Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
कोरोना चाचणीसाठी आता ९८० रुपये दर निश्चित | आरोग्यमंत्र्यांची माहिती
राज्यात खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठीचे (Corona Test) दर पुन्हा एकदा सुधारीत करण्यात आले असून प्रति तपासणी सुमारे २०० रुपये कमी करण्यात आले आहे. त्यामुळे आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी ९८०, १४०० आणि १८०० रुपये असा कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक दर खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार नाही. ४५०० रुपयांवरुन ९८० रुपयांपर्यंत इतके कमी दर निश्चित करुन सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी आज (२६ ऑक्टोबर) सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना रुग्णाला प्रचंड बिल | E-Mail करा सरकारच्या लेखा परीक्षकाला | तपासून घ्या
राज्यातील सर्व खासगी व धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांमधील शासनाने दर नियंत्रीत केलेल्या 80 टक्के खाटा कोरोना व अन्य रुग्णांच्या उपचारासाठी राखीव ठेवण्याच्या महत्वपूर्ण निर्णयाला राज्य शासनाने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. यासंदर्भात सोमवारी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या स्वाक्षरीने सुधारीत अधिसूचना काढण्यात आली आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाच्याबाबतीत महाराष्ट्राने देशात दिशादर्शक काम केले आहे - आरोग्यमंत्री
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुण्यात निर्माण झालेली परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल, असे वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. ते शुक्रवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी राजेश टोपे यांनी सांगितले की, सध्याच्या घडीला पुण्यात कोरोना रुग्णांसाठी बेडची अडचण नाही. परंतु, आम्ही ऑक्सिजन आणि आयसीयू बेडस वाढवण्यावर भर देत असल्याचे टोपे यांनी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
श्वसनासंबंधी २० आजारांसाठी मोफत उपचार | शुल्क आकारल्यास हॉस्पिटलला पाचपट दंड
महात्मा ज्योतिबा फुले जनारोग्य योजनेबाबत सरकारने विशेष आदेश जारी केले आहेत. श्वसनासंबंधित 20 आजारांसाठी मोफत उपचार करण्याच्या सूचना रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
ईश्वर हा सर्वत्र आहे | त्यामुळे धार्मिक स्थळांबाबत थोडी सबुरी बाळगू - आरोग्यमंत्री
राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे धार्मिक स्थळं बंद आहेत. पण राज्य अनलॉकच्या टप्प्यात असताना मंदिरं का उघडण्यात आली नाही? असा सवाल थेट मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थितीत केला. त्यानंतर आता मशिदी पुन्हा उघडण्याच्या मागणीसाठी पालकमंत्री अस्लम शेख हे पुढे आहेत. मुंबईतील धार्मिक स्थळं पुन्हा सुरू करण्याबाबत सरकार गांभीर्यानं विचार करीत असून लवकरच याबाबतचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना चाचणीचे दर आणखी कमी केले | आरोग्यमंत्र्यांची माहिती
राज्यात कोरोना चाचण्यांसाठीचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले असून प्रति तपासणी ३०० रुपये कमी करण्यात आले आहे. त्यामुळे आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी १९००, २२०० आणि २५०० रुपये असे कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक दर खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
न घाबरता बाहेर पडा, कोरोनाबाबत अधिक शिक्षित व्हा - आरोग्यमंत्री राजेश टोपे
कोरोनाचे संकट जरी असले तरी कोणीही घाबरुन जाऊ नये. नेहमी घबरदारी घेतली पाहिजे. आता आपल्याला कोरोनासोबत जवीनशैलीत बदल करायला हवा. कोरोनाला घाबरुन नका तर कोरोनाला समजून घ्या. कोरोनाबाबत अधिक शिक्षित झाले पाहिजे, असे सांगत कोरोना मृत्यूदर रोखणे मुख्य लक्ष्य आहे, असे मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले. टोपे हे ‘झी २४ तास’च्या ‘ ई-संवाद – महाराष्ट्र एक पाऊल पुढे’ याखास कार्यक्रमात बोलत होते.
5 वर्षांपूर्वी