Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Fake Twit Alert | शर्मिला ठाकरेंच्या नावाने कंगनाचं समर्थन | तर सेनेविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया
कंगना रणौत आणि शिवसेना वाद जबरदस्त पेटला आहे. असे असतानाच, आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले हरियाणाचे गृह आणि आरोग्यमंत्री तथा भाजपाचे आक्रमक नेते अनिल विज यांनी या वादात उडी घेतली आहे. त्यांनी शिवसेनेला इशारा देत, शिवसेनेचे नेते सत्य बोलण्यापासून कुणालाही रोखू शकत नाही, असे म्हटले आहे. एवढेच नाही, तर मुंबई काय शिवसेनेच्या बापाची आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
अन्यथा सरकारचे आदेश झुगारुन मंदिर प्रवेश करु | राज ठाकरेंचा इशारा
सरकारने मंदिरं सगळ्यात शेवट उघडून उगाच नको ते पुरोगामीत्व दाखवू नये त्यापेक्षा एक नियमावली आखावी आणि हिंदुजनांच्या मंदिर प्रवेशाचा मार्ग मोकळा करावा. पण तरीही सरकारने जर ह्या विषयी लवकरात लवकर सकारात्मक पाऊल उचललं नाही तर आम्हाला नाईलाजाने सरकारच्या आदेशांना झुगारून मंदिर प्रवेश करावा लागेल, पण ही वेळ सरकार आमच्यावर येऊ देणार नाही अशी अपेक्षा आहे अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंची महाराष्ट्र सैनिकांना भावनिक साद | काय म्हटलं आहे पत्रात
नांदेडमधील किनवट येथील मनसेच्या शहराध्यक्षाने गळफास घेऊन आत्महत्या केली, यावेळी त्याने राजसाहेब माफ करा, अशा आशयाने सुसाईड नोट लिहिली होती. जात आणि आर्थिक यावर राजकारण होत आहे. त्यामुळे पुढील राजकारण मी करु शकत नाही असं सांगत त्याने आत्महत्या केली. यानंतर मनसेच्या नेत्यांकडून कार्यकर्त्यांकडून सुनील ईरावार याला श्रद्धांजली वाहण्यात आली.
5 वर्षांपूर्वी -
केंद्र सांगत जिम सुरु करा | राज्य म्हणतं नको | यांना वेगळी अक्कल आहे का - राज ठाकरे
तुम्ही जिम सुरु करा, किती दिवस लॉकडाउनमध्ये काढणार आहात? असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जिम चालकांना जिम सुरु करण्याचे आवाहन केले. राज्य सरकारने अजूनही जिम चालकांना जिम सुरु करण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे मागच्या काही दिवसांपासून या व्यवसायाशी संबंधित असलेले लोक राज्यात आंदोलन करत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
राम मंदिराचं भूमिपूजन थोडं थांबून धूमधडाक्यात होणं गरजेचं होतं - राज ठाकरे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाच ऑगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. हा भूमिपूजनाचा सोहळा पार पडल्यानंतर त्याच दिवशी पंतप्रधानांच्या हस्ते राम मंदिराची प्रातिनिधिक चित्र असणारे आणि रामायणावर आधारित पोस्टाचे तिकीट प्रकाशित केले जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कोरोना आपत्तीच्या काळात होणाऱ्या याच भूमिपूजनावरून देशभर चर्चा रंगली आहे. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ई-भूमिपूजनाचं वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर हिंदुत्ववादी संघटना आणि समर्थकांनी जोरदार टीका केली होती.
5 वर्षांपूर्वी -
कोणाच्या म्हणण्यानं राज ठाकरे काही करतील, असे ते व्यक्ती नाहीत - फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांनी एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. राज्यातील सध्याची कोरोना परिस्थिती, राजकारण, देशाची आर्थिक परिस्थिती आणि सोशल मीडियावर ट्रोलिंगवरही त्यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली.
5 वर्षांपूर्वी -
राजकारणापलीकडे नाते टिकून ठेवणाऱ्या राज ठाकरेंना राऊतांनी अशा दिल्या शुभेच्छा
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. संजय राऊतांनी ट्विट करून राज ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. वाद वादळातही मित्रत्वाचे नाते टिकून राहिले..असे म्हणत संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
परीक्षा घेण्याचा अट्टाहास कशासाठी? अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करा - राज ठाकरे
कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या विविध शाखांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात यावी अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. राज ठाकरे यांनी हे पत्र सोशल मीडियावर शेअर केलं आहे. मे महिना संपत आला तरी राज्यातील विविध विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांचा निर्णय होत नाहीये आणि यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात आहे मला विद्यापीठांचे कुलपती नात्याने तुमच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची राजकीय निवृत्तीची घोषणा
मनसेचे नेते व कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. राजकारणातून निवृत्ती घेताना त्यांनी आपल्या उत्तराधिकारी म्हणून पत्नी संजना जाधव यांच्या नावाची घोषणा केली आहे. जाधव यांचा हा निर्णय मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
विकृत करूच नये अन केलं तर विकृती प्रमाणे मार सुद्धा खावा; रुपाली पाटील यांचं मनसे समर्थन
राज्यात एकीकडे कोरोनाचं संकट असताना राजकीय वातावरणही पेटू लागलं आहे. मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीत एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटू लागले आहे. लॉकडाऊनच्या काळातही खुद्द तरुणाला मंत्र्यांच्या बंगल्यात बोलावून ही मारहाण झाल्याने विरोधकांनी सरकारवरच निशाणा साधला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे म्हणाले होते, जेव्हा संकट येईल तेव्हा परप्रांतीय पळ काढतील; आज तेच चित्र?
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने पुणे, मुंबई, नागपूर आणि पिंपरी-चिंचवड ही चार शहरं ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश दिले. अशा परिस्थितीमध्ये कोरोनाच्या भितीमुळे परप्रांतीय गावाकडे निघाले आहेत. मुंबई, पुण्यामध्ये कामानिमित्त आलेल्या नागरिकांनी आपल्या गावाकडे जाण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मुंबईतील दादर, लोकमान्य टिळक टर्मिनसवर प्रवाशांची गर्दी पहायला मिळाली. तर तीच परिस्थिती पुणे रेल्वे स्थानकावर देखील आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती: राज ठाकरेंकडून महाराष्ट्र सैनिकांना 'या' मार्गदर्शक सूचना
महाराष्ट्रासह देशात करोनाचे रोज नवे रुग्ण वाढत असल्याने केंद्र आणि राज्य सरकारांनी करोना रोखण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही करोनाचा मुकाबला करण्यासाठी मनसे सैनिकांना सात सूचना केल्या आहेत. तसेच राज्यातील नागरिकांनाही दोन आठवडे सांभाळून राहण्याचं, एकमेकांच्या संपर्कात न येण्याचं, गर्दी आणि प्रवास टाळण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना संशयितांची नावं जाहीर करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
मुंबईसह महाराष्ट्रात करोनाचा फैलाव वाढतच असून महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या ४७ वर पोहोचली आहे. या संकटाशी सामना करण्यासाठी राज्य सरकारकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, लागण होण्याच्या भीतीनं काही ठिकाणी करोनाच्या ग्रस्तांना व संशयितांना बहिष्काराचा सामना करावा लागत असल्याच्या घटना पुढं आल्या आहेत. त्यामुळं खबरदारी म्हणून करोनाच्या रुग्णांची नावं जाहीर न करण्याची भूमिका सरकारनं घेतली आहे. मात्र, मनसेनं त्यास आक्षेप घेतला होता.
5 वर्षांपूर्वी -
अमित ठाकरेंचा औरंगाबाद मध्यवर्ती कार्यालयात महाराष्ट्र सैनिकांशी थेट सुसंवाद
शिवजयंतीच्या निमित्ताने राज ठाकरे आणि अमित ठाकरे औरंगाबादमध्ये आले होते. काल राज ठाकरे यांचा सकाळचा कार्यक्रम आटोपल्यावर संध्याकाळी शिव जयंतीच्या निमित्ताने अमित ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली औरंगाबादमध्ये मिरवणूक काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचं एकाप्रकारे हे जोरदार शक्तिप्रदर्शन मानले गेले. परंतु, तत्पूर्वी पोलिसांनी शिवजयंतीच्या मिरवणुकीला परवानगी नाकारली होती, मात्र त्यानंतर काही अटींवर आणि खबरदारी घेण्याचा सूचना देत परवानगी देण्यात आली.
5 वर्षांपूर्वी -
शिवजयंती ३६५ दिवस साजरी व्हायला हवी; आपले सर्व सण तिथीनुसारच
औरंगाबादमध्ये आज मनसेचा शिवजयंती उत्सव सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनी, ३६५ दिवस शिवजयंती साजरी व्हायला हवी असं म्हटलंय. कोणताही सण तारखेनुसार नसतो. हिंदू संस्कृतीनुसार तिथीनुसार सर्व सण साजरे होत असतात. शिवजयंती हा एक सण आहे. त्यामुळे हा सणही तिथीनुसारच साजरा केला जावा, असं राज ठाकरे म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
औरंगाबाद: रॅलीला परवानगी नाकारली; पण उद्या शिवजयंती साजरी होणारच: राज ठाकरे
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसने आता महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक ठिकाणच्या यात्रा आणि सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यातच आता औरंगाबाद महानगर पालिकेची निवडणूक पुढे ढकण्याची मागणी करण्यात आली आहे. खुद्द महापौरांनीच ही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. येत्या एप्रिल महिन्यात औरंगाबाद महापालिकेची मुदत संपणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाच्या नावाने लोकांना का घाबरवत आहात: राज ठाकरे
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसने आता महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक ठिकाणच्या यात्रा आणि सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यातच आता औरंगाबाद महानगर पालिकेची निवडणूक पुढे ढकण्याची मागणी करण्यात आली आहे. खुद्द महापौरांनीच ही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. येत्या एप्रिल महिन्यात औरंगाबाद महापालिकेची मुदत संपणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
ब्लॅकमेल करण्याचे प्रकार करू नका...हे बरे झाले: शिवसेना
राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या कामाचे वाभाडे काढण्यासाठी मनसेच्या शॅडो मंत्रिमंडळाच्या निर्णयाचेच शिवसेनेने बुधवारी वाभाडे काढले. मनसेच्या शॅडो मंत्रिमंडळाच्या निर्णयावर शिवसेनेने कडाडून टीका केली. राज्यात १०५ आमदारवाल्यांनी शॅडो मंत्रिमंडळ तयार केले नाही. पण एकमेव आमदारवाल्यांनी शॅडो मंत्रिमंडळ तयार केले असे सांगत नाव न घेता मनसेवर टीका करण्यात आली.
5 वर्षांपूर्वी -
पुन्हा ‘शॅडो’वाल्यांचे मुख्यमंत्रीपद रिकामेच; शिवसेनेकडून मनसेची खिल्ली
राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या कामाचे वाभाडे काढण्यासाठी मनसेच्या शॅडो मंत्रिमंडळाच्या निर्णयाचेच शिवसेनेने बुधवारी वाभाडे काढले. मनसेच्या शॅडो मंत्रिमंडळाच्या निर्णयावर शिवसेनेने कडाडून टीका केली. राज्यात १०५ आमदारवाल्यांनी शॅडो मंत्रिमंडळ तयार केले नाही. पण एकमेव आमदारवाल्यांनी शॅडो मंत्रिमंडळ तयार केले असे सांगत नाव न घेता मनसेवर टीका करण्यात आली.
5 वर्षांपूर्वी -
औरंगाबाद: मनसेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधवांना अटक होण्याची शक्यता
औरंगाबादच्या राजकीय वर्तुळातील चर्चेत असणारं आणि दबदबा असणारं नाव म्हणजेच हर्षवर्धन जाधव यांना अटक होण्याची शक्यता आहे. ऍट्रॉसिटी प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. जाधव यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आल्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही क्षणी अटकेची कारवाई होऊ शकते. सध्या ते त्यांच्या निवासस्थानी नसल्याचं कळत असून, त्यांचा शोधही घेतला जात आहे.
5 वर्षांपूर्वी