Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Maharashtra Health Department Exam 2021 | आरोग्य विभाग परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर
आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर राज्यातील विद्यार्थ्यांनी मनस्ताप व्यक्त केला होता. आज दुपारी 2 ते 3 तास बैठक झाली त्यामध्ये 24 ऑक्टोबर गट क ची परीक्षा तर गट ड साठी 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा घेण्याचा निर्णय झाल्याची माहिती माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. या दोन्ही दिवशी रविवार असल्यानं शाळा उपलब्ध होतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. परीक्षेच्या तयारीसाठी डॅशबोर्ड द्यावा, परीक्षा केंद्रांची माहिती, उपलब्ध शाळांची माहिती 1 ऑक्टोबरपर्यंत द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
केवळ बदनामीचं अजब राजकारण? | आरोग्य विभागाच्या ज्या परीक्षा झाल्याचं नाहीत, त्यातही फडणवीसांना 'दलालीची' शंका
आरोग्य विभागाच्या गट-क आणि ड संवर्गातील ६२०५ पदांची लेखी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय अचानक घेतला. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भातली माहिती दिली. तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा पुढे ढकल्याचे त्यांनी न्यासा या संस्थेवर परीक्षा रद्द होण्याचे खापर फोडले आहे. न्यासाही संस्था असमर्थ ठरल्यानेच परीक्षा रद्द करावी लागली असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र सरकारच्या या गोधळाच्या कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसला असून त्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
4 वर्षांपूर्वी -
न्यासा ही संस्था असमर्थ ठरल्यानेच आरोग्य विभागाची परीक्षा रद्द करावी लागली - आरोग्यमंत्री राजेश टोपे
आरोग्य विभागाच्या गट-क आणि ड संवर्गातील ६२०५ पदांची लेखी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय अचानक घेतला. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भातली माहिती दिली. तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा पुढे ढकल्याचे त्यांनी न्यासा या संस्थेवर परीक्षा रद्द होण्याचे खापर फोडले आहे. न्यासाही संस्था असमर्थ ठरल्यानेच परीक्षा रद्द करावी लागली असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र सरकारच्या या गोधळाच्या कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसला असून त्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
4 वर्षांपूर्वी -
शासनाने ठरवून दिलेल्या नियमात राहूनच गणेशोत्सव साजरा करा | आरोग्यमंत्र्यांचं आवाहन
शासनाने ठरवून दिलेल्या नियमात राहूनच गणेशोत्सव साजरा करा, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. यावर्षी गणेश मंडळांनी संख्या न वाढवता जुन्याच गणेश मंडळांनी गणेश मूर्तीची स्थापना करावी, असे आवाहनही टोपे यांनी केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
पूरग्रस्त भागात लसीकरण वाढवणार | फडणवीसांना सोबत घेऊन केंद्राकडे अधिक लसीची मागणी करणार
महाराष्ट्र ४-५ दिवसांत दहा लाख कोरोना प्रतिबंध लस मिळते. ती रोज मिळायला हवी. सध्या दोन तीन लाख मिळत आहेत,आम्ही केंद्राकडे जास्तीत जास्त लस मागणी करणार आहोत. त्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेबांना घेऊन भेटायला जाणार आहोत”, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते पुण्यात बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | राज्यात यापुढे कुणालाही होम आयसोलेशन ठेवण्यात येणार नाही - आरोग्यमंत्री
होम आयसोलेशनमध्ये असलेले अनेक कोरोना रुग्ण बाहेर फिरत असल्याचं दिसत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने होम आयसोलेशनबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात या पुढे कुणालाही होम आयसोलेशन ठेवण्यात येणार नाही. रुग्णाला आता कोविड सेंटरमध्येच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रासाठी कर्नाटकातून येणारा ऑक्सिजन केंद्र सरकारने थांबवला - आरोग्यमंत्री
राज्यातील कोरोनास्थिती आव्हानात्मक आहे. त्यातच आरोग्य यंत्रणेवर देखील मोठा ताण आहे. अगदी लसींपासून ऑक्सिजनच्या पुरवठ्यापर्यंत सगळ्याच गोष्टींचा तुटवडा आहे. या गंभीर स्थिती केंद्र सरकारकडून राज्याला ऑक्सिजन पुरवला जात असताना आता राज्य सरकारपुढे एक अडचण निर्माण झाली आहे. कारण, केंद्राकडून महाराष्ट्रात येणारा ५० मेट्रीक टन ऑक्सिजन साठा कर्नाटकातच रोखण्यात असल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Maharashtra Vaccination | राज्यात 1 मे पासून लसीकरण होणार नाही - आरोग्यमंत्री
राज्याला मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे 1 पासून राज्यात लसीकरण सुरू होणार नाही, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे येत्या 1 मे रोजी राज्यातील 18 वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्तीत राज्यभर दौरे, आरोग्यमंत्र्यांना जेवणासाठीही वेळ अपुरा, गाडीतच अल्पोपहार घेतला
महाराष्ट्रातील कोरोना स्थिती गंभीर असून सरकार, आरोग्य यंत्रणा ही स्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे सध्या राज्याला पुन्हा फीट बनवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळेच टोपेंना आपल्या बिझी शेड्यूलमधून जेवणासाठीही वेळ मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्याचे कारण असे की, औरंगाबाद विमानतळावर गाडीत बसून अल्पोपहार घेतानाचा राजेश टोपे यांचा व्हिडीओ समोर आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
जनतेसाठी राज्य सरकार केंद्र सरकारच्या पाया पडायलाही तयार | पण लोकांना ऑक्सिजन उपलब्ध करून द्या - आरोग्यमंत्री
देशात बुधवारी ३.१४ लाख नवे कोरोना रुग्ण आढळले. १५ महिन्यांच्या कोरोना काळात एखाद्या देशात एक दिवसात आढळलेल्या रुग्णांच्या तुलनेत ही संख्या सर्वात मोठी आहे. एवढेच नव्हे, बुधवारी देशात २,१०१ रुग्णांचा मृत्यू झाला. ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या असली तरी अमेरिकेच्या तुलनेत ती निम्मी आहे. देशात नव्या रुग्णांची संख्या १ वरून ३ लाख होण्यासाठी फक्त १५ दिवस लागले. या काळात महाराष्ट्रासह इतर राज्यांतही संसर्ग वेगाने वाढला. ६ एप्रिलला देशात १ लाख रुग्ण आढळले तेव्हा त्यात महाराष्ट्रातील ४८% रुग्ण होते.
4 वर्षांपूर्वी -
१९-२० एप्रिल नंतर रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होईल - डॉ. राजेंद्र शिंगणे
राज्यात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे आरोग्य यंत्रणा कोलमडत असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्ससह रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी करोनाबाधितांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील रेमडेसिवीरचा साठा वाढण्यासंदर्भात एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर अन्न व प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पत्रकारपरिषदेत बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
लोकांना पूर्व कल्पना देऊनच लॉकडाउनचा निर्णय होईल | पण लोकांनी मानसिकता ठेवायला हवी
महाराष्ट्रातील वाढती कोरोना रूग्ण संख्या पाहता लॉकडाऊनची वेळ आल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सर्वपक्षीय बैठकीत केले होते. त्यानंतर त्यांच्या बैठकांचा सपाटा सुरुच आहे. दरम्यान ,राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार असल्याचे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही दिले आहेत. तसेच, जनतेने लॉकडाऊनची मानसिकता ठेवा असा गंभीर इशाराही दिला आहे. आज (१२ एप्रिल) पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
आरोग्यमंत्र्यांनी दिली लॉकडाऊनबाबत प्राथमिक माहिती | अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांकडे
राज्यात कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत चालली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करणं हाच पर्याय असल्याचं काल सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. राज्यात लॉकडाऊन हा कमीत कमी 15 दिवसांचा असेल. लॉकडाऊनची सर्वांच्या मनाची तयारी झाली आहे. अंतिम निर्णय दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्री घेतील, असं टोपे यांनी सांगितलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्राचे सुपुत्र असल्याने राज्याची प्रतिमा मलिन होणार नाही याची दक्षता घ्याल ही माफक अपेक्षा - राजेश टोपे
सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर लसीचा तुटवडा जाणवत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राज्य सरकारवर आरोप केले होती. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सर्व आरोप फेटाळत स्पष्टीकरणही दिले. दरम्यान केंद्रीय माहिती व दूरसंचार मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला होता. आता याला राजेश टोपेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना लसीच्या वाटपात गैरव्यवस्थापन | आरोग्यमंत्र्यांनी दिली गुजरात आणि महाराष्ट्रातील आकडेवारी
आज महाराष्ट्रात सातारा, सांगली, पनवेलला लसीकरण बंद पडलं आहे. बुलढाण्यात फक्त आजच्या दिवसाचा साठा आहे. आपण लसीकरण केंद्र देखील वाढवले आहेत. हर्ष वर्धन यांच्या बोलण्यावरून जाणवत नाहीये की त्यांना जाणीवपूर्वक विरोध करायचा आहे. पण देशभरात ५० टक्के रुग्ण असणाऱ्या राज्याला ७.५ लाख आणि इतरांना जास्त डोस का?”, असा सवाल टोपेंनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
सध्या लॉकडाउनचा विचार नाही, पण यंत्रना सज्ज ठेवणं सरकारचं काम - आरोग्यमंत्री
महाराष्ट्रात तुर्तास लॉकडाऊन करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र, आपली सर्व चर्चा त्याच दिशेने सुरु आहे. पण याचा अर्थ राज्यात लॉकडाऊन लागेलच, असा नाही. मात्र राज्य सरकारला तशी तयारी करुन ठेवणे हे गरजेचे असते, असे वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना लसीकरण | राज्यात कोणत्या व्यक्तींना कोरोनावरील लस मिळणार नाही?
राज्यात कोरोनाचं लसीकरण 16 जानेवारीपासून सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता सीरम इंन्स्टिट्यूटकडून राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये लसीचे डोस पोहोचवले जात आहेत. कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या या लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील मोहिमेत कोणाला सर्वात आधी लस मिळणार ती कोणाला देऊ नये आणि कसं असेल नियोजन याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात ६ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा | तरुणांना रक्तदान करण्याचं आवाहन
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना लशीबाबत एक गुड न्यूज दिली आहे. कोरोना लशीला अधिकृत परवानगी मिळण्यासाठी सिरम कंपनीने केंद्राकडे परवानगी मागितली, या परवानगीकडे डोळे लागले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (State Health Minister Rajesh Tope) यांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कुणी कितीही लॉबिंग करा | पहिल्यांदा डॉक्टर आणि पोलिसांना कोरोना लस देणार
संपूर्ण जग आज कोरोना लस केव्हा उपलब्ध होणार याची वाट पाहत आहे. दुसरीकडे कोरोनावरची लस सर्वात आधी आपल्याला मिळावी यासाठी लॉबिंग सुरू आहे. मात्र हे लॉबिंग करणाऱ्यांना राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी उत्तर दिलं आहे. कुणी कितीही लॉबिंग तरीही डॉक्टर आणि पोलिसांना सर्वात आधी लस देणार असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
आरोग्य विभागाच्या घोटाळ्याच्या प्रश्नावर राजेश टोपेंकडून फडणवीसांना उत्तर
केंद्र सरकारकडून प्राप्त होत असलेल्या निधीतून राष्ट्रीय आरोग्य मिशनची अंमलबजावणी राज्य सरकारमार्फत करण्यात येते. यात सेवेत कायम नियुक्त्या देण्याच्या नावाखाली सुमारे ४०० कोटींचा आर्थिक गैरव्यवहार होत असल्याची तक्रार माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र पाठवून केली होती. तसंच यासंदर्भात याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी पत्राद्वारे केली आहे.
5 वर्षांपूर्वी