Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
उद्या चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरेंची कृष्णकुंजवर भेट | पुन्हा युतीच्या चर्चा सुरु
महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप-मनसे युतीसाठीच्या हालचाली वाढल्या आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे उद्या सकाळी साडे अकरा वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेणार आहेत. सदिच्छा भेट देणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. गुरुवारी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
अभिनेत्रीकडे शरीर सुखाची मागणी | मनसेकडून डायरेक्टरला फटक्यांची माळ
एका अभिनेत्रीकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या कास्ट डायरेक्टरला मनसेकडून चोप देण्यात आला. हिंदी सिनेमात काम देण्याचे आमिष अभिनेत्रीला त्याने दाखवले होते. त्याअभिनेत्रीने महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेकडे तक्रार केली होती.
4 वर्षांपूर्वी -
‘फडणवीस’ हे मुळात आडनाव नाही | ते मूळचं पर्शियन नाव आहे ‘फर्द नलीस’ - राज ठाकरे
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा आज वाढदिवस आहे. ते यावर्षी 100 व्या वर्षात पदार्पण करत आहे. या निमित्त आज पुण्यात सेलिब्रेशन केले जात आहे. बाबासाहेब पुरंदरेंच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी स्वतः उपस्थिती लावली. त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचे अभिचिंतन करत सत्कार केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
कुणाशीही वैयक्तिक वैर नाही | पण मला मोदी, शहांच्या भूमिका पटत नाहीत - राज ठाकरे
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा आज वाढदिवस आहे. ते यावर्षी 100 व्या वर्षात पदार्पण करत आहे. या निमित्त आज पुण्यात सेलिब्रेशन केले जात आहे. बाबासाहेब पुरंदरेंच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी स्वतः उपस्थिती लावली. त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचे अभिचिंतन करत सत्कार केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मनसे पारनेर तालुकाध्यक्षाच्या पत्नीला खंडणी प्रकरणी अटक
एकाबाजूला पक्षातील वरिष्ठ आगामी महत्वाच्या महापालिकांच्या निवडणुकीत व्यस्त आहेत तर दुसऱ्या बाजूला इतर जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय मनसेच्या अडचणी वाढवताना दिसत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातून एक धक्कादायक वृत्त समोर आली आहे, पारनेर मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तालुकाध्यक्ष बाळासाहेब माळी याची पत्नी पुष्पा माळी यांना खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. शेत जमिनीचा बेकायदा ताबा घेऊन नंतर ताबा सोडण्यासाठी एकरी पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा तीन वर्षांपूर्वी दाखल झाला होता. याबाबत सविस्तर माहिती अशी कि पारनेर तालुक्यातील रोहिदास भास्कर देशमुख यांच्या मालकीची १९ एकर जमीन आहे.
4 वर्षांपूर्वी -
पुणे महापालिकेच्या महा बजेटमधील पैसा जातोय कुठे? | माहिती घेऊन भाजपाची पोलखोल करा - राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर असून त्यांनी आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. याच पाश्वभूमीवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन ते संपूर्ण पक्षकार्याचा आढावा घेत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात
जळगाव नशिराबाद येथील आठवडे बाजारामधील विकास सोसायटी कॉम्प्लेक्स मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जळगाव ग्रामीण मध्यवर्ती कार्यलयाचे उद्धघाटन शनिवारी झाले झाले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आ जयप्रकाश बाविस्कर, जिल्हा सचिव जमील देशपांडे, मनवीसे जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे, तालुकाध्यक्ष मुकुंदा रोटे, आशिष सपकाळे, रज्जक सय्यद, किरण तळेले आदींच्या उपस्थितीत उद्धघाटन झाले.
4 वर्षांपूर्वी -
सामान्यांच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन पथक स्थापन करणारा मनसे पहिला पक्ष | राज ठाकरेंची पुण्यात घोषणा
पुणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यातील पहिल्या आपत्ती व्यवस्थापन पथकाची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यात असं पथक स्थापन करणारा मनसे हा पहिला राजकीय पक्ष ठरला आहे. पूर, इमारत दुर्घटना यासारख्या संकटकाळात हे आपत्ती व्यवस्थापन पथक सामान्य लोकांच्या प्रशासनाच्या मदतीला येईल.
4 वर्षांपूर्वी -
राज आणि माझी जुनी मैत्री, पुढच्या आठवड्यात मी मुंबईतही त्यांना भेटणार आहे - चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची आज सकाळी नाशिकच्या विश्रामगृहाच्या दारातच भेट झाली. राज यांच्या वाहनांचा ताफा येत असताना चंद्रकांत पाटील यांचा ताफा विश्राम गृहाबाहेर जात होता. त्यावेळी चंद्रकांत पाटलांनी गाडीतून उतरून राज यांना नमस्कार केला. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये विश्रामगृहाबाहेरच 15 मिनिटं चर्चा झाली. यावेळी राज ठाकरे हाताची घडी घालून उभे होते. तर चंद्रकांतदादा त्यांना हातवारे करून काही तरी सांगत होते. राज हे सर्व काही गंभीरपणे ऐकत होते.
4 वर्षांपूर्वी -
बिग बी मनाचा मोठेपणा दाखवा | अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासमोर मनसेची पोस्टरबाजी... काय कारण?
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या जूहू येथील प्रतिक्षा बंगल्यासमोर काही पोस्टर लागले आहेत. विशेष म्हणजे हे पोस्टर त्यांच्या एखाद्या चित्रपटाचे नसून राज ठाकरे यांच्या नवनिर्माण पक्षाकडून लावण्यात आले आहेत. झाले असे की, बृहन्मुंबई महानगरपालिका जवळपास एका आठवड्यापासून अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील प्रतिक्षा बंगल्याची एक भिंत पाडण्याची तयारी करत आहे. अमिताभ बच्चन यांचा बंगला संत ज्ञानेश्वर मार्गावर आहे आणि बीएमसीला हा रस्ता रुंद करायचा आहे, यामुळे अमिताभ यांच्या बंगल्याची भिंत पाडावी लागणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
मनसे प्रमुख राज ठाकरे ३ दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर जाणार | संघटनात्मक विषयांवर जोर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे काल पुण्यात आले होते. यानंतर आता पुण्यापाठोपाठ राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत. नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा नाशिक दौरा महत्वाचा मानला जात आहे. राज ठाकरे हे १६ ते १८ जुलै रोजी नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात राज ठाकरे नाशिक महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहेत. नाशिक हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जुना बालेकिल्ला राहिलेला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना नाशिक दौरा महत्वाचा मानला जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
२००९ मधील विधानसभा निवडणुकीवेळी भातखळकरांनी मनसेकडे तिकीट मागितलं होतं - राज ठाकरे
राज्याच्या राजकारणाचा भविष्यवेध घेण्याच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’कडून आयोजित ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या दूर-संवादमालिकेत राज ठाकरे यांनी त्यांचे विचार सविस्तर मांडले. यावेळी त्यांनी देशातील कोरोना स्थितीवरून देखील सविस्तर भाष्य करताना मोदी सरकारवर जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं. तसेच राज ठाकरे यांनी दलबदलू राजकीय नेत्यांवर देखील भाष्य केलं.
4 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंच्या पत्रानंतरच हाफकिनला परवानगी मिळाली, असे म्हणणे बालिशपणाचे होईल - महापौर
राज्यातील कोरोना परिस्थिती गंभीर आहे. दरम्यान राज्यात लसीच्या डोसचा तुटवडा निर्माण झाला. यानंतर केंद्र सरकार व राज्य सरकारमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले. यापार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा लसीकरण मोहिम पुर्ववत व्हावी यासाठी केंद्र सरकारने मुंबईतील हाफकिन संस्थेला लस निर्मितीची परवानगी दिली. मात्र, आता त्यावरुन आता शिवसेना आणि मनसेमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
अंबानींच्या घरावर हेलिपॅडला परवानगी मिळण्यासाठी बड्या मंत्र्याकडून सुपारी - अविनाश जाधव
सचिन वाझे प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मंगळवारी सायंकाळी जप्त केलेली मर्सिडीज कार धुळे पासिंगची असून ती मनीषा महेंद्र भावसार यांच्या नावावर असल्याचे दिसते आहे. दरम्यान, महेंद्र भावसार यांचे चिरंजीव सारांश भावसार यांनी ती विकत घेतली होती आणि फेब्रुवारी महिन्यात त्यांनी ती आॅनलाइन पोर्टलच्या माध्यमातून विकली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान याच विषयात आता राजकीय नेत्यांचे धक्कादायक दावे देखील समोर येऊ लागले आहेत. तसाच एक धक्कादायक दावा मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
दु:ख हेच की या पावतीवर बाळासाहेबांचा फोटो लावून शिवसेना फेरीवाल्यांकडून खंडणी वसूल करतेय
वीरप्पनने जेवढं लोकांना लुटलं नसेल, त्यापेक्षा जास्त सत्ताधाऱ्यांनी महानगरपालिकेला लुटलं आहे. म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत वीरप्पन गँगचा एन्काऊंटर करावाच लागेल” असं ट्विट संदीप देशपांडेंनी केलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई मनसेत लोकसभानिहाय एक नेता आणि एक सरचिटणीस | महत्वाची बैठक
कल्याण डोंबिवलीतील दोघा नेत्यांनी मनसेला रामराम ठोकल्यानंतर ‘कृष्णकुंज’वर खलबतं सुरु झाली आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेच्या प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांची बैठकीला उपस्थिती होती. मुंबईत लोकसभानिहाय एक नेता आणि एक सरचिटणीस यांची कमिटी मनसेने तयार केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कार्यकर्ता-पदाधिकारी फुटला तरी बातमी | याचा अर्थ त्या पक्षाच्या असण्याची सगळेच दखल घेतात
कल्याण डोंबवली महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेनेने मनसेला काल मोठा धक्का दिला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांच्यासह डोंबिवलीतील असंख्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.
4 वर्षांपूर्वी -
KDMC | एक फुटताच दुसऱ्याची नेमणूक | मनोज घरत मनसेचे नवे डोंबिवली शहराध्यक्ष
कल्याण डोंबवली महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेनेने मनसेला काल मोठा धक्का दिला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांच्यासह डोंबिवलीतील असंख्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.
4 वर्षांपूर्वी -
KDMC | मनसेला मोठं खिंडार | मंदार हळबे भाजपमध्ये | मनसेचा निवडणुक मार्ग खडतर
कल्याण डोंबवली महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेनेने मनसेला काल मोठा धक्का दिला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांच्यासह डोंबिवलीतील असंख्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. राजेश कदम हे पदाधिकारी असताना देखील त्यांना थेट मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षावर राजेश कदम यांचा पक्षप्रवेश देऊन राजेश कदम यांचं कल्याण डोंबिवलीत राजकीय वजन वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. साहजिकच राजेश कदम यांच्या शिवसेना प्रवेशाने मनसेला मोठा फटका बसणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंचा अयोध्या दौरा | विश्वहिंदू परिषद स्वागत आणि नियोजनासाठी सहकार्य करणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची नुकतीच घोषणा झाली. या घोषणेनंतर विश्व हिंदू परिषदेचे नेते मोहन सालेकर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. मुंबईतील कृष्णकुंज या ठिकाणी ही भेट झाली. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर निर्माण कार्यसंदर्भात विश्वहिंदू परिषद कोकण प्रांततर्फे वेगवेगळ्या स्तरावर नामांकित सन्माननीय व्यक्तींच्या भेट घेणे सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली.
4 वर्षांपूर्वी