Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
औरंगाबाद; शिवसेनेचे माजी महापौर सुदाम मामा सोनावणेंचा मनसेत प्रवेश
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. त्याचे औचित्य साधून अनेक पक्षतील नेते मंडळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती घेण्यासाठी उत्सूक असल्याचे पाहावयास मिळत आहे. त्याचा पहिला धक्का सेनेला बसला आहे, कारण औरंगाबादचे माजी महापौर राहिलेल्या एका दिग्गज नेत्याने त्यांच्या सर्व समर्थकांसोबत मनसे’मध्ये जाहीर प्रवेश घेतला आहे.
7 वर्षांपूर्वी -
ईव्हीएम बंदीबाबत राज ठाकरेंचं उद्धव ठाकरे आणि पवारांना पत्र
आगामी निवडणुकीआधी ईव्हीएम मशीन्स वरून राजकारण तापताना दिसत आहे. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या गंभीर विषयावर आक्रमक झालेले दिसत असून त्यांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन म्हणेज ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान व्हावे यासाठी थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवारांना पत्र पाठवून ईव्हीएम’ला तीव्र विरोध करण्याचं आवाहन केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून बीड, औरंगाबाद, धुळे आणि जुन्नरच्या दौऱ्यावर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून ६ दिवसांच्या बीड, औरंगाबाद, धुळे आणि जुन्नरच्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. त्यांच्या दौऱ्याची सुरुवात औरंगाबाद पासून होणार असून तिथे निरनिराळ्या पक्षातील पदाधिकाऱ्यांचा मनसेत प्रवेश, तसेच कार्यकर्त्यांशी परिसंवादाचे आयोजन करण्यात येणार आहे.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंपुढे Jio नरमली, आम्ही केबल चालकांना एकत्र घेऊन काम करायला तयार असल्याची हमी
काही दिवसांपूर्वी अनेक केबल संघटनांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेऊन जिओ केबलमुळे होणाऱ्या नुकसानाची तसेच अडचणींचा पाढा राज ठाकरे यांच्यासमोर वाचला होता. जिओमुळे त्यांच्यावर बेरोजगारीची कुराड येणार असल्याचे राज ठाकरेंच्या निदर्शनास आणले होते. त्यानंतर मनसेने थेट जिओ कंपनी सोबत पत्रव्यवहार करून त्यांच्यासोबत बैठक आयोजित केली होती.
7 वर्षांपूर्वी -
कारगिल इंटरनॅशनल मॅरेथॉन'साठी महाराष्ट्राचा 'ज्युनिअर मिल्खा सिंग' साईश्वर गुंटूक'ची निवड
तब्बल २१ किलोमीटरच्या कारगिल इंटरनॅशनल मॅरेथॉन’साठी महाराष्ट्रातील सोलापूरचा सात वर्षीय ‘ज्युनिअर मिल्खासिंग’ म्हणजे साईश्वर गुंटूक’ची निवड झाली आहे. विशेष म्हणजे ही स्पर्धा उणे ६ अंश सेल्सियस इतक्या कमी तापमानात आणि अतिशय दुर्गम भागात पार पडणार आहे.
7 वर्षांपूर्वी -
मोदी मोदी ओरडलात, पण शेवटी काय झाले ? : राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी पुण्यातील जैन समाजातील मंडळींची भेट घेतली. त्यावेळी उपस्थित जैन समाजातील लोकांना संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले की, धोनी धोनी प्रमाणे मोदी मोदी ओरडलात, पण शेवटी काय झाले, मोदींनी पहिली कुऱ्हाड व्यापाऱ्यांवरच मारली ना, असा प्रश्न उपस्थित जैन समाजातील लोकांपुढे करून मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
7 वर्षांपूर्वी -
केरळच्या पूरग्रस्तांसाठी मनसेच्या अनेक शाखांमधून लोकसहभागातून मदत रवाना
रळच्या संपूर्ण इतिहासात झाला नसेल इतका पाऊस केरळमध्ये काही दिवसांपासून पडत होता आणि त्यामुळे संपूर्ण राज्यच ठप्प झाल्यासारखी स्थिती होती. या महापूरामुळे २.२३ लाख जनता आणि ५०,०० कुटुंबे बेघर झाली आहेत. तसेच या सर्व बाधित लोकांना १,५६८ मदत केंद्रांमध्ये हलवण्यात आल्याची माहिती सुद्धा विजयन यांनी दिली आहे.
7 वर्षांपूर्वी -
मनसे महिला आघाडीच्या विधानसभा निहाय जोरदार बैठका
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्ष विस्तार आणि विधानसभा निहाय बैठका मोठयाप्रमाणावर सुरु असून, त्याला महिला पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असून ती मनसेसाठी आगामी निवडणुकीच्या निमित्ताने जमेची बाजू असल्याचे लक्षात येते. सध्या मनसे सामान्य जनतेच्या संबंधित प्रश्नांना हात घालून लोकांपर्यंत पोहोचत आहेत, तर दुसरीकडे मोठ्याप्रमाणावर पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचे मेळावे आयोजित केले जात आहेत.
7 वर्षांपूर्वी -
मुंबई गणेश मंडळांसाठी अमित ठाकरें व महाराष्ट्र सैनिक मैदानात; मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
मुंबईतील आणि गिरगावातील गणेश मंडळांसाठी राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आखाड्यात उतरले असून, त्यांनी गणेश मंडळांच्या व्यथा आणि प्रश्न घेऊन थेट मुख्यमंत्री निवास गाठलं आहे. अमित ठाकरे यांच्या बरोबर महाराष्ट्र सैनिकांच्या एका शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्र्यांची त्यांच्या वर्षा निवास्थानी भेट घेतली आहे.
7 वर्षांपूर्वी -
मेडिकल'साठी डोमिसाइल वैधच! राज ठाकरेंनी उचलून धरलेली भूमिका व महाराष्ट्र सरकारची अट सर्वोच्च न्यायालयानेही वैध ठरवली
राज्यातील मेडिकल कॉलेजांमध्ये ८५ टक्के ‘राज्य कोटा’मधील प्रवेशासाठी राज्यातील वास्तव्याचे ‘डोमिसाइल’ प्रमाणपत्र तसेच इयत्ता १०वी आणि १२वी’ची परीक्षा महाराष्ट्रातील शिक्षणसंस्थेतून उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे अशी महाराष्ट्र सरकारने घातलेली अट शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा निकालात वैध ठरवली आहे. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
7 वर्षांपूर्वी -
सरत्या दशकात आणि बदलत्या पिढीत त्यांची गरज जास्तच भासू लागली: राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वर्गीय. अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रति त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. स्वातंत्र्यपूर्व असो वा स्वातंत्र्योत्तर भारत ते नवीन सहस्रकातील भारत अशा दीर्घ पटलावर, अर्धशतकाहून अधिक कालावधीची, अटलजींची राजकीय कारकीर्द होती. पण एवढ्या दीर्घ कालावधीत अटलजी कधीच संदर्भहीन झाले नाहीत उलट, प्रत्येक सरत्या दशकात आणि बदलत्या पिढीत त्यांची गरज जास्तच भासू लागली, अशी राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
सविस्तर वृत्त: सरकार दरबारी दखल घेतली जात नसल्याने महाराष्ट्राचा ज्युनिअर मिल्खासिंग साईश्वर कृष्णकुंजवर
वयाच्या सातव्या वर्षीच देशातील अनेक मॅरेथॉन स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करून केवळ देशातच नव्हे तर परदेशी स्पर्धकांवर सुद्धा साईश्वरने छाप पाडली आहे. अल्पावधीतच साईश्वर गुंटूक’ला लोकं ‘ज्युनिअर मिल्खासिंग’ या नावाने ओळखू लागले आहे. मूळचा सोलापूरचा असलेला साईश्वर केशव गुंटूकचे सातव्या वर्षातील विक्रम बघितल्यावर थक्क व्हाल असच त्याच कर्तृत्व आहे.
7 वर्षांपूर्वी -
जनहिताच्या बांधकामात दिरंगाईमुळे कंत्राटदार व अभियंत्याला चोप, मनसे नगरसेवक संजय तुर्डे यांना अटक
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक संजय तुर्डे यांना कुर्ला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर मुंबई महापालिकेचे कंत्राटदार आणि अभियंत्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तशी रीतसर तक्रार संबंधित कंत्राटदार आणि अभियंत्यांनी केल्यामुळे त्यांना अटक झाली आहे.
7 वर्षांपूर्वी -
वॉटर कप; राज ठाकरेंनी मांडलेलं सिंचन क्षेत्रातील वास्तव उपस्थितांना रुचलं, पण अजित पवारांना का झोंबल?
काल पुण्यामध्ये पाणी फाऊंडेशनच्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या थाटात पार पडला. या कार्यक्रमाला राज्यातील अनेक मान्यवर नेत्यांनी उपस्थिती लावली होती. मात्र चर्चा रंगली ती मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्याच्या सिंचन क्षेत्रातील मांडलेल वास्तव, जे अजित पवारांना झोंबल्याचे पाहायला मिळालं.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे ‘लेखका’च्या भूमिकेत? गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जीवनावर पुस्तक लिहिणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे जरी एक आक्रमक आणि अभ्यासू नैतृत्व म्हणून महाराष्ट्राला परिचित असले तरी त्यांच्या मध्ये एक उत्तम कलाकार सुद्धा दडलेला आहे हे सर्वश्रुत आहे. त्यांना कला, साहित्य आणि संस्कृती या विषयाची उत्तम जाण असल्याचे त्यांच्या विचारात जाणवते. त्याच आक्रमक राजकारण्यामागील दडलेला लेखक लवकरच सर्वांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.
7 वर्षांपूर्वी -
बाप्पासाठी मनसेचा बिनधास्त मंडप? राम मंदिर नक्की बांधा, त्याआधी मुंबईत गणपती मंडपांसाठी परवाणगी द्या
मुंबई महापालिकेने गिरगावमध्ये मंडप उभारण्यासाठी गणेश मंडळांना परवानगी नाकारली होती. मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता असून सुद्धा गिरगावमध्ये मंडप उभारण्यासाठी महापालिकेकडून परवानग्या मिळत नसल्याने गणेश मंडळांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली होती.
7 वर्षांपूर्वी -
राज्य सरकार पलटलं, मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास बंदी कायम
नागपूरच्या पावसाळी अधिवेशनात निवेदन देऊन मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी असल्याचं मान्य करणारऱ्या राज्य सरकारने काही दिवसातच सुरक्षेच कारण पुढे करत स्वतःचाच निर्णय फिरवला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून विधिमंडळात दिली जाणाऱ्या निवेदनांवर सामान्यांनी किती विश्वास करावा असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
7 वर्षांपूर्वी -
म्हाडाने करार केल्याशिवाय मुंबई 'बीडीडी चाळीं'च्या रहिवाशांनी घर सोडायचं नाही
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज बीडीडी चाळींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी विविध प्रश्नां संदर्भात कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली. मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागला आहे, तरी रहिवाशांचे अनेक प्रश्न अनुत्तरित असल्याने अखेर रहिवाशांनी राज ठाकरेंकडे सर्व प्रश्न आज भेट घेऊन मांडले.
7 वर्षांपूर्वी -
गणेश उत्सव आला की सुटले सरकारचे फर्मान : राज ठाकरे
आज नवी मुंबईमध्ये महानगरपालिका कर्मचारी मेळावा पार पडला. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी अनेक गंभीर मुद्यांना हात घातला. लवकरच गणपती उत्सव सुरु होणार असून त्याआधी न्यायालय आणि मुंबई महानगर पालिकेकडून निरनिराळे फार्मन सुटू लागल्याने राज ठाकरेंनी त्या मुद्याला हात घातला आहे.
7 वर्षांपूर्वी -
आंदोलना दरम्यान परप्रांतीयांच्या हिंसक प्रकारामुळे नाव मराठा समाजाचं खराब होतंय: राज ठाकरे
आज नवी मुंबईमध्ये महानगरपालिका कर्मचारी मेळावा पार पडला. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी अनेक गंभीर मुद्यांना हात घातला. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना राज ठाकरे यांनी परप्रांतीयांनी हिंसक घटना घडवून मराठा समाजाचं खराब करण्याचा प्रयत्नं केला असा गंभीर आरोप केला.
7 वर्षांपूर्वी