा सल्ला मोदींच्या गुजरात भाजपला सुद्धा द्यायचा होता
काल मुंबई सांताक्रूझ येथे भव्य ‘उत्तर भारतीय स्थापना दिन’ मेळावा पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, युपीचे राज्यपाल राम नाईक आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची विशेष उपस्थिती होती. दरम्यान, उपस्थित उत्तर भारतीयांना मुख्यमंत्र्यांनी संबोधित केले.
6 वर्षांपूर्वी -
मनसे लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार, चाचपणी सुरू : सविस्तर
महिन्याभरावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीत मनसे उतरणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यासाठी मनसेकडून आकड्यांची चाचपणी सुरु झाली आहे. त्यानुसार २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत म्हणजे मोदी लाटेत सुद्धा पक्षाला मतदाराने ज्या लोकसभा मतदारसंघात चांगला प्रतिसाद दिला होता, त्याची आकडेवारी समोर ठेऊन मतदारसंघ निश्चिती होणार आहेत. त्यामुळे मोदी लाटेत मिळालेला प्रतिसाद, मतदारसंघ आणि उमेदवार या सगळ्याचा अभ्यास आधीच युद्धपातळीवर सुरु होता असे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोबाइल-सोनसाखळी चोर निघाला शिवसेना शाखाप्रमुखाचा मुलगा, स्थानिकांनी चांगलच झोडलं
अंधेरी पूर्वेकडील वॉर्ड क्रमांक ८० च्या शिवसेना शाखाप्रमुख कविता पांचाळ यांचा मुलगा विनायक याला तेथील स्थानिक लोकांनी तुफान तुडवून चांगलाच राग व्यक्त केला. त्याला भर रस्त्यात मार दिल्यानंतर स्थानिक पोलिसांच्याही स्वाधीन केलं. दरम्यान, विनायक विरोधात याआधी ५० पेक्षा अधिक मोबाइल चोरी तसेच सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
बेस्ट संप: मनसे रस्त्यावर उतरली, कोस्टल रोडचं काम बंद पाडलं, पहिला दणका सत्ताधाऱ्यांना
बेस्ट संपावर तोडगा न काढल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरली आहे आणि पहिला दणका कोस्टल रोडच्या बांधकामाला आणि काँट्रॅक्टरला दिला आहे. कालच मुंबईत तमाशा करु असा इशारा बेस्ट प्रशासनाला दिल्यानंतर मनसे रस्त्यावर उतरली आहे.
6 वर्षांपूर्वी -
BEST संपाबाबत तोडगा काढण्यासाठी राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये थोड्याच वेळात बैठक
BEST कामगारांचा संप न मिटल्यानं मुंबईकरांच्या समस्या संपण्याचं नाव घेत नाही. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा सलग ७वा दिवस आहे. महाराष्ट्र सरकारच्या उच्चस्तरीय समितीबरोबर चर्चा केल्यानंतर सुद्धा लेखी आश्वासन मिळेपर्यंत BEST कामगार संघटना अजून माघार घेण्यास तयार नाहीत.
6 वर्षांपूर्वी -
‘हुद्दा घालवला आणि खड्डा कमावला’ : राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून सीबीआय संचालक आलोक वर्मा प्रकरणी मोदी सरकारवर व्यंगचित्रातून बोचरी टीका केली आहे. व्यंगचित्रामध्ये एका बाजूला पंतप्रधान मोदी खड्डा खोदताना रेखाटले आहेत. या भागाला त्यांनी ‘हुद्दा घालवला आणि खड्डा कमावला’ असे नाव दिले आहे. तसेच यात वर्मा प्रकरण मृतदेहाप्रमाणे दाखवले आहे. त्यामुळे वर्मा प्रकरण खड्यात गाडून संपवून टाकण्याचे मोदींचे प्रयत्न व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
Video बघा! म्हणजे आर्थिक आरक्षणामुळे इतर आरक्षणात बेईमानी होणार? की मोदींनी राज यांचा 'तो' मुद्दा ढापला?
नुकतंच मोदी सरकारने लोकसभा आणि राज्यसभेत विधेयकाद्वारे सवर्णांसाठी १० टक्के आर्थिक आरक्षणाची तरतूद केली. परंतु, २०१५ साली नरेंद्र मोदी यांनी एका भर सभेत ५० टक्क्यांच्या वर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आरक्षण देता येत नाही. जर द्यायचेच असेल तर इतर उपलब्ध आरक्षणात काही ना काही बेईमानी करावीच लागते, असं जाहीर पणे सांगताना दिसत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
बेस्टचे कर्मचारी व कुटुंबीय राज ठाकरेंकडे पोहोचताच सरकारला ३ दिवसांनी जाग, मंत्रालयात बैठक
बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा कायम राहिल्याने मुंबईकरांचे प्रचंड हाल पाहायला मिळत आहेत. दरम्यान, संप सलग तिसऱ्या दिवशीसुद्धा बेस्टचे सुद्धा मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ‘बेस्ट’ला या संपामुळे अंदाजे ५ ते ६ कोटींच्या महसुलाचा फटका बसल्याचे वृत्त आहे. आज संपावर तोडगा निघाला नाही तर बेस्टच्या कार्यालयीन विभागातील कर्मचारी सुद्धा संपात सामील होतील असं सांगण्यात येत आहे.
6 वर्षांपूर्वी -
अविनाश जाधव व MMRDA अतिरिक्त आयुक्तांची भेट, रखडलेल्या रांजणोली व मानकली उड्डाणपुलांचे काम सुरू होणार
MMRDA च्या माध्यमातून प्रस्तावित आणि मागील ५ वर्षांपासून रखडलेल्या रांजणोली-मानकोली या दोन उड्डाणपुलांचे काम या महिन्याच्या अखेरीस सुरु होणार असल्याचे आश्वासन MMRDAचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिले आहे. मनसे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत MMRDAचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांची भेट घेतली आणि बैठकीत सर्व विषय तसेच अडचणीचा पाढा वाचला.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: नाशिकरांची २०४१ पर्यंत तहान भागवणार; 'राज' स्वप्नं म्हणजे मुकणे पाणीपुरवठा योजना लवकरच सज्ज
नाशिकमधील मनसेच्या सत्ताकाळातील अजून एक महत्वपूर्ण योजना पूर्णत्वाच्या दिशेने मार्गक्रमण झाली आहे. नाशिक शहरासाठी महत्वाचा आणि २०४१ पर्यंत नाशिक शहराची तहान भागवेल अशी मुकणे पाणीपुरवठा योजना लवकरच कार्यान्वित होण्याच्या मार्गावर आहे. सत्ताकाळात राज ठाकरे यांनी या योजनेचे जनतेला जाहीर सादरीकरण सुद्धा केलं होतं. आता त्याच महत्वाकांक्षी प्रकल्पाचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण झाला आहे.
6 वर्षांपूर्वी -
होय जाणारच अमितच्या लग्नाला, त्यात राजकारण नाही! आदित्य ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरेचं लग्न येत्या २७ जानेवारीला होणार आहे. त्यानिमित्त राज ठाकरे यांनी अमित ठाकरेंच्या लग्नाची पत्रिकाही मातोश्रीवर नेऊन दिली, उद्धव ठाकरेंच्या कुटुंबाला लग्नाचे निमंत्रण दिले. परंतु, पत्रकारांनी आदित्य ठाकरेंना लग्नाला जाणार का असा गमतीने प्रश्न विचारला.
6 वर्षांपूर्वी -
मनसेचे नाव पुढे करून आयोजकांवर नागपूरहून दबाव आला का? असीम सरोदे
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित उद्घाटक साहित्य अकादमी पुरस्कारविजेत्या लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्याच्या निर्णयावरुन मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. मनसेच्या स्थानिक शाखेने इंग्रजी लेखिका असल्याच्या कारणावरून सहगल यांना विरोध केल्याने त्यांचे निमंत्रण रद्द केले असे आयोजक कारणं देते आहे.
6 वर्षांपूर्वी -
नयनतारा सहगल यांना आमचा विरोध नाही, त्यांनी जरूर यावं : राज ठाकरे
प्रख्यात इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांना पाठवण्यात आलेले मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनाचे निमंत्रण आयोजकांनी रद्द केले आहे. त्यानंतर बरेच वादळ निर्माण झाले होते. साहित्यावर नितांत प्रेम करणारे राज ठाकरे यांच्या पक्षाकडून तशी मागणी झाल्याच्या बातम्या पुढे आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. परंतु, त्याबरोबर अनेकांनी वेगळीच शंका सुद्धा व्यक्त केली होती आणि ती म्हणजे मनसेच्या नावाने दुसरंच कोणी तरी हे करत आहे का, असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला होता.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: दिव्यांग महिलेची टिंगल करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला महाराष्ट्र सैनिकाच्या मदतीने अद्दल घडवली
दिवा येथे वास्तव्यास असणाऱ्या नूतन शेलार या दिव्यांग महिला असून, त्या काही कामानिमित्त घाटकोपर मार्गे अंधेरी येथे आल्या होत्या. त्यांच्या सोबत कुटुंबातील इतर सदस्य सुद्धा उपस्थित होते. दरम्यान, अंधेरी येथे मेट्रोने उतरताच त्या वॉशरूमच्या दिशेने जात असताना तिथल्या सुरक्षा रक्षकाने त्यांच्या चालण्याची टिंगल टवाळी करण्यास सुरुवात केली.
6 वर्षांपूर्वी -
शेलार मामा, हे बघा! भागवतांना सुद्धा चौकीदारची मूलाखत समजली नाही: गजानन काळे
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुलाखतीवरून एक व्यंगचित्र प्रसिद्ध केलं आणि ते भाजपच्या चांगलंच जिव्हारी लागल्याचे दिसले. त्या व्यंगचित्रात स्वतः मोदी हेच मोदी यांना प्रश्न विचारत असल्याची मार्मिक टिप्पणी केली होती. त्यावर चवताळलेले भाजपचे मुंबई शहर अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी लगेच ट्विट करत, ‘राज ठाकेर यांना ही मुलाखत समजणं अवघड असून त्यांनी चला हवा येऊ द्या, हा कार्यक्रम बघावा’, असा खोचक टोला लगावला होता.
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंचा अपवाद वगळता, एकाही मराठी नेत्याला मराठी सिनेमाबाबत कळकळ नाही: मांजरेकर
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व कोण? हा प्रश्न विचारला तर अर्थात समोर नाव येते ते पुलंचेच. होय! पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांच्या नावाची काय जादू आहे हे महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षक आज सुद्धा जाणतो. लवकरच म्हणजे अगदी शुक्रवारी त्यांच्या आयुष्यावर ‘भाई’ हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. परंतु, दुर्दैव हे की अशा महान व्यक्तिमत्वाच्या जीवनावर आधारित सिनेमासाठी मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील महत्वाच्या थिएटर्समध्ये स्क्रीन आणि प्राइमटाइमच उपलब्ध नाही.
6 वर्षांपूर्वी