Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
ब्लू-प्रिंट व्हिडिओ: राज ठाकरेंच्या कल्पनेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या महापरिनिर्वाणदिनी लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येऊन त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतात. यावर्षीच्या महापरिनिर्वाणदिनीही लाखो लोकांनी चैत्यभूमीवर उपस्थिती दर्शवली. वास्तविक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला वाचा, शिका आणि संघटित व्हा असा दीर्घकालीन संदेश दिला होता.
6 वर्षांपूर्वी -
व्हिडिओ: राम मंदिर; नक्की कोण कॉपी करतंय? राज मार्चमध्ये म्हणाले होते, तर प्रकाश आंबेडकर महिन्यापूर्वी
सध्या लोकसभा निवडणूक जवळ येताच राम मंदिराच्या राजकारणाने जोर धरला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना डोकं नाही, आणि ते माझीच कॉपी करत आहेत, अशी टीका भारिप बहुजन संघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. दरम्यान, राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केवळ मराठा समाजाची मते मिळवण्यासाठीच मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला, असे ते प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
भगवान हनुमानाची जात काढली जात आहे, सतर्क रहा! देशात दंगली भडकवण्याची तयारी
अयोध्येतील राम मंदिराच्या नावाने दंगली भडकवण्याची तयारी सध्या दिल्लीत सुरु आहे असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी विक्रोळी महोत्सवादरम्यान उपस्थितांना संबोधित करताना केला. एमआयएम’चे ओवेसी यांच्यासोबत त्यासंबंधित बोलणी सुरु असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. त्यासाठी अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा पुढे करून दंगली भडकवण्याची जोरदार तयारी सुरु आहे. दिल्लीतुनच मला एकाने तशी फोनवरून माहिती दिली आहे असं राज ठाकरे म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
हिंदीचा अपमान केल्याप्रकरणी राज ठाकरेंविरोधात याचिका दाखल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी उत्तर भारतीय पंचायत ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित राहून हिंदीतून भाषण केले. त्यानंतर देशभर त्यांनी साधलेल्या या हिंदी भाषेतील संवादाची चर्चा रंगली आहे. परंतु आता त्यांच्या या भाषणाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंच्या 'पंचायतीतील' कट्टर मराठी बाण्यामुळे शिवसेनेची मराठी मंतांची पंचायत?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबई कांदिवली येथे उत्तर भारतीय महापंचायत समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून उपस्थिती लावत स्वतःची भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, उत्तर भारतीयांच्या बाबतीत ते नेमकी कोणती भूमिका मांडतात यावर प्रसार माध्यमं आणि सर्वच प्रमुख पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे. भाषणातील मराठीचा हिंदीत अनुवाद करताना चुकीची माहिती हिंदी भाषिक राज्यांमध्ये प्रसारित केली जाते, त्यामुळे त्यांनी हा संवाद देशभर समजावा म्हणून हिंदीत भाषण केले.
7 वर्षांपूर्वी -
उत्तर भारतीय पंचायत: राज ठाकरे दिसत होते त्यापेक्षाही खूप कट्टर मराठी असल्याचे सिद्ध झाले
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबई कांदिवली येथे उत्तर भारतीय महापंचायत समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून उपस्थिती लावत स्वतःची भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, उत्तर भारतीयांच्या बाबतीत ते नेमकी कोणती भूमिका मांडतात यावर प्रसार माध्यमं आणि सर्वच प्रमुख पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे. भाषणातील मराठीचा हिंदीत अनुवाद करताना चुकीची माहिती हिंदी भाषिक राज्यांमध्ये प्रसारित केली जाते, त्यामुळे त्यांनी हा संवाद देशभर समजावा म्हणून हिंदीत भाषण केले.
7 वर्षांपूर्वी -
हिंदी प्रसार माध्यमं मराठीचा चुकीचा अनुवाद देतात, म्हणून राज ठाकरे हिंदीत संवाद साधणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे काही वेळातच मुंबई कांदिवली येथे उत्तर भारतीय महापंचायत समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून उपस्थिती लावणार आहेत. परंतु, उत्तर भारतीयांच्या बाबतीत ते नेमकी कोणती भूमिका मांडतात यावर प्रसार माध्यमं आणि सर्वच प्रमुख पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे.
7 वर्षांपूर्वी -
आज राज ठाकरे उत्तर भारतीय महापंचायत मंचावर मराठीची भूमिका मांडणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज संध्याकाळी मुंबई कांदिवली येथे उत्तर भारतीय महापंचायत समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून उपस्थिती लावणार आहेत. परंतु, उत्तर भारतीयांच्या बाबतीत ते नेमकी कोणती भूमिका मांडतात यावर प्रसार माध्यमं आणि सर्वच प्रमुख पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे.
7 वर्षांपूर्वी -
नवा महापौर बंगला: राज ठाकरेंच्या तंबीनंतर शिवाजी पार्क बीएमसी जिमखान्याच्या जागेचा नाद पालिकेने सोडला?
काही दिवसांपासून मुंबई महापौरांच्या नव्या बंगल्यासाठी जागेचा शोध सुरु आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेत सत्ताधारी असणाऱ्यांचा दादरच्या शिवाजी पार्कवरील म्युनिसिपल जिमखान्याच्या जागेवर डोळा असल्याची बातमी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कानावर आली होती.
7 वर्षांपूर्वी -
व्हिडिओ: युती सरकारविरोधात महाराष्ट्र सैनिक व शेतकऱ्यांचा महासागर लोटला, महिलांचा मोठा सहभाग
राज्यातील ग्रामीण भागात बळीराजा दुष्काळाच्या झळा सोसत असताना भाजप आणि शिवसेना धार्मिक व जातीय मुद्दयांमध्ये मश्गुल झाली आहे. दरम्यान, दुष्काळासारख्या गंभीर मुद्यांवर झोपलेल्या भाजप – शिवसेना सरकारला जागं करण्यासाठी मनसेचा महाराष्ट्र सैनिक आणि मराठवाड्यातील शेतकरी रस्त्यावर उतरला आहे.
7 वर्षांपूर्वी -
मनसैनिकांना 'दंडुका मोर्चा'त 'दडुंका-बंदी' घालून पोलीस दंडुका घेऊन बंदोबस्तावर येणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शेतकऱ्यांच्या विविध समस्या अधोरेखित करण्यासाठी आणि दुष्काळासारख्या गंभीर मुद्यावर झोपलेल्या भाजप-शिवसेना सरकारला जाग आणण्यासाठी औरंगाबाद येथे भव्य दंडुका मोर्चाचे आज आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, मोर्चासाठी येताना स्वत: जवळ कोणतेही शस्त्र बाळगू नये याची दक्षता घ्यावी आणि पोलिसांनी दिलेल्या परवानगीमधील सर्व अटींचे तंतोतंत पालन करावे. तसेच कायद्याचा आदर राखावा, असं आवाहन पोलिसांनी आंदोलकांना केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
प्रभू श्रीराम म्हणतात, देश घातलात खड्यात आता माझ्या नावाने!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सद्यस्थितीवर भाष्य करणारे व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे. त्यांनी आजच्या व्यंगचित्रातून अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्यावर शिवसेना, भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांवर बोचरी टीका केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे नाव कोणाच्या तरी स्वार्थासाठी वापरले जात आहे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबई महापालिकेत जाऊन आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली आहे. या भेटी दरम्यान त्यांनी आयुक्तांसोबत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे नाव हे केवळ कोणाच्या तरी स्वार्थासाठी वापरले जात आहे. आज हे महापौर बंगला मागत आहेत, उद्या राज भवन सुद्धा मागतील. त्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी जागा मिळू नये ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याचं राज ठाकरे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे आझाद मैदानावर जाऊन उपोषणाला बसलेल्या शिक्षकांची भेट घेणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज दुपारी मुबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेणार आहेत. आज मुंबई महानगरपालिका मुख्यालयात दुपारी १.०० वाजता ही भेट होणार असल्याचे समजते. काही दिवसांपासून विविध प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदानावर उपोषणास बसलेल्या शिक्षकांची सुद्धा ते भेट घेणार असल्याचे वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
ठाणे: आज भाजप-शिवसेना सरकार विरोधात मनसेचा महामोर्चा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नैतृत्वाखाली भाजप आणि शिवसेना सरकारविरोधात विविध विषयांच्या संदर्भात महामोर्चा काढला जाणार आहे. आज दुपारी एकच्या सुमारास तीन हात नाका ते जिल्ह्याधिकारी कार्यालय असा हा भव्य मोर्चा काढला जाणार असे वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
नवी मुंबई: शिवसैनिकांचा शिवबंधन तोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश
शिवसेना जरी आज केंद्रात आणि राज्यात सत्तेत असली तरी पक्ष नक्की सत्तेत आहे की विरोधी पक्षात हे कार्यकर्त्यांना सुद्धा कळेनासे झाल्याने संभ्रमात असलेले अनेक शिवसैनिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करत आहेत. त्याचाच प्रत्यय नवी मुंबईतील घणसोलीत आला आहे. शिवसेनेच्या अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
दुष्काळग्रस्त, तहानलेला महाराष्ट्र आणि अ'संवेदनशील' सरकार: व्यंगचित्र प्रसिद्ध
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून राज्यातील दुष्काळाने निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर वास्तव मांडताना आजारी साखर कारखाने आणि त्यांना राज्य सरकारकडून देऊ केलेली आर्थिक मदत यावर भाष्य केले आहे. यंदा सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने राज्यात नोव्हेंबरपासूनच तीव्र पाणीटंचाई सुरु झाली आहे. असं असताना सुद्धा फडणवीस सरकार तहानलेल्या ग्रामीण महाराष्ट्राला मदतीचा हात पुढे करण्याऐवजी भ्रष्टाचाराने आजारी पडलेल्या साखर कारखान्यांना आर्थिक मदत देत असून, साखर सम्राट आणि फडणवीस सरकारचं साटंलोटं असल्याचं व्यंगचित्रात दाखवले आहे.
7 वर्षांपूर्वी -
स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरेंचा आज ६ वा स्मृतिदिन, मनसे तसेच दिग्गजांकडून आदरांजली
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज ६ वा स्मृतिदिन आहे. या स्मृतिदिनाच्या निमित्ताने राज्यभरातून हजारो शिवसैनिक शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यासाठी दादर शिवाजी पार्क इथल्या शिवतीर्थावर एकत्र आले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मनसेचा औरंगाबादमध्ये दंडुका मोर्चा, नंतर राज्यव्यापी स्वरूप
महाराष्ट्रातील बहुतांश ग्रामीण भागात मोठा दुष्काळ पडला आहे. परंतु, राज्यातील युती सरकार शेतक-यांच्या सर्व प्रश्नांकडे पूणर्पणे दुर्लक्ष करत आहे. त्यासाठी आता राज्य सरकारचे डोके ठिकाणावर आणण्याची गरज असल्याने हातात दंडुका घ्यायला लागणार असल्याचा आक्रमक इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आजच्या पत्रकार देण्यात आला आहे. फडणवीस सरकारचे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना २७ नोव्हेंबरला औरंगाबादमध्ये प्रचंड मोठा दंडुका मोर्चा काढणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर या मोर्चाला राज्यव्यापी स्वरूप येईल, अशी माहिती मनसे नेते शिरीष सावंत यांनी प्रसार माध्यमांना दिली.
7 वर्षांपूर्वी -
भाजपच्या 'कार्टून' व्यंगचित्रकारांनी मनसे कार्यकर्ते सोडून शिवसैनिक दाखवले?
भाजपने काल “साहेबांचं कार्टून की कार्टून साहेब?” या शीर्षकाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची खिल्ली उडविण्याचा नादात भाजपचे कॉपीकॅट व्यंगचित्रकार भलतीच ‘कार्टूनगिरी’ करून बसले आहेत. कारण, राज ठाकरेंच्या पाठीमागे ‘मनसे कार्यकर्ते’ दाखविण्याच्या नादात खांद्यावर ‘भगवा गळपट्टा’ परिधान केलेले अनेक वरिष्ठ कार्यकर्ते, ज्यामध्ये अनेकांच्या डोक्यावर केसं कमी टक्कल अधिक असलेले कार्यकर्ते आणि पदाधिकारी दाखविण्यात आले आहेत. त्यामुळे ते मनसे कार्यकर्त्यांपेक्षा शिवसैनिक असल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे.
7 वर्षांपूर्वी